इयत्ता ११ वी - (इतिहास) - प्रकरण २

              विषय - इतिहास   

         इयत्ता ११ वी  (२०२०-२१)

                                  प्रकरण २ रे     

            भारतातील आद्य नगरे 

  • आत्तापर्यंत देशी-विदेशी विद्वानांमध्ये असा  एक समज होता की, जगातील प्राचीन संस्कृती फक्त  मेसोपोटेमिया,इजिप्त,  चीन या भागातच नांदल्या असाव्यात.

  • भारतीयांना वैदिक संस्कृतीपेक्षा जुना सांस्कृतिक वारसा नाही,असा एक मतप्रवाह होता.

  •  मात्र इ.स.1921 मध्ये हडप्पा येथे तर,सन १९२२  मध्ये मोहेंजोदडो येथील उत्खननानंतर वरील दोन्ही समजुतींना धक्का बसला.

  • सिंधू संस्कृतीचा शोध आणि भारतीय इतिहास संशोधकांना काळाच्या ओघात हरवलेले एक प्राचीन सोनेरी पान सापडले. त्यातून हे सिद्ध झाले की भारतालाही इतर देशांप्रमाणे प्राचीनतम सांस्कृतिक वारसा आहे.

  • इतर प्राचीन संस्कृतीप्रमाणे त्यांच्या समकालीन असलेली एक समृद्ध, परिपक्व संस्कृती भारतात नांदत होती. किंबहुना वरील सर्व प्राचीनतम संस्कृतीपेक्षा सिंधू संस्कृती इतरही बाबतीत अधिक वरचढ दिसते.

  • सिंधू/ हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे भारताचा इतिहास इसवी सनापूर्वी किमान 3000 ते 3500 पर्यंत मागे जातो. 

  • या संस्कृतीचा विस्तार  भारतीय उपखंडात  अफगाणिस्थानापासून  महाराष्ट्र पर्यंत आणि मकरानच्या किनाऱ्यापासून हरियाणापर्यंत 15 लाख  चौरस किलोमीटरच्या प्रदेशात झाला होता.

  • हडप्पा संस्कृती ही एक  विकसित नागरी संस्कृती  होती. ही संस्कृती कांस्ययुगीन होती.

  • या नागरी संस्कृतीची बिजे बलुचिस्तानातील  मेहेरगढ येथील हडप्पा पूर्व काळातील  नवाश्मयुगीन संस्कृतीत सापडतात.

  • जॉन  फ्रॅन्क्वा जॅरीज आणि रीचर्ड मेडो या पुरातत्वज्ञानी मेहरगढ  येथे उत्खनन केले.

  • मेहेरगढ  याठिकाणी हडप्पा संस्कृतीच्या  उदयाच्या खुणा दर्शवणाऱ्या नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष  मिळाले. त्या संस्कृतीला ‘टोगाओ संस्कृती’ या नावाने ओळखले जाते.

  • हडप्पा पूर्वकाळातील नवाश्मयुगीन ‘रावी किंवा हाक्रा’  संस्कृतीचे अवशेष  हडप्पा (पंजाब, पाकिस्तान) ,तसेच  कुणाल, भिराना, फरमाना (हरियाणा) इत्यादी स्थळांच्या उत्खननात मिळाले.हडप्पा संस्कृतीची २००० पेक्षा जास्त स्थळे उजेडात आहेत.

  • या नगरांचा इतिहास तीन कालखंडात  विभागलेला दिसतो.

           १.पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ-- हडप्पा संस्कृतीच्या  सुरुवातीचा टप्पा.

           २. प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ-- हडप्पा नागरी( प्रगल्भ) संस्कृतीचा संपूर्ण विकसित       टप्पा.

           ३. उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ--प्रगल्भ संस्कृतीच्या  उत्तरणीनंतरचा काळ.

                                ही  नगरे वसवणारे लोक कोण होते, हे कोडे मात्र अजून सुटलेले नाही. 

 हडप्पा, मोहेंजोदडो, कालीबंगन, लोथल, धोलवीरा, राखीगढी  या स्थळांच्या उत्खननातून हडप्पा संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष पटते .


  •  हडप्पा संस्कृतीच्या नगरांची  वैशिष्ट्ये

 प्रश्न- हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा.

१. सुव्यवस्थित नगररचना   २.  मध्यवर्ती शासनव्यवस्था    ३. समाजव्यवस्था      ४. आर्थिक व्यवस्था.

१. सुव्यवस्थित नगररचना--

  •  हडप्पा संस्कृतीतील नगररचना वैशिष्ट्यपूर्ण होती. नगराचे दोन विभाग, प्रत्येक विभागाला तटबंदी, एकमेकांना काटकोनात जाणारे प्रशस्त रस्ते आणि मोकळ्या चौकोनी जागांचा रहिवासी  घरांसाठी उपयोग.

  • पक्क्या विटांचे बांधकाम केलेले स्नानगृह, स्वच्छतागृह, विहिरी यासारख्या सोयींनीयुक्त  विशाल घरे, धान्याची कोठारे, सार्वजनिक स्नानगृहे,उत्तम मलनिस्सारण व्यवस्था, सार्वजनिक स्वरूपाच्या भव्य इमारती. विटकाम करताना वापरलेली इंग्लिश बाँड पद्धत.

 २. मध्यवर्ती शासनव्यवस्था-

  •  प्रशासकीय कामासाठी निवासी स्वतंत्र आणि भव्य इमारती.

  • व्यापारावर मध्यवर्ती शासनव्यवस्थेचे  नियंत्रण होते.

  •  वजन,मापे शासन व्यवस्थेकडून प्रमाणित केलेली असत.

  •  पाणी आणि इतर साधनसंपत्तीचे स्रोत यावर मध्यवर्ती शासन व्यवस्थेचे नियंत्रण होते. 

३.समाजव्यवस्था--

  •  अधिकारानुसार समाजरचना होती, उतरंडीसारखी  होती.

  • समाजात कुशल कारागिरांचे व्यवसायिक वर्ग अस्तित्वात होते.

  • श्रध्द्धेनुसार वस्तू आणि वास्तूंची  रचना होती.

           मृत्यूनंतरचे विधीकर्म करण्यासाठी दफनस्थळे अस्तित्वात होती.

४. आर्थिक व्यवस्था-- 

  • व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंची मोठ्या प्रमाणावर  उत्पादन होत असे.उदा. सुबक  मातीची भांडी, सोने-चांदी, तांबे, आणि कांसे इ.धातू यांच्या वस्तू सौंदर्यपूर्ण मणी, मूर्ती इ.

  •  उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने आणि कारागिर यांच्या वस्तीचा स्वतंत्र विभाग असे.

  •  अंतर्गत आणि अन्य वसाहतींशी असलेला भरभराटीचा व्यापार.

  • व्यापारावर मध्यवर्ती शासकीय यंत्रणेचे नियंत्रण असे.

  • मुद्रांवर आढळणारी  लिपी विकसित लेखन कलेचा उदाहरण होय.

  • हडप्पा संस्कृतीची काही नगरे-- 

 सकारण स्पष्ट करा---    प्रश्न--उत्खननामध्ये सापडलेले अवशेष हडप्पा, मोहेंजोदडो, कालीबंगन,लोथल, धोलावीरा, राखीगढी  संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष देतात.

  •  हडप्पा आणि अन्य ठिकाणी झालेल्या उत्खननात या संस्कृतीतील लोकांची  घरे, रस्ते, तटबंदी यांचे अवशेष सापडले त्यावरून त्यांच्या उत्कृष्ट नगररचनेचे दर्शन होते.

  •  बंदर,गोदी यांच्या अवशेषातून त्याचे उत्कृष्ट अभियांत्रिकीचे  ज्ञान आणि व्यापारातील भरभराट जाणवते.

  • पाणी साठवण्याच्या तलावाच्या अवशेषावरून या लोकांच्या जलव्यवस्थापनाचा प्रत्यय येतो.

  •  मातीची नक्षीदार भांडी, मणी, शेतीची अवजारे, दैनंदिन वापरातील इतर वस्तू या सर्वांच्या अवशेषांवरून या लोकांचे व्यवसाय, उत्कृष्ट कारागिरी, कौशल्य दिसून येते.

  •  हडप्पा आणि अन्यत्र झालेल्या उत्खननातून मिळालेले अवशेष या संस्कृतीतील  लोक उद्योग, घरबांधणी, नगर नियोजन व इतर कौशल्य ह्या बाबतीत प्रगत होते.


१. हडप्पा--

  • पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सहिवाल केल्यात रावी नदीच्या काठावर हडप्पा  हे स्थळ आहे.

  • हडप्पा नगराचे प्राचीन अवशेष 150 हेक्टर क्षेत्रावर पसरले होते.

हडप्पा संस्कृतीचा शोध- विस्तार--

  •  हडप्पा संस्कृतीचे विस्तृत उत्खनन इसवी सन  १९२१ मध्ये सुरू झाले. त्यानंतर तिथे पुन्हा उत्खनने केली.

  •  पुरातत्व खात्याचे सर संचालक सर मार्टीमर व्हीलर यांनी  १९४६ मध्ये स्तरशास्त्राच्या आधारे उत्खनन केले. 

  • यावेळी त्यांनी हडप्पा येथील किल्ल्याभोवतीची तटबंदी शोधली.

  •  या अगोदर इसवी सन १८२९ मध्ये  चार्लस मेसन या प्रवाशाने हडप्पाला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी हे प्राचीन अवशेष स्वराज्याचे असावेत असे मत मांडले होते.

  • हडप्पा येथे पूर्व हडप्पा संस्कृतीची पहिली गाव वसाहत इसवी सनापूर्वी ३३००  सुमारास झाली.

  • लेफ्टनंट अलेक्झांडर यांनी  भेट दिली आणि वृत्तांत लिहिले. 

  • भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक सर अलेक्झांडर कॅनिंग हेम यांनी  इसवी सन१८७२-७३  मध्ये हडप्पा येथे उत्खनन केले होते. 

  • त्यानंतर ४८ वर्षांनी हडप्पा येथे सन १९२१  मध्ये उत्खनन झाले.हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमिया संस्कृतीशी जवळचा संबंध आहे,असे अभ्यासकांना वाटत होते.

 हडप्पा संस्कृतीचे तीन टप्पे--

१. हडप्पा पूर्व गाव-वसाहत  (इसवी सन पूर्व ३३००)

२. नागरी हडप्पा संस्कृती  ( इसवी सन पूर्व २६००)

३. उत्तर हडप्पा संस्कृती   ( इसवी सन पूर्व १९०० )

         उत्खननात सापडलेल्या अवशेषांच्या आधारे प्रारंभीच्या काळातील हडप्पा नगराचे बालेकिल्ला व नगर वसाहत असे दोन विभाग मानले जात होते. अलीकडील संशोधनात तिथे चार विभाग होते--

 १.बालेकिल्ला      २.  नगर वसाहत     ३.  नगराच्या आग्नेय दिशेला कारागिरांचे कारखाने    ४. उ

त्तरेला धान्याची कोठारे आणि तेथील कामगारांची घरे.


२. मोहेंजोदडो--

  • पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लारकाना जिल्ह्यातील सिंधू नदीच्या काठावर हे स्थळ वसलेले होते.

  • राखालदास बॅनर्जी यांनी इसवीसन १९२१-२२ मध्ये मोहेंजोदडो येथे उत्खनन सुरू केले.

  •  या उत्खननात सापडलेल्या  मुद्रा आणि  इतर पुरावस्तू यांच्यामधील साधर्म्यामुळे मेसोपोटेमियातील प्राचीन संस्कृती आणि हडप्पा संस्कृती यामध्ये परस्परसंबंध असावेत, असे अनुमान काढले. 

  •  इसवी सन १९२३-२४  मध्ये अधिक सविस्तर पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व खात्याचे तत्कालीन संचालक सर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली माधव स्वरूप वत्स, काशिनाथ नारायण  दीक्षित, अर्नेस मके यांनी विविध पुरावस्तू, रहिवासी घरे आणि इतर वास्तू उजेडात आणल्या.

  •  मोहेंजोदडो हडप्पा संस्कृतीतील नगरांपैकी  सर्वात मोठे नगर आहे.

  •  या नगराचे बालेकिल्ला आणि नगर वसाहत असे दोन तटबंदीयुक्त भाग मानले जात होते.

  • पण याशिवाय तिसरा विभाग बाजाराचा होता त्यामध्ये कारागिरांच्या कार्यशाळा, मातीची भांडी आणि मणी भाजण्याच्या भट्ट्या होत्या.

  •  मोहेंजोदडो येथील उत्खननातून  उजेडात आलेली घरे, मोठ्या इमारती, रस्ते यावरून या नगराचची  भव्यता स्पष्ट होते.

  • पूर्व नियोजनाची  आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाची साक्ष पटते.

  • मोहेंजोदडोच्या निर्मितीमधील पुर्व नियोजनाची तुलना चंदीगडसारख्या शहराच्या निर्मितीमधील पूर्वनियोजनाशी करता येईल. या नगराच्या उभारणीमागे खास हेतू असावा असे अभ्यासकांना वाटते.


३.  कालीबंगन--

  •  राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यातील गंगा नदीच्या काठी वसलेले हडप्पा संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र आहे.

  • पीसी टोरी नावाच्या एका इटालियन भाषाशास्त्रज्ञांनी या स्थळाला भेट दिली आणि कालीबंगन हे इतिहास पूर्व काळातील असल्याची नोंद केली.

  •  इसवी सन  १९६०  मध्ये भारतीय पुरातत्व विभागाचे सर्वेक्षण खात्याचे तत्कालीन सहसंचालक ब्रिज बासी लाल ( बी. बी. लाल)  आणि बाळकृष्ण थापर( बी.  के. थापर) यांच्या मार्गदर्शनाखाली  उत्खनन केले गेले.

  •  त्यांनी हडप्पा आणि हडप्पा पूर्व अशा दोन वसाहती उजेडात आणल्या. या नगराचे बालेकिल्ला आणि नागरी वसाहत असे दोन तटबंदीयुक्त विभाग होते.

 कालीबंगनचे वैशिष्ट्य--

१.  नांगरलेल्या शेतीचा पुरावा इसवी सन पूर्व २८००  च्या सुमाराचा आहे. ही नांगरणी सध्याच्या     काळातील नांगरणी प्रमाणे आहे.

२.  बालेकिल्ल्यामध्ये ओळीने सापडलेली सहा ते सात अग्निकुंड.

३.  याशिवाय सर्वसामान्यांच्या नागरी वसाहतींमधील घरांमधून हे अग्निकुंड असल्याचे पुरावे मिळाले     आहेत

४.  नगराच्या तटबंदीच्या बाहेरही ओळीने अग्निकुंड असलेली एक वास्तू होती. त्यामध्ये पशूंची हाडे    होती. पूजेचा पुरावा असावा असे काही पुरातत्त्वज्ञ यांचे मत आहे.


 ४. लोथल--

  •  गुजरातमधील अहमदाबाद पासून 80 कि.मी.वर आहे.

  • कच्छच्या आखाताजवळ भोगाव नदीच्या तीरावर हडप्पा संस्कृतीमधील महत्त्वाचे बंदर आणि व्यापारी केंद्र होते.

  •  हे बाजाराचे ओटे,कोठार आणि गोदी  यावरून दिसून येते.

  •  लोथलच्या गोदीची रचना हे प्राचीन जगतातील अभियांत्रिकीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

  •  येथे इसवी सन  १९५५  ते १९६०  या काळात एस.आर.राव यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन झाले.

  • लोथलचे बालेकिल्ला आणि नागरी वसाहत असे तटबंदीयुक्त विभाग नसून ते एकाच तटबंदीने वेढलेले आहे.

 

५. धोलावीरा---

  • गुजरातमधील कच्छच्या आखातात असलेल्या या नगराचा शोध भारतीय पुरातत्व विभागाचे माजी संचालक जे.पी.जोशी यांनी लावला.

  • इसवी सन१९९०  मध्ये  आर. एस. बिशत  यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन सुरू झाले.

  •  हडप्पा संस्कृतीच्या उत्खनित नगरांमध्ये धोलावीरा चा विस्ताराच्या दृष्टीने पाचवा क्रमांक लागतो. 

  • धोलावीरा येथे हडप्पा पूर्व काळातील वसाहत होती. 

  • तिच्याभोवती कच्च्या विटा आणि  घडीव  दगड वापरून बांधलेली संरक्षक भिंत होती. 

  • तर त्यावरच्या थरात नागरी हडप्पाकालीन तटबंदीयुक्त वसाहत होती. 

  • या नागरी वसाहतीचे चार स्वतंत्र विभाग होते---१. बालेकिल्ला     २.  बालेकिल्ल्याला लागून असलेले अधिकाऱ्यांच्या वस्तीचे राखीव प्रांगण     ३.   सामान्यांची वसाहत  ४.   नगराच्या तटबंदीच्या आत संरक्षक भिंत नसलेली आणखी एक वस्ती होती, ती मजुरांची असावी.

  •  नगराच्या बाहेरून वाहणाऱ्या दोन पोळ्यांचे पाणी अडवून ते पाणी आणि पावसाचे पाणी साठवण्याची सोय केली होती.

  •  दगड आणि विटांचा वापर करून कालवे  आणि तलाव बांधले होते. 

  • नियोजनपूर्वक जलव्यवस्थापनाचा हा सर्वात प्राचीन पुरावा आहे.


६. राखीगडी-

  •  हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील चौटांग (प्राचीन दृशद्वती नदी)  नदीकाठी आहे. 

  • भारत आणि पाकिस्तानातील हडप्पा संस्कृतीच्या स्थळांमध्ये राखीगढी सर्वात मोठे आहे. 

  • राखीगढी येथे इसवीसन  १९६३ मध्ये उत्खनन सुरू झाले. पुढे ते इसवी सन  १९९७  ते २०००  या काळातही सुरू राहिले.

  •  त्यानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजचे संचालक डॉ. वसंत शिंदे यांनीही तिथे उत्खनन केले. 

  • नागरी हडप्पा संस्कृतीची सर्व वैशिष्ट्ये राखीगढी मध्ये पाहायला मिळतात. 

  • येथेही कालीबंगनप्रमाणे अग्निकुंडांचे तसेच दफन स्थळांचे पुरावे मिळालेले आहेत.

  •  राखीगढी येथील मानवी हाडांच्या जनुकशास्त्रीय (DNA) विश्लेषणाच्या आधारे हडप्पा संस्कृतीचे लोक कोण होते,या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेल,असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. 

  • राखीगढीशिवाय हरियाणाच्या  घग्गार  नदीच्या खोऱ्यात तसेच  कुणाल,  भीराणा, फर्माना  गिरवाड  आणि मीठाथल येथील उत्खनित पुराव्यावरून नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळाची सुरुवात इसवी सनापूर्वी ५०००  वर्षांहून अधिक प्राचीन असू शकते.

  •  हे सिद्ध झाले तर हडप्पा संस्कृतीचा उदय घग्गारच्या  खोऱ्यात झाला,असे अनुमान काढता येईल.

  • नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध--

प्रश्न-- हडप्पा संस्कृतीतील नगरे  व गाव-वसाहती यांच्यात परस्पर संबंध होता. (तुमचे मत नोंदवा.)

  •  हडप्पा संस्कृतीमधील नगरे हडप्पा पूर्व काळातील गाव-वसाहतीच्या विकास आणि विस्तारातून उदयास आली.

  •  हडप्पा पूर्व काळातील सर्वच गाव वसाहतींचे रूपांतर मोठ्या किंवा छोट्या नगरांमध्ये झाले नाही. 

  • नागरी  जीवनाच्या गरजा आणि व्यवस्थापनाच्या पूर्ततेसाठी नगरांना गाव-वसाहतीवरच अवलंबून राहावे लागत असे. 

  • नगरातील लोकांना लागणारे अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तू या वसाहतींमधून येत असत. 

  • तसेच नगरातील व्यापारी उत्पादनासाठी लागणारी चिकन माती, विविध प्रकारचे दगड आणि मौल्यवान खडे, विविध धातू इत्यादी कच्चामाल मिळवण्यासाठी नगरांना गाव वसाहतीवरच अवलंबून राहावे लागत असे.

  •  मातीची नक्षीदार भांडी, मौल्यवान दागिने, कापड या गोष्टींसाठी  गाव-वसाहती या नगरांवर अवलंबून असत. 

  • अशाप्रकारे हडप्पा संस्कृतीतील नगर वसाहती यांच्यात  परस्पर संबंध होता.

प्रश्न- लाजवर्दी  दगडांना हडप्पा संस्कृतीच्या व्यापारामध्ये अत्यंत महत्त्व होते. ( सकारण स्पष्ट करा.)

  •  काही गाव-वसाहतीमध्ये फारसे बदल घडले नाहीत. त्यामध्ये दुर्गम प्रदेशातील गाव वसाहतींचा समावेश होतो. 

  • अफगाणिस्तानच्या बदक्शान प्रांतातील  शोर्तुगाय ही हडप्पा संस्कृतीची वसाहत होती.

  • या वसाहतींमध्ये लाजवर्दी / इंद्रनील दगडांच्या खाणी आहेत.

  •  दगडापासून केलेल्या वस्तूंना मेसोपोटेमियामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी होती.

  • मेसोपोटेमियातील महाकाव्यांमध्ये  देवी इनन्नाच्या राजवाड्यातील भिंती लाजवर्दी दगडांनी  सुशोभित केल्याची वर्णने आहेत. 

  • यावरुन हडप्पा संस्कृतीतील लोकांच्या  मेसोपोटेमियाशी असलेल्या व्यापारात लाजवर्दी दगडाला अत्यंत महत्त्व होते. हे सिद्ध होते.

  •   उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था--

  •  उत्पादन--

  • शेतीला सुरुवात झाली तेव्हा मातीची भांडी घडवणे, शेती करणे ही कामे स्त्रियांची होती.

  • स्त्रिया मातीची भांडी हाताने घडवत  होत्या. पेरणीसाठी  टेपरणे वापरत. त्यामुळे उत्पादन कुटुंबापुरतेच होत असे.

  • कालांतराने पूर्व हडप्पा संस्कृतीच्या काळात शेतीकामासाठी आणि वाहतुकीसाठी बैलांचा वापर होऊ लागला. चाकाच्या वापरामुळे मातीची भांडी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात घडविणे शक्य झाले.

  •  नांगरणीसाठी बैलांचा वापर करत असलेल्या नांगराच्या प्रतिकृती हरियाणातील बनावली येथील उत्खननात मिळाल्या आहेत.

  • हडप्पाकालीन नगरांमध्ये कारखान्यांसाठी नगराचा एक स्वतंत्र विभाग राखून ठेवलेला असे. तसेच औद्योगिक स्वरूपाच्या वसाहतीही होत्या. 

  • सिंधमधील चहुन्जोदडो येथील  उत्खननावरून हे स्पष्ट होते.

  •  व्यापार -

             अतिरिक्त धान्य उत्पादनामुळे इतर गरजेच्या वस्तू,धान्याच्या मोबदल्यात घेता येऊ लागल्या. ही विनिमयाचे सुरुवात होती.

  •  धान्याचा विनिमय विशेषतः  मीठ, धातू आणि मौल्यवान गोष्टी मिळवण्यासाठी होत असे.

  •  हडप्पा संस्कृती काळात विनिमयाचे व्याप्ती वाढून आयात-निर्यात  व्यापाराला सुरुवात झाली.

  •  आयात-निर्यात व्यापार भारतीय उपखंडाच्या अंतर्गत आणि मेसोपोटेमिया या दुरवरच्या प्रदेशांशी सुरू झाला.

  • मेसोपोटेमियातील ‘अक्कड’ साम्राज्याची स्थापना सम्राट पहिला सार्गन इ.स.पू. 2334 मध्ये केली. 

  • एका लेखात हडप्पा संस्कृती आणि मेसोपोटेमिया यांच्यातील  व्यापाराचा उल्लेख केला आहे.

  • याकाळत इराण आणि मध्य आशियातून जाणाऱ्या खुष्कीच्या मार्गाचे महत्त्व कमी झाले आणि समुद्री व्यापाराला महत्व आले.

  •  त्यामध्ये दिलमून, मकन आणि मेलुहा अशा तीन प्रदेशांचा उल्लेख आहे.

  • प्रश्न- चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

१.   दिलमुन -  बहरीन

२.   मकन    -  ओमान-   इराण- बलूचिस्तानचा किनारा

३.   शोर्तुगाय -  मेसोपोटेमिया

४.   मेलुहा  -    हडप्पा संस्कृतीचा प्रदेश.

   दुरुस्त  जोडी-- शोर्तुगाय-- अफगाणिस्तानचा  बदक्शान प्रांत. 

मेलुहामध्ये प्राचीन काळी तांबे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.  तांब्याच्या  लाल रंगामुळे मेलुहा  नाव मिळाले असावे.

  • मी लोहा मधून तांबे, हस्तिदंताच्या  वस्तू, इंद्रनील / लाजवर्दी  दगड, गोमेदाचे मणी, कापड,  इमारती लाकूड इ. वस्तू, तर मोर माकडे हे प्राणी मेसोपोटेमिया निर्यात केले जात होते.

  •  इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर निळ्या कापडात गुंडाळले  जाई. 

  • त्यासाठी लागणारे नियम संस्कृतीचे व्यापारी निर्यात करत होते.

  •  निर्यात केलेल्या वस्तूंच्या मोबदल्यात हडप्पा संस्कृतीतील लोकर, सोने,चांदी या गोष्टी मिळत असाव्यात.

  •  व्यवस्थापन--

  • गुजरातमधील कच्छ-सौराष्ट्रमधील व्यापाराच्या  सोईसाठी कुंतासी, नागेश्वर,बगसरा   ही ठाणी  वसविली  होती.

  •  कच्चामाल मिळवणे, उत्पादित  पक्का माल करणे व ्रष्टाचार किनार्‍यावरून बाहेर पाठवणे अधिक सोयीचे होते.

  •  सौराष्ट्रातील हे विस्ताराने  छोटी असलेली ठाणी  औद्योगिक केंद्र होती. धोलवीरा मालाच्या व्यापाराच्या नियंत्रणासाठी उभारणी होते. आलो तर येईन महत्त्वाचे बंद होते.

  • शासन व्यवस्था -

  • प्रश्न-- हडप्पा संस्कृतीतील नग्रह सुसंघटित प्रशासन यंत्रणा असावी.( तुमचे मत नोंदवा.) 

  • हडप्पा संस्कृती  ही नागर संस्कृती होती.  प्रशासन यंत्रणा सुसंघटित होती.

  • विटा, वजन- मापे, मुद्रा, विविध वस्तूंचे आकार आणि  सुशोभीकरण या सर्वच बाबी  उत्तम प्रशासनव्यवस्थेची साक्ष देतात.

  •   प्रशासन यंत्रणेची सूत्रे धर्म प्रमुखाच्या हातात होती असे मानले जाते.

  •   हडप्पाकालीन नगररचना नियोजनपूर्वक केलेली  आढळते. बालेकिल्ला आणि नागरी वसाहत असे नगरांचे दोन भाग असत.

  •  बालेकिल्लामध्ये नगर प्रमुख, प्रशासकीय अधिकारी राहत असत.

  •  दैनंदिन व्यवहार आणि व्यापार यावर मध्यवर्ती प्रशासनाचे नियंत्रण होते.

  •  नगरातील समाज जीवन, धार्मिक व सांस्कृतिक विभाग यांचे व्यवस्थापन मध्यवर्ती प्रशासन यंत्रणेकडेच  असावे.

  •  नगरांचा ऱ्हास -

  •  प्रश्न- हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला.( सकारण  स्पष्ट करा.)

  • उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळात मेसोपोटेमिया ची असलेल्या हडप्पा संस्कृती च्या लोकांचा व्यापार उतरणीला लागला होता.

  •  मेसोपोटेमियाची  आर्थिक संपन्नता  कमी होण्याचा हडप्पा संस्कृतीवरही परिणाम झाला.

  •  इसवी सनापूर्वी  २०००-१९००  त्या सुमाराला नागरी हडप्पा संस्कृतीची घसरण सुरू झाली.

  • हडप्पा संस्कृतीच्या रासाची मुख्यतः व्यापाराची घसरण, हवामानातील बदल, आर्थिक समृद्धीची उतरण ही कारणे दिली आहेत.

  •  हडप्पाकालीन वसाहतीमध्ये लढाया होत असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर झाले असावे.

  •  सतत पीक घेतल्याने पिकाऊ जमिनीचे रूपांतर खारवट होत गेल्याने शेतीचे उत्पादन कमी होत गेले.

  •  सिंधू-सरस्वती नदीच्या खोऱ्यात घडून आलेल्या भूकंपाने या संस्कृतीचे वाताहात झाली असावी.

  •  अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीमुळे, महापूर, नदीच्या प्रवाहात बदल किंवा  एखाद्या बलाढ्य सत्तेच्या  आक्रमणामुळे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला असावा.


                                               ----समाप्त -----

टिप्पण्या