स्रीजीवन -
'न स्री स्वातंत्र्यम् अर्हति' म्हणून मनुवचनाला स्रीने केव्हाच खोटे ठरविले आहे.
जशी, वेल आधाराशिवाय उभी राहू शकत नाही, तशी स्त्री, पुरुषाच्या आधाराविना उभीच राहू शकत नाही, अशी समजूत होती.
बालपणी पित्याच्या आधार, तरुणवयात पतीचा हात आणि वार्धक्यात पुत्राचे बोट स्रिला धरावे लागते, अशीच समजूत होती.
कारण स्त्री ही अबला आहे, हे तिच्या मनात ठासून भरविले गेले होते.
ऋग्वेदकाळात स्त्रीला पूर्ण स्वातंत्र्य होते. तिचा दर्जा चांगला होता. परंतु त्यानंतर स्त्रीचे स्थान खालावत गेले.
त्यातच परकीय आक्रमणे भारतावर होऊ लागली. त्यावेळी स्रीजीवन चार भिंतीच्या आत गुंतून पडले.
स्रीला नैसर्गिक आपत्ती व सुरक्षितता, लैंगिक हिंसाचार यामुळे पुरुषाच्या मदतीची गरज भासू लागली.
सुरक्षिततेच्या भावनेतून स्री गुलाम बनत गेली.
घराबाहेरची आव्हाने, कामे, व्यवहार, व्यवसाय यामुळे पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था तयार झाली.
बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, सतीची चाल, पुनर्विवाह बंदी इत्यादी अनिष्ट प्रथांचा उदय झाला.
मुलीचा जन्म अशुभ मानला जाई. 'मुलगी परक्याचे धन' अशी मानसिकता होती.
काही समाजात तर मुलीला जन्मत: गळा दाबून ठार केले जात.
ऋग्वेदकाळात स्त्रीला श्रेष्ठ स्थान देण्यात आले होते.
पती निधनानंतर सतीप्रथा रूढ झाली. नाहीतर विधवेचे केशवपन करून तिला विद्रूप करण्यात येत असे.
त्यामुळे अनेक स्त्रियांची दुर्दशा झाली.
ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेनंतर भारतीयांना पाश्चात्त्य ज्ञान, संस्कृतीची ओळख झाली.
ब्रिटिशांनी भारतात शिक्षणाची सुरुवात केली.
त्यातच अखिल मानवेतर दूरगामी परिणाम करणाऱ्या काही जागतिक घटना घडल्या.
त्यातील १७८९ ची फ्रेंच राज्यक्रांती एक होय.
बुद्धिवाद, स्वातंत्र्य, समता यांना महत्त्व आले.
स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या घोषणेने स्री वर्गालाही जाग आली. सामाजिक बदलाला प्रारंभ झाला.
ब्रिटिशांनी स्त्री सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नातून ब्रिटिश सरकारने विविध कायदे केले.
त्यामुळे सामाजिक स्थित्यंतरे घडून स्रीमुक्ती चळवळीला प्रारंभ झाला.
'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता'. अशा शब्दांच्या अलंकारात स्रीला अडकवले गेले.
स्त्रीचे कार्यक्षेत्र म्हणजे चूल आणि मूल. एवढ्याच मर्यादित दिला वावरता येई.
शिक्षण प्रसारातून नव्या विचारांनी भारावलेल्या विचारवंतांनी, विद्वानांनी आणि समाजसुधारकांनी स्त्रियांवरील अन्याय दूर व्हावेत, त्यांना समाजात समानता, पुरुषांच्या बरोबरीचे स्थान प्राप्त व्हावे, यासाठी प्रयत्न केले.
स्रियांना प्रथम शिक्षण दिले पाहिजे, हे ओळखून स्री शिक्षणावर भर देण्यात आला.
त्यामुळेच आधुनिक काळात स्रीची जडणघडण होऊ लागली.
क्राफ्ट या बाईंनी 'व्हिंडिकेशन ऑफ द राइट्स ऑफ वुमन' हे स्रियांच्या हक्काविषयीचे पहिलेच पुस्तक प्रसिद्ध केले.
त्यानंतर औद्योगिक क्रांतीसारख्या घटनांमुळे स्त्रियांनी आपल्या हक्कांची लढाई चालू ठेवली.
जे. एस. मिलसारख्या उदारमतवाद्यांनी त्यांची बाजू उचलून धरून 'सब्जेक्शन ऑफ विमेन' या ग्रंथाद्वारे स्त्रियांची समानता पुढे मांडली.
१९ व्या शतकाच्या मध्यानंतर हळूहळू स्रीविमोचन कार्याला सुरुवात झाली.
मात्र २० व्या शतकात, त्यातच पहिल्या महायुद्धकाळात स्त्रियांनी केलेल्या मदतीमुळेच त्यांना मतदानाचा हक्क मिळाला.
भारतात १९१९ च्या सुधारणा कायद्याने प्रथमच हिंदी प्रजेपैकी थोड्या जणांना मतदानाचा हक्क मिळाला. त्यात स्त्रियांनाही समाविष्ट करण्यात आले.
पतीला हा हक्क असल्यास पत्नीला मिळे. त्यांच्याकरिता विधिमंडळात काही जागा राखून ठेवण्यात आल्या.
पहिल्या महायुद्धानंतरची सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे संततीनियमनाला लाभलेली जाहीर मान्यता.
परंतु दुर्दैवाने जर्मनी व इटली येथील हुकूमशाह्यांनी स्त्रियांना चूल व मूल हा आदेश दिला.
१५ व्या कलमानुसार स्त्री व पुरुष असा कोणताही भेदभाव भारत राज्य करणार नाही.
पाश्चात्य लोकशाही राष्ट्रात अजूनही स्त्रीविरोधी विचारप्रवाह रेंगाळत आहे.
पुरुष हा भय्यूजी तर स्त्री ही एक यॉजी आहे असे पुरुषप्रधान संस्कृती अव्याहतपणे धरून चालतात.
ताया झिनकीनच्या मते, स्री विमोचनाचे लोन हे अगदी खेड्यांपर्यंत पोहोचले.
लॉर्ड विल्यम बेंटिकने १८२९ मध्ये सतीबंदी कायदा केल्यापासून स्त्रियांची स्थिती सुधारली.
स्त्रियांच्या बाबतीत शारीरिक धोके अधिक असतात.
स्वातंत्र्यसंग्राम व दोन्ही महायुद्धामुळे स्त्रियांना पुढे येणे सुलभ झाले.
डॉ. राधाकृष्णन म्हणतात, स्रीला हिंदुधर्म मानाचे स्थान देतो.
आपल्या प्रत्येक कार्यात स्री जोडीदारीण असल्यामुळे तिला सहधर्मचारिणी म्हणतात.
मेरी कार्पेंटरने स्त्रियांसाठी शिक्षण प्रसाराचे कार्य केले.
सरकारकडे स्रीशिक्षक तयार करण्यासाठी नॉर्मल स्कूल काढावे, अशी मागणी केली.
या शिक्षणासाठी येणाऱ्या स्त्रियांना शिष्यवृत्तीही जाहिर करण्यात आली.
स्री सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हणून राजाराम मोहन रॉय यांचा उल्लेख केला जातो.
लोकहितवादी स्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते होते.
स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले.
तसेच मुलींसाठी पुणे येथे शाळा सुरू करून सावित्रीबाईंना घरी शिक्षण देऊन शिक्षिका म्हणून नियुक्त केले.
महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे महिला विद्यालय स्थापन केले.
१९१६ मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी कर्वेंनी केली.
तसेच ताराबाई शिंदे यांनी 'स्त्री-पुरुष तुलना' या विषयावर लेखन केले.
इंग्रजांनी विविध कायदे केले, त्यामुळे सामाजिक स्थित्यंतरे घडून स्रीमुक्ती चळवळीला प्रारंभ झाला.
विधवांच्या विवाहाला संमती देणारा कायदा १८५६ मध्ये करण्यात आला.
१८७२ मध्ये नोंदणी विवाह कायदा ( स्पेशल मॅरेज एक्ट) संमत करण्यात आला.
१९३८ मध्ये हिंदू स्त्रियांची प्रॉपर्टी हक्क कायदा करून मालमत्तेत हक्क वाढवण्यात आला.
१९४६ मध्ये हिंदू विवाहित स्त्रियांना विभक्त राहून पोटगी मागण्याचा हक्क हा कायदा संमत करण्यात आला.
१८२९ ते १९४७ पर्यंत स्त्रियांना हक्क देणारे विविध कायदे मंजूर करण्यात आले.
स्रीया कुटुंबातील कामाबरोबरच नोकरीच्या निमित्ताने रोजगारासाठी बाहेर जाऊ लागल्या.
त्यांना संरक्षण देण्याच्या हेतूने अनेक संरक्षक कायदे लागू करण्यात आले.
१९ व्या शतकातील समाजसुधारक व कायदे यांच्या माध्यमातून स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला.
भारतीय राज्यघटनेने स्त्रियांना व पुरुषांना समान अधिकार दिले आहेत.
विवाह, घटस्फोट, वारसाहक्क, दत्तक घेणे या प्रश्नांबाबत सुधारणा घडून आली.
स्त्री शिक्षणावर भर दिल्यामुळे स्त्रिया सुशिक्षित होऊ लागल्याने त्यांनी नवनवीन क्षेत्र, व्यवसाय, उद्योग यामध्ये शिरकाव केला.
त्यांची आर्थिक स्थिती सुधारली. वाढती जीवनशैलीबरोबर स्त्रियांच्या प्रश्नांच्या समस्या वाढत गेल्या.
शहरी स्त्रियांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते.
रस्त्यात होणारे छेडछाडीचे प्रकार, गुंडगिरी वाढल्याने स्त्रियांना असुरक्षित वाटू लागले.
हुंडाबळी, मारहाण, अत्याचार, निपुत्रिक असेल तर होणारा छळ इत्यादी प्रश्न भेडसावू लागले. तसेच 'हुंड्यापायी स्रीची हत्या',
'छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या',
'मुलींची छेड काढणाऱ्यास अटक',
अशा बातम्या वृत्तपत्रांमधून नेहमीच दिसतात.
खेड्यांमध्ये ही बेरोजगारी, गुंडगिरी, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.
ग्रामीण भागातील बहुसंख्य स्त्रियांना अल्पमजुरी, कुपोषण इत्यादी संकटांना तोंड द्यावे लागते.
कोणतेही स्वातंत्र्य ग्रामीण स्रीला नसते.
मनुस्मृति श्लोकात स्रीसंस्काराविषयी म्हटले आहे-
वैवाहिको विधी: स्रीणां संस्कारो वैदिक: स्मृत:
पतिसेवा गुरौ वासो गृहार्थोग्नि परिक्रिया
विवाह हा तिचा वैदिक संस्कार,
प्रतिभेला हा गुरू गृहवास,
गृहकृत्यें हीच होमादिक अग्निसेवा होय.
पुरुषप्रधान संस्कृती यांचा कोंडमारा होतो, ही जाणीव आता तीव्र झाली आहे.
त्यामुळे स्री आपल्यावरील ही बंधने नाकारू लागली आहे.
आपल्या हक्क आणि अधिकारांची जाणीव त्यांना होऊ लागली आहे.
वर्चस्व त्यांना नको आहे, असे असले तरी आधुनिकतेचे वारे वाहू लागल्यामुळे ते आधुनिकता साहजिकच मुली अथवा स्त्रियांच्या वेशभूषेत दिसू लागली आहे.
त्यामुळेच की काय स्रिया अथवा मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.
अजूनही स्री स्वतंत्र नाही. जे. एस. मिल उदारमतवाद यांनी सब्जेक्शन या ग्रंथाद्वारे स्रियांची समानता मांडली.
१५ व्या कलमानुसार स्त्री व पुरुष असा कोणताही भेद भारत राज्य करणार नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा