पोळा.....

 

  • पोळा

  • बलिवर्द या संस्कृत शब्दापासून बैल हा शब्द निर्माण झाला. 

  • ऋषभ,नंदी, बसब,गोपुत्र, कृषिमित्र, शिववाहन या नावाने ज्ञात असलेला बैल प्रत्येक गावातील शिवमंदिरात असतो. 

  • या दिवशी शेतकरी बैलाला नदीवर नेऊन आंघोळ घालून, अलंकार घालून मिरवणूक काढतात.

  • घरी आल्यावर पूजा करून पुरणपोळी खाऊ घालतात.

  • या दिवशी बैलाला काम करू दिले जात नाही.

  • महाराष्ट्रात श्रावण व भाद्रपद अमावस्येला तर, श्रावण वद्य ||४|| ला गुजरातमध्ये  आणि श्रावण वद्य ||८|| ला बंगालमध्ये हा उत्सव संपन्न करतात.

  • गुजरातमध्ये 'बहुल', दक्षिण हिंदुस्थानात 'पोंगल' (संक्रांतीच्या दिवशी हा उत्सव संपन्न करतात.)

  • कोकणात 'बेंदूर' या नावाने ओळखला जाणारा हा सण आषाढ शुद्ध||१३||, कार्तिक शुद्ध ||१|| व मार्गशीर्ष ||१|| या दिवशी संपन्न करतात.

  • मातृदिन - बंदीगृहात असलेल्या देवकीने गोकुळात यशोदेकडे राहणाऱ्या गोपालकृष्णाच्या सौख्यासाठी हे व्रत केले होते. तेव्हापासून आपल्या मुलाच्या सौख्यासाठी प्रत्येक माता हे व्रत करते. या दिवशी आई आपल्या मुलाला मागे उभे क रून मुलाच्या डोक्यावर अक्षता टाकून अतीत कोण?' असे विचारते, तेव्हा 'अतीत मी आहे' असे मुलाने म्हटल्यावर, आई पुरणाच्या पुऱ्या, घवल्याची खीर व निरंजनासहित ते वाण आपल्या मुलाला देते.

  •  या दिवशी आईला नवीन वस्त्र देऊन तिचा सन्मान करण्याची प्रथा आहे.

  • पिठोरी अमावस्या - मूल होत नसलेल्या व झालेले मूल जिवंत राहावे, म्हणून अशा महिला हे व्रत करतात.

  • नदीवर जाऊन अप्सरा व आपल्या घरातील ६४ योगीनींच्या चित्राची पूजा करून, खीरपुरीचा नैवेद्य दाखवून हे व्रत संपन्न करतात.

टिप्पण्या