भगिनी निवेदिता...

 

  • भगिनी निवेदिता २८ ऑक्टोबर स्मृतिदिन - 

  • भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक व स्वामी विवेकानंदांच्या पाश्‍चात्य शिष्या मार्गारेट एलिझाबेथ नोबल (भगिनी निवेदिता) यांचा जन्म आयर्लंडमधील टायरोन परगण्यातील डुंग्यानन येथे २८ फेब्रुवारी १८६७ ला पिता सॅम्युअल रिचर्ड व माता मेरी इसाबेल यांच्या पोटी झाला. 

  • मार्गारेटने वयाच्या १७ व्या वर्षीच शिक्षिकेच्या नोकरीला सुरुवात केली होती.

  • आयर्लंडमधील परंपरागत धर्मोपदेशक असलेल्या नोबल कुटुंबातील सॅम्युअल रिचर्ड आणि मेरी इसाबेल यांची कन्या मार्गारेट.

  • धर्मजिज्ञासा, सेवाभाव याचा जन्मजात वारसा तिला लाभला. तसा राष्ट्राभिमानाचा, स्वातंत्र्यप्रेमाचा वारसादेखील मार्गारेटला आजोळहून मिळालेला होता.

  • मार्गारेटच्या आईचे आई-वडील आयर्लंडच्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय कार्यकर्ते होते.

  • आजोबा हॅमिल्टन यांनी बालपणीच देशाभिमानाची ठिणगी मार्गारेटच्या मनात चेतवली होती.

  • तिचे रक्त तिला आयर्लंडच्या स्वातंत्र्य चळवळीपासून दूर राहू देत नव्हते.

  • या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी संग्रामाच करायला हवा, हे पटल्यावर तसे कार्य करणाऱ्या सिनफेन या गुप्त संघटनेची ती सक्रिय सदस्य बनली.

  • इ.स.१८९२ मध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटपुढे आयर्लंडचे होमरूल बिल आले, त्यावेळी निडरपणे मार्गारेटने आपले अनुकूल मत मांडले.

  • परंतु विवेकानंदांच्या सर्वधर्मपरिषदेतील हिंदू धर्मावरील महत्त्वपूर्ण, ओजस्वी भाषणामुळे मार्गारेट भारावून गेली. तेव्हाच त्यांनी मनोमन विवेकानंदांचे शिष्यत्व पत्करले.

  • सतत पाच वर्ष विवेकानंदांच्या विचारांचे वाचन, चिंतन व आचरण करून १८९८ ला त्या भारतात आल्या. 

  • स्वामीजींच्या सखोल चिंतनाने व नव्या युगाला अत्यंत उपयुक्त अशा विचारांनी भारलेल्या व्याख्यानांनी मार्गारेट अतिशय प्रभावित झाल्या.

  • रस्त्यावर उभे राहून सत्यधर्माचा प्रसार करणाऱ्या २० स्त्री-पुरुषांची मला गरज आहे, असे स्वामीजींनी आवाहन केले, तेव्हा मार्गारेटने त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देण्याचा निर्धार केला.

  • स्वामीजींनीदेखील 'आपण अवश्य या कार्यात सहभागी व्हा' तसेच 'तुम्ही इंग्लंडमध्येच काम करावे' अशी इच्छाही कळविली होती.

  • परंतु नंतर त्यांची जिज्ञासा पाहून भारतात येण्याची परवानगी दिली.

  • पण तत्पूर्वी भारतातील सामाजिक स्थिती, भौगोलिक वातावरण, सुखसोयींचा अभाव यांची पूर्ण कल्पना त्यांना दिली.

  •  एवढेच नाही तर, "दारिद्र्य, अधःपतन, घाण व मळके, फाटके कपडे घातलेले स्री-पुरुष बघण्याची इच्छा असेल तर निघून या, इतर कोणतीच आशा बाळगून मात्र येऊ नका." असे कळवून स्वामीजींनी निवेदितांच्या मानसिक जडणघडणीस भारतात येण्यापूर्वीच प्रारंभ केला.

  •  भारतात आल्यानंतर त्यांनी पूर्णपणे हिंदू जीवनपद्धतीचा स्वीकार केला.

  •  त्या मूळच्या परदेशी व परधर्मीय असल्यामुळे सुरुवातीला काही कर्मठ हिंदूंनी त्यांच्या कार्यात बरेच अडथळे आणले.

  •  निवेदितांनी आपल्या प्रेमळ व विनम्र स्वभावाने कट्टर विरोधकांनाही आपलेसे केले.

  •  'भारतावर प्रेम कर' हा आपल्या पितृतुल्य गुरूचा आशिर्वाद घेऊन निवेदिता भारतीयांच्या सेवेसाठी कटिबद्ध झाली.

  •  २५ मार्च १८९९ कलकत्त्यात 'ब्रह्मचारिणी' व्रताची दीक्षा घेऊन त्यांचे नाव 'भगिनी निवेदिता' असे ठेवले.

  •  निवेदिता म्हणजेच - 'जिने आपले जीवन समर्पित केले आहे अशी'.

  • जन्माने आयरिश असलेल्या मार्गारेटचे नाव स्वामी विवेकानंदांनी दीक्षाप्रसंगी निवेदिता ठेवले.

  • निवेदिताचा अर्थ समर्पिता.  निवेदिताने आपले नाव शब्दशः खरे करून दाखवले. 

  • स्वतः घेऊ इच्छिणाऱ्या व्रताची जबाबदारी पूर्णपणे ओळखूनच त्या ब्रह्मचारिणी झाल्या. अंतर्धान पावल्या. 

  • त्यांच्या जागी स्वामी विवेकानंदांच्या मानसकन्या भगिनी निवेदिता आविर्भूत झाल्या. 

  • पण तरीही एकदा स्वामीजींनी त्यांना त्यांच्या राष्ट्रीयत्वाचा प्रश्न केला, तेव्हा त्यांच्या उत्तरात इंग्लंड व त्याचा राष्ट्रध्वज याबद्दलचा नितांत आदर 'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी' या न्यायाने व्यक्त झाला.

  •  'जी देशभक्ती तुम्ही व्यक्त करीत आहात, ते एक पापच आहे' असे स्वामीजींनी म्हटल्यामुळे त्या दुखावल्या.

  •  परंतु परिवारातील एका वृद्ध स्त्रीने त्यांच्यात समेट घडवून आणला.

  • त्यांनी १८९९ साली कलकत्त्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीत स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. 

  • प्रसंगी रस्ते झाडून, सफाईपर्यंतची कामे केली. 

  • स्वामींच्या कार्याचा वसा चालविण्याचे असिधाराव्रत यांनी घेतले. तेच त्यांचे जीवितकार्य बनले. 

  • स्री शिक्षणाच्या कार्याला स्वामींनी दिलेले महत्त्व लक्षात घेऊन निवेदितांनी कन्या शाळा काढली.

  • स्त्रियांना जीवनाभिमुख असे हस्तकला, शिवणकला, इतिहास, पदार्थविज्ञान हे शिकवले जात. 

  • निवेदितांच्या शिक्षणविषयक विचारांवर स्वामीजींच्या विचारांची छाप होती.

  •  हिंदू स्रियांबद्दल गैरसमज पसरविणाऱ्या मिशनऱ्यांची मते त्यांनी देश-परदेशात आपल्या लेखातून, भाषणातून खोडून काढली.

  •  भारतीय स्त्रियांना त्यांच्या सृजनशील, शालीन, सौहार्दपूर्ण गुणांची त्यांनी जाणीव करून दिली.

  •  स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यात अभिमान वाटणाऱ्या स्वामीजींच्या विचारांचा, हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या भारतीयांच्या कैवारी भगिनी निवेदिता स्वयंप्रज्ञ, स्वतंत्र होत्या.

  •  बंगालच्या फाळणीला त्यांनी कसून विरोध केला.

  •  भूपेंद्रनाथ या बंगाली देशभक्ताला जामिनापोटी सरकारला भरावयाची रक्कम निवेदितांनी स्वतः काही तासात जमा करून व भरून त्यांना मुक्त केले.

  •  बंगालच्या दुष्काळात सापडलेल्या गोरगरिबांना केलेल्या मदतीला तर सीमाच नव्हती.

  •  डॉ. जगदीशचंद्र बोस यांना अपमानास्पद वागणूक इंग्रज शास्त्रज्ञांनी दिली, त्याबद्दलचा मनस्वी संताप त्यांनी, 'या हीन  वृत्तीमुळे या देशाची वैयक्तिक व सार्वजनिक अधोगती सूचित होते', अशा शब्दात व्यक्त केला.

  •  सशस्त्र क्रांतीचा विचार पटल्यावर रामकृष्ण संघाशी त्यांनी औपचारिक फारकत घेतली.

  • भारताचे पुनर्निर्माण याविना कोणत्याही अन्य कार्यार्थ त्या  प्रतिज्ञित झालेल्या नव्हत्या. 

  • स्वामीजी समाधिस्थ झाल्यानंतर दोन आठवड्याच्या आतच स्वतंत्र भूमिकेवर उभे राहून हिंदुभूमीच्या स्वातंत्र्याच्या ध्येयाच्या मार्गावर वाटचाल सुरू केली. असे करताना त्यांच्या मनोभावना काय असतील!  त्यांनी मनोमन हिंदुस्थानातील तरुण-तरुणींना हाक घातली असेल अन् त्या म्हणाल्या असतील,

माझिया सांगाती वदा कोण येती'|

दावानलांतुनी मार्ग माझा||

माझिया सांगाती वदा कोण येती|

गाठावयाप्रती  ध्येयधाम||

  • आपला मृत्यू १९१२ मध्ये होणार हे निवेदितांना १९०४ पासूनच माहिती होते. 

  •  खूप काम झाले म्हणतेस!! झालेले काम बंद पडले असेल तर न झालेले काम सेंचुरी आहे! असे त्या म्हणत.

  • निवेदितांच्या दृष्टीने मृत्यू हा 'वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृहाति नरोपराणि!' या गीतावचनाप्रमाणे होता.

  • जुनी वस्त्रे टाकून मनुष्य ज्याप्रमाणे नवे वस्त्र धारण करतो, तसेच तो एक देह टाकून, दुसरा नवा देह मिळवितो.

  • एक शरीर टाकून दुसरे धारण करणे, हे एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जाण्याइतके सहजसाधे त्यांना वाटत होते.

  •  कधी कधी निवेदिता उपनिषदातील प्रार्थना करत असत... 

असतो मा सद्गमय |

तमसो मा ज्योतिर्गमय |

मृत्योर्मा अमृतं गमय |

अविरावीर्म एधि|

रुद्र यत्रे दक्षिणं मुखं तेन मां पाहि नित्यम् | हे परमात्मन् असताकडून सताकडे आम्हास ने, अंधकारातून प्रकाशाकडे ने, मृत्यूकडून अमरत्वाकडे ने…

  • रवींद्रनाथ टागोर आणि भगिनी निवेदिता यांविषयी म्हटले आहे की, "भगिनी निवेदितांमध्ये मानवाचे अजिंक्य माहात्म्य प्रत्यक्ष बघून आम्ही धन्य झालो आहोत."

  • आपल्या मुलीला इंग्लिश मुलींप्रमाणे शिकवून तयार करावे, असे सांगणाऱ्या रवींद्रनाथांना नकार देताना, 'मुलांपुढे त्या राष्ट्राला आवश्यक असे विचार ठेवावे' असे स्पष्ट बजावले.

  • इंग्रजीपेक्षा स्वभाषा अधिक चांगली शिकणे, स्वदेशी वस्तू वापरणे, उत्तम सुसंस्कारित पिढी निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षणाबरोबर स्वदेशी व स्वातंत्र्य या विषयीचे बाळकडू मुलांना पाजले.

  • स्वातंत्र्यचळवळीत, सत्याग्रहात अथवा राजकारणात भाग घेण्यापेक्षा स्त्री शिक्षणावर निवेदितांनी अधिक भर दिला.

  • 'मड्डम साहिबा' म्हणून संबोधणाऱ्या एका व्यक्तीला त्यांनी आपल्याला भगिनी म्हणून संबोधावे, असे ठणकावून सांगितले.

  • १९०२ साली पुण्याला जाऊन देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या चाफेकर बंधूंच्या आईच्या चरणांना स्पर्श करून तिच्या चरणांची धूळ त्यांनी आपल्या मस्तकी लावली.

  •  स्वामी विवेकानंद व भारतीय जीवन यावरची त्यांची  'काली, द मदर', 'द वेब ऑफ इंडियन लाइफ', 'द मास्टर ॲज आय साॅ हिम', 'नोट्स ऑफ वाॅंडरिंग्ज विथ द स्वामी विवेकानंद', 'ब्लॅंब्स अमंग द वुल्फज ॲग्रेसिव्ह हिंदुइझम', असे अनेक ग्रंथ, वृत्तपत्रे, मासिकातील लेख, देश-परदेशातील व्याख्याने या सर्वांचे मानधन शैक्षणिक कार्य, शास्त्र, कलाक्षेत्रासाठी म्हणून त्यांनी भारतमातेच्या चरणी अर्पण केले.

  • 'चरैवेति' 'चरैवेति' 'चालत राहा, चालत राहा, सतत काम करीत रहा' हे त्यांचे ब्रीद होते.

  • भारत व भारतीय संस्कृती यावर असीम प्रेम करणाऱ्या निवेदितांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.

  •  त्या भारतीय जनमानसाच्या स्वामिनी, सेविका, सखी बनल्या.

  • आपल्या गुरुची,मानस-पित्याची अपेक्षा त्यांनी सर्वार्थाने पूर्ण केली.

  •  अशा या विदुषीने भारतातील दार्जिलिंग शहरात आपला देह ठेवला. दार्जिलिंग येथे निवेदितांनी अखेरचा श्वास घेतला. 

  • त्यांच्या समाधीवरील शिलालेखात जिने आपले सर्वस्व भारताला वाहिले, त्या निवेदितांनी इथे देह ठेवला, हे शब्द कोरलेले आहेत. यावरून त्यांच्या जीवनकहाणीचा परिचय होतो.

  • 'धर्म हे एक साध्य आहे, ती नुसती श्रद्धा नव्हे,' मानवतेची सेवा करणे नव्हे, तर आत्म्याचे मुक्त स्वरूप जाणणे, हा जीवनाचा खरा अर्थ असला पाहिजे,'  'सर्व धर्मात एकच तत्त्व सांगितलेले असते -सत्याचा शोध.' याचा विलक्षण प्रभाव पडला. 

  • सत् तत्चाचा शोध, ईश्वर, कर्म, भक्ती, बौद्धमत, अद्वैतवाद या विषयांवरील स्वामींची व्याख्याने ऐकणाऱ्या, चर्चा- बैठकीत सहभागी होणाऱ्या मार्गारेटला, इतके दिवस अनिश्चिततेच्या मार्गावर चाचपडतांना, निश्चित मार्गाचा प्रकाश किरण दिसला.

  • तिने मनोमन त्यांना गुरु मानले. स्वामींच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी भारतात येण्याची इच्छा वारंवार प्रगट केली.

  • त्यावर तुम्ही तेथेच कार्य करावे, या स्वामींच्या प्रतिसादाने मार्गारेट नाराज झाली.

  • पण तिच्या जिद्दी स्वभावाने शेवटी स्वामींनी तिला भारतात येण्याचे निमंत्रण दिले.

  • पण, तत्पूर्वी इथली सामाजिक स्थिती, भौगोलिक वातावरण, सुखसोयींचा अभाव याची पूर्ण कल्पना दिली.

  •  याचा अर्थ भारतात येण्यापूर्वी स्वामींनी निवेदिता यांच्या मानसिक जडणघडणीला सुरुवात केली होती.

  • मार्गारेटच्या मनात प्राधान्य हवे,ते स्वामीजींना नव्हे, तर भारत देशाची आणि सत्याची सेवा करण्याला, असेही स्पष्ट केले.

  • २८ जानेवारी १८९८ ला मार्गारेट कलकत्त्याला आल्या. स्वामीजींनी त्यांचे स्वागत केले.

  • २५ मार्चला दीक्षा विधी झाला आणि त्यानंतर मार्गारेट स्वामीजींची मानसकन्या निवेदिता झाली.

  • 'भारतावर प्रेम कर'' हा आपल्या पितृतुल्य गुरूचा आशीर्वाद घेऊन भारत आणि भारतीयांच्या सेवेसाठी कटिबद्ध झाली.

  • त्यांच्या आयुष्यातील जडणघडणीच्या टप्प्यावर येऊन ठेवली,पण तरीही एकदा स्वामींनी त्यांना त्यांच्या राष्ट्रीयत्वाचा प्रश्न केला, तेव्हा त्यांच्या उत्तरात इंग्लंड व त्याचा याबद्दलचा नितांत आदर व्यक्त झाला. स्वामींना ही गोष्ट खटकली.

  • उत्तर भारतातील भ्रमणात अल्मोर्याच्या मूक्कामापासून निवेदिता यांची शाळा सुरू झाली.

  •  गुरु-शिष्य यांच्यातील मतभेद वाढले, वारंवार त्यांच्यामध्ये खटके उडू लागले, शेवटी तर 'जी देशभक्ती तुम्ही व्यक्त करीत आहात, ते एक पापच आहे,' असे म्हणत स्वामीजींनी केलेल्या भाष्याने निवेदिता दुखावल्या. पण त्या दोघांमध्ये समेट घडवून आणला परिवारातील एका वृद्ध स्त्रीने.

  • एकांतवासासाठी निघालेल्या स्वामींनी आकाशात उगवलेल्या नवचंद्रिकेकडे पाहत आपल्या या बंडखोर शिष्येला मनोमन आशीर्वाद दिला.

  • नोरेन् आपल्या दिव्य स्पर्शाने ज्ञानदान करू शकेल.

  •  गुरू रामकृष्णांचे शब्द स्वामीजींनी खरे केले.

  • गुडघे टेकून त्यांच्यासमोर विनम्र झालेल्या निवेदिता ती अनुभूती सांगताना लिहितात, "त्या समाधीअवस्थेत माझे 'मीपण' नाहीसे झाले. अनंताचे दर्शन घडले. सत्याचा साक्षात्कार झाला.

  •  आता निवेदिता आंतरर्बाह्य भारतीय झाल्या. स्वामींच्या कार्याचा वसा चालवण्याचे असिधाराव्रत त्यांनी घेतले. तेच त्यांचे जीवितकार्य होते.

  • स्त्रीशिक्षणाच्या कार्याला स्वामींनी दिलेले महत्त्व लक्षात घेऊन निवेदितांनी कन्या शाळा काढली.

  •  स्त्रियांना जीवनाभिमुख असे हस्तकला, शिवणकला, इतिहास, पदार्थविज्ञान येथे शिकवले जाई.

  •  त्यांच्या शिक्षणविषयक विचारांवर स्वामीजींच्या विचारांची छाप होती.

  •  १८९९ च्या कलकत्त्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीत रुग्णांची घरी जाऊन देखभाल करण्यापासून, प्रसंगी रस्ते झाडून सफाईपर्यंतची कामे निवेदितांनी झटून केली.

  • आता त्यांची नाळ या मातीशी, बांधवांशी खऱ्या अर्थाने जुळली.

  •  त्या भगिनी निवेदिता झाल्या, म्हणूनच डॉ. जगदीशचंद्र बोस यांना जी अपमानास्पद वागणूक इंग्रज शास्त्रज्ञांनी दिली, त्याबद्दल मनस्वी संताप त्यांनी 'या वृत्तीमुळे या देशाची वैयक्तिक व सार्वजनिक अधोगती सूचित होते' या शब्दात व्यक्त केली.

  • बंगालची फाळणी,१९०४ मध्ये पारित झालेल्या 'युनिव्हर्सिटीज अॅक्ट' विरोधात त्यांनी केलेली जनजागृती, राष्ट्रीयतेचा मंत्र देऊन युवकांमध्ये त्यांनी राष्ट्रीय जाणीव निर्माण केली.

  • हिंदू स्त्रियांबद्दल गैरसमज पसरविणाऱ्या मिशनर्यांची मते त्यांनी देश-परदेशात आपल्या लेखनातून, भाषणातून खोडून काढली.

  •  भारतीय स्त्रियांना त्यांच्या सृजनशील, शालीन, सौहार्दपूर्ण गुणांची त्यांनी जाणीव करून दिली.

  •  बद्रीनारायण मंदिरात त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यांना वाईट वाटले, तरी हिंदू धर्मातील पुराणमतवादाचाही त्यांनी बिनातक्रार स्वीकार केला.

  • आपल्या मुलीला इंग्लिश मुलींप्रमाणे शिकवून तयार करावे, असे सांगणाऱ्या रवींद्रनाथांना नकार देताना 'मुलांपुढे त्या राष्ट्राला आवश्यक असे विचार ठेवावे' असे स्पष्ट बजावले.

  •  मड्डम साहिबा म्हणून संबोधणारे एका व्यक्तीला त्यांनी 'आपल्याला भगिनी म्हणून संबोधावे' असे ठणकावले. 

  • प्रसिद्ध चित्रकार अवनींद्रनाथ टागोर यांना भारतीय चित्रकलेतील सौंदर्याची महती पटवून त्यांचे मतपरिवर्तन केले. 

  • स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यात अभिमान वाटणाऱ्या स्वामींच्या विचारांचा, हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या, भारतीयांच्या कैवारी भगिनी कसलेल्या निवेदिता स्वयंप्रज्ञ, स्वतंत्र होत्या.

  • सशस्त्र क्रांतीचा विचार पटल्यावर रामकृष्ण संघाशी त्यांनी औपचारिक फारकत घेतली.

  •  राष्ट्रजागृतीसाठी स्वामीजींनी पौरुषनिर्मिती असे शब्द वापरले.

  •  त्यापेक्षा आपल्या ध्येयाचे स्वरूप अधिक मूर्त व नजीकच्या भविष्यात साध्य होण्यासारखे आहे, असा विश्वास वाटल्याने निवेदितांनी राष्ट्रनिर्मिती शब्द वापरायला सुरुवात केली.

  •  भारताला राष्ट्रीयता देण्यासाठी तन-मन-धन वेचले.

  • 'द मास्टर अॅज आय साॅ हिम', नोटस् ऑफ वाॅंडरिंग्ज विथ द स्वामी विवेकानंद,' 'ब्लॅंब्स अमंग द वुल्फज्,' 'ॲग्रेसिव्ह हिंदुइझम्,'  'द वेब ऑफ इंडियन लाइफ' असे अनेक ग्रंथ, वृत्तपत्रे-मासिकातील लेख, देश-परदेशातील व्याख्याने या साऱ्याचे मानधन शैक्षणिक कार्य, शास्त्र-कला क्षेत्रासाठी म्हणून त्यांनी भारतमातेच्या चरणी अर्पण केले.

  • त्यांचे जीवन म्हणजे नियतीचा चमत्कृतीपूर्ण खेळच.

  •  जन्मल्या आंग्लभूतीत आणि जगल्या हिंद भूमीत, हिंद भूमीसाठी! 

  • या भारताची, स्वामीजींची त्यांच्याशी ऋणानुबंधाची गाठ नियतीनेच बांधली असावी, म्हणूनच स्वामींना हवी तशी शिष्या- कन्या लाभली.

  •  निवेदिता भारतीय जनमानसाच्या स्वामिनी, सेविका, सखी बनल्या.

  • आपल्या गुरूची, मानस-पित्याची अपेक्षा त्यांनी सर्वार्थाने पूर्ण केली.

टिप्पण्या