पानिपतची पहिले युद्ध : (बाबर आणि इब्राहिम लोदी) .....

 

  • पानिपतचे पहिले युद्ध : २१ एप्रिल १५२६

  • बहलोल लोदीने अल्लाउद्दीन आलमशहाची उचलबांगडी करून दिल्लीमध्ये लोदी करण्याची स्थापना केली.

  • बहलोलच्या मृत्यूनंतर १७ जुलै १४८९ रोजी त्याचा मुलगा निजामखानने स्वतः सुलतान घोषित करून सिकंदरशहाचा किताब धारण केला. 

  • सिकंदर लोदीच्या मृत्यूनंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र इब्राहिम हा २१ नोव्हेंबर १५१७  रोजी सिंहासनारूढ झाला.

  •  त्याने धाकटा बंधू जलालखान याचा वध केला. 

  • अनेक अफगाण सरदारांची मुस्कटदाबी केली. असभ्य वर्तन केले. त्यामुळे इब्राहीमविरुद्ध उद्रेक सुरू झाला.

  •  इब्राहिम लोदीचा चुलता आजमखानदेखील दिल्लीची गादी बळकावण्याचे स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नात होता.

  • अशा परिस्थितीत आजमखान व दौलतखान यांनी काबूलचा सम्राट बाबरला भारतावर स्वारी करण्यास आमंत्रित केले. त्यामुळे बाबर दिल्लीकडे अग्रेसर झाला.

  • दिल्ली येथे इब्राहिम लोदी राज्य करत होता.

  • बाबराने प्रथम पंजाब जिंकून घेतला.

  • ही बातमी इब्राहिमला समजताच त्याने बाबराला रोखण्याचा प्रयत्न केला.

  • परंतु इब्राहिम लोदीच्या स्वभावामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले होते. ठिकठिकाणी बंडाळी निर्माण झाली होती. 

  • इब्राहिम लोदीने एक लाख शिपायांसोबत लढा देण्याची जय्यत तयारी केली.

  • फेब्रुवारी १५२६ रोजी उडालेल्या पहिल्या चकमकीत खान व इतर अफगाणांना पराभूत करून अटक केली.

  •  बाबराचा मुलगा हुमायूनने फिरोजवर ताबा मिळवला. बाबर शहाबादला पोहोचला.

  • यमुना ओलांडून बाबराने सरसावा या स्थळी तळ दिला.

  •  १ एप्रिल १५२६ रोजी बाबराच्या एका लष्करी तुकडीने स्वारी करून  खानास यमसदनी पाठवले.

  • त्यामुळे लोदी शिपायांमध्ये दहशत निर्माण झाली.

  • अशा प्रकारे तयारी करून बाबर १२ एप्रिल १५२६ रोजी पानिपतच्या प्रसिद्ध मैदानात येऊन धडकला.

  •  पानिपतच्या मैदानात उभय पक्षांच्या सैन्याने समोरासमोर तोंड दिल्यावरही कोणत्याही पक्षाने आठ दिवसापर्यंत लढाई सुरू केली नाही.

  •  बाबराने याप्रसंगी उत्तम रचना केली. मोर्चेबंदी करताना बाबराने सैन्य उजव्या बाजूला पानिपत गावापर्यंत पसरवले, तर डाव्या बाजूला मुक्त व सुरक्षित ठेवले.

  •  सर्वत्र खंदक खोदून फांद्या व मातीने त्यांना झाकण्यात आले.

  •  समोर तोफखाना जमविण्यात आला.

  • विशिष्ट अंतरावर घोडेस्वारांच्या तुकड्या, बैलगाड्यांची ओळी ठेवण्यात आली.

  •  उजव्या व डाव्या बाजूस बाबराने आपला पक्ष भक्कम केला.

  •  बाबर मध्यस्थानी होता, इब्राहीम लोदीने सुमारे एक लाख शिपायांना अग्रभागी दल, केंद्रीय दल, उजवीकडे सैन्य व डावीकडे रक्षा दल या पद्धतीने तैनात केले होते.

  •  २० एप्रिल रोजी उभय पक्षाचे सैनिक आगेकूच करू लागले.

  • २१ एप्रिल सकाळी दोन्ही पक्षात घनघोर युद्ध सुरू झाले, बाबराने सुव्यवस्थितपणे युद्धाचा सुपुत्र भात केला तर अफगाण पूर्णपणे नियंत्रित व संघटित होते.

  •  इब्राहीम लोदी सैनिकांसोबत द्रुतगतीने पुढे चालून आल्यावर गाड्यांच्या ओळीसमोर त्यास थांबावे लागले.

  •  बाबराने त्याचा फायदा घेतला. दुर्गामाता लाच मागे वळून लोदीच्या मागील सैन्यावर तुटून पडण्याचा आदेश दिला.

  •  एकीकडे बाणांचा वर्षाव तर दुसरीकडे तोफांचा भडीमार यामुळे त्याचे सैन्य कोंडीत सापडले.

  •  सर्व पठाण मध्यभागी अडकले. किंमत त्यांना संपेपर्यंत इब्राहिमचे चाळीस-पन्नास हजार शिपाई युद्धात मारले गेले

  •  ताहीर इब्राहीमचे डोके शोधून काढले. सर्वशक्तिमान ईश्‍वराच्या अपार कृपेने या युद्धात विजय मिळाला, असा उल्लेख बाबराने केला आहे.

  •  याप्रमाणे बाबरापेक्षा सुमारे पाच पटीने विशाल असणाऱ्या इब्राहिमच्या शिपायांचा पानिपतच्या प्रसिद्ध संग्रामात पराभव झाला.

  • डॉ. ईश्वरीप्रसादच्या मते,  "पानिपतचा रणसंग्रामामुळे दिल्लीचे साम्राज्य बाबराच्या हाती आले. लोदीची शक्ती नेस्तनाबूत झाली व हिंदुस्थानचे साम्राज्य चगताई तुर्कांकडे गेले."  

  • रशबुक्र विलियमच्या मते, "बाबराचे निराश्रित जीवन संपुष्टात आले, तो एका निश्चित भूभागाचा स्वामी बनला."

  • बाबराने पानिपतच्या पहिल्या युद्धाच्या वेळी रुमी-युध्दतंत्राचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला होता.

  • बाबराची युद्धरचना तुलुगामा युद्धतंत्राची होती.

  •  इब्राहीम लोदीची युद्धरचना पारंपरिक होती.

  •  बाबराजवळ शिस्तबद्ध सैन्य, घोडदौड व तोफखाना होता. बंदुका होत्या. राखीव सैन्य होते, तर इब्राहिम लोदीजवळ प्रचंड सैन्य होते. घोडदळ, पायदळ व  हत्ती होते.

  • परंतु प्रत्यक्ष लढाईत बाबराच्या तोफांनी लोदीच्या सैन्यातील हत्ती जखमी होऊन पळत सुटले.

  • परिणामी लोदीच्या सैन्यात गडबड उडाली. त्याचाच फायदा बाबराच्या सैन्याने घेऊन इब्राहीम लोदीचा दणदणीत पराभव केला.

  • दिल्लीतील सुलतानशाहीचा शेवट झाला व दिली मोगलांच्या ताब्यात गेले.

  • अशाप्रकारे भारतात मोगल साम्राज्यास सुरुवात झाली.

  • खानुआची लढाई: १७ मार्च १५२७

  • बाबरने पानिपत विजयानंतर दिल्ली आणि आग्रा जिंकून दिल्लीत प्रवेश केला व स्वतःला भारताचा बादशहा म्हणून घोषित करून गादीवर बसला.

  •  अर्थात बाबराच्या ताब्यात थोडाच प्रदेश होता. बाबराला अनेक विरोधक होते.

  •  विशेषतः राजपुतांना असे वाटले की, बाबर दिल्ली जिंकून लुटालूट करून परत जाईल.

  •  परंतु बाबर दिल्लीतच राहिल्याने राणासंगाच्या नेतृत्वाखाली राजपूत व बाबर यांच्यात संघर्ष झाला.

  •  त्यातूनच आग्र्याजवळ खानूआ येथे १६ मार्च १५२७ रोजी राजपूत व बाबर यांच्यात युद्ध झाले.

  • यावेळीही बाबराने तुलुगामा युद्धतंत्राचा अवलंब करून राणासंगाचा पराभव केला.

  • राणासंगची युध्दरचना पारंपारिक होती. सुरुवातीला राजपुतांना यश मिळाले, परंतु ते त्यांना अखेरपर्यंत टिकविता आले नाही.

  • राजपुतांच्या पराक्रमाची कल्पना बाबरला असल्यानेच, त्याने आपल्या सैन्यात उत्साह निर्माण करून या युद्धाला जिहादचे स्वरूप दिले.

  • परिणामी बाबरचे सैन्य राजपुतांवर तुटून पडले. तशातच राणासंग जखमी होऊन पडल्याने राजपूत सैन्याचे मनोधैर्य खचू लागले.

  • त्याचाच फायदा घेऊन बाबराने राजपुतांची कत्तल सुरू केली.

  • अशा प्रकारे राजपुतांचे दिल्ली प्राप्तीचे स्वप्न नष्ट झाले.

  • याच वेळी बाबराने स्वतःला गाझी ही पदवी धारण केली.

  • अशाप्रकारे खानुआ लढाईत राजपूतांचा पराभव करून मोगल सत्ता अधिक सुरक्षित झाली.

  •  पुढे बाबरने मेवाड जिंकून घेतला. सन १५२८ मध्ये मोहिनी राय या राजपूत प्रशासकाचा पराभव करून चंदेरी जिंकून घेतले.

  • ६ मे १५२९ रोजी घाग्रा (बक्सार) येथे झालेल्या निर्णायक युद्धात बाबराने अफगाणांचे पारिपत्य केले.

  • याप्रमाणे डिसेंबर १५३० मध्ये बाबराच्या मृत्यूपूर्वी त्याने हुमायुनसाठी विशाल मोगल साम्राज्याचा वारसा निर्माण केला होता.

  • त्याचे साम्राज्य मध्य अशियातील वंशु नदीपासून तर बिहारपर्यंत पसरले होते.

  • उत्तरेकडील पर्वतापासून तर माळवा राजपुतानापर्यंत ते उत्तर-दक्षिण भागात पसरले होते.

  • बाबराने पानिपत व घाग्राच्या लढायांमध्ये अफगाणांचा दारुण पराभव केला असला, तरी त्यांचे पूर्णपणे उच्चाटन झाले नव्हते.

  • हुमायुन गादीवर बसल्यावर (१५३०-४०) त्याच्याकडून वेळोवेळी ज्या चुका झाल्या, त्याचा फायदा शेरशहा सूर याने घेतला.

  •  शेरशहाने सन १५४०-४५ या पाच वर्षाच्या शासन काळात अत्यंत उपयुक्त अशा सुधारणा कार्यान्वित केल्या.

टिप्पण्या