बाबराचे आक्रमण व भारतात मुघल साम्राज्याची स्थापना-
बाबर- जहिरुद्दीन महंम्मद बाबर
जन्म : १४ फेब्रुवारी १४८३
मृत्यू : ३० डिसेंबर १५३०
दिल्लीच्या गादीवर पठाण वंशीय लोदी घराणे होते.
त्याचवेळी दक्षिणेत दख्खन बहामनी राज्याचा तर दक्षिण विजयनगर साम्राज्याच्या प्रभावाखाली होते.
इतरत्र अनेक छोटी-छोटी हिंदू तर कोठे मुस्लीम राज्य विखुरलेली होती.
१५ व्या शतकाच्या अखेरीस युरोपियन व्यापाऱ्यांचे पाय भारतीय भूमीला लागले.
त्यांच्या आगमनाने उपखंडातील भूमीबरोबरच आता येथील समुद्र व किनारपट्टीही महत्त्वपूर्ण ठरू लागली.
भारतीय उपखंडातील घडामोडींवर मध्य व पश्चिम आशियातील घडामोडींचा प्रभाव फार पूर्वीपासूनच जाणवत होता.
म्हणजेच दिल्लीची सुलतानशाही तुर्की, अफगाणी, पठाण अशा विविध वंशीयांचे राज्य जवळजवळ ३०० वर्ष होते.
त्याचा शेवट एका मंगोल वंशीय आक्रमकाने घडवून आणला.
हा आक्रमक म्हणजे ट्रान्स ऑक्सियना या परिसरातील फरघाना या लहानशा राज्याचा राज्यकर्ता बाबर हा होय.
त्याचा जन्म ४ फेब्रुवारी १४६३ मध्ये झाला. वयाच्या १४ व्या वर्षी फरघानाचा राज्यकर्ता झाला.
वडील तैमूरलंगाच्या वंशाचे, तर माता चंगीझखानाच्या घराण्यातील. असा दुहेरी वारसा बाबराला लाभलेला होता.
भारतातील अफाट संपत्तीची आणि वैभवाची माहिती तसेच आकर्षण बाबरला होते.
बाबराने भारत जिंकून घेण्याचा निश्चय केला.
बाबराने भारतावर पहिली स्वारी इ.स.१५१९ मध्ये केली.
इ.स.१५१९ ते १५२६ पर्यंत भारतावर पाच वेळा आक्रमण केले.
पाचव्या वेळेस पानिपत संग्रामात बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव करून सुलतानशाही संपुष्टात आणून मुघल राजवट स्थापन केली.
इ.स. १५२५ मध्ये सर्व तयारीनिशी बाबर दौलतखान व राणासंग यांच्या आमंत्रणावरून भारताकडे निघाला.
बाबराने तयारीनिशी दिल्लीवर चालून जाण्याची योजना आखली.
त्याची इब्राहिम लोदीशी पानिपतावर गाठ पडली.
बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये इ.स. १५२६ मध्ये पानिपत येथे युद्ध झाले. त्यात बाबराचा विजय झाला.
बाबराच्या सैन्याने इब्राहिम लोदीचा दणदणीत पराभव केला.
बाबराने आपला चुलता अहमद मिर्झा याच्या मृत्यूनंतर फरघाना या आपल्या राज्यानजीकचे समरकंदचे राज्य जिंकून घेतले.
मात्र उझबेकचा प्रमुख शायबानीखान याने बाबरावर स्वारी करून त्याच्याकडून समरकंद तर मिळवलेच, पण बाबराला फरघाण्यातून हुसकावून लावले.
त्यानंतर बाबर काबूलला आला. त्याने गझनीचे राज्य जिंकून तेथे इ.स.१५०४ मध्ये आपले राज्य स्थापन केले.
बाबराने काबूल हेच आपले सत्ताकेंद्र निवडले व तो तेथे स्थिरावला.
आपल्या आत्मचरित्रात म्हणजेच 'बाबरनामा' मध्ये तो म्हणतो, काबुल घेतल्यापासून माझ्या मनात हिंदुस्थानवर आक्रमण करण्याचे होते.
आपल्या राज्यातील बंडाळी, आक्रमणे, हेवेदावे यांनी आपण कंटाळलो.
तेव्हा येथून दूर तिकडे भारताकडे जाऊन स्वतंत्र असे राज्य स्थापावे, ही महत्त्वाकांक्षा बाबराने मनाशी बाळगली होती.
मध्य आशियातील राज्यकर्त्यांची महत्वाकांक्षा असण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे, त्यांना भारतातील अन्नधान्य, अमाप संपत्ती, मुबलक पाणी यांचे सदैव आकर्षण होते.
बाबराचा पूर्वज तैमुर यांने भारतातून अमाप संपत्ती नेण्याबरोबरच येथून कलाकार, कारागीर घेऊन आपली राजधानी सुंदर आणि वैभवशाली केली होती.
येथील संपत्तीच्या लुटीतून तैमूरने आपले मध्य आशियातील प्रचंड साम्राज्य उभारले होते.
त्यांनी याच दृष्टीने पंजाब आपल्या ताब्यात पुढे एक वर्ष ठेवला होता.
अफगाणिस्तानमध्ये राज्य करणाऱ्या बाबरला पंजाब आपल्याच मालकीचा आहे, असे वाटत होते.
बाबराच्या काबूलच्या राज्याचे उत्पन्न अत्यंत अल्प होते.
अबुल फजल हा इतिहासकार लिहितो की, "बाबराने बदक्शन, कंधार आणि काबुल येथे राज्य स्थापन केले. पण त्याचे उत्पन्न अत्यंत नगण्य होते.
खरे तर हे राज्य चालविण्यासाठी जे लष्कर लागावयाचे, त्याच्या खर्चापेक्षा उत्पन्न किती तरी कमी होते."
तोकड्या उत्पन्नातून आपले नोकर-चाकर, जात बांधव यांचे पगारसुद्धा भागत नव्हते.
त्यातच उझबेकांच्या स्वारीची शक्यता केव्हाही असे.
भारतात जाऊन तेथे राज्य स्थापन करावे.
मग तेथून आक्रमक उझबेकांचा उपद्रव शांत करावा, अशी बाबराला उर्मी होती.
त्याच्या महत्त्वाकांक्षेला व्यवहारात आणण्याजोगी योग्य राजकीय स्थिती त्यावेळी भारतामध्ये होती.
इ.स.१५१७ मध्ये सिकंदर लोदीच्या मृत्यूनंतर इब्राहिम लोदी दिल्लीचा सुलतान झाला होता.
आपले राज्य बळकट करण्याची खटपट इब्राहिम करू लागला होता.
त्याने राजपुत आणि काबूल राज्यकर्त्यांना धोका संभवत होता.
याच दरम्यान दौलतखानाने आपला मुलगा दिलावरखानला बाबराकडे पाठवले.
त्याच्याकरवी इब्राहिमचा काटा काढण्यासाठी चालून येण्याचे आमंत्रण दिले.
नेमकी अशीच मागणी बाबराकडे राजपूत राजा राणासंग यानेही केली.
कदाचित इब्राहिम उन्मत झाला असण्याची शक्यता यावरून स्पष्ट होते.
या उत्साहवर्धक बातम्यांनी बाबराच्या मनातील भारतावर आक्रमण करण्याच्या इच्छेने उचल खाल्ली.
भारत नाही, निदान पंजाब तर मिळवावे, असे त्याला ठामपणे वाटू लागले.
दौलतखान व राणासंग यांच्या आमंत्रणावरून इ.स.१५२५ मध्ये तो भारताकडे निघाला.
यावेळी इ.स.१५२६ मध्ये बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात पानिपतचे पहिले युद्ध झाले.
पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबराने इब्राहिम लोदीचा पराभव करून मुघल सत्तेची स्थापना केली.
पानिपतचा हा संग्राम भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा होता.
बाबरची भारतावरील स्वारी आणि त्याने स्थापलेल्या नव्या मुघल राजवटीची महती फार वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते.
त्यानंतर आपली सत्ता मजबूत करण्यासाठी मेवाडचा राजा राणासंग याचा खानुआच्या लढाईत पराभव केला, तर घाग्रा येथील संग्रामात दौलतखानाचा व उरलेल्या शत्रूंचा पराभव केला.
भारतातच राहण्याचा निर्णय घेताना बाबर म्हणतो, 'नको ती काबूलची उपासमारी, दारिद्र्य पुन्हा.'
अशाप्रकारे खानुआच्या लढाईत राजपूतांचा पराभव करून सत्ता अधिक सुरक्षित केली.
पुढे बाबरने मेवाड जिंकून घेतला.
इ.स. १५२८ मध्ये मोहिनी राय या राजपूत प्रशासकाचा पराभव करुन चंदेरी जिंकून घेतले.
इ.स. १५२९ साली महंमद लोदीचा घाग्रा येथील लढाईत पराभव करून बिहार ताब्यात घेतला.
अशाप्रकारे बाबराने इ.स.१५२६ मध्ये दिल्ली ताब्यात घेऊन इ.स. १५२९ पर्यंत हिंदुस्थानातील एकेक राज्य जिंकून घेऊन साम्राज्यविस्तार केला.
३० डिसेंबर १५३० रोजी बाबराचा मृत्यू झाला.
बाबर स्वतः कुशल सेनापती व चांगला योद्धा होता.
त्याचे सैनिकांवर नियंत्रण होते, तसेच त्याला पर्शियन आणि तुर्की भाषा अवगत होत्या.
या दोनही भाषांमध्ये त्याने काव्यरचना केली.
आपल्या आत्मचरित्रात त्याने भारताच्या राजकीय, सामाजिक तसेच भौगोलिक परिस्थितीचे वर्णन केले आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सर्व संकटांना तोंड देत बाबराने भारतासारख्या परक्या देशात मोगल सत्ता स्थापन करून मोगल साम्राज्याचे बीजारोपण करून साम्राज्यविस्तार केला.
इ.स.१५३० मध्ये बाबराच्या मृत्युनंतर त्याचा मोठा मुलगा हुमायुन गादीवर आला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा