राजमाता जिजाऊंविषयी....

  • इतिहासातील महान स्त्री व्यक्तिमत्त्वाविषयी थोडेसे….

  • आपल्या देशात अनेक महान स्त्री-पुरुष होऊन गेले.

  •  ज्यांच्या  द्रष्ट्या विचाराने, क्रांतिकारक कृतींनी आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याच्या उर्मीने आपल्या देशाचे,समाजाचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. 

  • त्यांच्या संघर्षमय जीवनाचे संस्कार आपल्यावर होत राहिले.

  • भारतीय इतिहासातील एका महान स्त्री- व्यक्तिमत्त्वाविषयी म्हणजेच राजमाता जिजाबाईं विषयी थोडेसे…

     


  • शहाजीराजांचे स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी वीरमाता जिजाऊंनी शिवरायांना प्रोत्साहन दिले. 

  • त्या कर्तबगार आणि द्रष्ट्या राजनीतिज्ञ होत्या. 

  • जिजाबाईंसारख्या द्रष्ट्या आणि लढाऊ स्त्रीचे चरित्र म्हणजे महाकाव्यच आहे.

  • जिजाबाईंना स्त्री शक्तीचा आविष्कार म्हटले जाते.परंतु या आविष्काराचे प्रकटीकरण त्यांच्या जीवनातील ज्या घटनांमुळे झाले, त्या घटना म्हणजे एक-एक अग्निदिव्यच होते.

  • काही अग्निदिव्य तर त्यांच्यावर नियतीने लादली होती, तर काहींमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले होते.

  • जिजाऊंना वीरकन्या, वीरपत्नी आणि वीरमाता म्हटले जाते, परंतु या तीनही उपाध्यांची जबरदस्त किंमत त्यांना मोजावी लागली होती.

  • राजमाता जिजाऊंचा जन्म महाराष्ट्रातील यादवांचा वारसा सांगणाऱ्या जाधव या विख्यात मराठा कुळात झाला.

  • सरदार लखुजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या त्या कन्या.

  •  पराक्रमी पित्याचे रक्त या वीरकन्येच्या धमन्यांतून वाहत होते.

  •  या वीराच्या कन्येचा विवाह दुसऱ्या वीराच्या वीरपुत्राशी म्हणजेच शहाजीराजे यांच्याशी झाला. 

  • भोसले घराणे उदयपूरच्या सिसोदिया घराण्याचा वारसा सांगणारे.

  • शहाजीराजे हे निजामशाही, मोगलशाही व आदिलशाही या तीनही शाह्यांमध्ये असामान्य पराक्रम गाजवून दक्षिणेतील एक बलाढ्य सेनानी म्हणून वावरत होते.

  • शहाजी राजांनी निर्माण केलेली निजामशाही म्हणजे एका अर्थी मराठ्यांचे राज्य होते.

  • देश मराठी, लढणारे मराठे आणि पुन्हा शाही निर्माण करण्याची ताकद असणाराही मराठाच.असा पराक्रमी पती लाभला, म्हणून केवळ जिजाबाईंना वीरपत्नी म्हणणे अपुरे ठरेल. 

  • कारण शहाजीराजांच्या कर्तबगारीच्या काळातही त्यांनी आपली स्वतंत्र बुद्धी जागृत ठेवली होती.

  • काही व्यक्ती या, त्यांना जीवनात मिळालेल्या स्थैर्यातून घडत असतात, तर काही व्यक्तींवर होणारे आघात, त्यांच्यावर आलेली संकटे त्यांना असामान्य बनवत असतात.

  • जिजाबाईंवरच्या आघाताने त्यांना वीरमाता बनवले.

  • स्वजन, स्वदेश या संकल्पना मराठ्यांच्या स्मृतीतून नष्ट झाल्या होत्या.

  • त्यामुळेच तर शुल्लक कारणावरून जाधव-भोसले या घराण्यांमध्ये संघर्ष होऊन जिजाबाईंचे  बंधू दत्ताजी  यांसकडून त्यांचे चुलत दीर संभाजी मारले गेले.

  • जिजाबाईंना बसलेला हा पहिला धक्का होता. 

  • जिजाबाईंच्या घरातील अशी अनेक माणसे स्वकीयांच्या इर्षेपायी आणि परकीयांच्या चाकरीपायी मारली गेली.

  • त्यांच्यावर झालेला सर्वात मोठा आघात म्हणजे त्यांचे पिता व भावांच्या हत्येचा.

  •  निजामशहाने भर दरबारात भेटीस आलेल्या लखुजीराजे जाधव आणि त्यांचे पुत्र अचलोजी, राघोजी आणि नातू यशवंतराव यांची भीषण कत्तल केली.

  • पूर्वाश्रमीच्या देवगिरीच्या यादवांच्या दरबारात जिजाबाईंचे माहेर उद्ध्वस्त झाले.

  •  त्यानंतर सहा महिन्यांनी शिवाजीचा जन्म झाला. म्हणजे गरोदर अवस्थेत असतानाच त्यांचे माहेर कापले गेले.

  •  शहाजीराजे हे यवनी सत्तांच्या वावटळीत सापडले होते.

  • सर्वत्र भीषण दुष्काळ पसरलेला होता. या सर्व परिस्थितीचा जबरदस्त परिणाम जिजाबाईंवर झाला.

  • स्वराज्याची संकल्पना शहाजीराजे भोसले यांनी मांडली आणि त्यांची पूर्तता त्यांचे पुत्र शिवाजी महाराजांनी केली.

  • मराठी स्वराज्य स्थापन करण्याच्या कामात जिजाऊंनी शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले आणि त्यादृष्टीने उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली.

  • संपूर्ण महाराष्ट्र यवनी सत्तेच्या सामाजिक आणि राजकीय जुलुमाखाली भरडला जात होता.

  • 'ज्याचं राज्य त्याचा धर्म' या न्यायाने धार्मिक असहिष्णुता शिगेला पोहोचली होती.

  •  स्त्रियांचा शिलभंग होत होता.जिजाबाईंचा चुलत दीर खेळोजी राजे यांची पत्नी पंचवटीतील गोदावरी नदीवर स्नानासाठी गेली असता मोगल सरदार महाबतखानाने तिला घोड्यावरून पळवून नेले.

  •  जिजाबाईंच्या जावेची ही अवस्था तर सर्वसामान्य स्त्रीच्या जगण्याची कल्पनाच न केलेली बरी!

  • प्रजेची अशी दुरावस्था असताना मराठा घराणी मात्र खोट्या प्रतिष्ठेच्या आणि सत्तास्पर्धेच्या आहारी गेलेली.

  • त्यांच्या रक्तात स्वाभिमानशून्यता भिनली होती.

  • या सर्व गोष्टींचा जिजाबाईंच्या विचारशक्तीवर जबरदस्त परिणाम झाला. यांच्या गुलामी मानसिकतेची सल आहे आणि आप्तजणांना या गुलामीखतार गमावल्याचे दुःखदेखील आहे.

  •  शिवरायांना घडविणाऱ्या आणि त्यांच्या आराध्य दैवत असलेल्या माँसाहेब जिजाबाई या शिवरायांचे रायगडावर राज्यारोहण झाल्यावर रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाचाड' या गावी १७ जून १६७४ ला त्या देवाघरी गेल्या.

टिप्पण्या