अकबर (१५५६ ते १६००)--
जन्म- १५ ऑक्टोबर १५४२, अमरकोट.
अकबराच्या जन्माच्या वेळी त्याच्या वडिलांची म्हणजेच हुमायुनची अवस्था अतिशय वाईट होती.
अशाही परिस्थितीत हुमायूनने अकबराच्या शिक्षणाची चांगली व्यवस्था केली होती.
बैरामखानास अकबराचा शिक्षक आणि संरक्षक म्हणून नेमले होते.
हुमायुनच्या मृत्यूनंतर बैरामखानाने १४ फेब्रुवारी १५५६ रोजी अकबराचा राज्याभिषेक करून त्यास बादशहा पदावर आरुढ केले.
अकबर बादशहा झाला, तेव्हा त्याच्याकडे सुसंघटित लष्कर नव्हते, पैसा नव्हता, फारसे प्रदेशही ताब्यात नव्हते, राजकीय परिस्थिती प्रतिकूल होती.
अशा परिस्थितीत बहरामखानाने त्याला चांगला आधार दिला.
त्याच्याच सहकार्याने अकबराने भारतात मुघल साम्राज्य स्थिर व भक्कम केले.
पानिपतची दुसरी लढाई अकबर आणि हेमू यांच्यात १५५६ मध्ये झाली.
बादशहा म्हणून अधिकारावर आल्यानंतर १५५६ ते १५६० पर्यंत बहरामखानाच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली, आग्रा, पंजाब, ग्वाल्हेर, जौनपूर व चुनार या प्रदेशात मोगल सत्ता स्थिर करून त्यानंतर अकबराने आपले लक्ष उत्तर भारताकडे वळवले.
उत्तर भारतातील मोहिमा-
अकबर सामर्थ्यशाली, पराक्रमी असल्याने लवकरच त्याने साम्राज्यविस्ताराचे धोरण आखून हिंदू व मुसलमानांची स्वतंत्र राज्य जिंकून घेतली.
माळव्यातील बाझबहाद्दूरची सत्ता संपुष्टात आणली.
जौनपूर व चुनार येथील बंडाचा बीमोड केला.
जयपूरच्या राजाने अकबराची भेट घेऊन आपली मुलगी जोधाबाई हिचा विवाह १५६२ मध्ये अकबराशी लावून संबंध दृढ केले.
अशाप्रकारे जयपूर आपल्या प्रभावाखाली आणला.
गोंडवनात गोंड लोकांचे एक लहानसे राज्य होते.
राणी दुर्गावती गोंडवनचा कारभार पाहत होती.
साम्राज्य विस्तारासाठी अकबराचे लक्ष गोंडवनाकडे गेले.
गोंडवन जिंकून घेण्यासाठी आसफखानाला पाठवले.
राणी दुर्गावती व मोगल यांच्यात युद्ध होवून राणी दुर्गावतीचा पराभव झाला.
विटंबना टाळण्यासाठी तिने आत्महत्या केली.
त्याबरोबरच मोगलांनी गोंडवन ताब्यात घेऊन आपल्या साम्राज्याला जोडले.
अकबर प्रबळ साम्राज्यवादी शासक होता.
कालांतराने बहरामखानाच्या वर्चस्वातून सुटका मिळवून पुढे अंतःपुरातील स्त्रियांचे वर्चस्व झुगारून अकबराने विविध प्रदेश पादाक्रांत करण्यासाठी मोहिमा काढल्या.
मुजुमदार राय चौधरी व दत्त यांच्या मते, "वस्तुतः ४० वर्षात अनेकदा इतर राज्यांना आपल्या साम्राज्यात विलीन करताना त्याने जवळजवळ संपूर्ण उत्तर व मध्य भारताचे राजकीय एकीकरण केले."
डॉ. ईश्वरीप्रसाद लिहितात, अकबराच्या दिग्विजयास तीन भागात विभक्त केले जाऊ शकते.
१. उत्तर भारतावरील विजय (१५५८ ते १५७६ )
२. वायव्येकडील विजय (१५८० ते १५९६) ३. दक्षिणेकडील विजय (१५९८ ते १६०१ )
त्याच्या साम्राज्याचा प्रसार सुरुवातीच्या कारकीर्दीतच म्हणजेच १५५८ ते १५६० याकाळात घडून आला.
त्याने ग्वाल्हेर, अजमेर, जौनपूर त्याने घेतले.
सन १५६१-६२ मध्ये त्याने माळवा व मेवाडवर विजय मिळवला.
त्यानंतर चितोडचा राजा उदयसिंह व अकबर यांच्यात हळदीघाटची लढाई होवून अकबराने चितोड ही इ.स.१५६८ (१५७६) मध्ये जिंकून घेतले.
दक्षिण भारतातील मोहिमा (१५९५ ते १६०१):
इ.स.१५९५ पर्यंत उत्तर हिंदुस्तान ताब्यात घेतला.
त्यानंतर अकबराचे लक्ष दक्षिण भारतावर केंद्रित होऊन दक्षिणेतील अहमदनगरच्या सत्तेविरूद्ध संघर्ष करून २८ ऑगस्ट १६०० रोजी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला.
त्यानंतर ६ जानेवारी १६०१ रोजी खानदेशच्या प्रदेशावर मोगलांनी नियंत्रण प्रस्थापित केले.
अशा प्रकारे दक्षिणेकडील खानदेश, वर्हाड, अहमदनगर ही राज्ये जिंकून घेतली.
त्यानंतर अकबराने सम्राट ही उपाधी धारण केली.
राजपूतविषयक धोरण :
अकबर अतिशय धूर्त व मुत्सद्दी होता.
राजपुतांच्या सहकार्याशिवाय हिंदुस्थानात आपले साम्राज्य निर्माण होणे अशक्य आहे, हे लक्षात ठेवून अकबराने रजपूतांविषयी उदार धोरण स्वीकारून त्यांच्याशी सहकार्याने वागायचे ठरवले.
एवढेच नाही तर रोटी-बेटी व्यवहार करून राजपूत कन्या जोधाबाई हिच्याशी विवाह केला.
अकबराने रजपुतांना मानसन्मान व अधिकार पदे ही दिली.
राजा मानसिंह, राजा भगवानदास, राजा बिरबल राजा तोडरमल इत्यादी राजपुतांना अधिकारपदे दिली.
राजपुतांची राज्ये त्यांच्याकडेच ठेवून त्यांना मांडलिकत्व स्वीकारण्यास भाग पाडले.
एकापाठोपाठ अनेक रजपूतांनी अकबराचे मांडलिकत्व स्वीकारले.
त्याला राणाप्रताप अपवाद होता. अखेर हळदीघाटच्या लढाईत राणा प्रतापचा पराभव झाला.
याच राजपुतांच्या मदतीने अकबराने अनेक विजय मिळवले. राजपुतांना मानसन्मान दिला.
अकबराने फत्तेपूर सिक्री येथे राजधानी वसवली.
अकबराचे धार्मिक धोरण-
सर्व धर्मात सत्यांश आहे असे अकबराचे ठाम मत बनले होते.
इतर धर्मातील तत्त्वांनी आकृष्ट झाला.
ख्रिस्ती धर्मातील उपासना विधींना तो उपस्थित राहू लागला.
पारशींची सूर्योपासना त्याने केली.
हिंदूंच्या जन्म-मरणाच्या फेऱ्यांवर त्याची श्रद्धा बसली.
जगातील कोणताच एक धर्म त्याला अध्यात्मिक शांती देऊ शकला नाही, म्हणून त्याने सर्व धर्मातील चांगली तत्त्वे एकत्रित करून दिन-ए-इलाही हा नवीनच धर्मपंथ स्थापन केला व स्वतः त्याचा प्रमुख बनला.
अकबराने हिंदूंवरील 'जिझिया कर' बंद केला.
अनेक धर्मांची तीर्थस्थाने पुन्हा गजबजून गेली.
अनेक धर्मातील साधूंचा स्वतः अकबराने सन्मान केला.
हिंदूंना प्रशासनात समाविष्ट करून घेतले.
अकबराने हिंदू कवी, विद्वान, संगीततज्ञ व चित्रकारांना ही प्रोत्साहन दिले.
हिंदू-मुस्लिम यांच्यातील यापूर्वीची दरी कमी होऊ लागली.
'एका दृष्टीने अकबर हा भारतीय एकराष्ट्रीयत्वाचा जनक होऊन गेला असे म्हणता येईल.' असे उद्गार पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काढले आहेत.
भारताचे सामर्थ्य हिंदू-मुस्लिम ऐक्यात आहे हे ओळखणारा अकबर हा द्रष्टा सम्राट होऊन गेला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा