पंडित जवाहरलाल नेहरू : २७ मे पुण्यतिथीनिमित्त...
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते, जागतिक शांततेचे पुरस्कर्ते, आधुनिक भारताचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म गंगा, यमुना व सरस्वती यांचा त्रिवेणी संगम असलेल्या प्रयोगक्षेत्र म्हणजे अलाहाबाद येथे झाला.
पंडित मोतीलाल नेहरू व स्वरूपाराणी यांच्या या पुत्राचे बालपण अत्यंत वैभवात गेले.
प्राथमिक शिक्षण इंग्रजी शिक्षकाकडून घरीच, वडिलांनी बांधलेल्या ऐश्वर्यसंपन्न 'आनंदभवन' नामक बंगल्यात झाले.
आज हे घर राष्ट्रीय स्मारक आहे.
मोतीलालजींनी आपल्या मुलाला माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला ठेवले.
इंग्लंडला हॅरोच्या 'ब्रिटिश पब्लिक स्कूल मध्ये त्यांचे शिक्षण झाले.
१९१२ ला नेहरू बॅरिस्टर झाले. बॅरिस्टर व एम. ए. या पदव्यांसाठीचा अभ्यास करताना जवाहरलाल यांनी नामवंत पाश्चात्य विचारवंतांचे ग्रंथही वाचले.
त्यामुळे त्यांचे मन उदारमतवादी व विशाल झाले.
भारतात परतल्यावर त्यांचा विवाह कमला कौल या दिल्लीत राहणाऱ्या युवतीशी झाला.
ते अलाहाबाद उच्च न्यायालयात वडिलांप्रमाणेच वकिली करू लागले.
इंग्लंडमध्ये ७ वर्ष तर तिथून येताना आयर्लंडमध्ये जाऊन राहिले.
वडिलांबरोबर फ्रान्स, जर्मनी, नॉर्वेचा प्रवासही त्यांनी केला.
पण आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ पोट भरण्यासाठी न करता देशबांधवांच्या सेवेसाठी ही करावा, असे त्यांच्या मनात आले.
ते आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांमध्ये फिरुन, त्यांच्यावर जमीनदार व सरकार यांच्याकडून होणारे अन्याय विनामूल्य दूर करू लागले.
त्यामुळे लवकरच ते रंजल्या- गांजलेल्यांचे दैवत बनले.
आपला भारत इंग्लंडसारखा स्वतंत्र देश असावा, असे त्यांना वाटत असे.
इ.स.१९१२ ला ते बांकीपूर येथे काँग्रेसच्या अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून गेले.
तेथे गोपाळ कृष्ण गोखले यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाची छाप त्यांच्यावर पडली.
लोकमान्य टिळकांच्या लढाऊ वृत्तीनेही ते भारावून गेले.
मोतीलाल नेहरू, डॉ. ॲनी बेझंट, सरोजिनी नायडू व महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्यलढ्यात आले.
त्यांचा १९१६ मध्ये दिल्ली येथे कमलादेवी (कमला कौल काश्मिरी व्यापाऱ्याची मुलगी) या मुलीशी विवाह झाला.
त्यांना हर्ष नावाचा मुलगा झाला, पण तो अल्पायुषी ठरला.
१९ नोव्हेंबर १९१७ ला इंदिरा ही मुलगी झाली.
मोतीलाल व जवाहरलाल या पिता-पुत्रांनी वकिली सोडून देशसेवेत स्वतःला वाहून घेतले.
गांधीजींबरोबर सत्याग्रहात भाग घेऊ लागले.
१९०३ ला ते काँग्रेसमध्ये आले. १९१६ लखनौच्या अधिवेशनात ते महात्मा गांधींजींजवळ आले.
त्यांच्या जीवनात दोन दुःखद घटना घडल्या. त्यांचे वडील मोतीलालजींचे १६ फेब्रुवारी १९३१ ला निधन झाले.
त्यांची पत्नी कमलादेवी आजारी पडल्या. त्यांना घेऊन ते स्विझर्लंडला गेले. तेथे लोझोन या गावी उपचार घेताना कमलादेवींचे २८ फेब्रुवारी १९३६ ला निधन झाले.
भारतभर कायदेभंगाची चळवळ सुरू झालेली होती.
कायदेभंग करणाऱ्यांना इंग्रज सरकारने अटकेत टाकले.
तुरूंगात नेहरूंनी स्वतःचे आत्मचरित्र लिहिण्यास घेतले.
त्यांनी 'भारताचा शोध', 'इंदिरेस पत्रे', यासारखी अनेक पुस्तके तुरुंगात व तुरूंगाबाहेर लिहिली.
१९५५ साली राष्ट्रपतींनी त्यांना 'भारतरत्न' हा किताब देऊन सन्मानित केले होते.
काँग्रेस कार्यात नेहरू जास्त लक्ष देऊ लागले.
प्रचारकार्य व जाहीर भाषणे वाढली. त्यामुळे राज्यद्रोहाबद्दल नेहरूंना अटक झाली.
ते भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत दौरे काढून स्वातंत्र्याबद्दलच्या विचारांचा प्रसार करू लागले.
त्यातच त्यांची आई स्वरूपाराणी या ही जग सोडून गेल्या.
संपूर्ण नेहरू कुटुंब स्वातंत्र्यसमरात उतरले होते.
१९४२ च्या 'चले जाव' चळवळीस सुरुवात झाली होती.
ते युरोपच्या दौऱ्यावर गेले. त्यांचे अनेक ठिकाणी भव्य स्वागत झाले.
दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांना मदत करण्याबद्दल भारतीयांनी नकार दर्शवला.
इंग्रजांनी नेहरू-गांधी यांना अटक केली.
सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेवर राजद्रोहाचे खटले भरले गेले.
त्यावेळी नेहरूंनी पुन्हा खटला लढवला. त्यात त्यांना यश मिळाले.
१९२१ साली गांधीजींनी सुरू केलेल्या असहकाराच्या चळवळीपासून, १९४२ च्या भारत छोडो चळवळीपर्यंतच्या प्रत्येक चळवळीत भाग घेतल्याने, आयुष्याची १५ वर्ष तरी त्यांनी कारावासात काढली.
त्यांनी कामगार संघटनांना तसेच संस्थानातील प्रजाजनांच्या चळवळींना ही मार्गदर्शन केले.
१९२९ साली लाहोरला भरलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची, तर १९३६ साली लखनौला भरलेल्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून समाजवादावर आधारित समाजरचनेची घोषणा केली.
पुढे ब्रिटिश सरकारने स्वातंत्र्य देऊ केले, पण ते देशाची फाळणी करून.
जवाहरलालजींनी ते नाइलाज म्हणून स्वीकारले.
१५ ऑगस्ट १९४७ ला सर्वानुमते ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
परंतु ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाल्याने ते व्यथित झाले.
पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे १७ वर्ष पंतप्रधान होते.
भुवनेश्वरच्या काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांना हृदयविकाराचा पहिला झटका आला, पण ते त्यातून वाचले.
परंतु २७ मे १९६४ ला त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते स्वर्गवासी झाले.
आपल्या कारकिर्दीत जवाहरलाल नेहरू यांनी भारताला वैज्ञानिक व आर्थिक नियोजन या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी दिल्या.
१९६२ मध्ये चीनने केलेल्या आक्रमणामुळे त्यांच्या मनाला फार मोठा धक्का बसला आणि असे म्हटले जाते की, त्यामुळेच त्यांचा लवकर मृत्यू झाला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा