(इयत्ता 11 वी) इतिहास
प्रकरण १ ले - आद्य शेतकरी
घडून गेलेल्या घटनांचा विश्वसनीय साधनांच्या आधारे घेतलेला सर्वांगीण आढावा म्हणजे इतिहास होय.
मानवी प्रगतीच्या वाटचालीचा इतिहास मोठा रंजक आहे.
मानवाच्या उत्पत्तीपासून सांस्कृतिक इतिहासाची सुरुवात होते.
आपल्या जीवनासाठी मानवाला निसर्गशक्तींशी महान संघर्ष करावा लागला.
मानवाने आपल्या बुद्धीसामर्थ्याने आणि विचारशक्तीने विविध हत्यारे आणि अवजारे बनवली.
लक्षावधी वर्ष विरोधीशक्तींशी झुंज देऊन जीवन अधिकाधिक सुखी करण्याचा प्रयत्न मानवाने केला.
जलवायूमध्ये होणारा बदल, त्याबरोबरच सभोवतालचे बदलत जाणारे प्राणी याचा विचार करून मानवाने हत्यांरामध्ये आणि उपकरणांमध्ये बदल केला.
दगडांचा मानवाकडून होणारा वापर हे या काळाचे खास वैशिष्ट्य लक्षात घेवून या कालखंडाला अश्मयुग असे म्हटले गेले.
अभ्यासाच्या सोयीसाठी या अश्मयुगाचे तीन प्रकार पाडले जातात.
१.पुराणाश्मयुग (जुने अश्मयुग) २. मध्याश्मयुग ३. नवाश्मयुग (नवे अश्मयुग)
१. पुराणाश्मयुग / जुने अश्मयुग- (अंदाजे ३ लाख ते इ.स.पू. ९००० वर्ष)
जुन्या अश्मयुगाचे अभ्यासाच्या दृष्टीने पुन्हा तीन टप्पे पाडलेले आहेत.
१. पूर्व पुराणाश्मायुग--साधारणपणे हा कालखंड दीड लाख वर्षांपूर्वीचा धरलेला आहे. या कालखंडात मानव प्रामुख्याने अन्नशोधक शिकारी होता.तो शिकारीसाठी आणि स्वरक्षणासाठी निसर्गात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी म्हणजे दगड, लाकूड यांचा वापर करत.
२. मध्य पुराणाश्मयुग - साधारणपणे हा कालखंड दीड लाख वर्ष ते ५०००० वर्षांपूर्वीचा गृहीत धरलेला आहे. या कालखंडातील हत्यारांमध्ये विविधता आढळते.
३. उत्तर पुराणाश्मयुग- - साधारणपणे ५०००० वर्षे ते २५००० वर्षांपूर्वीचा कालखंड. या कालखंडात मानवाने शारीरिक आणि बौद्धिक उत्क्रांतीचा मोठा टप्पा गाठला. तो समूहाने राहू लागला. शिकार करू लागला. इतर कलांमध्ये रुची दाखवू लागला. म्हणजेच त्याला सामुदायिक जीवनाची जाणीव झाली.
२. मध्याश्मयुग----
प्रश्न- सकारण स्पष्ट करा- मध्याश्मयुगात सुक्ष्मास्त्रे बनवली.
(साधारणपणे इ.स.पू. २५००० ते १०००० वर्ष)
जुने अश्मयुग आणि नवे अश्मयुग या दोन्ही युगांमधील संक्रमण अवस्थेस मध्याश्मयुग असे म्हणतात.
या काळात हवामानात बदल होऊन हवा उबदार बनली.
त्यामुळे भीमगजासारखे मोठ्या आकाराचे प्राणी नाहीसे होऊन चपळ आणि आकाराने लहान प्राणी अस्तित्वात आले.
त्यामुळे शिकारीच्या तंत्रात बदल केला गेला. हत्यारांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक प्रगती झाली.
सूक्ष्म आणि भूमितीजन्य आकाराची हत्यारे बनवली गेली.
मानवाने अनेक वन्य वनस्पतींची लागवड करण्यास सुरुवात केली.
वन्य प्राण्यांना माणसाळवले. याकाळात अग्नीचा शोध हा क्रांतिकारक बदल होता.
३.नवाश्मयुग--इ.स.पू. १०००० ते ४००० वर्ष)
प्रश्न- नवाश्मयुगाला क्रांतीयुग म्हणतात.( सकारण स्पष्ट करा.)
अश्मयुगीन कालखंडाचा हा शेवटचा टप्पा होय.
या काळात मानव शेती, पशुपालन करू लागला.
भटके-निमभटके जीवन संपुष्टात आले. गाव - वसाहती निर्माण झाल्या.
पद्धतशीर शेतीची सुरुवात इसवी सनापूर्वी साधारणपणे १२००० वर्ष ते ११००० वर्षापूर्वी झाली असावी, असे पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे दिसते.
नवाश्मयुगात मानवी जीवनाला स्थिरत्व प्राप्त झाले. शेतीचे तंत्र साध्य झाल्यामुळे जगभरात नद्यांकाठच्या प्रदेशात सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती विकसित झाल्या.
ते प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया, इजिप्त , भारतीय उपखंड आणि चीन.
या चार प्रदेशात नवाश्मयुगाचा उदय झाला.
शेती-पशुपालनाची सुरुवात होऊन स्थिर गाव-वसाहती प्रस्थापित झाल्या.
हे कसे घडले ते बघण्यासाठी नद्यांकाठच्या संस्कृतींचा आपण थोडक्यात परिचय
करून घेऊ.
प्रश्न- गटात न बसणारा शब्द लिहा.
प्राचीन संस्कृती असणारे देश-- भारत, इजिप्त, चीन, इंग्लंड.
-इंग्लंड .
टायग्रीस आणि युफ्रेटीस नद्यांचे खोरे- -
मेसोपोटेमिया संस्कृती---
प्रश्न- मेसोपोटेमियामध्ये नवाश्मयुगीन गाव वसाहतींचा उदय झाला.(सकारण स्पष्ट करा.)
आजचे इराक, सिरिया आणि इराणचा पश्चिमेकडील प्रदेश तसेच तुर्कस्तानचा
आग्न्येयेकडील प्रदेश यांचा समावेश मेसोपोटेमिया संस्कृतीतील होतो.
मेसोपोटेमिया हे टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्याचे ग्रीक भाषेतील आहे.
मेसॉस म्हणजे मधला. पोटेमॉस म्हणजे नदी.
दोन नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया होय.
दोन नद्यांचे मुबलक पाणी आणि दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे या नद्यांच्या खोऱ्यातील जमीन सुपीक बनली.
यामुळे प्राचीन मेसोपोटेमियामध्ये मध्याश्मयुगीन भटके-निमभटके जनसमूह स्थिरावले आणि नवाश्मयुगीन गाव-वसाहतींचा उदय झाला.
मेसोपोटेमियामधील नवाश्मयुगीन आद्य वसाहती इसवी सनापूर्वी १०००० वर्ष इतक्या प्राचीन आहेत.
तेथील शेतकरी गहू आणि बार्ली पिकवत असत.
नाईल नदीचे खोरे-
इजिप्तची संस्कृती/ मिस्र संस्कृती -
प्रश्न- इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात.( सकारण स्पष्ट करा.)
आफ्रिका खंडाच्या उत्तरेला असलेला नाईल नदीच्या खोऱ्यातील प्रदेश म्हणजेच इजिप्त.
इजिप्तचे मूळ नाव केमेत. म्हणजे काळी भूमी. नाईल नदीने वाहुन आणलेला काळा गाळ यावरून हे नाव पडले असावे,
पुढे इजिप्तला व्हट-का -प्ता असे नाव मिळाले. प्ता - म्हणजेच देवाचे मंदिर.
ग्रीकांनी त्याचे रूपांतर एजिप्टस असे केले. त्यावरून इजिप्त हे नाव पडले.त्यावरून या संस्कृतीला इजिप्तचे अरबी नाव मिस्र आहे. म्हणून या संस्कृतीला मिस्त्र संस्कृती असेही म्हटले जाते.
या संस्कृतीचा शोध नेपोलियन बोनापार्टने इ.स .१७९८ मध्ये इजिप्तवर स्वारी केली त्यावेळी सैन्याबरोबर अनेक विद्वानही गेले होते.
त्यांनी इजिप्तमधील प्राचीन अवशेषांचा पद्धतशीर अभ्यास केला आणि माहिती प्रसिद्ध केली.
रोझेटा स्टोनवरील अभिलेखाच्या आधारे इजिप्तच्या चित्रलिपीचे वाचन करता येणे शक्य झाले.
इ.स.पू. ६००० वर्षांपूर्वी तेथे वसाहती वसल्या होत्या.
याच सुमारास शेतीची सुरुवात झाली असावी.
शेतीतून गहू आणि बार्ली ही सुरवातीची मुख्य पिके होते.
हो- यांग - हो--
चिनी संस्कृती--
प्रश्न- होयांग हो नदीला चिनी संस्कृतीचे जन्मदात्री मानले जाते. (सकारण स्पष्ट करा.)
चीनमधील हो-यांग-हो नदीचे खोरे हे चिनी संस्कृतीचे उगमस्थान समजले जाते.
या चीनमध्ये रिव्हर आणि मदर अशी दोन नावे आहेत.
रिव्हर या नावातून तिचे चिनी संस्कृतीतील तिचे अनन्य साधारण महत्व लक्षात येते.
तर मदर या नावातून तिला चिनी संस्कृतीची जन्मदात्री मानले जाते हे स्पष्ट होते.
चीनमधील नवाश्मयुगीन गाव वसाहतींमध्ये इसवी सनापूर्वी ७००० च्या सुमारास शेतीची सुरुवात झाली होती.
शेतीतून गहू,राळा, भात ही सुरुवातीची पिके होती.
येलो रिव्हर(पित्त नदी)हे होयांग हो या चिनी नावाचे भाषांतर आहे.(प्रश्न-१गुण)
ही नदी पिवळा गाळ वाहून आणते. त्यावरून तिला येलो रिव्हर हे नाव मिळाले असावे.
ती हिमालयात उगम पावते. चीनमधील होयांग हो, यांगत्से या दोन प्रमुख नद्या होत.
प्रवाहाच्या वेगामुळे या नदीचे पात्र सतत सतत बदलते. तिला येणाऱ्या विनाशकारी पुरामुळे तिला अश्रूंची नदी असेही म्हणतात.
हिंदू आणि सरस्वती नद्यांचे खोरे--
भारतीय उपखंड--सिंधू/ हडप्पा संस्कृती इसवी सन पूर्व 3000 च्या सुमारास अस्तित्वात असावी हे सिद्ध झाले आहे.
भारतीय उपखंडामध्ये इसवी सनापूर्वी 8000 त्या सुमारास अस्तित्वात होत्या. हडप्पा संस्कृती पूर्वी अस्तित्वात असलेल्या वसाहतींचे आणि स्थळ उजेडात आली आहे.
यातीलच काही वसाहतींचा विकास हडप्पा संस्कृतीचा उदय झाला असावा, बहुतेक आता मान्य करतात.
वसाहतीमधील शेतकरी प्रामुख्याने बार्लीचे आणि प्रामुख्याने गव्हाचे पीक घेत असत.
याच वसाहती मधील शेतकरी हे भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी होत.
गाय बैल आणि शेळ्या- मेंढ्या पाळत असावीत. त्यांची घरे मातीची असत. पाकिस्तानातील बलुचिस्तान भागातील मेहरगढ या ठिकाणच्या उत्खननामध्ये हडप्पा पूर्व नवाश्मयुगीन गाव वसाहती ते हडप्पा संस्कृतीच्या उद्यापर्यंतचा सलग कालक्रम आणि त्या संस्कृतीचे भौतिक पुरावे उजेडात आले आहेत.
जम्मू काश्मीर- बुर्जाहोम, कुफकराल.
उत्तर प्रदेश-- मिर्झापूर, इलाहाबाद जिल्ह्यातील स्थळे.
कर्नाटक-- मास्की ,ब्रह्मगिरी,हल्लूर कोडकल्ल पिकल्लीहाळ,टीनसीपुर तैक्कलकोटा.
आंध्र प्रदेश--इमनुर .
मध्य प्रदेश-- होशंगाबाद.
तामिळनाडू-- पैयमपल्ली.
राजस्थान-- बागोर.
प्रश्न- चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
१. टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांचे खोरे-- मेसोपोटेमिया.
२. नाईल नदीचे खोरे- इराण
३.होयांग हो नदीचे खोरे- चीन
४.सिंधू नदीचे खोरे-- भारतीय उपखंड.
दुरुस्त जोडी-- नाईल नदीचे खोरे-- इजिप्त.
शेतीची सुरुवात - कृषी उत्पादन--
प्रश्न-भारतातील आद्य शेतकरी आणि शेतीची सुरुवात या गोष्टींवर विस्ताराने लिहा.( सविस्तर उत्तर लिहा.)
शेतीची सुरुवात--
नवाश्मयुगाच्या सुरुवातीला शेतीला सुरुवात झाली हा बदल अत्यंत धीम्या गतीने झाला.
इसवी सनापूर्वी साधारणपणे १०००० ते ८७०० या नवाश्मयुग काळात मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि भारतीय उपखंड या चारही प्रदेशात शेतीची सुरुवात होण्यासाठी आवश्यक असलेल्या पूर्व परिस्थितीमध्ये अनेक समान घटक होते.
निसर्गतः उगवलेल्या धान्याची कापणी करता करता मानव धान्य पेरू लागला.
गहू,जवस,बार्ली यासारखी पिके घेतली जाऊ लागली.
अन्नधान्य उत्पादन करण्याच्या तंत्रज्ञानामध्ये सुधारणा झाली.
मानव शेतीबरोबर पशुपालन करू लागला.
शेतीकामासाठी प्राण्यांचाही वापर करू लागला.
होलोसिन कालखंड--
इसवी सनापूर्वी सुमारे १२००० ते ११००० वर्षापुर्वी शेवटचे हिमयुग संपुष्टात येऊन उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवा कालखंड सुरू झाला. त्याला होलोसीन कालखंड असे म्हणतात.
या काळामध्ये हिमखंड वितळून जलाशयांमध्ये पाण्याचे साठे वाढले.
या विषयांमध्ये माशांच्या अनेक प्रजाती, तसेच शेळी-मेंढी हरीण यासारख्या आकाराने लहान प्राणी तसेच अन्नासाठी उपयुक्त वनस्पतीची उपलब्धता वाढली.
मॅमोथसारखे महाकाय प्राणी लुप्त होऊन आकाराने लहान फक्त प्राणी निर्माण झाले.
त्यामुळे शिकारीच्या तंत्रात बदल करावा लागला. उत्तरपुराश्मयुगातच दाब तंत्राने दगडाची लांब पाती काढण्यास सोबत झाली होती.
मध्याश्मयुगामध्ये हेच तंत्र आणि गारगोटीचे दगड वापरून बोटांच्या नखाएवढी छोटी पाती काढून त्यापासून हत्यारे बनवायला सुरुवात झाली. त्यांना सुश्मास्त्रे असे म्हणतात.
याशिवाय संयुक्त हत्यारे गळ, भाले, बान, वेडा यासारखी अवजारे बनवले. शिकार आणि अन्नधान्य मिळवण्याचे तंत्र सुधारले. अन्नाचे विपुलता वाढली त्यामुळे जनसमूह दीर्घकाळ एका ठिकाणी राहू लागला.
या स्थित्यंतरात दीर्घ कालावधी लागला. शेती आणि पशुपालन यामुळे मानवी जीवनशैलीत कमालीचा बदल घडून आला.
या नवाश्मयुगीन काळातील स्थित्यंतराला गार्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञाने ‘नवाश्मयुगीन क्रांती’ असे म्हटले.
भारतातील आद्य शेतकरी--
भारतीय उपखंडात इसवीसन पूर्व ७००० च्या सुमारास नवाश्मयुगीन वसाहती उदयास आल्या.
पाकिस्तामधील बलुचीस्थान भागातील मेहरगढ या स्थळाचे विशेष महत्त्व आहे.
तेथील लोक बार्ली आणि गहू पिकवत असत. गाय, बैल, मेंढ्या पाळत असत. राहण्यासाठी मातीचे घरे बांधत असत.
याकाळात शेतीच्या तंत्रज्ञानात सुधारणा झाली.
प्रगत हत्यारे आणि अवजारे निर्माण झाली.
नवीन धरतीची दगडी हत्यारे आणि ती घडवण्याचे नवे तंत्रज्ञान यामुळे या काळाला नवाश्मयुग म्हटले गेले.
पाकिस्तान मध्ये बलुचिस्तान भागातील मेहरगड या स्थळाचे विशेष महत्त्व आहे. तेथे लोक गहू आणि बार्लीचे पीक घेत होते.
उत्तर प्रदेशातील कबीर नगर जिल्ह्यातील लहूरादेवा येथील शेतकरी भातशेती करत होते.
बाई महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन मानव इसवी सनापूर्वी १०००० ते ४००० याकाळात गुहा आणि प्रस्तर , शैलाश्रय यांच्या आश्रयाने राहत होता.
गारगोटीच्या दगडाची सूक्ष्मस्त्रसे हत्यारे बनवत होता.
महाराष्ट्रातील नवाश्मयुगीन गाव वसाहती मिळाल्या नाहीत.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील इनामगाव हे ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहतीचे स्थळ आहे.
जेरिको शहरातील नवाश्मयुग--( टीप लिहा)
पॅलेस्टाईन मधील जार्डन नदीवर असलेल्या जेरिको शहराला खूप प्राचीन इतिहास आहे.
इसवी सनापूर्वी ९००० च्या सुमारास ही गाव-वसाहत प्रथम वसली.
ती नवाश्मयुगात उदयाला आलेल्या पहिल्या कायमस्वरूपी वसाहतींपैकी ही एक गाव -वसाहत आहे.
इसवी सनापूर्वी ८००० या सुमारास तेथे सामाजिक संघटनांची सुरुवात झाली. हा संघटित समाजाचा पुरावा मानला जातो.
वसाहतीच्या भोवती संरक्षक भिंत बांधली त्याला भरभक्कम बुरुज बांधला होता.
जेरिकोजवळच्या गिलगल या गावातील नवाश्मयुगीन अंजिराच्या झाडांची नियोजनपूर्वक लागवड केली होती.
प्राचीन स्थळाच्या उत्खननात एका जळक्या घरामध्ये अंजीर या फळाचे अवशेष मोठ्या संख्येने सापडले.
यावरून नवाश्मयुगातील जेरिको वसाहतीत अन्नधान्याची व फळांची लागवड केले जात असावी.
छाटलेल्या फांद्यांची कलमे तयार करून त्यांची त्याची लागवड केली.
नियोजनपूर्वक लागवडीचा प्रयत्न होता.
स्थिर गाव वसाहती: संघटन आणि व्यवस्थापन-
प्राचीन गाव-वसाहतींच्या लोकसंख्येचा अंदाज वर्तवण्याचे प्रयत्न संशोधकांनी केले आहेत.
त्यासाठी विविध गणिती आणि संख्याशास्त्रीय प्रतिकृती यांचा आधार घेतला.
मध्याश्मयुगीन भटक्या-निमभटक्या स्थिर जीवनाकडे स्थित्यंतर होत असताना सुरुवातीला एका जनसमुहात किमान 25 ते 40 लोक असणे आवश्यक होते.
पूर्णपणे शेती-पशुपालनवर अवलंबून असलेल्या गाव-वसाहतींची लोकसंख्या 100 पर्यंत असावी, असा लोकसंख्येचा अंदाज संशोधकाने वर्तवला आहे.
नवाश्मयुगीन स्थिर गाव वसाहतीचे स्वरूप व वैशिष्ट्ये--
१. छोट्या वस्तीसारख्या गाव वसाहती.
२. गोल झोपड्या असत. तीच कायमस्वरूपी घरे असावीत.
३. राहत्या घरांशिवाय वस्तीच्या मध्यवर्ती ठिकाणी सामायिक जागा असत.
या जागेचा वापर धान्य आणि इतर वस्तू साठविण्यासाठी केला जात असावा.
अन्न उत्पादन संबंधित व्यवहाराचे नियंत्रण करणारी अधिकाऱ्यांची साखळी तयार झाली असावी.
वैयक्तिक घर- कुटुंबाच्या सीमा, जमिनीवरील मालकी हक्क, प्रत्येक घराचे स्वतःपुरते अन्न उत्पादन, आणि त्या अनुषंगाने नातेसंबंधांची गुंफण या गोष्टी अस्तित्वात आल्या.
प्रत्येक घरातील उत्पादन विषयक कौशल्यांचे कुटुंबातील पुढील पिढीला प्रशिक्षण देणे या गोष्टीची सुरुवात नवाश्मयुगात झाली असावी, असे मानले जाते.
अधिकारांच्या उतरंडीवर आधारलेल्या सामाजिक आणि कौटुंबिक रचनेची सुरुवात तसेच वारसाहक्क कल्पनेची सुरुवात हीदेखील नवाश्मयुगात झाली असावी.
मृदभांडी निर्मिती--
जपान मधील जोमोन संस्कृतीत मध्याश्मयुगात मातीची भांडी बनवण्यास सुरुवात झाली होती.
अपवाद वगळता इतरत्र नवाश्मयुगात च्या दुसऱ्या टप्प्यात मातीची भांडी बनवण्यास सुरुवात झाली होती.
सुरुवातीला मातीचे भांडे हाताने बनवलेली असत.
चाकाचा शोध लागल्यानंतर ती चाकावर बनवली जाऊ लागली.
या भांड्यांचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी, वाढण्यासाठी आणि धान्य साठवण्यासाठी केला जात.
हळूहळू भांड्यांवर रंगीत नक्षी काढायला सुरुवात झाली.
अशाप्रकारे नवाश्मयुगाच्या मध्यावर मातीची भांडी बनवणे ही एक उत्तम प्रतीची कला बनली होती.
मातीची भांडी बनवण्यासाठी नवाश्मयुगीन कारागिरांना खालील गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक होते---
१.चिकन मातीचा स्त्रोत माहिती असणे.
२. चाकाचा शोध लागल्यानंतर ती वाहून आणण्याची तजवीज करणे.
३. माती उत्तम प्रकारे मळून तयार करणे.
४. भांड्याला हवा तसा आकार देणे.
५. भांडे सुशोभित करणे.
६. भांडे योग्य तापमानाला भाजणे.
या सर्व गोष्टींचे ज्ञान असलेला कुशल कारागीर यांचा वर्ग नवाश्मयुग यामध्ये तयार झाला होता.
नवाश्मयुग यामध्ये मातीच्या भांड्यात प्रमाणेच इतर काही कौशल्यांवर आधारित हस्तव्यवसाय आणि कारागिरांचे वर्ग उदयाला आले होते.
त्यामुळे विविध प्रकारच्या वस्तू बनवण्याचे तंत्र नवाश्मयुगीन कारागिरांनी सुरुवातीपासूनच अवगत केले होते.
प्रामुख्याने विविध प्रकारच्या गारगोटीच्या दगडांचे तसेच शंखाचे मणी बनवले जात.
मणी बनवण्याची कार्यपद्धती आणि टप्पे-(प्रश्न-संकल्पना चित्र पूर्ण करा.)
१. मणी बनवण्यासाठी उपयुक्त असलेले दगड आणि शंख यांचे स्त्रोत माहिती असणे.
२.तेथून कच्चा माल मिळवणे.
३. कच्चामाल कामाच्या जागेपर्यंत वाहून आणणे.
४. ओबडधोबड दगड आणि शंख यापासून गुळगुळीत, नियमित आकाराचे मनी बनवणे.
कामाची विभागणी--
शेती व शेतीला पूरक वस्तू,मातीची भांडी,मणी यासारख्या सर्वच उत्पादन प्रक्रियेत कामाचे विविध टप्पे असतात.
त्यातून कामाची विभागणी होऊन विविध कार्य कोठे कारागिरांचे वर्ग तयार होतात.
व्यापार आणि दळणवळण-
मध्याश्मयुगात भटके- नीम भटके जनसमूह एकमेकांमध्ये वस्तुविनिमय करत असत.
दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती.
नवाश्मयुगाच्या दुसऱ्या टप्प्यावर प्राण्यांचा उपयोग सामानाची ने- आण यासाठी होउ लागला.
हत्यारे तयार करणे, झाडे तोडणे, लाकूडकाम करण्याचे तंत्र अवगत झाले. मासेमारी, कुंभारकाम, पशूपालन, सुतारकाम इत्यादी व्यवसाय विकसित झाले.
लाकडाचे ओंडके कापताना मानवाला चाकाचा शोध लागला.
मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. या नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येणे मानवाला शक्य झाले. याचा उपयोग वाहतूकीसाठी लागला.
वस्तू निर्मिती साठी लागणारा कच्चामाल दुरून आणि आणि उत्पादित वस्तू इतरत्र पाठवणे चाकाच्या शोधामुळे शक्य झाले. त्यातूनच दळणवळण वाढीस लागले.
भांडी,अन्नधान्य, विविध वस्तू, कापसाची वस्त्र यांचे उत्पादन वाढले.
वाढते उत्पादन आणि स्थानिक कमतरता यामुळे दळणवळण वाढवून व्यापार वाढीस लागला.
व्यापारामध्ये वाढ आणि दळणवळणाच्या सुलभ सोई यामुळे नवाश्मयुगातील मानवी जीवनाला स्थैर्य आणि समृद्धी प्राप्त झाली.
नागरीकरणाची सुरुवात-
प्रश्न- नवाश्मयुगातील नागरीकरणाचे सुरुवात कशी झाली ते लिहा.(सविस्तर उत्तर लिहा.)
अन्नासाठी सतत भ्रमंती करणारा माणूस शेती करू लागला. तो एका ठिकाणी स्थिर झाला. त्यातून गाव वसाहतींचा विस्तार होत गेला.
या गाव-वसाहतीमध्ये दीर्घकाळ राहिल्यामुळे आपली घरे आणि शेतकरी याबद्दल वैयक्तिक मालकी हक्काची भावना निर्माण झाली.
गाव वसाहतींचा विस्तार होऊन सामायिक जमिनी आणि गावाच्या सिमा याबद्दल हक्काची भावना निर्माण झाली.
आपल्या परिसरातील साधनसंपत्ती, पाण्याचे स्रोत, उद्योग-व्यापार तसेच समाज जीवन यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सामाजिक संकेत आणि नियम तयार होऊ लागले.
समाज नियंत्रण आणि धार्मिक आचार विधीचे तपशील यांना महत्त्व आले. त्यातूनच शासन व्यवस्था उदयाला आली.
व्यापाराने धार्मिक आचार विधी यांच्या व्यवस्थापनाच्या आणि नोंदी ठेवण्याच्या गरजेतून लिपी विकसित झाल्या.
समाज नियमन करणे तसेच विविध व्यवसाय करणारे लोक आणि अधिकारीवर्ग एका ठिकाणी आल्यामुळे गाव वसाहती ची लोकसंख्या वाढली.
गाव वसाहतींमध्ये लोकसंख्या वाढल्यामुळे त्या गाव वसाहतींचा विस्तार होऊन नगरे विकसित झाली.
अशा रीतीने नवाश्मयुगात नागरीकरणाची सुरुवात झाली.
पुढील घटना कालानुक्रमे लिहा.
१. सूक्ष्मास्त्रांची निर्मिती
२. नवाश्मयुगाचा उदय
३. होलोसिन कालखंडाची सुरुवात
४. शेती आणि पशुपालनाच्या तंत्राचा विकास.
योग्य कालक्रम--
१. होलोसिन कालखंडाची सुरुवात
२. मास्तरांची निर्मिती
३. शेती आणि पशुपालनाच्या तंत्राचा विकास
४. नवाश्मयुगाचा उदय.
प्रश्न- तुमचे मत नोंदवा.
१. नवाश्मयुगात मानवी जीवनशैलीत कमालीचा बदल घडून आला.
२. चाकाच्या वापराने तंत्रज्ञानात क्रांती घडून आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा