१ ऑगष्ट….. लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती….
लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे जनक, गणितज्ज्ञ, खगोलतज्ज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्य सेनानी होते.
लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. अशा या लोकमान्यांची १ ऑगस्ट रोजी पुण्यतिथी.
त्यांचा जन्म रत्नागिरीजवळ चिखली या गावी झाला.
लो. टिळक लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते.
इंग्रजांचे अंधानुकरण करणाऱ्या भारतीयांबद्दल टिळकांना चीड होती.
तत्कालीन भारतीय नेतृत्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा, याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते---
१. इंग्रजांशी जुळवून घेऊन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे. ही मवाळवादी विचारसरणी होती.
२. इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करून वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे. ही जहालवादी विचारसरणी होती.
टिळक जहालवादी होते.
लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल
यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. त्यामुळे या त्रिपुटीला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले. यांनीच जहालवादी प्रवाहाचे नेतृत्व केले.
ब्रिटिश साम्राज्यविरोधात संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते.
म्हणूनच लोकमान्य टिळकांनी संशोधनाची आवड असूनसुद्धा एल.एल.बी करण्याचा निर्णय घेतला.
तसेच समाजपरिवर्तन शिक्षणाशिवाय अशक्य आहे, असे लोकमान्य टिळक व त्यांचे जवळचे मित्र गोपाळ गणेश आगरकर यांचे मत होते.
दोघेही त्या काळात राष्ट्रप्रेमाने भरलेले होते. ते त्या काळात युरोपीय लेखकांची राजनीती, अर्थशास्त्र व सामाजिक परिवर्तनावरील पुस्तके वाचत होते.
1880 रोजी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. यानंतर 1881 मध्ये इंग्रजी भाषेतून मराठा तर मराठी भाषेतून केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली.
त्यानंतर 1884 रोजी पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली तर 1885 रोजी फर्ग्युसन कॉलेज सुरू केले.
अशा ह्या लोकमान्यांचा 1 ऑगस्ट 1920 रोजी मृत्यू झाला.
वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणारे अण्णाभाऊ साठे (तुकाराम साठे) यांची १ ऑगस्ट रोजी पुण्यतिथी.
इसवी सन 1950 ते 1962 हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ.
अण्णाभाऊंनी आपल्या अनेक कथांमधून सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, धार्मिक समस्यांना तोंड फोडले. समाजातील वास्तव अण्णाभाऊंनी आपल्या कथा , कादंबऱ्यांमधून समाजासमोर मांडले.
त्यांच्या फकीरा या कादंबरीमध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना वाटप करणाऱ्या फकीरा या लढाऊ तरुणाचे चित्रण त्यांनी केले आहे.
अण्णाभाऊ साठे यांची छक्कड (लावणीचा एक प्रकार) माझी मैना गावाकडे राह्यली या काव्यरचनेमुळे अण्णाभाऊंचे नाव मराठी साहित्यात अविस्मरणीय असेल. भारतीय चळवळीत, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले.
प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वतःचे वैयक्तिक जीवन मात्र धकाधकीचे होते.
अशा या लोकशाहीराने 35 कादंबऱ्या, 8 पटकथा,
3 नाटके, 1 प्रवासवर्णन (रशिया प्रवास), 13 कथासंग्रह, 14 लोकनाट्य, 10 प्रसिद्ध पोवाडे आणि 12 उपहासात्मक लेख लिहिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा