हुमायुन (इ.स. १५३० ते १५४० आणि इ.स. १५५५ ते १५५६) :-
बाबराच्या मृत्यूनंतर हुमायून हा मोगल घराण्याचा वारस म्हणून गादीवर आला.
परंतु सुरुवातीपासूनच त्याला विपरीत परिस्थितीशी तोंड द्यावे लागले.
भाऊ कामरान स्वतंत्र राज्य मागत होता.
त्याला पंजाब, मुलतानकडील भाग देऊन हुमायूनाने तडजोड केली.
एक प्रकारे हुमायून फार मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाला होता.
अफगाणांचा धोका होताच, त्याबरोबरच गुजरातचा राज्यकर्ता बहादुरशहा यांचे आवाहनही त्याच्यासमोर होते.
त्यापैकी अफगाणांचा धोका गंभीर बनला.
त्यांच्याशी संघर्ष करण्यात गुंतलेला हुमायून बंगालपर्यंत फरफटत गेला.
तेथे तो कोंडीत सापडल्याचे पाहून इकडे अफगाण सरदार शेरशहा याने दिल्लीचे मुघल तख्त बळकावले.
तेथे तो कोंडीत सापडल्याचे पाहून इकडे अफगाण सरदार शेरशहा याने दिल्लीचे मुघल तख्त बळकावले.
परंतु पुन्हा एकदा इ.स. १५५५ मध्ये हुमायूनने दिल्लीचे राज्य शेरशहाच्या वारसांकडून जिंकून घेऊन दिल्लीत मुघल घराण्याची पुनर्स्थापना केली.
सन २२ मे १५४५ मध्ये शेरशहाच्या अपघाती मृत्यूनंतर अफगाण शासक एवढ्या विशाल साम्राज्याची धुरा सांभाळू शकले नाही.
परागन्दा अवस्था व्यतीत केल्यावर हुमायूनने १५ वर्षानंतर म्हणजेच २३ जुलै १५५५ मध्ये पुन्हा दिल्लीची गादी बळकावली.
सन २७ जानेवारी १५५६ मध्ये जिन्यावरून पडून हुमायुनचा मृत्यू झाल्यावर बैरामखानाच्या मार्गदर्शनात सन १५५६ ला अकबर गादीवर बसला.
शेरशहा सूर (१५४०-१५४५) :
शेरशहाने वयाच्या ६७ व्या वर्षी हे कृत्य करून बादशाहीपद मिळवले होते.
त्याच्या पूर्व आयुष्याची फारशी माहिती मिळत नाही. त्याचे मूळ नाव फरीद होते. त्याचे वडील जौनपूरचे जहागीरदार होते.
त्यांच्या हाताखाली शेरशहाला महसूल, प्रशासनाचे योग्य प्रशिक्षण मिळालेले होते.
तो सरदार म्हणून लवकरच नावारुपाला आला.
मोगलांच्या आपापसातील दुहीचा फायदा करून घेण्याचे शेरशहाने ठरवले.
त्यातूनच शेरशहा सूर व हुमायुन यांच्यात संघर्ष झाला.
१५ मे १५४५-४६ रोजी शेरशहाने मोगली सैन्यावर हल्ला करून मोगलांचा पराभव केला.
अशाप्रकारे दिल्लीतील मोगल सत्तेचा पराभव करून दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची स्थापना झाली.
भारताच्या मध्ययुगीन इतिहासात एक आदर्श, प्रजाहितदक्ष राजा म्हणून शेरशहाचे स्थान उंच आहे.
आपल्या पाच वर्षाच्या अल्पशा काळात शेरशाहाने शासनाच्या प्रत्येक दालनात नेत्रदीपक सुधारणा घडवून आणल्या.
भारताचे राजकीय दृढ एक स्थापन यासाठी सुरू केलेले अविरत कार्य अकबराच्या काळात पूर्णत्वास केले गेले.
राजकीय एकीकरणाची प्रक्रिया सुरू करणाऱ्या शेरशहास अनेक इतिहासकार "प्राचीन व आधुनिक भारतामधील एक दुवा" मानतात.
इतिहासकार कीन तर असे वर्णन करतो की, "कोणत्याही शासनाने, सरकारनेदेखील एवढी बुद्धिमत्ता दर्शवली नाही जेवढी या पठाणाने दर्शविली." तो निरंकुश शासक असला, त्याचे शासन केंद्रीकृत असले, तरी ते लोकांच्या इच्छांवर आधारित होते.
भारतीय राज्यव्यवस्था-
"प्रजा सुखी तर राजा सुखी" त्यानुसार त्याने राज्यकारभार चोखंदळपणे सांभाळला.
पहाटेपासून रात्रीपर्यंत अव्याहतपणे कार्यात मग्न असणारा तो प्रजावत्सल शासक होता.
त्याने सुलतानशाही प्रमाणेच विशेषत्वेकरून चार मंत्री विभाग स्थापले होते.
१. दिवाण वजारत
२. दिवाण- ए-आरिज
३. दिवान-- ए-रसालत
४. दिवान-ए-इन्शा. या चार विभागांव्यतिरिक्त दिवान-ए-काजी मुलकी व फौजदारी खटल्यांचा न्यायनिवाडा करत असे.
दिवाण-ए- बरीद हे त्यांचे गुप्तहेर खाते होते.
प्रांतीय शासनव्यवस्था -
डॉ. आशीर्वादलाल श्रीवास्तव यांच्या मते, "सुलतानशाहीत व शेरशहाच्या कारकिर्दीत प्रांतांसारखे विभाग होते. या विभागांना "सुभा" किंवा "प्रांत" न म्हणता "इक्ता" म्हटले जाई.
शेरशहाने बंगालमध्ये मात्र नवीन शासन व्यवस्था प्रस्थापित करून त्या प्रांतास अनेक "सरकारा"मध्ये विभाजित केले होते.
त्याचे केंद्रीय व प्रांतिक प्रशासन अत्यंत कार्यक्षम होते.
प्रशासनातील भ्रष्टाचार निपटून त्याने लोकांच्या कल्याणासाठी प्रशासनावर वचक बसवला.
जमिनीची शास्त्रीय मोजणी करून दर्जाप्रमाणे उच्च, मध्यम व कनिष्ठ अशी वर्गवारी करून जमीन
महसूल पद्धत ठरवली.
"शेतकरी सुखी तर राज्य सुखी" असे त्याच्या प्रशासनाचे सूत्र होते
'दम' हे नाणे चलनात आणले. ६४ दमांचा एक रुपया दर ठरवला.
जोपर्यंत भारतात रुपयाचे नाणे आहे, तोपर्यंत शेरशहा भारताच्या इतिहासात अजरामर राहील.
अनेक ठिकाणी वसुल केले जाणारे कर त्याने रद्द करून फक्त 'उत्पादन कर' व 'विक्रीकर' असे दोनच कर बसवले.
रस्त्याचे महत्त्व जाणून त्याने महामार्ग बांधले. उदाहरणार्थ सोनारगाव, बंगाल ते सिंधू नदीपर्यंत पंधराशे कोसाचा सडक -इ आशय, आग्रा ते बुऱ्हाणपूर, जोधपुर, लाहोर ते मुलतान असे महामार्ग बांधले.
रस्त्यावर ठिकठिकाणी डाकचौक्या बसवल्या.
प्रवाशांसाठी राहण्यास सराया बांधल्या, पाण्याची व्यवस्था केली, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली.
कार्यक्षम पोलिस यंत्रणा उभारली.
गुन्हेगार सापडला नाही तर त्याची जबाबदारी अधिकाऱ्यावर दिली.
न्यायक्षेत्रात समान कायदा, हे सूत्र लागू केले.
घोडदळात घोड्यांना डाग देण्याची व पायदळात सैनिकांची चेहरापट्टी घेण्याची पद्धत त्याने सुरू केली.
इस्लामचा तो अभिमानी असला तरी त्याने हिंदूंची प्रतिष्ठा जपली.
शेरशहाने लोककल्याणकारी व कार्यक्षम प्रशासन यंत्रणा उभारली, त्याच पायावर पुढे सम्राट अकबराने आपल्या राज्याचे प्रशसन उभारले.
म्हणूनच शेरशहाला 'अकबराचा पूर्व सूरी' असे म्हणतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा