वर्धमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त---

  • वर्धमान महावीर -


  • धार्मिक क्रांतीच्या युगात घडून आलेल्या आध्यात्मिक प्रगतीमधूनच जैन धर्माची निर्मिती झाली.

  • जैन विचारक आपल्या धर्माला वैदिक धर्माइतकेच, किंबहुना त्याहीपेक्षा प्राचीन मानतात.

  • डॉ. राधाकृष्णन व इतर विद्वानांनी हे मान्य केले आहे की, ऋषभदेव हे जैन धर्माचे संस्थापक होते.

  • वैदिक वाड्मयात अनेक जैन तीर्थंकरांचा उल्लेख आढळतो.

  •  जैन धर्माचे एकंदर चोवीस तीर्थंकर मानले जातात.

  • जैन धर्माचे तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ हे होय. ते महावीरांच्या 250 वर्षापूर्वी होऊन गेले.

  • या धर्माचे चोविसावे तीर्थंकर महावीर होते. यांच्या कालखंडापासून जैन धर्म असे संबोधले गेले असावे.

  • 'जीन' म्हणजे इंद्रियांवर विजय प्राप्त करणारा. 

  • वर्धमान महावीर यांचा जन्म वैशाली राज्यातील कुंडग्राम (म्हणजेच बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्हा) येथे ख्रिस्तपूर्व 539 मध्ये झाला. 

  • त्यांचे वडील सिद्धार्थ हे ज्ञातक (क्षत्रिय) जमातीचे प्रमुख होते.आई त्रिशला ही लिच्छवी राजा चेटकची बहिण होती. 

  • यशोदा नामक सुंदर स्त्रीशी त्यांचा विवाह झाला होता. तिच्यापासून त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. परंतु या मोहमायेत ते जास्त दिवस राहू शकले नाही. 

  • वयाच्या तिसाव्या वर्षी नंदिवर्धन नामक मोठ्या भावाची परवानगी घेऊन त्यांनी सुखाचा त्याग केला.

  •  संन्यासी बनल्यावर त्यांनी १३ महिन्यांपर्यंत इंद्रिय दमन केले. 

  • सर्वस्वाचा त्याग केल्यानंतर  वर्धमानांनी  कष्टमय जीवनमार्गाचा स्वीकार केला.

  •  बारा वर्षांच्या काळात अखंड तपश्चर्या करून, अडचणी सहन करून इंद्रियांवर ताबा मिळविला.

  •  ते सत्याच्या शोधात भटकत राहिले. १२ वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले.

  •  ऋजूपालिका नदीच्या तीरावरील एका जुनाट देवळाच्या जवळील श्माल या वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली.

  •  त्यांनी इंद्रियांवर ताबा मिळविल्यामुळे त्यांना 'जितेंद्रिय' किंवा 'महावीर' म्हणून ओळखले जाते.त्यांना 'जिन' असे म्हणतात. त्यामुळे त्यांच्या अनुयायांना 'जैन' या नावाने ओळखले जाऊ लागले.

  •  त्यांनी आपल्या धर्माचा हिरीरीने प्रचार केला. त्यांनी जैन धर्माला लोकप्रिय बनवले.

  •  त्यांनी शांततापूर्ण मार्गाने प्रवचने, संवाद, वाद-विवाद इत्यादींच्याद्वारे समाजात मतपरिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

  •  वयाच्या ७२ व्या वर्षी म्हणजेच इसवी सन पूर्व ५२७ मध्ये पाटणा जिल्ह्यातील  पावापुर (राजगृहाजवळ) येथे त्यांचे महानिर्वाण झाले.

  •  वर्धमान यांना आपल्या आयुष्यकाळात उत्तर भारतात सुमारे १४००० अनुयायी मिळाले होते.

  • वर्धमान महावीर यांनी यज्ञ संस्कार, विधी, अग्निपूजा इत्यादींचा निषेध केला. 

  • ते सृष्टीला स्वयंभू आणि अनादि मानत.अर्थात ते सृष्टीची निर्मिती करणार्‍या ईश्वराचे अस्तित्व मान्य करत नाहीत.

  • ते मोक्षप्राप्ती मिळविलेल्या आत्म्यास सर्वशक्तिमान मानतात.

  • मोक्ष प्राप्त झालेल्या मुक्त आत्म्यास 'अर्हत्' किंवा 'जिन' संबोधले जाते. 

  • मोक्ष  हीच जीवाची पूर्णावस्था मानले जाते.जीव हे सर्वत्र आढळतात.  

  • कर्मानुसार जीवास गती मिळते. जीव जन्ममरणाच्या फेर्‍यात गुंतून जातो. 

  • म्हणूनच कर्मनाशासाठी त्यांनी विनय, चिंतन, तप,पापकर्माला मान्य करणे, स्वाध्याय इत्यादी मार्ग सांगितले आहेत.

  • जैन धर्मात मोक्ष प्राप्त करण्यासाठी देहदंडाने शरीर झिजविणे मान्य आहे.

  • अर्थात कर्मनाशासाठी ते व्रत-वैकल्य मान्य करतात.

टिप्पण्या