१. युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास
You Tube Video Links - प्रकरण १ - [भाग १]
पार्श्वभूमी -
इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे तीन विभागात विभाजन केले जाते.
इ. स. ४७६ मध्ये रोमन साम्राज्याचा शेवट झाला. तेव्हापासून मध्ययुगाला सुरुवात झाली.
इ. स. १४५३ ला तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर जिंकून घेतले. या घटनेने मध्ययुगाचा शेवट होऊन आधुनिक युगाला सुरुवात झाली. मध्ययुगाला संक्रमणाचा काळ असेही म्हणतात.
vमध्ययुगात धर्मसंस्थेचे प्राबल्य होते. या धर्मसंस्थेचा शास्त्रीय संशोधनाला विरोध होता.
vधर्मग्रंथांमध्ये जे लिहून ठेवले आहे तेच अंतिम सत्य आहे, असा धर्मसंस्ठेचा दृष्टीकोन होता.
vमागासलेली समाजवृत्ती /सामाजिकता आणि धर्मसंस्थेचा अडसर या दोन कारणांमुळे विज्ञानाची प्रगती झाली नव्हती.
प्रबोधन म्हणजे काय ?
vमध्ययुगाच्या अखेरच्या काळात धर्मयुद्धांमुळे युरोपियन जनतेला नव्या जगाचा, त्यांच्या आचार - विचारांचा व संस्कृतीचा परिचय झाला.
v युरोपात प्रबोधन काळात बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य व मानवतावाद इ. मूल्ये रुजली.
vआधुनिक विचारांचा विकास होऊ लागला. त्यामुळेच ग्रंथप्रामाण्यवादापेक्षा बुद्धिप्रामाण्यवादाला महत्व आले.
v१४ व्या शतकातच या व्यवस्थेला तडे जाऊ लागले होते.
vरॉजर बेकन, थॉमस अक्विनस यांसारखे विचारवंत पारंपरिक विचारसरणीवर टीका करू लागले.
v बुद्धिनिष्ठेचे महत्व पटवून देऊ लागले. “जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघा आणि बुद्धीला पटेल तेच मान्य करा”, अशी शिकवण देऊ लागले.
vत्यामुळे समाज धर्मसंस्थेच्या जोखडातून बाहेर पडून विज्ञाननिष्ठ विचार करू लागला.
प्रबोधन म्हणजे--
“प्रबोधन, भौगोलिक शोध आणि धार्मिक सुधारणेची चळवळ या घटनांनी आधुनिक युगाचा पाया घातला गेला, म्हणून या काळाला प्रबोधन काळ असे म्हणतात.”
१५ व्या शतकात म्हणजेच आधुनिक युगाच्या सुरुवातीपासूनच ग्रीक व लॅटिन साहित्य, विज्ञान, कला, तत्वज्ञान व राजकारण या सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आला, म्हणूनच या काळाला प्रबोधन काळ असे म्हणतात .
प्रबोधनाने सर्वांगीण प्रगतीला चालना दिली आणि नवयुगाची सुरुवात झाली .
Ø युरोपातील धर्मयुद्धे (क्रुसेड्स) व त्याचे दूरगामी परिणाम
Ø युरोपातील धर्मयुद्धे (टिप लिहा ) २ गुण.
Ø इ. स. १ ल्या शतकात ख्रिश्चन धर्माचा उदय झाला, तर इ. स. ७ व्या शतकात इस्लाम धर्माचा उदय झाला.
Ø ख्रिश्चन धर्माचा युरोपमध्ये तर इस्लाम धर्माचा आशिया खंडात धर्मप्रसार झाला.
Ø जेरुसलेम (इस्राईल )व बेथेलहॅम (पॅलेस्टाईन )ही दोन शहरे ज्यु , ख्रिश्चन , आणि इस्लाम धर्माच्या अनुयायांसाठी पवित्र आहेत .
Ø ११ व्या-१२ व्या शतकात ही शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात होती.
Ø ही शहरे परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या लढायांना ‘धर्मयुद्धे’ असे म्हणतात.
Ø इ. स. १०९६ ते इ. स. ११८७ (१२७०) या काळात एकूण नऊ धर्मयुद्धे घडून आली.
Ø तरी जेरुसलेम व त्याच्या आसपासचा प्रदेश इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात होता.
धर्मयुद्धांना पाठिंबा देण्यामागचा हेतू -
vधर्मयुद्धाच्या कल्पनेने सामान्य जनता भारावून गेली होती . याचवेळी ख्रिस्ती धर्मगुरू पोप यांनी धर्मयुद्धामध्ये सर्व जनतेने सहभागी व्हावे यासाठी पापक्षालनासंदर्भात विशेष सवलती जाहीर केल्या.
vपापक्षालन म्हणजे -पापातून मुक्ती. अथवा सवलत. किंवा जाणते -अजाणतेपणी व्यक्तीकडून झालेले पाप नाहीसे करणे, म्हणजे पापक्षालन होय.
हे पाप नाहीसे करण्यासाठी विविध धर्मामध्ये विविध मार्ग सांगितले जातात. प्रायाश्चित्त हा ही त्याचाच एक भाग आहे.
क्रुसेड्स म्हणजे ---- युद्धात लढणारे सैनिक आपल्या छातीवर क्रूसचे चिन्ह वापरीत, म्हणून त्यास क्रुसेड्स हे नाव पडले असावे. यालाच मराठीत धर्मयुद्धे म्हणतात.
धर्मयुद्धांना
पाठींबा -
या धर्मयुद्धात युरोपातील सर्वसामान्य लोक, सत्ताधीश, व्यापारी, धनिक सहभागी झाले होते..
vपोप (ख्रिस्ती धर्मगुरू)---ख्रिश्चन धर्म संस्थापक येशूची जन्मभूमी पॅलेस्टाईन तुर्की नियंत्रणातून मुक्त करणे.
v सामान्य जनता ---या युद्धात भाग घेणाऱ्या लोकांना पापक्षालनासंदर्भात विशेष सवलती जाहीर केल्या. त्यामुळे जनतेने मनापासून युद्धात सहभाग घेतला.
vरोमन सम्राट ---रोमन सम्राटांना धर्मयुद्धाच्या आधारे सीरिया आणि आशिया मायनर येथे स्वतःची सत्ता स्थापन करायची होती.
vधनिक आणि व्यापारी ---इटलीतील व्हॅनिस व जिनीव्हा या शहरातील व्यापाऱ्यांना
मध्य आशियात व्यापारी पेठा स्थापन करायच्या होत्या. या सर्वांनी आपापल्या स्वार्थासाठी या धर्मयुद्धांना पाठिंबा दिला होता.
प्रश्न- युरोपातील धर्मयुद्धांची माहिती लिहा.
मुद्दे - अ. अपयशाची कारणे ब. धर्मयुद्धांचे परिणाम.
अ. धर्मयुद्धांच्या अपयशाची कारणे -
१. पोप आणि युरोपियन सत्ताधीश यांचा युद्धाकडे पाहण्याचा संकुचित हेतू.
२. धर्मयुद्धांमुळे धर्मावरील कमी झालेली श्रद्धा.
३. युरोपातील विविध राजांमधील एकीचा अभाव.
४. पोप व जर्मन सम्राटातील वितुष्ट.
५. बायझँटाईन सम्राटांच्या सहकार्याचा अभाव .
या बाबी धर्मयुद्धांच्या अपयशास कारणीभूत ठरल्या.
ब. धर्मयुद्धाचे परिणाम -
१. सरंजामशाहीचा अस्त झाला.
२. लोकांची पोपवरील श्रद्धा कमी झाली.
३. मध्य आशियाबरोबर व्यापार वाढला.
४. इटली व जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्रे खुली झाली.
५. नवा व्यापारी मार्ग उदयाला आला.
६. युरोपीय युद्धतंत्रात अनेक बदल घडून आले.
७. किल्लेबांधणी, वाहतुकीसाठी पूलबांधणी शत्रूचे मार्ग उध्वस्त करणे इ. गोष्टीत युरोपियनांनी प्राविण्य मिळवले.
८. लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपमधील राजांनी नवीन कर लागू केले व ते सरकारी तिजोरीत जमा होऊ लागले.
९. युरोपियांना अपरिचित गोष्टींचा परिचय झाला, जसे की साखर, वनस्पती, फळे, अत्तरे, सुती व रेशमी कापड, पोषाखाचे प्रकार, मसाल्याचे प्रकार, औषधे, रसायन, संगीत, व्यापार इ.
युरोपातील प्रबोधनाचा काळ -
v१४ वे शतक हा प्रबोधनाचा आरंभ तर १५ वे व १६ वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्षकाल समजला जातो.
vया ३०० वर्षात बुद्धिवाद व वैचारिक विचारसरणीवर आधारित असलेल्या संस्कृतीचा पाया घातला गेला.
vप्रबोधन काळात माणसाच्या बुद्धीला, प्रतिभेला आणि जीवनपद्धतीला नवी दिशा मिळाली .
vविज्ञानात नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात झाली.
vप्रबोधनकाळापूर्वी ईश्वर हा केंद्रबिंदू होता,तर प्रबोधनकाळात मानव हा या विचारांचा केंद्रबिंदू बनला,यालाच मानवतावाद असे म्हणतात.
vयाच काळात धाडसी दर्यावर्दीना दूरवरचे प्रदेश शोधण्यासाठी युरोपीय राज्यकर्त्यांकडून प्रोत्साहन मिळाले.
vपाहिलेल्या देशातील वनस्पती, फळे, फुले, झाडे, नवनवे प्राणी, शस्त्र इ. माहिती त्यांनी मायदेशी आणली .
vइ. स. १६०९ मध्ये गॅलिलिओने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. या दुर्बिणीमुळे खगोल संशोधनाला गती मिळाली.
vछपाईचा शोध ही प्रबोधनकाळात जगाला मिळालेली सर्वोच्च देणगी होय.
संशोधक व त्यांचे संशोधन -
vनिकोलस कोपर्निकस याने इ.स.१५४३ मध्ये ग्रहमाला पृथ्वीकेंद्रित नसून सूर्यकेंद्रित आहे, असे प्रतिपादन केले (पृथ्वी सूर्याभोवती फिरते).
vगॅलिलिओ इ. स. १६०९ मध्ये अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. याच दुर्बिणीमुळे खगोल संशोधनाला गती मिळाली.कोपर्निकस आणि केपलर यांच्या संशोधनाला गॅलिलिओने वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे पुष्टी दिली.
vगॅलिलिओने निरीक्षण करणे आणि सिद्धांत मांडणे, अशी तर्कशुद्ध पद्धती रूढ केली, त्यामुळेच गॅलिलिओला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक म्हणतात.
vजोहान्स गुटेनबर्गने इ.स.१४४० ला जर्मनीत छापखाना सुरु केला. इ. स. १४५१ ला इटलीत पहिला छापखाना सुरु केला.
v१८ व्या शतकात युरोपातील सुरूवातीची आधुनिक विद्यापीठे स्थापन झाली.त्यांच्या अभ्यासक्रमात होमरची इलियड व ओडिसी ही महाकाव्ये, ग्रीक नाटके, ख्यातनाम वक्त्यांची भाषणे, ललित साहित्य, चित्र, शिल्पकला, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास इ. विषय शिकवले जाऊ लागले.
कॅथॉलिक चर्च -
vलोकांच्या व्यक्तिगत जीवनाचे नियंत्रण करणारी संस्था म्हणजेच कॅथॉलिक चर्च होय.
vचर्चच्या धर्मगुरूंनी सामान्य लोकांची पिळवणूक सुरु केली होती. स्वतंत्र विचार करण्यास व मांडण्यास बंदी घातली होती.
vबायबल या पवित्र ग्रंथावर चर्चच्या परंपरेपेक्षा भिन्न भाष्य करणाराला मृत्युदंडाची शिक्षा दिली जात असे.
vया सर्व परिस्थितीविरोधात आवाज उठवण्यासाठी प्रबोधनकाळातील मानवतावादी विचारसरणीने पार्श्वभूमी तयार केली.
आधुनिक विज्ञान –
प्रश्न -प्रबोधनकाळाची पुढील मुद्यांच्या आधारे सविस्तर माहिती लिहा.
मुद्दे -अ. प्रबोधनकाळातील विज्ञानाचा विकास ब. वैज्ञानिक शोध
अ. प्रबोधनकाळातील विज्ञानाचा विकास -
o प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषावर माणूस सत्याचे आकलन करून घेऊ लागला, हाच आधुनिक विज्ञानयुगाचा पाया होय.
o गणित,विज्ञान व कला यांच्या शिक्षणाला या काळात महत्व प्राप्त झाले.
o आधुनिक युगाच्या प्रारंभी निसर्गवैज्ञानिक होऊन गेले, उदा. लिओनार्डो -द-विन्ची.
कला –
o प्रबोधनकाळात विज्ञानाचा प्रभाव कलाक्षेत्रावारही पडला.
o ‘किमया’ या शास्रातील प्रगतीमुळे खनिजांचे स्रोत व मूलद्रव्य यांच्या ज्ञानात भर पडली.
o तैलरंगात रंगवलेले फलक तयार करण्यास सुरुवात झाली.
o माणूस निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण करु लागला.
o वैज्ञानिक पद्धतीच्या निरीक्षणातून मानवाच्या शरीररचनेची वैशिष्टे दर्शवणार्या आकृती चित्रित करणे सुलभ झाले.
o या संदर्भात लिओनार्डो-द-विन्ची व मायकेल अन्जेलो यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
Ø विज्ञानाचा विकास -
प्रश्न – युरोपात १७ व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्रज्ञांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला. (तुमचे मत नोंदवा)
o या काळातील शास्रज्ञांचा पुढील गोष्टींवर भर होता.
१. प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांताना स्थलकालातीत महत्व आहे हे सिद्ध करणे.
२. नव्याने शोधून काढलेले नियम सूत्रबद्ध करणे.
३. नवी वैज्ञानिक परिभाषा तयार करणे.
Ø या प्रयत्नातून आधुनिक विज्ञान प्रगत होत गेले.हेच विज्ञान जेथून जन्म घेते, ते म्हणजे वैज्ञानिक संस्था पुढीलप्रमाणे-
· रोम - अॅकॅडमी ऑफ द लिंकस आईड (लीन्क्सिएन अॅकॅडमी)
· फ्लोरेंस - अॅकॅडमी फोर एक्सपिरीमेंट.
· लंडन - रॉयल सोसायटी फॉर इम्प्रुव्हींग नॅचरल नॉलेज.
· फ्रान्स - फ्रेंच अॅकॅडमी ऑफ सायन्सेस इ.
· इंग्लंड - फ्रान्समध्ये शास्रज्ञांचे लेख प्रकाशित करणारी नियतकालिके चालविणे. पत्रव्यवहार, शंका-समाधान, वैचारिक देवाण-घेवाण यासाठी या संस्था काम करत.
ब. विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध
vहोकायंत्र (दिशादर्शक), दुर्बीण, भारमापक यंत्राचा शोध याकाळात लागला.
vरॉबट बॉईल याने वायूचे घनफळ त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते, हे शोधून काढले.
हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन यासंदर्भात संशोधन सुरु झाले. भौतिकशास्रात उष्णता, ध्वनी यांच्या अभ्यासाला प्राधान्य मिळाले. प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांची वर्गवारी केली गेली.
Ø उद्योग – व्यवसाय -
· वस्रोद्योग –
· इंग्लंडमध्ये लोकरीपासून वस्र विणणे हा घरगुती स्वरूपाचा व्यवसाय पूर्वापार चालत आलेला होता.
· इ. स. १७३८ मध्ये जॉन के याने धावता धोटा तयार केला.
· इंग्लंडमधील जेम्स हारग्रीव्हज याने स्पिनिंग जेनी नावाचे यंत्र तयार केले.
· इ. स. १७६९ मध्ये ‘रिचर्ड आर्कराईट’ याने सुत कातण्यासाठी सुधारित यंत्र बनवले.
· इ. स. १७७९ मध्ये सॅम्युअल क्रॉम्टन याने म्युल नावाचे सूतकताई यंत्र तयार केले.
· इ. स. १७८५ मध्ये ‘एडमंड कार्टराईट’ याने यंत्रमाग बनवला.
· इ. स. १७९३ मध्ये कॉटन जीन नावाचे यंत्र आले.
· या यंत्रामुळे कापसापासून सरकी वेगाने वेगळी करता येणे शक्य झाले.
धातुविज्ञान -
· इंग्लंडमध्ये लोखंडाच्या खाणी होत्या. तेथे मिळणाऱ्या लोहखनिजापासून शुद्ध लोखंड निर्माण करण्याच्या तंत्रात सुधारणा करण्याची गरज होती.
· हे खनिज वितळवण्यासाठी लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरण्यात येऊ नंौ
· त्यामुळे उच्चतम तापमान असणाऱ्या भट्ट्या तयार करण्यात आल्या, परिणामी लोखंडाचे उत्पादन वाढले.
· पुढे कोळश्याच्या भट्ट्या रसरसीतपणे तापवणे आणि कोळशाच्या भट्टीत हवा खेळवणे या कामासाठीही स्वतंत्र यंत्रे निर्माण केली गेली.
· इ. स. १७८३ मध्ये लोखंडाचा रस साच्यात ओतून लोखंडी पट्टिका (रेल्वे रूळ) तयार करण्याची पद्धत आली.
· इ. स. १८६५ मध्ये लोखंड रसाचे रुपांतर पोलादात करण्याच्या प्रक्रियेचा शोध लागला आणि धातुउद्योग बदलून गेला.
यंत्राचा उपयोग -
· एका क्षेत्रात एका यंत्राचा शोध लागला की, माणसे तेच यंत्र दुसऱ्या क्षेत्रात कसे वापरता येईल, याचा विचार करायला लागली.
· परिणामी एका यंत्रातून दुसऱ्या यंत्राची कल्पना व निर्मिती होऊ लागली. यातूनच नवनवी यंत्रे तयार होऊ लागली.
· इ. स. १७८३ मध्ये बेल याने रोलर सिलिंडर प्रिंटींग या यंत्राची निर्मिती केली. त्याचा वापर कापडावरील छपाईसाठी केला गेला.
· इ. स. १८०९ मध्ये बुटाचे आतील तळवे व टाच एकत्र जोडण्याचे काम यंत्राद्वारे केले जाऊ लागले.
· कपडे शिवण्यासाठी शिलाई यंत्रे आली.
· इ. स. १७७६ मध्ये जेम्स वॅटने बाष्प शक्तीवर चालणारे स्टीम इंजिन तयार केले. सुरुवातीला हे इंजिन खाणीतून कोळसा व कच्चे लोखंड काढण्यासाठी वापरले जात. नंतर वस्रोद्योगात वापरले जाऊ लागले.
· बाष्प शक्तीवर चालणारा नांगर, कापणीयंत्र, गवत कापणारी यंत्रे इ.
· अमेरिकेत रॉबर्ट फुल्टन याने क्लेरमॉट ही बोट बाष्पशक्तीवर चालवली.
· बाष्प शक्तीच्या मदतीने जमिनीवरून वाहतूक करण्याचा पहिला प्रयोग जॉर्ज स्टीफन्सन याने केला.
· बाष्प शक्तीवर चालणारे आगगाडीचे इंजिनही तयार करण्यात आले.
· या शोधांमुळे इंग्लंडमधील व्यापाऱ्यांना इतर देशात त्यांच्या वसाहती प्रस्थापित करण्यास मदत झाली.
Ø भौगोलिक शोध आणि शोधक
|
भौगोलिक शोध आणि शोधक |
||
|
मार्को पोलो |
इटालियन प्रवासी |
सर्वप्रथम चीन व आशियाखंडाची ओळख |
|
इब्न बतुता |
मध्ययुगातील प्रवासी |
भारत, मालदीव, सुमात्रा, चीन, स्पेन, सार्डीनिया, पूर्व आणि पश्चिम आफ्रिका |
|
हेन्री-द नेविगेटर |
पोर्तुगालचा राजपुत्र |
आफ्रिकेजवळ असणाऱ्या मॅडेरा व अॅझोरेस या दोन द्विकल्पांचा शोध |
|
ख्रिस्तोफर कोलंबस |
स्पेन |
भारताच्या शोधात होता, परंतु अमेरिका खंडाजवळ पोहचला |
|
बार्थोलोम्यू डायस |
पोर्तुगाल |
आफ्रिकेचे दक्षिण टोक सापडल्यानंतर केप ऑफ स्टॉर्म् स (वादळाचे भूशिर) हे नाव दिले, पुढे ते बदलून केप ऑफ गुड होप (आशेचे भूशिर) असे केले |
|
अमेरिगो व्हेस्पुसी |
इटली |
जिंकलेल्या प्रदेशाला व्हेनेझुएला असे नाव दिले. अॅमेझॉन नदीच्या मुखाचा प्रदेश शोधला |
|
वास्को द गामा |
पोर्तुगीज |
१४९७ मध्ये भारताकडे निघाला, आफ्रिकेच्या प्रवासात मालिंदी बंदराच्या भागातील एका भारतीय वाटाड्याबरोबर कालिकत (कोझिकोडे) बंदरात पोहचला. झामोरीन राजाकडून व्यापारी सवलती घेऊन पोर्तुगालला गेला व पुन्हा दोन वेळा भारतात आला. पहिला व्हाइसरॉय. युरोपीय देश आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध याच्या प्रयत्नातून सुरु झाले |
|
फर्डीनंड मॅगेलन |
स्पेन |
पृथ्वी प्रदक्षिणा घालणारा पहिला प्रवासी |
|
सॅम्युअल डी शॅम्प्लेन |
फ्रान्स |
उत्तर अमेरिकेत शोध मोहीम काढल्या, तेथे फ्रेंच वसाहती स्थापन, कॅनडातील क्युबेक शहराची स्थापना |
|
एबल जानस्वाँ टासमन |
हॉलंड
|
न्युझीलंडचा शोध, ईशान्य ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड मधील कार पेंटारीया या प्रदेशाचा शोध |
|
कॅप्टन जेम्स कुक |
इंग्लंड |
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या प्रदेशांवर इंग्लंडच्या शाही नौदलात |
|
लुई अँटोनी द बोगनविले |
फ्रान्स |
पसिफिक महासागर पार करून ताहिती येथे पोहचला. त्याने व्हॉयेजेस अराउंड द वर्ल्ड (१७७१) हे पुस्तक लिहिले. पॅसिफिक महासागरातील एका बेटाला आणि फुलवेलीला बोगनवेल हे त्याचे नाव दिलेले आहे |
|
मन्गो पार्क |
स्कॉटलंड |
पश्चिम आफ्रिकेचा शोध, नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोवा |
औद्योगिक क्रांती -
· औद्योगिक क्रांती हा शब्दप्रयोग सर्वप्रथम ‘अर्नाल्ड टोयनाबी’ याने सर्वप्रथम प्रचलित केला.
· औद्योगिक क्रांती म्हणजे हस्तव्यवसायाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण.
· १८ व्या आणि १९ व्या शतकात बाष्पशक्ती आणि जलशक्ती यांचा उपयोग करून उत्पादनाच्या प्रक्रियेत यंत्राचा उपयोग करण्यास युरोपमध्ये सुरवात झाली.
· औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी भांडवलशाहीची गरज असते .त्यातून उद्योग धंद्यांची मालकी किंवा गुंतवणुकीसाठी ज्यांच्याकडे भांडवल आहे, असा भांडवलदार वर्ग अस्तित्वात आला.
· वस्तूंच्या किमती कमी ठेवणे व अधिक नफा मिळवण्यासाठी श्रमाचा मोबदला कमी देणे.
· नफा मिळवणे हे भांडवलशाही व्यवस्थेचे वैशिष्ठे.
Ø भांडवलशाही अर्थव्यवस्था -
· भांडवलशाही अर्थव्यवस्थेत –
‘खासगी मालकी, आपल्या उत्पादनाच्या किमती ठरवणे, नफ्याचे प्रमाण ठरवण्याचे स्वातंत्र्य, उपभोक्त्याला निवडीचे स्वातंत्र्य असते.’
प्रश्न: औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली.
१. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी अनुकूल पार्श्वभूमी होती.
२. तेथे लोहखनिज व कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.
३. दमट हवामानामुळे सुती धागे बनवणे सोपे, परिणामी सुती कापडाचा उद्योग तेथे भरभराटीला आला.
४. इंग्लंडच्या ताब्यात वसाहतींचा मोठा प्रदेश होता. या प्रदेशांमधून कच्चा माल आयात करणे इंग्लंडला सहज शक्य झाले.
५. नाविक सामर्थ्याच्या जोरावर कच्चा माल प्रक्रिया करून पुन्हा पक्क्या मालाच्या रुपात इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या वसाहतींमध्ये विक्रीसाठी पाठवता येऊ लागला.
६. मिळणाऱ्या नफ्यातून इंग्रज व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले.
७. याचबरोबर कमी मोबदल्यात कामगारांचे श्रम उपलब्ध झाल्याने वस्तूंच्या किमती प्रमाणाबाहेर वाढू न देणे शक्य झाले.
या पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये ओद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली.
औद्योगिक क्रांतीचे भारतावर झालेले दूरगामी परिणाम
प्रश्न - औद्योगिक क्रांतीचे भारतावर दूरगामी परिणाम झाले. (तुमचे मत नोंदवा.)
१. भारतात घरगुती उद्योगधन्द्यांचा ऱ्हास झाला.
२. भारतातील कापड उद्योग मंदावला.
३. सरकारने इंग्लंडच्या हिताचे धोरण स्वीकारल्याने आर्थिक पिळवणूक झाली.
Ø आर्थिक राष्ट्रवाद -
Ø औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद सुरु झाला.
Ø आपल्या राष्ट्राच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देण्यासाठी हा ‘आर्थिक राष्ट्रवाद’ सुरु झाला.
आर्थिक राष्ट्रवादाची वैशिष्ठे:
(प्रश्न - आर्थिक राष्ट्रवादात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो?)
१. आपल्या राष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देणे.
२. प्रतिस्पर्धी राष्ट्राची आर्थिक नाकेबंदी करणे.
३. आयात-निर्यातीवर बंदी घालणे.
४. इतर देशांच्या मालावर जबर जकात आकारणे.
५. प्रतिस्पर्धी देशाबरोबर युद्ध करणे. यातूनच साम्राज्यवादाला सुरुवात झाली.
६. वेळ आल्यास प्रतिस्पर्धी राष्ट्राविरुद्ध युद्ध करणे.
७. गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, या सर्वातून वसाहतींचे शोषण करणे.
----------प्रकरण समाप्त----------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा