जागतिक महिला दिन...

  • जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ----

          ८ मार्च -

          "उत्तुंग तुझ्या भरारीपुढे गगन हे ठेंगणे भासावे,

           तुझ्या विशाल पंखाखाली अवघे विश्व वसावे!"

           "प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे,

           स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिजं लाभू दे!"

  • महिलांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय उन्नतीचा, कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो.

  • लिंग समानतेचे महत्त्व पटवून देण्यासाठीदेखील हा दिवस साजरा केला जातो.

  • ८ मार्च रोजीच महिला दिन का साजरा केला जातो?

  • रशियामध्ये एकत्र जेवणाची परवानगी आणि मताधिकाराच्या मुद्यावरून महिलांनी मोठं आंदोलन सुरू केले होते.

  • या घटनेशी संबंधित तारखा १९ मार्च, १५ एप्रिल आणि २३ फेब्रुवारी आहेत.

  • यावेळी रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडरचा वापर केला जायचा, तर इतर देशांमध्ये ग्रेगोरियन कॅलेंडरचा वापर केला जात होता. म्हणजेच रशियाच्या तत्कालीन  कॅलेंडरनुसार २३ फेब्रुवारीची तारीख जगाच्या दृष्टीने  ८ मार्चची तारीख होती.

  • ८ मार्च हा 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' म्हणून साजरा केला जात असला तरी त्यामागेदेखील इतिहास आहे.

  • अमेरिका आणि युरोप तसेच संपूर्ण जगभरातील महिलांना मतदानाचा अधिकार नाकारलेला होता. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या.

  • १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात 'द नॅशनल अमेरिकन सर्फेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु तीदेखील वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती.

  • ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमधील वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रूटगर्स चौकात जमून ऐतिहासिक निदर्शने सुरू केली. 

  • कामाचे तास १० आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता या दोन मागण्या महिला कामगारांच्या होत्या.

  • अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाल्या.

  • १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा 'जागतिक महिला दिन' म्हणून स्वीकारावा, हा क्लारा यांनी मांडलेला ठराव पास झाला.

  • भारतात पहिला महिला दिन ८ मार्च १९४३ रोजी मुंबईमध्ये सर्वप्रथम साजरा करण्यात आला.

  • महिला कामगार चळवळीमुळे महिला दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.

  • कालांतराने युनोने १९७५  हे 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले.

  • त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. 

  • बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले. 

  • त्यामुळे स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या.

  • १९७५ या आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघटनेने 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' साजरा करण्याचे ठरवले.

  • १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून  ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने साजरा करावा, असे आवाहन केले. 

  • त्यानुसार संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.

  • संयुक्त राष्ट्रसंघाने जगातील प्रत्येक स्त्रीला काही हक्क दिले आहेत. 

  • भारतीय संविधानानेदेखील स्त्रियांना काही हक्क बहाल केलेले आहेत.

  • महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

  • या दिवसाचे औचित्य साधत समाजामध्ये महिलांच्या हक्कांबाबत जनजागृती केली जाते.

  • स्त्री आणि पुरुष यांना समान वागणूक मिळावी, हा खास उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे. 

  • अशा या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा!!! 

  • स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात, 

            स्त्री म्हणजे क्षणांची साथ,

            स्त्रीच्या कर्तुत्वाला सर्वांचा प्रणाम!!!!!




टिप्पण्या