कृष्णाजी अनंत सभासद हा शिवाजी महाराजांचा आद्य चरित्रकार, मराठ्यांचा राजा 'छत्रपती' झाला, हे पाहण्याचे भाग्य लाभलेला.
त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रायगडावर झालेल्या सोहळ्याचा खरा अर्थ समजलेला हा मराठी बखरकार आहे.
त्याचे लेखन अत्यंत त्रोटक आहे, पण ते अतिशय मार्मिक आहे.
राज्याभिषेकाच्या महत्त्वाबद्दल हा बखरकार दोनच वाक्य लिहून जातो, पण त्या वाक्यांत सर्व शिवचरित्राचे सार येते. तो म्हणतो, "या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मऱ्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही," ही खरोखरच असामान्य गोष्ट होती.
एखाद्या समाजाच्या इतिहासात असा एखादा वैभवशाली दिवस येतो.
हिंदू समाजाच्या इतिहासामध्ये आलेला हा असा वैभवशाली दिवस होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नूतन राजधानी रायगड या किल्ल्यावर झाला.
गुप्तकाळानंतरच्या काळात राज्यभिषेक केल्याचे हिंदू समाजाला माहीत नव्हते.
देवगिरीच्या यादवांनंतर महाराष्ट्रातील खरेखुरे राजपदही नाहीसे झाले होते.
निजामशाही व आदिलशाही या दक्षिणेतील शाह्यांत व उत्तरेकडील मोगल बादशाहीत अनेक हिंदूंना राजा हा किताब असे व यावेळीही होता.
पण हे सर्व नावाचेच राजे असत. खुद्द महाराजांचे वडील शहाजीराजेही 'राजे' पद लावीत.
परंतु त्यांची सत्ता मुसलमान राजांसारखी नव्हती, ते चाकर होते.
महाराजांना असे राजपद नको होते. त्यांना खरेखुरे राजपद, स्वतंत्र राजेपण हवे होते.
आदिलशहाच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराज म्हणजे, आपल्या जहागीरदाराचा एक बंडखोर पुत्र, आपल्या राज्यातील एक बंडखोर, लुटारु मनुष्य.
कुतुबशहा, मोगल, पोर्तुगीज, इंग्रज या सर्वांचाही महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन याहून फारसा वेगळा नव्हता.
एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील मोरे, सुर्वे, दळवी, निंबाळकर इत्यादी मराठे महाराजांना आपल्यासारखेच एक आदिलशहाचे चाकर समजत होते.
त्यांच्या कागदपत्रांमध्ये यासंबंधी अनेक पुरावे उपलब्ध आहेत.
महाराजांना राज्याभिषेकाने हे दाखवून द्यायचे होते की, प्रस्थापित मुसलमान राजवटीविरुद्ध बंडखोरी करण्याची पायरी महाराजांनी ओलांडली असून, त्यांनी 'मराठी राज्याची' स्थापना केली आहे.
ते आदिलशहा, मुघल बादशहा यांच्यासारखे हिंदूंचे राज्यकर्ते बनले आहेत.
त्यांना त्यांचा अभिषिक्त राजा मिळाला आहे.
येथून पुढे हिंदूंवर होणारा अन्याय व जुलूम सहन केला जाणार नाही.
तसा तो झाला, तर अन्याय व जुलूम करणाऱ्यास शासन करण्यासाठी हिंदूंची सत्ता, हिंदूंची बादशाही, हिंदुस्थानात प्रस्थापित झाली आहे.
महाराजांनी आपल्या छोट्याशा जहागिरीचे राज्यात रूपांतर केले.
बलाढ्य फौज जमविली,आरमार बांधले, राज्यकारभार यंत्रणा उभारली, खजिन्यात हिरे, माणके, सोने यांची अगणित संपत्ती जमा केली.
तरी कायदेशीरदृष्ट्या ते सामान्य जहागीरदार होते. महाराजांसंबंधी ते अभिषिक्त राजे नसल्याने ही अडचण होती.
राजनीतीशास्त्राच्या दृष्टीने जोपर्यंत ते राजपद स्वीकारत नव्हते, तोपर्यंत त्यांनी जिंकलेल्या प्रदेशावर राज्य करण्याचाही नैतिक व शास्त्रीय हक्क त्यांना प्राप्त होत नव्हता.
कर वसूल करणे, नवे कर जारी करणे, न्यायदान करणे,शिक्षा अथवा अनुग्रह करणे इत्यादी राज्यकारभाराच्या बाबींनाही महाराजांनी राजपद निर्माण न केल्याने कायदेशीरपणा येत नव्हता.
अशा अनेक अडचणी दूर करण्यासाठी महाराजांना राज्याभिषेकाची आवश्यकता भासत होती.
समाजात खोलवर रुजलेला हा न्यूनगंड राज्याभिषेकाने महाराजांना नष्ट करावयाचा होता.
या जगात क्षत्रिय आहेत, क्षत्रिय राजा बनू शकतो, आपण क्षत्रिय आहोत, आपण राजा झालेलो आहोत, इतक्या गोष्टी त्यांना राज्याभिषेकाने सिद्ध करावयाच्या होत्या.
राज्याभिषेक हा प्रामुख्याने धार्मिक सोहळा होता.
या संस्काराने महाराजांनी आपल्या कर्तबगारीने जे यश व सामर्थ्य निर्माण केले होते, त्यास धर्मशास्त्रीय बैठक येणार होती.
या मुद्याचे विवेचन करताना प्रा. न.र. फाटक म्हणतात, "कोणत्याही प्रकारच्या अभिषेकादि संस्काराशिवाय जशी सिंहाची मृगेंद्रता विक्रमार्जित म्हणून स्वयंसिद्ध असते, तसेच महाराजांचे राजत्व स्वयंसिद्ध असले, तरी खाणीतून काढलेल्या सोन्याला-त्याच्या मूळ सोनेपणात कसलीच उणीव नसूनही, अग्निसंस्काराने त्याचा चमकदारपणा वाढविला जातो, त्या न्यायाने महाराजांच्या राज्याभिषेकाचा विचार करणे चांगले"
राज्याभिषेक समारंभ घडवून आणण्यात त्यामागची स्वतंत्र व सार्वभौम राज्याची महाराजांची कल्पना अत्यंत महत्त्वाची आहे.
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, दक्षिणेतील आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांनीही मोगल बादशहाचे मांडलिकत्व स्वीकारले होते.
म्हणजे खऱ्या अर्थाने ही राज्ये स्वतंत्र व सार्वभौम राहिली नव्हती.
या पार्श्वभूमीवर महाराजांनी केलेला हा प्रयोग अत्यंत तेजस्वी व प्रभावी वाटतो.
राज्याभिषेकाने महाराजांनी सर्व जगास घोषित केले होते की, दक्षिणेत हिंदूंची एक नवी सत्ता उदयास आलेली आहे आणि ही सत्ता स्वतंत्र व सार्वभौम आहे.
रियासतकार सरदेसाई यांच्या शब्दांत, 'महाराजांचे हे कृत्य म्हणजे नूतन राज्याची जाणीव उत्पन्न करण्यासाठी केलेला भरीव व यशस्वी प्रयत्न होय.'
अकबराच्या काळात कृष्ण नृसिंह शेष या धर्मपंडितांने शुद्राचार शिरोमणी नावाचा ग्रंथ लिहिला होता.
त्यामध्ये त्याने या कलियुगात जगात क्षत्रियच नाहीत, असा सिद्धांत सांगितला होता आणि त्याचाच प्रभाव हिंदुस्थानातील सर्व हिंदू प्रजेवर पडलेला होता.
महाराजांनी राज्याभिषेकाचा विचार बोलून दाखविताच, त्यांनी दोन मूलभूत प्रश्न उपस्थित केले : १. जगात क्षत्रिय आहेत काय? २. असतील तर महाराज क्षत्रिय आहेत काय? जसे प्रश्न तसेच त्यावर उत्तर शोधणे आवश्यक होते.
महाराज व त्यांचे वाडवडील स्वतः सिसोदिया या राजपूत क्षत्रिय वंशातील आहोत, असे मानत होते.
त्यांनी व इतरांनी काढलेले उद्गार कागदपत्रांत सापडतात.
खुद्द महाराजांना आपण क्षत्रिय आहोत, असे मनापासून वाटत असूनसुद्धा त्यांनी कोणीही पंडिताच्या मनात असा काही किल्मिष राहू नयेत, यासाठी आपल्या पदरी असणारे बाळाजी आवजी, केशव भट्ट, पुरोहित भालचंद्र भट इत्यादी पंडितांचे एक शिष्टमंडळ उत्तरेतील उदयपूर, काशी इत्यादी ठिकाणी पाठविले.
या शिष्टमंडळाने जयपूरच्या राजघराण्यातून सिसोदिया शिवाजी महाराज याच वंशामधील आहेत, हे सांगणारी वंशावळ प्राप्त केली; आणि राजाच्या दरबारी होणाऱ्या राज्याभिषेक समारंभाची शास्त्रीय माहिती जमा केली.
पुढे हे शिष्टमंडळ काशीला गेले, तेथे हिंदू जगतामध्ये प्रसिद्ध असलेल्या गागाभट्ट या पंडिताला त्यांनी महाराजांच्या वतीने राज्याभिषेकाचे आमंत्रण स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मानली.
विरेश्वर उर्फ गागाभट्ट यांचे मूळ घराणे महाराष्ट्रातील पैठण या गावचे.
परंतु १६ व्या शतकात अनेक विद्वान ब्राह्मणांनी मुसलमानी जुलमाला कंटाळून पैठण सोडून काशीला वास केला.
त्यात हे भट्ट घराणे होते. या घराण्यात अनेक महापंडित होऊन गेले होते.
खुद्द गागाभट्ट हिंदू जगतामध्ये एक सर्वश्रेष्ठ पंडित समजले जात असे.
हिंदू धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान या क्षेत्रात त्यांच्या तोडीचा अन्य कोणी पंडित हिंदुस्थानात नव्हता.
हिंदू जगतामध्ये ब्रह्मदेव व व्यास यांना अशा नावाने ओळखले जाई.
अशा महान पंडिताला महाराजांनी राज्याभिषेकासाठी पाचारण केले होते.
खुद्द गागाभट्ट अनेक वेळा दक्षिणेत धर्मशास्त्र निर्णयासाठी येऊन गेले होते.
महाराजांचा व त्यांचा चांगला परिचय होता.
गागाभट्ट आल्यानंतर आपल्याला ओळखीत नाहीत त्यांना बुद्धिचातुर्याने त्यानेच या मंडळींनी राज्याभिषेकाला विरोध केला होता त्यांच्या शंकांचे निरसन करून समाधान केले आणि समारंभाच्या पुढच्या तयारीस लागले.
राज्याभिषेक समारंभ रायगड या किल्ल्यावर होणार होता.
त्या दृष्टीने राजधानीस आवश्यक असणाऱ्या राजमंदिर, मंत्रसभा, चित्र सभा प्राण्यांचे वहां गजे शाला पाकशाला कोठ्या सरकारकुनांचे वाडे, बाजारपेठ इत्यादी अनेक इमारती यापूर्वीच बांधून तयार होत्या.
रायगड ही राजधानी म्हणून महाराजांनी का निवडली, हे सांगताना कृष्णाची अनंत सभासद म्हणतात, "गड बहुत चकोट, चौतर्फी गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे दीड गांव उंच. पर्जन्यकाली कडियावर गवत उगवत नाही; आणि धोंडा ताशीव एकच आहे, असे देखोनी बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड करावा."
राज्याभिषेकापूर्वी आपल्या राज्यातील देवदेवतांचे दर्शन घेण्यासाठी महाराजांची स्वारी मे १६७४ ला चिपळूनला गेली.
परशुरामाची पूजा बांधून ते रायगडास परतले. चार दिवसांनी प्रतापगडास आले.
तेथे महाराजांनी तुळजाभवानीची मूर्ती स्थापून मंदिर बांधले होते.
या मूर्तीस महाराजांनी सव्वा मण सोन्याची छत्री अर्पण केली.
तुळजाभवानीचे दर्शन घेऊन महाराज २१ मे रोजी रायगडास परतले.
यानंतर २९ मे १६७४ रोजी गागाभट्टाने महाराजांचे क्षत्रिय पद्धतीनुसार मौंजीबंधन म्हणजेच उपनयन संस्कार केले.
आत्तापर्यंत भोसले घराण्यात हा संस्कार लुप्त झाला होता. त्याचे प्रायश्चित्त म्हणून तुलादान विधी केला.
तसेच लष्करी मोहिमांमध्ये झालेल्या 'ब्रह्महत्यादी पातकांच्या क्षालनार्थ' तुलापुरुषदान विधी केला.
यानंतर ३० मे १६७४ रोजी महाराजांचे त्यांच्याच राण्यांशी पुन्हा समंत्रक विवाह लावण्यात आले.
हे विवाह वैदिक पद्धतीनुसार करण्यात आले.
या दोन विधींनी महाराजांना आता शुद्ध क्षत्रिय म्हणून धर्मशास्त्राची मान्यता मिळाली.
यानंतर राज्याभिषेकाच्या दिवसापर्यंत दररोज अनेक प्रकारचे विधी, होम-हवन, दान, ब्राह्मण भोजने इत्यादी अनेक कार्यक्रम नित्य चालू होते.
राज्याभिषेक --
ज्येष्ठ शुद्ध तेरा शनिवार तारीख ६ जून १६७४ रोजी रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला.
राज्याभिषेक समारंभास शुक्रवार सायंकाळपासून सुरुवात होऊन तो शनिवारी सकाळी संपला.
या राज्याभिषेकाचे वर्णन अनेक बखरीत व परकीयांच्या पत्रांत आढळते.
महाराज व त्यांची पट्टराणी सोयराबाई राज्याभिषेक मंडपात आल्यावर राज्याभिषेकाची सुरुवात गणेशपूजन, स्वस्तिपूजन इत्यादी पूजनांनी झाली.
नंतर मंडपपूजा करण्यात आली.
अभिषेक व सिंहासनारोहण असे राज्याभिषेकाचे दोन प्रमुख विधी होते.
अभिषेकशालेत सोन्याचे आसन तयार केले होते.
आसनावर महाराज, सोयराबाई व युवराज संभाजी यांनी आरोहण केले.
यावेळी अष्ट दिशांना महाराजांचे अष्टप्रधान उभे राहिले होते.
याशिवाय अनेक अधिकाऱ्यांच्या हाती पवित्र नद्यांच्या जलाने भरलेले कलश होते.
या सर्वांनी वेदमंत्राच्या घोषात महाराज, पट्टराणी व युवराज यांच्यावर अभिषेक केला.
यावेळी वाद्यांचा गजर झाला. १६ ब्राह्मण सुवासिनी व १६ कुमारिका यांनी महाराजांची सोन्याच्या ताटातून पंचाआरती केली.
यानंतर महाराजांनी पुन्हा स्नान करून काशाच्या परातीतील तुपात आपले मुख पाहिले.
हिरे, सोने यांचे अलंकार घालून, वस्त्र परिधान करून डोईस मंदिल बांधला.
नंतर त्यांनी तलवार, ढाल, धनुष्य, बाण व रथ यांची पूजा केली.
सत्पुरुष मातोश्री जिजाबाई, इतर वडीलधारी मंडळी, गागाभट्ट, इतर पंडित यांना नमस्कार करून त्यांच्यासह महाराज राजसभेत सिंहासनारूढ व्हावयास निघाले.
राज्यारोहणासाठी अत्यंत मौल्यवान असे सिंहासन महाराजांनी तयार केले होते.
सभासद म्हणतात की, महाराजांनी ३२ मण सोन्याचे सिंहासन तयार करून कोशातील मौल्यवान रत्ने त्यामध्ये जडविली होती.
तर सर जदुनाथ सरकार म्हणतात 32 मण म्हणजे 14 लाख रुपयांचे सोने झाले रत्नांची किंमत त्याशिवाय.
सिंहासन तयार करीत असता दिल्लीचे मयूरसिंहासन शिवाजीच्या दृष्टीपुढे असावे.
आजच्या रोहनच्या प्रसंगी हजर असलेला ऑक्झिंडेन हा इंग्रज वकील राजसभेचे वर्णन करताना म्हणतो,"सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सुवर्णा अंकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे असल्याचे आम्ही पाहिले. उजव्या हाताला दोन मोठमोठ्या दातांच्या वस्त्यांचे सुवर्णाची मत्स्यांची शिरे होती. हाताला अनेक अश्व पुछे व एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती."
मातोश्री जिजाबाई यांच्या समोर हा सोहळा होत होता महाराजांनी सिंहासन आरोहण करताच वाद्यांचा गजर झाला तोफांचा गडगडाट झाला.
सिंहासनाला रोहन आनंतर सोळा सुवासिनी व सोळा कुमारिका यांनी महाराजांना सोन्याच्या ताटातून पंचारती केली यानंतर गागाभट्टांनी "मोत्याचा तुरा वर लावलेला भरजरीचा राजमुकुट हातात घेऊन तो स हस्ताने महाराजांच्या मस्तकावर ठेविला व मोत्याची झालर लावलेले रत्नजडित छत्र महाराजांच्या मस्तकावर धारण करून उच्च स्वरात शिवाजी महाराज हे छत्र सिंहासनाधीश्वर व संस्कार युक्त राजे झाल्याचे घोषित केले."
पंतप्रधान मोरोपंत यांनी महाराजांना मुजरा करून ८००० होनांचा अभिषेक केला. यानंतर इतर अधिकाऱ्यांचे मुजरे झाले इंग्लिश डच पोर्तुगीज त्यातील परकीयांच्या वकिलांनी महाराजांना प्रणाम करून नजरा ने दिले यानंतर महाराजांनी स्वारी अश्वारूढ होऊन वैभवाने गडावरील देवदेवतांचे दर्शन घ्यायला निघाली काही अंतर गेल्यावर महाराज सुवर्णालंकारांनी सजविलेल्या गजराजावर आरुढ झाले. या गजावर माहुत होते खुद्द सेनापती हंबीरराव!
देवदर्शना नंतर राज्यसभेत परत येऊन कुलदैवत मातोश्री यांना महाराजांनी वंदन केले आणि राज्याभिषेकाचा सोहळा संपला.
महाराजांनी राज्याभिषेक सोहळ्यासाठी अपार दानधर्म केला. विद्वान पंडित संत-महंत तडीत आपसे इत्यादींना मुक्तहस्ते दाने दिली.
२४००० केवळ दक्षिणेवर खर्च झाले. गागाभट्टांना ७००० होन दक्षिणा देण्यात आली.
७ जून १६७४ रोजी सुरू झालेला दानधर्म पुढे १२ दिवस चालू होता.
एकदा होऊन कोणीही रिक्त हस्ते परत केला नाही..
सभासदाच्या म्हणण्याप्रमाणे, या समारंभास एक करोड ४२ लक्ष होऊन खर्च आला तर सर्च दोनच सरकार यांच्या मते एकंदर खर्च सुमारे दहा लक्ष होन आला असावा.
महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या तीन महिन्यांनी त्यांना एक छोटासा राज्याभिषेकाचा समारंभ घडवून आणावा लागेल समारंभ रायगडावर झाला आणि त्याच्या सोहळ्याचे पुढारीपण यांनी केले कल्पतरू नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला असून त्यामध्ये या कवितेचे पूर्ण भरून व समारंभाची प्रयोजन याची चर्चा केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा