ओरिसा प्रांतातील जगन्नाथपुरी जवळील कटक येथे 23 जानेवारी १८९७ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानकीनाथ व प्रभावती देवी यांच्या उदरी झाला.
त्यांना सात भाऊ व सहा बहिणी होत्या.
सुभाषबाबूंच्या लहानपणी अशा काही घटना घडल्या की, ज्यामुळे त्यांच्या मनात इंग्रजांबद्दल द्वेष, घृणा निर्माण झाली.
ते वयाच्या ५ व्या वर्षी 'प्रॉटेस्टंट युरोपीय स्कूल' मध्ये जाऊ लागले. तेथील इंग्रजी विद्यार्थी भारतीय विद्यार्थ्यांना शिव्या देत. तसेच त्यांच्या बरोबर खेळतही नसत. सुभाषबाबू आपल्या मामाबरोबर जेव्हा कोलकत्त्याला गेले, तेव्हा १५ वर्षांचा सुशीलकुमार सेन याला 'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत म्हटल्यामुळे १५ फटक्यांची शिक्षा झाली. ती त्यांनी पाहिली.
आपल्या देशात राहून आपल्याला राष्ट्रगीत म्हणण्याचा अधिकार नसावा, हे पाहून त्यांना अत्यंत वाईट वाटले.
कोलकत्त्यात महाविद्यालयात असताना इंग्रजीचे प्राध्यापक (ओएटन) ओटन हे भारतीय विद्यार्थ्यांचा द्वेष करत.
त्यांनी एका विद्यार्थ्याला मारले तेव्हा नेताजींनी ओटनला प्रिन्सिपल जेम्सकडे नेले.
ओटनने क्षमा मागितली, परंतु १५ दिवसांनी त्यांनी परत एका विद्यार्थ्याला मारले, तेव्हा नेताजींनी विद्यार्थ्यांना संघटित करून ओटनला मारले (१० जानेवारी १९१६).
त्यामुळे त्यांना महाविद्यालयातून काढून टाकले, म्हणून त्यांना बी. ए. ची परीक्षा देता आली नाही.
यादरम्यान ते सद्गुगुरू शोधासाठी हरिद्वार ऋषिकेश अयोध्या इत्यादी ठिकाणी जाऊन आले, परंतु त्यांना योग्य सद्गुगुरु भेटला नाही. तेथून ते कटकला आले. तेथे त्यांनी 'स्वेच्छा सेवा संघ' स्थापन केला व त्याद्वारे खेडेगावात जाऊन सामाजिक कामे केली.
कोलकत्त्याला 'स्कॉटिश मिशन कॉलेज'मध्ये १९१९ ला ते बी.ए. झाले.
नंतर ते इंग्लंडला गेले सात महिन्यात १४ विषयांचा अभ्यास करून सप्टेंबर १९२० साली आय. सी. एस् च्या कठीण परीक्षेत चौथ्या क्रमांकाने पास झाले.
त्यांनी केंब्रिज विश्वविद्यालयाची बी.ए. ही पदवी प्राप्त करून घेतली.
इंग्रजांची नोकरी करावयाची नाही, म्हणून त्यांनी नोकरी केली नाही.
ते १६ जुलै १९२२ रोजी भारतात परत येण्यास निघाले.
महात्मा गांधीजींना साबरमती आश्रमात जाऊन भेटले.
त्यानंतर बंगालचे नेते देशबंधू चित्तरंजन दास यांचे कार्य करू लागले.
त्यांनी अनेक क्रांतिकारकांच्या चित्रांचा संग्रह केला, परंतु ती वही घरच्या लोकांनी जाळून टाकली.
हे सर्व इंग्रजांमुळे घडत आहे, असा त्यांचा अनुभव होता आणि म्हणून ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत इंग्रजांविरुद्ध लढले.
बर्लीन व हॅम्बुर्ग या दरम्यान एका जहाजावर २९ मे १९४१ रोजी जर्मनीचे सर्वेसर्वा हिटलर व त्यांची भेट झाली. पहिल्याच भेटीत हिटलरने त्यांना 'भारताचे प्युअरर (भारताचे नेताजी) हीज एक्सलन्सी सुभाष बोस' हे वाक्य वापरून स्वागत केले, तेव्हापासून लोक त्यांना नेताजी या नावाने ओळखू लागले.
हिटलरने त्यांना एक विमान भेट देऊन सर्वतोपरी सहाय्य देण्याचे वचन दिले.
बर्लिनमध्ये त्यांनी जर्मन सरकारच्या सहाय्याने एक नभोवाणी केंद्र सुरू केले.
तिथे त्यांची व सरदार भगतसिंग यांचे चुलते सरदार अजितसिंह यांची भेट झाली. त्यांनी ३४ वर्षांपूर्वी जर्मनीत जाऊन आझाद हिंद सेना स्थापन केली होती. तिचे नेतृत्व नेताजींकडे सोपविले.
याच पद्धतीचे कार्य जपानमधील टोकियो येथे रासबिहारी बोस यांनी केले होते. त्या दोघांच्या कार्याचा सुभाषबाबूंना फार उपयोग झाला. 'जर्मनीच्या कैदेत अपमानाचे जीवन जगण्यापेक्षा भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आझाद हिंद सेनेत या' असा सल्ला नेताजींनी सैनिकांना दिला.
त्यांच्या या मताशी अनेक सैनिक सहमत झाले व हिंदी पलटण तयार झाली.
'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा|' असा नेताजींनी नारा दिला.
सेनेचा व्याप वाढत गेला. १२००० सैनिकांची एक अशा आठ बटालियन तयार झाल्या.
नाझी अधिकाऱ्याशी चर्चा केल्यावर नाझींनी त्यांना 'भारताचे प्रवक्ता' म्हणून मान्यता देऊन भारतीय युद्धकैद्यांना सुभाषचंद्र यांच्या स्वाधीन केले.
युरोपातील अनेक देशात विखुरलेले भारतीय त्यांना तन-मन-धनाने सहकार्य करू लागले.
'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत व जयहिंद ही घोषणा करणाऱ्या आझाद हिंद सेनेचे वाघाचे चित्र असलेला तिरंगी झेंडा हे मानचिन्ह होते.
२६ जानेवारी १९४२ रोजी या सर्व सैनिकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची शपथ घेतली.
जपान, ब्रह्मदेश, इटली आदी देशात आझाद हिंद सेना निर्माण झाली.
नेताजींनी आझाद हिंद रेडिओवरून भारताला पहिला संदेश दिला.
रासबिहारींच्या आमंत्रणावरून नेताजी अबिद हसन नावाच्या एका भक्तास बरोबर घेऊन १९४३ मध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बर्लीनहून पाणबोटीने निघाले.
सुमात्रा - पेनांगमार्गे तीन महिन्यानंतर २० जून १९४३ रोजी टोकियोला येऊन पोहोचले.तेथे त्यांचे अभूतपूर्व स्वागत झाले.
टोकियो नभोवाणीवरून त्यांनी पहिले भाषण दिले. रासबिहारींनी त्यांना आपण चालवलेल्या इंडिपेंडन्स आजाद हिंद सेनेची माहिती दिली.
त्यांनी आपल्या स्वातंत्र्य संघ व स्वातंत्र्य सेनानी यांची सुत्रे सुभाषबाबूंच्या स्वाधीन केली.
नेताजींनी २ जुलै १९४३ ला सिंगापूरला जावून मलायातील हिंदी बांधवांना 'चलो दिल्ली' हा नारा दिला.
५ जुलै १९४३ रोजी रासबिहारी बोस यांनी स्वातंत्र्य संघाचे अध्यक्षपद नेताजींना अर्पण केले.
१२ जुलै १९४३ ला इंडियन इंडिपेंडन्स स्री शाखेने स्त्रियांची एक सभा आयोजित केली. स्त्रियांनी रेडक्रॉस व झाशीची राणी पलटण उभी करण्याची मागणी केली.
नेताजींनी शोनान व पेनान येथे उभारलेल्या सैनिक शाळेत स्त्रियांना शिक्षण देण्याची घोषणा केली व कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन या तरुणीच्या नेतृत्वाखाली १३जुलै १९४३ ला त्यांनी 'राणी ऑफ झाशी रेजिमेंट' ची स्थापना केली.
त्यामध्ये १५६ बंदूकधारी स्रिया होत्या. २५ ऑगस्ट १९४३ ला ते आझाद हिंद सेनेचे अधिकृत नेते झाले.
जपान सरकारने आजाद हिंद सरकारला त्यांच्या ताब्यात असलेले अंदमान निकोबार ही बेटे दिली. या ठिकाणी आझाद हिंद सेनेचा राष्ट्रीय ध्वज फडकला.
आजाद सैन्याचे प्रमुख ठाणे रांगोळी ला नेण्यात आले मात्र 15 मार्च 1945 ला रंगून ब्रिटिशांच्या हाती गेले 3 1945 रोजी आझाद हिंद सेनेने रंगून ब्रिटिशांच्या ताब्यात दिले त्यानंतर सुभाषबाबूंनी रंगून सोडले. ते बँकॉकला पोहोचले.बँकाॅकहून सायगावला पोहोचले. त्यानंतर कर्नल हबिबूब रहमान यांच्यासह टोकियोला जाण्यास निघाले.
इंडोचीनमधील टुरेन या विमानतळावर उतरले आणि १८ ऑगस्ट १९४५ रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी विमान टुरेन विमानतळावरून उडाले व विमानाला अपघात झाला.
ते १८ ऑगस्ट १९४५ रोजी रात्री ९.०० वाजता टूरेन येथे ब्रह्मलीन झाले. २३ ऑगस्ट १९४५ रोजी त्यांच्या निधनाचे वृत्त रेडिओवरून भारतात प्रसिद्ध झाले. त्यांचा अस्थिकलश टोकियोला रेणुका मंदिरात आहे.
स्वातंत्र्यलढ्यातील सुभाषबाबूंचे योगदान अनमोल आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा