सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त......

  • आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त (३ जानेवारी) …..


  • पुणे-सातारा रोडवर शिरवळपासून ५ किमीवर नेवाशांच्या 'नायगाव' या गावी खंडोबा नेवसे व सौ.लक्ष्मी यांच्या उदरी ३ जानेवारी १८३१ ला सावित्रीबाई यांचा जन्म झाला. 

  • सावित्रीबाईंचा विवाह थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबरोबर झाला.

  • ज्योतिबा व सावित्रीबाईंना संतान झाले नाही.

  •  मुलींची शाळा काढल्याने सनातन्यांनी मुलींना शिकविणाऱ्या सावित्रीबाईंना अंगावर शेण, दगड टाकून अर्वाच्च शिव्या देऊन अपमानित केले. परंतु सावित्रीबाईंनी  जिद्द सोडली नाही.

  • 'जर मुलींना शिकवले तर तुझ्यावर भर चौकात अत्याचार करील' असे म्हणणाऱ्या धटिंगणाच्या मुस्काटात मारून त्यांनी धाडसीपणा दाखवून दिला, तर भावाने 'तू हे शिक्षणाचे काम बंद कर' असे सांगताच तुम्ही लोक शेळ्या-मेंढ्यावरून प्रेमाने हात फिरविता मग शूद्र लोक त्यांच्यापेक्षा कनिष्ठ आहेत का? असे उत्तर देऊन त्यांनी त्यांच्यात दडलेल्या क्रांतिकारी व करारी स्रीची जगाला ओळख करून दिली.

  • सनातनी लोकांच्या भीतीने ज्योतीबांच्या वडिलांनी जेव्हा या पती-पत्नीला घर सोडण्याचा सल्ला दिला, तेव्हा आपल्या पतीच्या समाजकार्याला बळकटी देण्यासाठी त्या ज्योतिबांबरोबरच घराबाहेर पडल्या.

  •  इ.स. १८५१ मध्ये त्यांनी शाळेत घेतलेल्या मुलींच्या परीक्षेमुळे टीकाकारांची तोंडे बंद झाली.

  • ज्योतीबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुतण्याने यशवंतास मडके धरण्यास मनाई केल्यावर, नॉर्मल स्कूलमध्ये प्रशिक्षित शिक्षक तयार करण्याचे काम करणाऱ्या कवयित्री व लेखिका सावित्रीबाईंनी ते मडके स्वतःच्या हाती धरले व त्या अंत्ययात्रेच्या पुढे चालू लागल्या आणि स्मशानात ज्योतीबांच्या पार्थिवाला त्यांनी स्वतः अग्नी दिला.

  • १८९३ मध्ये झालेल्या सत्यशोधक परिषदेच्या त्या अध्यक्षा होत्या.

  • काव्यफुले (१८५४), बावनकशी(१८६४), सुबोधरत्नाकर (१८९२) हे काव्यसंग्रह व ज्योतिबांची भाषणे, ज्योतिषांना पत्रे व त्यांनी दिलेली भाषणे हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

  •  इ.स. १८९७ च्या प्लेगमध्ये रुग्णांची सेवा करत असताना प्लेगग्रस्त दलित मुलास खांद्यावर घेऊन दवाखान्यात जाताना सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली व त्यातच त्या १० मार्च १८९७ ला ज्योतिर्मय झाल्या.

टिप्पण्या