लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची ६ मे रोजी पुण्यतिथीनिमित्त ...
शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती नाही, असे इतिहास सांगतो.
अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणाची भारताला अत्यंत गरज आहे, हीच गरज ओळखून मोफत व सक्तीच्या शिक्षणाची सुरुवात करणारे राजे राजर्षी शाहू महाराज यांची ६ मे रोजी पुण्यतिथी त्यानिमित्त राजर्षी शाहू महाराज महाराजांना विनम्र अभिवादन...
राजर्षी शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस 'सामाजिक न्याय दिवस' म्हणून पाळला जातो.
या दिवशी कोल्हापूर या ठिकाणी अनेक सार्वजनिक कार्यक्रम होतात.
कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले तेव्हा ते दहा वर्षांचे होते.त्यांनी त्यांचे नाव 'शाहू' ठेवले गेले.
१८९४ तिथे राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी लगेचच बहुजनांच्या उद्धाराचे कार्य हाती घेतले.
दुष्काळपिडीत शेतकऱ्यांना कर्ज दिले.
बहुजन समाजातून तलाठ्यांच्या नेमणुका करण्याचा अध्यादेश काढला.
ते प्रजाहितदक्ष संस्थानिक होते.
राजर्षी शाहूंनी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या समाजात जागृती निर्माण केली.
दिखाऊ कार्यापेक्षा चिरस्थायी व कल्याणकारी कार्याला महत्त्व दिले.
त्यांच्या प्रयत्नांनी व उपक्रमांनी सामाजिक परिवर्तन झाले.
एकदा ते युरोप दौऱ्यावर गेले असता, त्यांनी काही धरणे बघितली, त्यातूनच त्यांना राधानगरी धरणाची कल्पना सुचली.
म्हणूनच १९११ साली त्यांनी कोल्हापुरात राधानगरी तालुक्यात 'भोगवती नदीवर’ ‘राधानगरी धरण' बांधले.
शाहू महाराजांना कुस्ती हा खेळ आवडत असे.
त्यामुळे मल्लविद्येला प्रोत्साहन देऊन, त्यांनी अनेक मल्लांना राजाश्रय दिला.
१८९५ मध्ये मोतीबाग तालीम सुरू केली.
शिक्षणाचा प्रसार व्हावा, म्हणून त्यांनी अनेक सोयी व सवलती उपलब्ध करून दिल्या.
शाळा, महाविद्यालय, वसतिगृहे व शिष्यवृत्त्या सुरू केल्या.
त्यांनी आपल्या महाविद्यालयात उत्तम शिक्षक वर्ग प्रयत्नपूर्वक आणला.
शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याची योजना व गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याची योजना सुरु केली.
'गाव तिथे शाळा असावी', असा अध्यादेश काढला.
बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी डेक्कन रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
१९०१ साली मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मराठा बोर्डिंगची स्थापना कोल्हापुरात केली.
याच वर्षी नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना केली.
१९१७ मध्ये विधवांच्या पुनर्विवाहास कायद्याने मान्यता दिली.
१९१९ मध्ये स्त्रियांवर होणार्या अन्यायाविरुद्ध कठोर कायदा केला.
देवदासी प्रथा कायद्याने बंद केली.
कोल्हापूरमध्ये सहकार चळवळीचा व शेतकरी संघटनेचा उपक्रम सुरु होण्यामागे शाहू महाराजांची प्रेरणा होती.
लोकजीवनाला क्रीडा, नाट्य व संगीत इत्यादी कलांची जोड त्यांच्याच काळात मिळाली.
अशा या मोठ्या दिलाच्या राजाला कानपूरच्या कूर्मी क्षत्रिय समाजाने "राजर्षी" ही पदवी दिली.
या लोकराजाचे ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे निधन झाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा