१४. दिल्लीची सुलतानशाही, विजयनगर आणि बहामनी राज्य
प्रस्तावना -
इसवीसन १० वे शतक ते १२ वे शतक हा कालखंड भारताच्या इतिहासातील संक्रमणाचा कालखंड होता.
याच काळात भारतावर महम्मद गजनी आणि महम्मद घोरी यांच्या आक्रमणे झाली.
या आक्रमणानंतर भारतात सुलतान सत्तेची स्थापना झाली. इसवी सन १२०६ ते १५२६ भारतात सुलतानांची सत्ता होती.
भारताच्या इतिहासामध्ये प्राचीन कालखंडाचे मध्ययुगात संक्रमण हे विविध क्षेत्रातील बदलांमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसते.
भारतात राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात हे संक्रमण घडून आले.
एखादे युग ठराविक काळी संपते आणि दुसऱ्या युगाची सुरुवात होते, असे प्रत्यक्षात घडत नाही.
नवे युग सुरू झाले तरी, जुन्या युगाच्या काही परंपरा अस्तित्वात राहतात आणि त्याच बरोबरीने नवीन परंपरादेखील उदयाला येत असतात.
त्यानुसार इतिहासात कालखंडाची कल्पना मांडली जाते. परंतु एखाद्या युगाची सुरुवात आणि त्याचा अंत विभाग आणि त्यातील स्थलकालाच्या बदलणाऱ्या संदर्भामुळे करणे कठीण जाते.
भारतातील राजकीय स्थिती -
भारतीय इतिहासातील मध्ययुग इसवी सनाच्या ८ व्या शतकापासून सुरू होते.
संपूर्ण भारतीय उपखंडाचा विचार करता एकच मध्यवर्ती सत्ता त्यावेळी भारतात नव्हती, तर अनेक लहान-मोठी राज्ये, उपखंड वसलेले होते.
त्यामध्ये दक्षिणेतील चोळांचे राज्य सर्वात महत्त्वाचे होते.
पुढे इसवी सन १३ व्या शतकाच्या सुरुवातीस दिल्ली सुलतानशाहीचे राज्य उत्तरेत स्थापन झाले होते.
१६ व्या शतकाच्या आरंभी मोगल साम्राज्य तर १७ व्या शतकात मराठ्यांचे हिंदवी स्वराज्य स्थापन होऊन नव्या पर्वाची सुरुवात झाली.
दक्षिण भारतातील चोळ राज्याचे रूपांतर मध्ययुगीन कालखंडात साम्राज्यात झाले होते.
पांड्य, पल्लव इ.सत्तांचा पराभव होऊन विजयालय नावाच्या राजाच्या कारकीर्दीपासून चोळांची सत्ता अधिक विस्तारित झाली.
हर्षवर्धन सम्राटानंतर समर्थपणे राज्य करू शकणारा राज्यकर्ता न झाल्याने साम्राज्याची वाताहत होण्यास सुरुवात झाली.
त्यातून अनेक छोटी-छोटी राज्ये उदयाला आली. त्या राज्यांचा अंतर्गत संघर्ष संपूर्ण उत्तरेत राजकीय गोंधळास कारणीभूत ठरत होता.
इसवी सनाच्या ७ व्या शतकापासून सिंध प्रांतातून अफगान टोळ्यांची आक्रमणे वारंवार होत होती.
उत्तरेत गोंधळाची स्थिती असताना दक्षिणेतही छोटी- छोटी राज्ये होती.
त्यामध्ये चोळांचे राज्य सर्वात महत्त्वपूर्ण ठरू लागली.
चोळांच्या राज्यास भक्कमपणा येऊन अल्पकाळात साम्राज्य बनले.
उत्तर भारतात एकछत्री साम्राज्य निर्माण झाले नाही.
१३ व्या शतकात भारताच्या राजकीय स्थितीचा फायदा तुर्की आक्रमकांनी घेतला. त्यावेळी राजस्थानचे चौहान, कनोजचे प्रतीहार आणि गढवाल (राठोड), बुंदेलखंडाचे चंदेल, माळव्यातील परमार, गोरखपूरचे कलचुरी, त्रिपुरीचे कलचुरी (मध्य प्रदेश) गुजरातमधील चालुक्य ( सोळंकी),बंगालमधील पाल अशी अनेक राजघराणी अस्तित्वात होती.
त्यांनी तुर्कांच्या आक्रमणाचा प्रतिकार केला, परंतु आपापसातील संघर्षामुळे त्यांचा परकीय आक्रमकांपुढे निभाव लागला नाही.
अरब आणि तुर्कांचे आक्रमण -
अरब आक्रमण -
उमायद घराण्यातील मुहम्मद-बिन-कासिम याने इसवीसन ७१२ मध्ये सिंधवर आक्रमण करून तो प्रदेश जिंकून घेतला.
महम्मद-बिन-कासीमनंतर भारतातील अरबांची सत्ता स्थिर राहिली नाही.
तुर्की आक्रमण -
इस्लामची सत्ता तुर्कांनी रुजवली. तुर्कांनी भारतावर अनेक आक्रमणे केली.
भारतातील कोणतीही सत्ता या आक्रमकांचा यशस्वी प्रतिकार करू शकले नाही.
त्यांनी भारतातील प्रचंड संपत्ती लुटून नेली.
अनेक राज्य नष्ट केली आणि इस्लामी सत्ता स्थापन केली.
अफगानिस्तानमधील गझनीचा सुलतान सबक्तगीन -
अफगाणिस्तानमधील गझनीचा सुलतान सबक्तगीनने ११ व्या शतकात पंजाबच्या जयपाल राजावर हल्ला केला.
हे राज्य हिंदुकुश पर्वतापासून चिनाब नदीपर्यंत होते.
सबक्तगीनाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र मुहम्मद गजनीचा सुलतान झाला.
महम्मद गझनी -
सबक्तगिनचा मुलगा मुहम्मद हा गजनीचा सुलतान झाला.
महम्मद गझनीने इसवी सन १००१ ते १०१८ या काळात भारतावर १७ स्वाऱ्या केल्या.
भारतातील संपत्तीची लूट करणे, भारतात धर्माचा प्रसार करणे इत्यादी उद्देशाने त्याने भारतात स्वार्या केल्या होत्या.
खैबर खिंड -
अफगाणिस्तान व पाकिस्तान या दरम्यान असलेल्या हिंदुकुश पर्वतात ही खैबर खिंड आहे.
प्राचीन काळात भारताचा मध्य आशियाशी चालणारा व्यापार या खिंडीमार्गेच चालू असे.
पर्शियाचा इराण सम्राट पहिला दाऱ्युष हा याच मार्गाने भारतात आला होता.
सम्राट अकबर / सिकंदरानेही खैबरखिंडीतूनच येऊन भारतावर आक्रमण केले.
मध्ययुगात गझनीचा महमूद, बाबर, नादिरशाह, अहमदशहा अब्दाली यांनी या खिंडीच्या मार्गानेच भारतावर आक्रमण केले होते.
त्यामुळे ही खैबर खिंड भारताच्या इतिहासाची घट्ट जोडली गेलेली आहे.
तेथे ब्रिटिशांनी रेल्वे मार्ग बांधला.
मुहम्मद घोरी -
महम्मूद गझनीनंतर भारतावर मुहम्मद घोरीने संपत्ती व सत्ता मिळवण्यासाठी भारतावर आक्रमण केले.
मुहम्मद घोरी खूप महत्त्वाकांक्षी होता. भारताची संपत्ती लुटणे, याबरोबरच भारतात आपले राज्य स्थापन करणे, हा त्याचा मुख्य उद्देश होता.
राजपूत राजा पृथ्वीराज चौहान यांनी त्याचा प्रतिकार केला.
पृथ्वीराज चौहान आणि मुहम्मद घोरी यांच्यामध्ये दोन युद्ध झाली. त्यांना ‘तराईची युद्ध’ असे म्हणतात.
तराईच्या पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहानांकडून मुहम्मद घोरीचा पराभव झाला.
मात्र तराईच्या दुसऱ्या युद्धात पृथ्वीराज चौहानांचा पराभव झाला.
या पराभवानंतर राजपुतांना एकत्र करू शकणारे प्रभावी व्यक्तिमत्व राहिले नाही.
मुहम्मद घोरीने या विजयानंतर सिंधपासून बंगालपर्यंत तुर्की साम्राज्य निर्माण केले.
पृथ्वीराज चौहान -
राजस्थानच्या उत्तरेकडील प्रदेशांमध्ये चौहान घराण्याचे राज्य होते.
या घराण्यातील पृथ्वीराज चौहान हा स्वाभिमानी व पराक्रमी राजा होता.
गझनीचा महत्वकांक्षी सुलतान महंमद घोरी याला भारतात आपले राज्य प्रस्थापित करायचे होते .
घोरीला भारतातील संपत्ती देखील लुटायची होती, म्हणून मुहम्मद घोरीने इसवी सन ११९१ मध्ये पृथ्वीराज चौहानांवर आक्रमण केले,परंतु त्यात घोरीचा पराभव झाला.
इसवीसन ११९२ मध्ये हरीणी पुन्हा पृथ्वीराज वर आक्रमण केले.
दुसऱ्या लढाईत घोरीने पृथ्वीराज याचा पराभव केलाझाल्या म्हणून त्यांना तराईची युद्धे असे म्हणतात.
पृथ्वीराज चौहानांएवढा पराक्रमी राजा पराभूत झाल्याने अन्य राजपूत राजांना एकत्र करून लढणारे नेतृत्व राहिले नाही, त्यामुळे घोरीने त्यांचा पराभव करून त्यांची राज्य जिंकून घेतली.
स्थानिक राजांची तूर्कांपुढील माघारीची कारणे---
प्रश्न- राजपूत राज्यांना तुर्की आक्रमाणासमोर माघार घ्यावी लागली. (सकारण स्पष्ट करा)
- मोहम्मद घोरीने भारतावर आक्रमण केले. त्याने पृथ्वीराज चौहानांचा पराभव केला.
- पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाल्यानंतर राजपुताना एकत्र करू शकणारे नेतृत्व पुढे आले नाही.
- मुहम्मद घोरीच्या आक्रमण काळात अनेक छोटी मोठी राज्य होती, परंतु ती विखुरलेली होती. या राज्यांमध्ये---
- एकीचा अभाव होता.
- राजपूत राजांमध्ये राष्ट्र भावनेचा अभाव होता.
- राजपूताकडे खड्या सैन्याची कमतरता होती.
- तुर्कांची कुटिल राजनीती आणि युद्धांमधील आक्रमकता यांचा स्थानिक राज्यांमध्ये अभाव होता. अशा अनेक कारणांमुळे राजपूत राज्यांना तुर्की आक्रमणासमोर माघार घ्यावी लागली.
- गुलाम घराणे---
- इसवीसन १२०६ ते १२९६ या कालावधीत दिल्लीवर गुलाम घराण्याने राज्य केले.
- कुतुबुद्दीन ऐबक, शमसुद्दीन अल्तमश, रजिया सुलताना, बल्बन हे सुलतान या कालावधीत होऊन गेले.
- कुतुबुद्दीन ऐबक
कुतुबुद्दीन ऐबकला भारतातील सुलतानशाहीचा संस्थापक मानले जाते.
इसवीसन १२०६ ते इसवीसन १५२६ पर्यंत भारतावर सुलतानांची सत्ता होती.
मुहम्मद घोरीने गुलाम करण्यातील कुतुबुद्दीन ऐबक यांच्यावर दिल्ली व तिच्या आजूबाजूच्या प्रदेशांची जबाबदारी दिली होती.
भारतातील जिंकलेल्या प्रदेशावर कुतुबुद्दीन ऐबकाची सुभेदार म्हणून घोरीने नेमणूक केली होती.
मुहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीन ऐबक दिल्लीचा पहिला सुलतान झाला.
कुतुबुद्दीन ऐबक हाच गुलाम घराण्याचा संस्थापक होय.
इसवी सन १२०६ मध्ये तो दिल्लीचा सुलतान झाला.
कुतुबुद्दीन ऐबकानंतर अल्तमश हा सुलतान झाला.
त्याने अंतर्गत बंडखोरांचा पराभव केला.
अल्तमशच्या मृत्यूनंतर त्याची मुलगी रझिया ही पराक्रमी महिला सुलतान पदावर आली.
दिल्लीच्या राजपदावर आलेली ती पहिली महिला होती.
इ.स. १२३६ ते १२४० हा तिचा कालखंड होता.
अल्तमशने रझियाला बालपणापासूनच राज्यकारभाराचे शिक्षण दिले होते.
रझिया कर्तबगार, पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष होती. प्रसंगी ती लष्करी मोहिमांचे नेतृत्व देखील करत असे.
दिल्लीच्या गादीवर आलेली ती पहिली आणि एकमेव स्त्री होती.
त्यानंतर दिल्लीच्या गादीवर आलेला महत्त्वाचा सुलतान बल्बन होता.
बल्बनने सुलतानशाहीला वैभवाचे दिवस दाखवले.
त्याने दरबाराचे काही रीतीरिवाज आणि परंपरा सुरू केलेल्या सैन्याची पुनर्रचना केली. बंडाळी मोडून काढली.
किल्ले बांधले, आपली सत्ता मजबूत केली आणि वारंवार उठाव करणाऱ्या राजांना पराभूत केले.
मंगोल हे भारतावर वारंवार आक्रमण करून दिल्लीच्या साम्राज्याला धोका निर्माण करीत असत. त्यांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न बल्बनने केले. त्यावेळी तुघ्रीलखान आपली स्वतंत्र सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता.
बल्बनने त्याचा पराभव केला आणि बंगालवर सुलतानी राजवट आणली.
- अल्लाउद्दीन खिलजी आणि देवगिरीचे यादव :-
- गुलाम घराण्याचा अस्त झाल्यानंतर खिलजी वंशाचा उदय झाला.
- जलाउददिन खिलजी हा या घराण्याचा संस्थापक होय.
- इसवीसन १२९६ ते १३२० पर्यंत दिल्ली येथे खिलजी घराण्यातील सुलतानांनी राज्य केले.
- खिलजी घराण्यात सहा सुलतान होऊन गेले.
- त्यापैकी अल्लाउद्दीन खिलजी हा विशेष पराक्रमी होता.
- तो उत्तम सेनापती आणि कुशल प्रशासक होता.
प्रश्न - अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या यादवांनी वर आक्रमण केले त्याची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. (सविस्तर उत्तर लिहा)
मुद्दे - अ. आक्रमणाची कारणे ब. आक्रमण व घटना क. आक्रमणाचे परिणाम.
अ. आक्रमणाची कारणे -
अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या यादवांवर इसवीसन १२९६ ते इसवी सन १३१२ असे दोन वेळा आक्रमण केले.
दोन्ही वेळा त्याचा विजय झाला. या आक्रमणाची कारणे
त्यांचा विस्तार करणे प्रश्न सोडवण्यासाठी संपत्ती गोळा करणे, वाढत्या सैन्यांचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी सैन्याला मोहिमांमध्ये गुंतवणे.
देवगिरी हे दक्षिणेतील संपन्न शहर होते.
अल्लाउद्दीन खिलजीने यादवांवर आक्रमण करून प्रचंड संपत्ती हस्तगत केली.
ब. आक्रमण व घटना -
इसवीसन १२९६ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवराय यादव यांच्यावर आक्रमण केले.
अचानक झालेल्या या आक्रमणामुळे आपला बचाव करण्यासाठी रामदेवराय याने देवगिरीच्या किल्ल्याचा आश्रय घेतला.
अल्लाउद्दीन याने किल्ल्याला वेढा घातला आणि शहरामध्ये लुटालूट केली.
रामदेवरायाने नेटाने किल्ला लढवला, परंतु किल्ल्यातील धान्य साठा संपत आला होता.
त्यामुळे पुढे लढणे अशक्य झाले, अखेर रामदेवराय शरण गेला आणि त्याला तह करावा लागला.
क. आक्रमणाचे परिणाम -
अल्लाउद्दीनच्या आक्रमणामुळे त्याला देवगिरीच्या आसपासचा प्रदेश मिळाला.
रामदेवरायाची प्रचंड संपत्ती त्याने लुटून नेली. रामदेवयाबरोबरच दक्षिणेतील अनेक राज्य जिंकून घेतले.
अल्लाउद्दीन खिलजीच्या सत्तेचा दक्षिण भारतात विस्तार झाला.
प्रश्न - अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिणेकडील राज्यांवर स्वारी केली. (सकारण स्पष्ट करा)
आपल्या राज्याचे रुपांतर विशाल साम्राज्यात करावे, अशी अल्लाउद्दीन खिलजीची महत्वकांक्षा होती.
देवगिरीच्या रामदेवरायाने अल्लाउद्दीनला खंडणी देण्याचे बंद केल्याने, त्याचा बंदोबस्त करून आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी संपत्ती गोळा करणे, हा त्याचा उद्देश होता.
रामदेवरायावर केलेल्या पहिल्या हल्ल्यानंतर त्याने कायमस्वरूपी खडे सैन्य उभे करून सैनिकांची संख्याही वाढवली होती.
देवगिरीचा राजा रामदेवराय याने अल्लाउद्दीनला खंडणी देण्याचे बंद करताच त्याने आपला सरदार मलिकला दक्षिणेकडे पाठवले.
अल्लाउद्दीनच्या या दक्षिण स्वारीला राजकीय आणि आर्थिक कारणे होती.
देवगिरीचा बंदोबस्त करून आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी संपत्ती गोळा करणे, हे महत्त्वाचे कारण होते.
बाजारभाव नियंत्रणासाठी त्याने केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे राज्याच्या खजिन्यावर ताण पडत होता.
सैन्य व सेनाधिकारी यांना नव्या मोहिमेमध्ये गुंतवणे आवश्यक होते.
या सर्व कारणांमुळे अल्लाउद्दीन खिलजी याने दक्षिणेकडील राज्यांवर स्वारी केली.
अल्लाउद्दीन खिलजी हा दक्षिण भारतात आपला साम्राज्यविस्तार करणारा पहिला इस्लाम प्रशासक होता.
- तुघलक घराणे -
खिलजी घराण्यानंतर दिल्ली येथे तुघलकांची राजवट सुरू झाली.
इसवीसन १३२० ते १४१३ हा तुघलकांचा कालखंड होता. तुघलक घराण्यात नऊ सुलतान होऊन गेले.
मुहम्मद बिन तुघलक हा एक प्रसिद्ध सुलतान होय.
तुघलक घराण्याच्या अखेरच्या काळात तैमूररंगाने भारतावर स्वारी केली होती.
त्याने दिल्लीपर्यंत धडक मारली आणि पुष्कळ लुटालूट केली.
प्रश्न - मुहम्मद बिन तुघलक यांची कारकीर्द अपयशी ठरली. (सकारण स्पष्ट करा)
- दिल्लीवर राज्य करणाऱ्या तुघलक घराण्यातील मुहम्मद बिन तुघलक यांची कारकीर्द वैशिष्ट्यपूर्ण ठरली.
तांब्याची नाणी पाडणारा तो पहिला सुलतान ठरला. हा त्याचा निर्णय फसल्याने राज्याच्या तिजोरीवरील भार वाढला.
त्याने दिल्लीची राजधानी देवगिरीला स्थलांतरित केली. त्याचा हा देखील निर्णय चुकीचा ठरला.
दळणवळणाच्या सोयींच्या अभावी स्थलांतर करण्यात जनतेला खूप त्रास सहन करावा लागला.
राजधानी बदलायला जनता ही नाखुश होती.
राजधानीतील बदलामुळे व्यापाराची ही मोठी हानी झाली.
यामुळे महंमदाने पुन्हा राजधानी देवगिरीहून दिल्लीला नेली.
राजधानीच्या बदलामुळे जनतेत त्यांच्याविषयी नाराजी आणि चीड निर्माण झाली.
सुलतानाची व राज्याची प्रतिष्ठा खालावली.
या सर्व कारणांमुळे मुहम्मद बिन तुघलक यांची कारकीर्द अपयशी ठरली.
- या काळात दक्षिणेत एक महत्त्वाची घटना घडली.
- मुहम्मद तुघलकाला दक्षिणेत आपले साम्राज्य उभारण्यात यश आले नाही.
- परंतु त्याच्याच काळात दक्षिणेत दोन नवी राज्ये उदयाला आली होती, ती म्हणजे विजयनगरचे राज्य आणि बहामनी राज्य होय.
- विजयनगरची स्थापना होऊन सुलतानशाहीच्या विरोधात एक प्रबळ राज्य उदयास आले होते.
- सय्यद घराणे -
- तुघलकानंतर दिल्लीच्या गादीवर सय्यद घराण्याची सत्ता होती.
- सय्यद घराण्यात चार सुलतान होऊन गेले.
- इसवी सन १४१४ ते १४५० या काळात दिल्लीच्या तख्तावर सय्यद घराण्याची सत्ता होती.
- लोदी घराणे -
सय्यद घराण्यानंतर लोदी घराण्याची सत्ता स्थापन झाली.
लोदी घराण्यात तीन सुलतान होऊन गेले.
इसवीसन १४५१ ते इसवी सन १५२६ या काळात भारतात लोदी घराण्याची सत्ता होती.
बहलोल लोदी हा लोदी घराण्याचा संस्थापक होय.
बहलोल हा अफगान होता. लोदी घराण्याच्या राजवटीमध्ये सुलतानशाहीच्या ऱ्हासाला सुरुवात झाली.
लोदी हा लोदी घराण्यातील सर्वात प्रसिद्ध राज्यकर्ता होता.
याच घराण्यातील इब्राहिम लोदीच्या कारकीर्दीत बाबराने दिल्लीवर स्वारी केली.
त्याने इसवी सन १५२६ मध्ये इब्राहीम लोदीचा पराभव केला आणि या पराभवाबरोबर सुलतानशाहीचा देखील शेवट झाला.
प्रश्न - भारतातील सुलतानशाही संपुष्टात आली (सकारण स्पष्ट करा)
दिल्लीच्या सय्यद घराण्याच्या सत्ते नंतर लोदी घराण्याची सत्ता स्थापन झाली. इब्राहिम लोदी हा सत्तेवर आला.
परंतु त्याच्या स्वभावदोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले.
अनेक अफगाण सरदारही त्याचे विरोधक झाले. पंजाबचा सुभेदार दौलतखान लोदी हा इब्राहिम लोदीचा विरोधक होता.
त्याने काबुल कंदाहारचा सत्ताधीश बाबर याला इब्राहिमचा पराभव करण्यासाठी भारतात बोलावले.
इसवीसन १५२६ मध्ये बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात पानिपत येथे लढाई होऊन ईब्राहिम लोदीचा पराभव झाला. या लढाईला पानिपतची पहिली लढाई असे म्हणतात.
इब्राहिम लोदीच्या पराभवामुळे भारतातील सुलतानशाही संपुष्टात आली. भारतात मोगलांची सत्ता सुरू झाली.
- व्यापार आणि वाणिज्य
सुलतान राजवटीत शेती हाच बहुसंख्य लोकांचा व्यवसाय होता.
शेतीचे उत्पन्न व त्यावरील महसूल हेच प्रमुख राज्याच्या उत्पादनाचे प्रमुख साधन होते.
प्रश्न - सुलतान राजवटीत कापड उद्योग भरभराटीला पोहोचला होता. ( तुमचे मत नोंदवा)
सुलतान राजवटीत शेतीबरोबरच कापड उद्योग मोठ्या प्रमाणात चालू होता. सुती कापड, मलमलचे कापड यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असे.
तागाचे कापड, सेटिंग किनखाब म्हणजे जरीचे कापड यांची ही निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असे.
दिल्ली, आग्रा, लाहोर, मुलतान, बनारस, पाटणा, खंबायत, बुऱ्हानपूर, देवगिरी हे त्या काळातील कापड उद्योगाचे प्रमुख केंद्र होती.
सुती कापडाची निर्यात बंगाल आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात होत असे.
कापड रंगवण्याचा उद्योगही मोठ्या प्रमाणात चालत असे. गोवळकोंडा,अहमदाबाद, ढाक्का इत्यादी ठिकाणी कापड रंगवण्याच्या उद्योगांची केंद्रे होती.
सुलतान राजवटीत बाजार आणि मंडई यामधून स्थानिक व्यापार चालत असे.
शेती हाच बहुसंख्य लोकांचा व्यवसाय असल्याने बाजारपेठेत धान्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत असे.
सुती साठी आणि जरीचे कापड निर्मितीचा मोठा उद्योग असल्याने त्याचा व्यापार मोठा होता.
चिंध्या, झाडाची साल यांच्यापासून कागदाचे उत्पादन होत असे.
या सर्व वस्तूंची व्यापारी उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असल्याने सुलतान राजवटीत व्यापारी पेठांचाही उदय झाला.
दिल्ली, मुलतान, जौनपुर, बनारस, आग्रा, पाटण अशा अनेक बाजारपेठा या राजवटीत भरभराटीस आल्या होत्या.
परकीय व्यापारीही या बाजारपेठेत माल खरेदी करण्यासाठी येत असत.
अशाप्रकारे सुलतान राजवटीत अंतर्गत व्यापारात वाढ झाली होती.
संकल्पना चित्र पूर्ण करा.
सुलतान राजवटीतील कागद निर्मिती उद्योगाची ठिकाणे
प्रश्न - सुलतान राजवटीत भारतातून कोणत्या मालाची आयात व निर्यात होत असे?
सुलतान राजवटीत भारतातून -
सुती कापड, रंगीत कापड, मलमल.
नीळ, साखर, आले, सुंठ.
कापूस, सुगंधी तेल इत्यादी माल.
इराण, अरबस्तान, चीन इत्यादी देशात निर्यात होत असे.
सोने व चांदी या गोष्टी आयात केल्या जात असत.
प्रश्न - अमिर खुसरो याने ढाक्याच्या मलमलींचे वर्णन कसे केले आहे?
अमिर खुसरो हा फारसी भाषेत रचना करणारा प्रख्यात कवी आणि विद्वान होता.
दिल्लीच्या राजदरबारात बल्बन या सुलतानाच्या राजवटीत राजकवी म्हणून होता.
डोक्याला गुंडाळले तरी डोईचे केस दिसून येतात.ही मलमल एवढी तलम असली तरी ती तेवढीच मजबूतही असते. शंभर हात लांबीचे मंगलमय शुभेच्छा छिद्रातून आरपार जाऊ शकते.पण त्याच सोयीने त्या मलमली छिद्र पाडता येत नाही. त्याच्याबद्दल मुलीचे तलम आणि मजबुती याविषयीचे वर्णन अमिर खुस्रोने केले आहे.
सुलतानशाहीच्या काळातील चलनव्यवस्था -
सुलतानशाहीच्या काळात चलन व्यवस्थेत मूलगामी बदल घडून आले.
नाण्यांवर देवी-देवतांच्या प्रतिमेऐवजी खलिफांची व सुलतानांची नावे कोरली जाऊ लागली.
नाण्यांच्या वजनासाठी ‘तोळा’ हे प्रमाण प्रचलित झाले.
- सुलतानशाही कालखंडातील नाणी -
सुलतानशाही राजवटीच्या प्रत्येक सुलतानाने विविध प्रकारची नाणी पाडली.
पहिला सुलतान अल्तमश याने ‘टंका’ हे चांदीचे नाणे पाडले.
मुहम्मद- बिन-तुघलक हा तांब्याची नाणी पाडणारा पहिला सुलतान तो आदेश मागे घेऊन त्याने पुन्हा सोन्या- चांदीची नाणी पाडली.
हिंदू राजांच्या नाण्यांवर देवदेवतांच्या प्रतिमा असत.
सुलतानशाही चलनव्यवस्थेत मूलगामी बदल झाले.
देवतांऐवजी सुलतानांच्या प्रतिमा आणि त्यांची नावे कोरली जाऊ लागली.
नाण्यांच्या वजनासाठी 'तोळा' हे प्रमाण प्रचलित झाले.
प्रश्न - सुलतान राजवटीत बाजारावर प्रशासनाचे नियंत्रण ठेवण्याच्या धोरणाचा कोणता परिणाम झाला?
अल्लाउद्दीन खिलजी याने बाजारावर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्याचे धोरण स्वीकारले.
धान्य व भाजीपाला, फळे, नित्योपयोगी वस्तू, गुलाम, घोडे इत्यादी वस्तूंचे भाव त्यांनी निश्चित केले.
याच किमतीत या वस्तू उत्पादकाने व्यापाऱ्याला विकल्या पाहिजेत, अशी सक्ती केली.
दुष्काळाच्या काळात शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असे.
- शहरीकरण :-
प्रश्न - सुलतानशाहीच्या काळात शहरीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळाली. (सकारण स्पष्ट करा)
शहरीकरणाची प्रक्रिया ही राजकीय आणि आर्थिक विकासाशी निगडित असते.
शहरांचा उदय आणि अस्त तेथील राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींवर अवलंबून असतो.
दिल्ली ही सुलतानांची राजधानी असल्याने ती विकसित झाली.
अल्लाउद्दीन खिलजीने सिरी हे शहर उभारले.
तुघलक घराण्यातील सुलतानांनी तुघलकाबाद, जहाँपन्हा आणि फिरोजाबाद की तीन शहरे वसवली.
सय्यद आणि लोदी घराण्यांनी आग्रा ही राजधानी बनवली.
राज्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे या शहरात व्यापार आणि दळणवळणाची साधने वाढत गेली.
त्यामुळे सुलतानशाहीच्या काळात शहरीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळाली.
राज्यकर्त्यांची शहर वसवण्यात व त्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका असते.
इब्न खल्दून अरब इतिहासकाराच्या मते, राज्यकर्त्यांच्या धोरणातून व्यापाराला चालना मिळत असते.
काही शहरांना प्रशासनाचे केंद्र किंवा तेथील मागणी असलेल्या उत्पादनामुळे महत्त्व प्राप्त होते.
कला, स्थापत्य, साहित्य, समाजजीवन :--
सुलतान राजवटीचे राजकीय जीवनावर परिणाम झाले.
तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनावर देखील झाले.
कलेच्या क्षेत्रात काही नवीन यांची भर पडली.
प्रश्न - सुलतान राजवटीचे भारतीय संगीत क्षेत्रावर कोणते परिणाम झाले?
सुलतान राजवटीने भारतीय संगीत क्षेत्रात नव्या पैलूची करता ती रझिया सुलतान संगीतकार व गायकांना बक्षिसे देऊन प्रोत्साहित करीत असे.
स्वतः संगीतकार असलेल्या बल्बन या सुलतानाने इराणी संगीत आणि भारतीय संगीत यांच्या संयोगातून अनेक नवीन रागांची निर्मिती केली.
त्याच्या दरबारात ‘अमीर खुसरो’ आणि ‘आमिर खास’ असे प्रसिद्ध कवी व संगीतकार होते.
सुफी संतांचा संगीत कलेच्या विकासामध्ये मोठा वाटा होता.
ख्वाजा मोईनुद्दीन चिस्तीमुळे कव्वाली हा संगीतातील प्रकार खूप लोकप्रिय झाला.
हुसेन शहा शाहरुख खान याने ख्याल गायकी विकसित करून संगीतात मोठे योगदान दिले.
स्थापत्य -
प्रश्न - सुलतानी राजवटीतील स्थापत्यकलेविषयी माहिती लिहा.
सुलतानी राजवटीत बांधल्या गेलेल्या खूप मशीदी, दर्गे व खबरी या स्थापत्यावर इराणी आणि भारतीय स्थापत्य यांचा प्रभाव पडलेला दिसतो.
कुतुबुद्दीन ऐबक हा इस्लामी शैलीच्या इमारती बांधणारा पहिला शासक होता.
मेहरौली येथील कुतुबमिनार हे भारतीय इस्लामी स्थापत्याचे उत्तम उदाहरण आहे.
कुतुबमिनारच्या परिसरात अनेक इमारती बांधल्या गेल्या.
त्यापैकी अलाई दरवाजा व समाकलन खान मशीद या अल्लाउद्दीन खिलजीने बांधलेल्या दोन मशिदी आहेत.
फिरोजशहा तुघलक आणि दिल्लीमध्ये फक्त हा भात आणि फिरोज नावाच्या दोन इमारती बांधल्या.
तुघलक सुलतानाने बांधलेले किल्ले, पूल, धर्मशाळा, कालवे इत्यादी स्थापत्य कलेचा उत्तम नमुने आहेत.
तुघलक घराण्यातील सुलतानांनी बांधलेल्या इमारती भव्य पण साध्या होत्या.
प्रश्न - दिल्लीच्या सुलतानांनी साहित्य निर्मितीस उत्तेजन दिले.
दिल्लीच्या सुलतानी राजवटीत अनेक संस्कृत ग्रंथांचे फारसी भाषेत अनुवाद झाले.
गझनीचा महमूद याच्या काळात अल्बेरूणी याने संस्कृत भाषेतील अनेक ग्रंथांची अरबी भाषेत भाषांतरे केली.
त्यांच्या दरबारात अनेक साहित्यिक, कवी यांना आश्रय मिळत होता.
त्यात भारतीयांबरोबरच सिरिया, अरबस्तान, इराण देशातील विविध योजनांचा समावेश होता.
कोशशास्त्र या ग्रंथाचे भाषांतर ‘तुली’ या कोशकाराने केले.
सुलतानशाहीच्या काळात हसन निजामी, झियाउद्दिन बरनी, अफीफ याह्या असे इतिहासकार होऊन गेले.
राजवटीत फारसी, अरबी, तुर्की या भाषांच्या एकत्रीकरणातून ‘उर्दू’ ही नवी भाषा दक्षिण भारतात उदयास आली.
या सर्व उदाहरणांवरून दिल्लीच्या सुलतानांनी साहित्य निर्मितीस उत्तेजन दिल्याचे दिसते.
संकल्पना चित्र पूर्ण करा.
सुलतानशाही काळातील इस्लामी वास्तुकलेच्या इमारती -
सुलतानशाहीच्या काळात मुसलमानी समाज हा तूर्क, उलेमा, मुघल, अरब व भारतीय मुसलमान अशा अनेक घटकांचा बनला होता.
बहुतेक सुलतान तुर्क व पठाण जमातीचे होते.
अमीर, उमराव यांचा एक स्वतंत्र वर्ग निर्माण झाला.
या काळात मक्तबा म्हणजेच प्राथमिक शाळा आणि मदरसे यांची स्थापना झाली.
विजयनगरचे साम्राज्य -
भारतात सुलतानशाही राजवट असताना विंध्य पर्वताच्या खाली दक्षिण भारतात विजयनगरचे राज्य अस्तित्वात आले.
उत्तर भारतात महंमद तुघलकाच्या राज्यात जेव्हा अस्थिरता निर्माण झाली, त्याच वेळी हरिहर आणि बुक्क दोन बंधूंनी विजयनगर राज्याची स्थापना केली.
विजयनगरवर चार घराण्यांनी राज्य केले.
सन १३३६ मध्ये हरिहर आणि बुक्क या संगम घराण्यातील पराक्रमी बंधूंनी विजयनगर हे शहर आणि राज्य निर्माण केले.
संगम घराण्यानंतर सलुवा घराण्याने सत्ता काबीज केली. त्यांचाही लवकरच शेवट झाला. .
त्यानंतर कृष्णदेवराय यांनी तुळुवा घराण्याची स्थापना केली.
- कृष्णदेवराय -
कृष्णदेवराय हा विजयनगरचा सर्वश्रेष्ठ आणि नामवंत सम्राट होय.
इसवीसन १५०९ ते १५३० या काळात तो विजयनगरचा सम्राट होता.
राज्याची विस्कटलेली घडी पुन्हा भक्कमपणे उभी केली.
कृष्णदेवरायाने विजयनगर राज्याचा विस्तार केला.
त्याचे साम्राज्य पश्चिमेला दक्षिण कोकणपासून पूर्वेला विशाखापटनमपर्यंत आणि उत्तरेला कृष्णा नदीपासून दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरले होते.
‘अमुक्तमाल्यादा’ हा राजनीतिविषयक ग्रंथ कृष्णदेवराय यांनी तेलगू भाषेत लिहिला.
कृष्णदेवराय विद्वान होता. त्याने कला, संगीत व स्थापत्य यांना उत्तेजन दिले.
तेलुगु व संस्कृत भाषेचा एक विद्वान अभ्यासक होता.
कृष्णदेवराय अत्यंत उदार व सहिष्णू राज्यकर्ता होता.
येस हा इटालियन प्रवासी कित्तेक वर्ष कृष्णदेवरायाच्या दरबारात होता.
निकोलो कोंटी हा इटालियन प्रवासी आणि अब्दुल रज्जाक हा इराणी प्रवासी विजयनगर येथे येऊन गेले होते.
त्यांचे प्रवासवृत्तांत विजयनगरच्या इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत.
बहमनी राज्य -
दक्षिण भारतातील आणखी एक प्रमुख सत्ता म्हणजे बहमनी सत्ता होय.
इसवी सन १३४७ मध्ये दक्षिणेतील काही सरदारांनी हसन गंगूच्या नेतृत्वाखाली सुलतान महंमद तुघलकाच्या सैन्याविरुद्ध उठाव केला. दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला.
हसन गंगुने ‘अल्लाउद्दीन बहमतशहा’ असा किताब घेऊन बहमनी राज्याची स्थापना केली.
कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे बहमनी राज्याची राजधानी स्थापन केली.
इ.स. १३४७ ते १५२६ या कालावधीत बहामनी राज्य अस्तित्वात होते. त्या काळात १८ सुलतानांनी बहमनी राज्यावर राज्य केले.
पण या सर्वांमध्ये हसन गंगू आणि महम्मूद गवान हे दोनच कर्तबगार होते.
महमूद गवान या वजिराने सत्ता अधिक बळकट केली.
हा मूळचा इराणमधील व्यापारी होता.
त्याने कर्नाटकातील बागलकोट, हुबळी,बेळगाव हे प्रदेश जिंकून घेतले.
तसेच कोकण, गोवा हेही प्रदेश जिंकून बहामनी राज्य वाढवले.
एक कार्यक्षम प्रशासन व्यवस्था निर्माण करून लष्करात सुधारणा केल्या.
सैनिकांना जहागिरीऐवजी रोख वेतन दिले.
महसूल व्यवस्थेत सुधारणा करू केली जमिनीची मोजणी करून शेतसारा निश्चित केला.
गवानने विद्या आणि कला यांना आश्रय दिला. तो अतिशय प्रामाणिक होता.
त्याला गणित आणि वैद्यक विषयांमध्ये गती होती.
व्यक्तिगत ग्रंथसंग्रह करणे, बिदर येथे मदरसा स्थापन करणे, यामुळे तो समकालीन राज्यकर्त्यांपेक्षा वेगळा ठरला.
महमूद गवाननंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली. परिणामी दुर्बल झाली.
पुढे १४८४ ते १५२७ या कालावधीत बहमनी राज्याचे विभाजन होऊन पाच तुकडे झाले.
संकल्पना चित्र पूर्ण करा.
बहामनी राज्याचे झालेले विभाजन विघटन.
बिदरची ---------- बरीदशाही
वऱ्हाडची--------- इमादशाही
विजापूरची--------- आदिलशाही
अहमदनगरची--------- निजामशाही
गोवळकोंड्याची --------- कुतुबशाही.
पुढील घटना कालक्रमानुसार दाखवा लिहा.
तालिकोटची लढाई --------------------------------- इ.स. १५६५
विजयनगरच्या राज्याची स्थापना ------------------ इ.स. १३३६
अल्लाउद्दीनची देवगिरीवरील पहिली स्वारी ------ इ.स. १२९६
पानिपतची लढाई ------------------------------------- इ.स. १५२६
विजयनगर आणि बहमनी हे दोन्ही राज्य वेगवेगळ्या धर्माची होती.
त्यांचे राजकीय व आर्थिक हितसंबंध परस्परविरोधी होते.
त्यामुळे त्यांच्यात सातत्याने संघर्ष होत राहिले आणि हे संघर्ष त्या दोन राज्यांच्या नाशाला कारणीभूत ठरले.
प्रांतातील अधिकारी स्वतंत्र वृत्तीने वागू लागले.
सन १५६५ मध्ये झालेल्या तालिकोटच्या लढाईत विजयनगरच्या रामरायाचा बहमनी राज्याच्या अंतर्गत असलेल्या पाचही शाह्यांनी विजयनगरचा निर्णायक पराभव केला.
अशा रीतीने वैभवसंपन्न अशा विजयनगर साम्राज्याचा अस्त झाला.
सुलतानशाहीच्या काळात भारताच्या राजकीय व सामाजिक जीवनावर मूलगामी स्वरूपाचे परिणाम करून आले. एका नव्या संमिश्र संस्कृतीची निर्मिती झाली.
सुलतानशाहीच्या अस्तानंतर उत्तरेमध्ये मोगलांचे साम्राज्य उदयाला आले.
या मोगलाकालीन भारताविषयीची माहिती आपण पुढच्या पाठात अभ्यासणार आहोत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा