प्रजासत्ताक दिन: (२६ जानेवारी)
घटना समितीने इ.स. २६ जानेवारी १९५० ला भारताची नवी घटना संमत करून स्वीकारली आणि त्या दिवशी भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले.
म्हणून २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून संपन्न केला जातो.
हिंदुस्थानच्या लोकप्रतिनिधींनी घटना तयार करावी व त्यास ब्रिटिश सरकारने मान्यता द्यावी, अशी मागणी इ.स. १९२२ मध्ये महात्मा गांधीजींनी केली.
मार्च १९४६ मध्ये ॲटली सरकारने एक ३ सदस्यांचे शिष्टमंडळ भारतात पाठवले.
त्या मंडळाने घटना परिषद बनविण्याची योजना मांडली व त्यानुसार ते अस्तित्वात आली.
९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीची पहिली बैठक संसद भवनाच्या मध्यवर्ती हॉलमध्ये झाली व स्वतंत्र भारतासाठी इच्छेनुसार घटना तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
त्यास २०७ सभासद उपस्थित होते.
या बैठकीचा प्रारंभ आचार्य कृपलानींनी सर्वात वयोवृद्ध व वरिष्ठ सभासद डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांचा परिचय देऊन केला.
डॉ. सिन्हांना समितीचे तात्पुरते अध्यक्ष होण्याची विनंती केली.
त्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली.
नोव्हेंबर १९४९ मध्ये जेव्हा घटना तयार झाली, तेव्हा ३०२ सदस्यांची नावे होती.
१३ डिसेंबर १९४६ रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी 'भारत एक सार्वभौम स्वतंत्र व प्रजासत्ताक गणराज्य असेल, तसेच सर्व शक्ती व अधिकार जनतेद्वारा प्राप्त होतील, सर्व लोकांना न्याय, समानता व विविध क्षेत्रात स्वातंत्र्य असेल व अल्पसंख्यांक-दलित आणि मागासवर्गीय लोकांना संरक्षण मिळेल, अशी उद्दिष्टे व्यक्त केली.
हा ठराव २२ जानेवारी १९४७ रोजी सर्व सभासदांनी उभे राहून पास केला.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.
२९ ऑगस्ट १९४७ पासून घटना पूर्ण होऊन पास होईपर्यंतची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली.
फेब्रुवारी १९४८ मध्ये घटनेचा कच्चा मसुदा तयार करण्यात आला व लोकांच्या सूचनेसाठी परिचालीत केला गेला.
डॉ.आंबेडकरांनी घटनेचा मसुदा १४ नोव्हेंबर १९४८ रोजी घटना समितीपुढे सादर केला.
त्यासाठी घटना समिती ३ विराम वगळता सतत ११ महिने (१५ नोव्हेंबर १९४८ ते १७ ऑक्टोबर १९४९) बसली.
७६३५ पैकी २४७३ दुरुस्त्या सूचना विचारात घेतल्या गेल्या.
१७ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ.आंबेडकरांनी सभेने संमत केलेले संविधान मंजूर करावे,असा ठराव आणला.
त्यावरील चर्चेत ११३ सदस्यांनी भाग घेतला.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने त्यावर शिक्कामोर्तब केले.
घटना समितीची शेवटची बैठक २४ जानेवारी १९४९ रोजी झाली.
त्या दिवशी जन-गण-मन व वंदे मातरम या दोन गीतांना राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आला.
त्यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडले.
घटनेच्या तीन प्रती बनविल्या गेल्या. त्यावर २८४ सदस्यांनी सह्या केल्या.
यात सर्वप्रथम जवाहरलाल नेहरूंनी व सर्वात शेवटी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सही केली.
२६ जानेवारी १९४९ पासून संमत केलेली घटना अंमलात आली.
घटना बनविण्याचे कार्य २ वर्ष ११ महिने १७ दिवस चालले, तर मसुदा समिती १४१ दिवस तर घटना समिती १६५ दिवस बसली.
सुमारे ५३००० लोकांनी सभेचे काम संविधान हॉलच्या प्रेक्षक हॉलच्या गॅलरीतून पाहिले.
२२ नोव्हेंबर १९४९ पर्यंत ६३,९६,७२९ रुपये खर्च झाले.
या दिवशी देशाचे राष्ट्रपती राज्यांच्या झाकी, जल,स्थल व वायुसेना यांची मानवंदना स्वीकारून शौर्य पदकांचे वितरण करतात.
तसेच अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्या मुलांचा सत्कार करून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढतात.
सर्व शासकीय कार्यालये, शाळा, कॉलेजेसमध्ये ध्वजारोहण करून राष्ट्रगीतांचे गायन करतात.
या दिवशी स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावर व्याख्यानांचे आयोजन केले जाते.
या दिवशी आपण सर्वांनी मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्य निर्माण करण्याचा संकल्प सोडवू या…..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा