अतिप्राचीन,केदारनाथ मंदिर....

 

  • केदारनाथ मंदिर -

  • केदारनाथ मंदिर हे अतिप्राचीन एक हिंदू मंदिर आहे.

  • उत्तराखंडमध्ये केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर हे मंदिर बांधले गेले आहे.

  • हिमालय पर्वतामध्ये असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली, तर आद्य शंकराचार्यांनी या मंदिराचे पुनरुज्जीवन केले, असे मानले जाते.

  •  एका मतानुसार, राजा भोजने हे मंदिर बांधले असावे.

  •  पण काहींच्या मते, हे मंदिर ८ व्या शतकात शंकराचार्यांनी बांधले.

  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले केदारनाथ सर्वात उंचीवर असून समुद्रसपाटीपासून ३५५३ मीटर उंचीवर असून गौरीकुंडाहून १४ किलोमीटर लांबीचा प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते.

  •  हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा या काळातच खुले असते.

  •  इतक्या उंचीवर हे मंदिर कसे बांधले असेल, याविषयीची खरी माहिती आजही उपलब्ध नाही.

  •  केदारनाथ मंदिर ८५ फूट उंच, १८७ फूट लांबी, तर ८० फूट रुंद आहे.

  • मंदिराच्या भिंती मजबूत दगडांपासून बनवलेल्या आहे.

  • सत्ययुगात प्रशासक असलेल्या राजा केदार यांच्या नावावरून या ठिकाणाचे नाव केदार पडले.

  • २०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसक पुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले.

  • भूस्खलनामुळे केदारनाथ सर्वात जास्त प्रभावित होते.

  • मंदिर परिसराचे देखील खूप नुकसान झाले.

  • मात्र दगडी बांधकाम असलेल्या केदारनाथ मंदिराला धक्काही पोहोचला नाही.

  • हे चार धामांपैकी एक, पंचकेदारपैकी एक आहे.

  • केदारनाथ मंदिर एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान  उघडतात.

  • स्वयंभू शिवलिंग अतिप्राचीन आहे.

  • डेहराडूनच्या वाडिया इन्स्टिट्यूटच्या विजय जोशींनी म्हटले की,केदारनाथ मंदिर ४०० वर्ष बर्फात दबलेले होते. त्याचे निशाण आजही मंदिरात आहे.

  • विजय जोशी म्हणतात की, १३ ते १७ व्या शतकात छोटे हिमयुग आले होते.

  • त्यामध्ये मोठा भाग बर्फात झाकला गेला होता.

  • तरीदेखील मंदिर सुस्थितीत होते.

  • असे मानतात की, केदारनाथ मंदिराच्या मागच्या बाजूला पांडवांनी मंदिर बांधले होते, परंतु ते कालौघात नष्ट झाले.

  • गढवाल विकास निगमनुसार, हिमयुगाआधीच ८ व्या शतकात आदि शंकराचार्यांनी हे मंदिर बांधले असावे.

  • वाडिया इन्स्टिट्यूटने केदारनाथ परिसराची पाहणी केली. 

  • त्यानुसार शेवाळ आणि त्याचे कवक मिळून त्याच्या काळाविषयी अनुमान काढले.

  • १७३८ पर्यंत त्या ठिकाणी  हिमनगाचे भूस्खलन चालू होते.

  • वाडिया इन्स्टिट्यूटचे विजय जोशी म्हणतात, हिमनग मागे झाले की, खालील सगळे दाबून टाकतात,मोठे तुकडे तसेच राहतात.

  • अशा ठिकाणी मंदिर बांधणे म्हणजे अद्भुतच!अदभूतच!!

  • डॉ. आर. के. डोबाल देखील मानतात की, हे मंदिर खूप भक्कम, मजबूतपणे बांधले गेले आहे.

  • जाणकारांच्या मते, दगडांना जोडण्यासाठी इंटरलॉक पध्दत वापरली असावी. 

  • त्यामुळे हे मंदिर भूकंपरोधक वास्तूमध्ये समाविष्ट झाले.

  • याच मजबुतीमुळे मंदिर कित्येक शतकांपासून खंबीरपणे उभे आहे.

  • केदारनाथ हिंदू धर्मातील पवित्र स्थानांपैकी एक आहे.

टिप्पण्या