१३. भारत, श्रीलंका आणि आग्नेय आशिया
भारत आणि श्रीलंका -
प्रश्न - भारत श्रीलंका यांच्यातील सांस्कृतिक संबंधांचा आढावा घ्या.
मुद्दे - अ. ऐतिहासिक साधने ब. सम्राट अशोकाचा कालखंड क. बौद्ध सांस्कृतिक ठिकाणे.
अ. ऐतिहासिक साधने -
प्राचीन काळापासून भारत आणि श्रीलंका यांचा इतिहास एकमेकांशी निगडित आहे.
दीपवंश, महावंश आणि चुल्लवंश या ग्रंथामधून बुद्धपूर्व काळात आणि बुद्धोत्तर काळात भारतात आणि श्रीलंकेत होऊन गेलेले राज्य व त्यांचे परस्पर संबंध आणि घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते, म्हणून या ग्रंथांना ‘वंशग्रंथ’ असे म्हणतात.
श्रीलंकेतील राजसत्ता -
वंशग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इसवीसनाच्या सुमारे सहाव्या शतकात श्रीलंकेत स्थापन झालेल्या पहिल्या राज्याचे नाव ‘तांबपण्णी’ (ताम्रपर्णी) असे होते.
तो भारताच्या वंग-कलिंग राज्यातील युवराज होता. त्याच्या राज्यातून प्रथम सुप्पारक म्हणजे ‘सोपारा’ येथे आला आणि तेथून श्रीलंकेत पोचला.
ब. सम्राट अशोकाचा कालखंड -
सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार श्रीलंकेत करण्यासाठी पाठवलेला राजपुत्र थेर महेंद्र यांचे अनुराधपुर येथील मिहीनथले आगमन झाले.
श्रीलंकेचा राजा ‘देवानामपिय तिस्स’ यास बौद्ध धर्माची दीक्षा दिली.
त्याच्या धाकट्या भावाची पत्नी अनुला हिने भिक्खुणी होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर थेर महेंद्र याने त्याची बहीण थेरी संघमित्रा हिला भारतातून बोलावून घेतले.
थेरी संघमित्राने भारतातून श्रीलंकेत येताना बोधीवृक्षाची एक फांदी आणि बुद्धाचे काही अवशेष आणले.
थेरी संघमित्राने राजाच्या धाकट्या भावाच्या पत्नीला म्हणजेच ‘अनुलाला’ बौद्ध धर्माची दीक्षा दिली.
अनुला ही भिक्खुणी झालेली श्रीलंकेतील पहिली स्री होती.
संघमित्राने श्रीलंकेतील पहिले भिक्खुणी शासन प्रस्थापित केले.
थेरी संघमित्राच्या आगमनाचे स्मरण म्हणून श्रीलंकेमध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पौर्णिमेला ‘उंडुवप पोया’ नावाचा उत्सव साजरा केला जातो.
क. बौद्ध सांस्कृतिक ठिकाणे -
थेर महिंद आणि थेरी संघमित्रा यांच्या अनुराधपुर जवळच्या मिहीनथले येथील वास्तव्यामुळे बौद्ध धर्म श्रीलंकेत रुजला आणि वाढला.
मिहीनथले उभारलेला ‘कंटकचेतीय’ हा प्राचीन स्तूप आहे.
थेर महिंद्राचा अंबस्थल दगाबा हा स्तूप मिहिनथले येथे आहे.
भगवान बुद्धांच्या अस्थीवरचा ‘थूपाराम’ स्तूप अनुराधपुर येथे आहे.
पोलन्नरुवा येथे बुद्धांच्या अस्थींची पुनर्स्थापना करून तिथे बुद्ध मंदिर बांधण्यात आले.
दांबूल्ल आणि सिगिरिया येथील बौद्ध लेणी व भित्तिचित्रे जागतिक सांस्कृतिक ठेवा आहेत.
संकल्पना चित्र पूर्ण करा.
प्रश्न- पोलन्नरुवा येथील बौद्ध मंदिराची माहिती लिहा.
भगवान बुद्धांचा अवशेष पोलन्नरुवाच्या या मंदिराच्या मध्यभागी असलेल्या स्तूपात विराजमान आहे.
स्तूपाच्या पायथ्याशी चंद्रशिला (अर्धवर्तुळाकृती) पायऱ्या आहेत. त्यावर हत्ती, घोडे व वेली यांच्या आकृत्या कोरल्या आहेत.
या मंदिरातील ‘गलपोथा’ हा एक वैशिष्ट्यपूर्ण अभिलेख आहे.
८.१७ मीटर लांबीच्या आणि १.३९ मीटर रुंदीच्या अखंड शिलापट्टावर कोरलेल्या लेखात राजा निस्संक मल्ल यांच्या कारकिर्दीचे वर्णन आहे.
गलपोथाच्या एका बाजूस दोन हंसावलींच्या किनारींमध्ये गजलक्ष्मीची प्रतिमा कोरलेली आहे.
कॅंडी -
बुद्धांच्या अस्थींवर श्री दलद मलिगव मंदिर कवाली या नावाने ओळखले जाणारे दंतधातुचे सध्याचे कॅंडी शहरात आहे.
श्री दलद मलिगव मंदिर या मंदिराला युनेस्कोने जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा लाभला आहे ; कारण गौतम बुद्धाचे दंत धातु (अवशेष) त्याठिकाणी आहेत.
गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थींचे अवशेष भारतातील आणि बाहेरच्या देशांमधील बौद्ध संघ यांच्या हवाली करण्यात आले.
अस्थींच्या या अवशेषांना ‘धातू’ असे म्हटले जाते.
‘दीघ निकाय’ या ग्रंथातील वर्णनानुसार गौतम बुद्धांचा डाव्या बाजूचा सुळा म्हणजेच दंतधातू कलिंग देशाच्या राजाला मिळाला.
हा दंतधातू पुढे श्रीलंकेत आला. ज्याच्याकडे दंतधातू असेल त्याला राज्य करण्याचा दैवी अधिकार आहे, अशी श्रद्धा श्रीलंकेतील राजघराण्यांमध्ये रुजली.q
त्यामुळे सत्तेवर असलेल्या राजांनी तो आपल्या राजवाड्याच्या परिसरातच राहावा, यासाठी प्रयत्न केले.
त्यामुळे दंतधातूचे स्थान सतत बदलत राहिले.
दांबुल्ला सिगिरिया -
श्रीलंकेतील दांबूल्ल येथील बौद्ध लेणी जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर झालेली आहेत.
याठिकाणी असलेल्या पाच लेण्याच्या अंतर्भागात गौतम बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या मूर्तींबरोबर छतांवर काढलेली चित्रे आहेत.
दांबुल्ला शहराच्या जवळ असलेल्या ‘सिगिरिया’ येथील पर्वतावर एका प्रचंड मोठ्या खडकावर बांधलेला किल्ला आणि राजवाडा होता.
त्या खडकात राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी कोरलेली सिंहाची एक प्रचंड मूर्ती आहे, त्यावरून या ठिकाणाचे नाव ‘सिगिरिया’ असे पडले.
सिगिरिया येथील भित्तीचित्रांच्या शैलीची तुलना अजिंठा येथील भित्तिचित्र शैलीशी केली जाते.
भारत आणि आग्नेय आशिया -
आग्नेय आशियातील देश- (संकल्पना चित्र पूर्ण करा.)
(म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया)
आग्नेय आशियात प्रस्थापित झालेल्या भारतीयांच्या वसाहती आणि राज्य यांची माहिती देणारे भारतीय साहित्य फारसे उपलब्ध नाही.
मात्र चिनी सम्राटांच्या दरबारी नोंदीमध्ये या संदर्भातील माहिती उपलब्ध आहे.
प्राचीन भारतीय साहित्यात -बौद्ध साहित्यात ‘सुवर्णभूमी’ असा आढळतो.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ‘आग्नेय आशिया’ या संकल्पनेचा उदय झाला.
आग्नेय आशियाचे दोन विभाग आहेत -
मुख्य भूभाग-
प्रदेशाचा उल्लेख इंडो-चीन या नावानेही केला जातो.
म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम हे देश आणि मलेशियाचा पश्चिम भाग यांचा समावेश होतो.
समुद्री प्रदेश -
म्हणजेच मलाया द्विपसमूह.
Aज्यामध्ये मलेशियाचा पूर्वभाग आणि इंडोनेशियाचा समावेश केला जात असला तरी, तेथे संस्कृती आणि इतिहास यांचा अभ्यास स्थानिक वैविध्य यांचा विसर पडणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.
आग्नेय आशिया भारत यांच्यातील व्यापारी संबंध -
आग्नेय आशियातील देशांशी भारताचे व्यापारी संबंध इसवी सनापूर्वी पहिले शतक ते इसवी सनाचे पहिले शतक या काळात सुरू झाले.
भारतीय व्यापाऱ्यांसाठी मलाका सामुद्रधुनीमार्गे येऊन चिनी समुद्रात प्रवेश करण्यासाठी मलाया द्वीपकल्प हा सोयीचा बिंदू ठरला.
मलाया द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडील किनार्यावर माल उतरवून तो पूर्व किनाऱ्याकडे नेणे आणि परत जहाजावर चढवणे, हे संपूर्ण समुद्राला वळसा घालून जाण्यापेक्षा सोयीचे होते.
समुद्रमार्गाने चालणारा हा व्यापार इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या शेवटी चोळ राजांच्या राजवटीत लक्षणीयरीत्या वृद्धिंगत झाला.
प्रश्न - भारतीय संस्कृतीचा आग्नेय आशियात प्रसार झाला. (सकारण स्पष्ट करा)
आग्नेय आशियातील देशांशी भारताचे व्यापारी संबंध इसवीसनपूर्व १ ल्या शतकात सुरू झाले.
जहाजांवरून महिनोन् महिने प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांबरोबर असलेल्या लवाजम्यात पुरोहित, भिक्खू , धर्मगुरू आणि राजघराण्यातील महत्त्वकांक्षी व्यक्ती आग्नेय आशियात गेल्या.
या लोकांमार्फत आग्नेय आशियात भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला.
इतकेच नाही तर काहींनी तेथे स्वतंत्र राज्य प्रस्थापित केली.
आग्नेय आशियात भारतीय संस्कृतीच्या खुणा आजही पहायला मिळतात.
म्यानमार -
प्रश्न - म्यानमार आणि भारत यांमधील सांस्कृतिक संबंधांविषयी माहिती लिहा.
म्यानमार हा भारताच्या सीमेलगत असलेल्या शेजारील देश आहे. पूर्वीचे नाव ब्रह्मदेश होते.
इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात उत्तर आणि मध्य म्यानमारमध्ये ‘प्यू’ या नावाने ओळखली जाणारी नगर राज्य अस्तित्वात होती.
त्यापैकी श्रीक्षेत्र हे विस्ताराने सर्वात मोठे राज्य होते. (ब्रिटिश काळात ‘प्रोम’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि सध्या ‘प्येइ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शहराजवळ श्रीक्षेत्र हे नगर होते.)
काही नगरे नव्याने वसली. त्यामध्ये हालीन आणि श्रीक्षेत्र हे महत्त्वाचे नगरे होती.
श्रीक्षेत्र राज्याचा संस्थापक असलेले दोन भाऊ हे गौतम बुद्ध यांच्या शाक्य कुळातील होते.
इसवी सनाच्या पहिल्या शतकात पगान (बगान) हे राज्य उदयास आले.
अकराव्या शतकात त्याचे साम्राज्यात रूपांतर झाले आणि त्यात श्रीक्षेत्रसह सर्व ‘प्यू’ नगरराज्य विलीन झाली.
पगान साम्राज्याचा संस्थापक ‘अनव्रथ’ हा म्यानमारच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ र उत्तर व दक्षिण म्यानमारचे एकत्रीकरण केले.
त्याच्या कारकीर्दीत आग्नेय आशियात क्षीण होत चाललेल्या थेरवादी बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले.
यॉंगान ( रंगून) शहरात ६ व्या ते १० व्या शतकांच्या दरम्यान बांधला गेलेला स्वेडगॉन पॅगोडा हा म्यानमारमधील बांधणीचा उत्कृष्ट नमुना आहे.
म्यानमारमधील दोन व्यापारी बंधू भारतात आले असताना त्यांची गौतम बुद्धांची भेट झाली. त्यावेळी त्यांना गौतम बुद्धांच्या मस्तकाचे आठ केस मिळाले.
मायदेशात केल्यानंतर हा अमूल्य ठेवा त्यांनी राजाच्या हवाली केला.
तो जोपासण्यासाठी राजाने श्वेडगाॅन पॅगोडा बांधला. हा पॅगोडा सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेला आहे.
भारत-म्यानमार सांस्कृतिक संबंधांची घनिष्ठता या वास्तूच्या निर्माणातून व्यक्त होते.
अकराव्या ते बाराव्या शतकात सम्राट क्यांंझिथ्था याच्या कारकीर्दीत बांधले गेलेले ‘आनंद मंदिर’ ही वास्तू भारतीय व पगान स्थापत्यशैलीच्या संमिश्र बांधणीचा उत्कृष्ट नमुना आहे.
ब्रिटिश राजवटीत ब्रह्मदेश भारतातील वसाहती साम्राज्याचा एक भाग होता.
त्या कालखंडात प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले सांस्कृतिक संबंध पुनर्प्रस्थापित झाले.
थायलंड -
प्राचीन काळी थायलंडचे रहिवासी त्यांच्या देशाचा उल्लेख ‘मुएंग थाइ’ असा करत असत.
मात्र बाहेरील जगामध्ये तो ‘सयाम’ या नावाने ओळखला जात असे.
२० व्या शतकात त्याचे नाव थायलंड असे बदलण्यात आले.
प्रश्न - थायलंडमधील भारतीय संस्कृतीचा प्रकार स्पष्ट करा. (सविस्तर उत्तर लिहा)
६ व्या ते ११ व्या शतकात आशियातील थायलंडमध्ये मॉन लोकांचे द्वारावती नामक राज्य होते.
द्वारावती राजवटीच्या काळात थायलंडमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला.
मॉन लोकांच्या संस्कृतीच्या घडणीमध्ये भारतीय शिल्प, साहित्य, नीतिशास्त्र व दंडनिती या क्षेत्रातील परंपरांचा मोठा वाटा होता.
थायलंडच्या इतर भागात झालेल्या विजयाचे श्रेय मॉन लोकांना आणि पर्यायाने भारताला दिले जाते.
थायलंडमध्ये लोप बुरी (लाओपुरी) आणि अयुथ्था (अयोध्या) यासारख्या शहरांच्या जवळ द्वारावती कालखंडातील शिल्प आणि स्थापत्याचे अवशेष सापडले आहेत.
त्यावरून हे स्पष्ट होते की द्वारावती शिल्प शैलीवर भारतीय शिल्प शैलीचा प्रभाव होता.
दक्षिणेतील चोळांच्या राज्यात ज्या प्रकारची मंदिरे होती; त्यासारखे मंदिरे थायलंडमध्ये निर्माण करण्यात आली होती.
या अवशेषांमध्ये भगवान बुद्ध भगवान विष्णु यांच्या मुर्त्या वर्षी अवलंब सापडले होते.
कंबोडियातील शिल्पशैलीचा उगम द्वारावतीच्या शिल्पशैलीत म्हणजेच द्राविडी शिल्पशैलीत झाला असावा.
१४ व्या शतकातील अयुथ्थ्या राजांच्या नावामागे ‘राम’ हा उपसर्ग जोडलेला दिसतो. त्याचे कारण रामचरित्राची थायलंडमधील लोकप्रियता हे आहे.
थायलंडमध्ये रामायणाची स्वतंत्र परंपरा आहे. तिला ‘रामकीएन’ (राम आख्यान) असे म्हटले जाते.
रामकीएनमधील कथा व त्यातील मूल्ये थायलंडमधील शिल्पकला, नाट्यकला, नृत्यकला व लोकसंगीत या विविध कलांच्या माध्यमातून जपलेल्या आहेत.
व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया
युरोपियन वसाहतींच्या काळात व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया या तीन देशांना मिळून ‘इंडो-चीन’ असे नाव दिले गेले.
व्हिएतनाम -
प्रश्न - फुनान (व्हिएतनाम) ची माहिती लिहा.
हे व्हिएतनाममधील मेकॉंग नदीच्या मुखाच्या प्रदेशातील प्राचीन राज्य होते.
फुनानची माहिती प्रामुख्याने चिनी साहित्यातून मिळते.
इसवीसनाच्या ३ ऱ्या शतकात चीनमध्ये ‘हान’ घराण्याची सत्ता लयाला जाऊन साम्राज्याचे तीन तुकडे झाले.
त्यातील दक्षिणेकडच्या राज्याला रेशीम मार्गापर्यंत पोचण्यासाठी पर्याय उरला नाही.
तेव्हा तेथील राजाने समुद्री मार्गाचा पर्याय शोधण्यासाठी काही लोक पाठवले.
त्यांना मेकॉंग नदीच्या मुखाच्या प्रदेशात एक राज्य आढळले, त्यास त्यांनी ‘फुनान राज्य’ असे नाव दिले.
फुनानमध्ये तटबंदी युक्त शहर, राजवाडा, प्रस्थापित करप्रणाली, कायदे लिखित, नोंदी करण्याची पद्धत आणि कौशल्यावर आधारित व्यवसाय करणारा कारागीर वर्ग होता.
हवाई छायाचित्रणाच्या आधारे या वर्णनाला दुजोरा मिळाला आहे.
फ्रेंच पुरातत्त्वज्ञ लुई मेलरे याने केलेल्या उत्खननामध्ये बांधकाम केलेल्या मंदिरांचे अवशेष, अलंकार घडवण्याचे कारखाने आणि राहण्याची घरे यांचे अवशेष येथे मिळाले.
इसवीसनाच्या दुसऱ्या शतकातील रोमन नाणी ही मिळाली.
चंपा राज्य - (टीप लिहा.) २ गुण.
व्हिएतनामच्या किनारी प्रदेशात ‘चंपा’ हे प्राचीन राज्य होते.
चंपा म्हणजे चामवंशीय लोकांचे राज्य होय.
विजय हे शहर चंपाची राजधानी होते.
तेथील इतर शहरांची नावे इंद्रपुर, अमरावती, कौठार, पांडुरंग अशी होती.
चंपा राज्यात अनेक ठिकाणी ब्राम्ही लिपीत कोरलेले संस्कृत शिलालेख मिळतात.
या शिलालेखांमध्ये तेथे राजे व राण्या यांची नावे आणि त्यांनी बांधलेल्या हिंदू देवतांच्या मंदिरांचे विशेषतः शिवमंदिराचे उल्लेख सापडतात.
त्याचबरोबर लाकडी बुद्धमूर्ती ही मिळाल्या आहेत.
त्यावरून व्हिएतनाममध्ये व्यापारी केंद्र असलेली फुनानसारखे इतर नगरराज्य अस्तित्वात होते आणि तेथून विविध वस्तूंची आयात निर्यात होत असे हे स्पष्ट होते.
इसवी सनाच्या ४ थ्या ते १४ व्या शतकात चंपा राज्यातील शिवमंदिरे माइ सान नगरीमध्ये बांधली गेली.
त्यातील भद्रेश्वर मंदिर महत्त्वाचे समजले जाते.
या मंदिराची उभारणी मेरू पर्वताच्या संकल्पनेवर आधारलेली होती.
या मंदिराच्या प्रांगणात संस्कृत आणि चाम भाषेत कोरलेल्या लेखांचे दगडी पट्टे आहेत.
याच परिसरात राजघराण्यातील व्यक्तींचे दफन स्थळे परिसर राजघराण्यातील लोकांच्या धार्मिक प्रसंगांसाठी राखीव होता, असे दिसते.
माइ सान येथील मंदिरांच्या परिसराला जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा लाभलेला आहे.
माइ सान येथे एकेकाळी ७० हून अधिक मंदिरे होती.
माइ सानची मंदिर स्थापत्य शैली वैशिष्ट्यपूर्ण होती.
व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया या तीन देशांमध्ये सुमारे २० वर्ष सुरू असलेल्या युद्धाला ‘व्हिएतनाम युद्ध’ म्हणून ओळखले जाते.
या युद्धात माइ सानचा परिसर उद्ध्वस्त झाला.
लाओस -
प्रश्न - आग्नेय आशियातील ‘लाओस’ या देशाची माहिती लिहा.
लाओस हा देश भूवेष्टित आहे.
लाओसचे अधिकांश लोक मूळचे दक्षिण चीनमधून आलेले ‘लाओ वंशा’चे आहेत.
लाओसमधील राज्याचे नाव ‘लाओ सांग’ असे होते.
हे राज्य इसवीसनाच्या १४ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत अस्तित्वात होते.
१९ व्या शतकात थायलँडने केलेल्या आक्रमणापुढे लाओ सांगचा टिकाव लागला नाही.
आग्नेय आशियातील इतर देशांप्रमाणेच लाओसमध्येही बौद्ध धर्म प्रमुख आहे.
तेथील सांस्कृतिक आणि साहित्यिक जीवनात बुद्ध चरित्र आणि रामायण यांच्याशी संबंधित प्रथांचा प्रभाव बघायला मिळतो.
१६ व्या शतकात लाओसमध्ये रचले गेलेले ‘सान सिनसे’ नावाचे एक महाकाव्य केवळ लाओसमध्येच नव्हे, तर थायलंडमध्ये ही लोकप्रिय आहे.
‘सान सिनसे’ आणि ‘रामायणा’च्या कथा सूत्रांमध्ये साम्य आहे.
कंबोडिया -
कंबोडियाचे प्राचीन नाव ‘कंबुजदेश’ असे होते.
इसवीसनाचे ८ वे ते १२ वे शतक या कालखंडात कंबोडियामध्ये मॉन आणि ख्मेर वंशाच्या लोकांचे राज्य होते.
ख्मेर साम्राज्याचा उदय कंबोडियामध्ये झाला. त्याचा इतिहास तेथील मंदिरांच्या प्रांगणामध्ये असणाऱ्या कोरीव लेखांच्या आधारे समजतो.
लेख संस्कृत आणि ख्मेर भाषेत आहेत.
सर्वप्रथम प्रस्थापित झालेल्या राज्याचे नाव चेन्ला असे होते.
चेन्ला राज्य -
कंबोडियामध्ये सर्वप्रथम प्रस्थापित झालेल्या राज्याचे नाव चेन्ला असे होते.
चेन्ला येथील लोक ‘ख्मेर’ वंशाचे होते.
दुसरा जयवर्मन चेन्ला राज्याचा संस्थापक होता.
इसवीसन ८०२ मध्ये त्याचा राज्याभिषेक झाला.
राजधानीचे नाव हरीहरालय होते.
चेन्ला राज्याच्या राजांनी पुढील ५०० वर्ष राज्य केले.
व्हिएतनाम ते म्यानमार आणि उत्तरेला चीनपर्यंत साम्राज्यविस्तार केला.
सातवा जयवर्मन या राजाच्या कारकिर्दीनंतर ख्मेर साम्राज्याला उतरती कळा लागली.
जगविख्यात अंकोरवाट हे विष्णू मंदिर बांधले.
अंकोरवट विष्णूमंदिर -
कंबोडियातील चेन्ला राज्याच्या दुसऱ्या सूर्यवर्मनने यशोधरपूर या आपल्या राज्याच्या राजधानीत ११ व्या शतकात ‘अंकोरवट’ हे विष्णू मंदिर बांधले.
या मंदिराचे क्षेत्रफळ सुमारे ५०० एकर म्हणजेच दोन चौरस किलोमीटर इतके आहे.
मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेला असून, मंदिराभोवती दोनशे मीटर रुंदीचा खंदक आहे.
मंदिरातील कोरीव शिल्पांमध्ये आग्नेयकडील भिंतीवर असलेले समुद्रमंथनाचे शिल्प प्रसिद्ध आहे.
चंपाच्या राजाने अंकोरवटवर हल्ला करून या मंदिराचे बौद्ध मंदिरात रुपांतर केले.
सूर्यवर्मनचा मृत्यूनंतर काही वर्षांनी चंपाच्या राजाने अंकोरवटवर हल्ला केला आणि नासधूस केली.
पुढे अंकोरवटचे रूपांतर बौद्ध मंदिरामध्ये झाले.
अंकोरथॉम -
चेन्ला राजवंशाच्या सातव्या जयवर्धन याने साम्राज्याची राजधानी स्थापन केलेले नगर म्हणजेच अंकोरथॉम.
७ व्या जयवर्धनने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता.
अंकोरथॉम शहराचे नियोजन, जलव्यवस्थापन आणि स्थापत्य यामध्ये ख्मेर शैलीची परिपक्वता दिसून येते.
त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘बयोन मंदिर’ आहे.
त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीसाठी प्रसिद्ध आहे.
ही शिखरे किंचित स्मित करणाऱ्या मानवी चेहऱ्याच्या आकाराची आहेत.
चेहऱ्यांची बांधणी अनेक दगड वापरून केलेली आहे.
बयोन मंदिर -
चंपाच्या राजाने अंकोवटची नासधूस केल्यानंतर,चेन्ला राजा सातव्या जयवर्मन याने अंकोरथाॅम ही नवी राजधानी बांधली.
त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर अंकोरथॉमचा मध्यवर्ती बिंदू म्हणजे बयोन मंदिर.
हे मंदिर मेरू पर्वताचे प्रतीक आहे.
मेरू पर्वताला रवीच्या-सूर्याच्या स्वरूपात मध्यवर्ती ठेवून समुद्रमंथन करणाऱ्या देव व दानव यांच्या शिल्पकृती मंदिराच्या दक्षिण प्रवेश मार्गाच्या दोन्ही बाजूंना निर्माण करण्यात आल्या.
अंकोरवट, अंकोरथॉम आणि त्यांच्या भोवतीचा परिसर हा युनेस्कोने जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर केलेला आहे.
मलेशिया आणि इंडोनेशिया -
युरोपियन लोकांच्या आगमनाआधी मलेशियामध्ये तीन प्राचीन राज्य होऊन गेली.
वायुपुराणात मलय द्वीप या नावाने मलेशियन द्वीपकल्पाचा उल्लेख आढळतो.
मलायु -
आजच्या मलेशियाचा उल्लेख प्राचीन चीनच्या दरबारी दप्तरात ‘मलायु’ असा करण्यात आला आहे.
तंजावर येथील बृहदीश्वर मन्दिरात त्याचा ‘मलैयुर’ असा उल्लेख आहे.
टॉलेमीने त्याचा उल्लेख ‘मलेउ कोलान’ आणि ‘गोल्डन केर्सनीझ’ (सुवर्णद्वीप) असा केला आहे.
चोळ राजा राजेंद्र यांनी पराभूत केलेल्या राज्यांपैकी ते एक राज्य होते.
श्रीविजय राज्य -
श्रीविजय राज्याचा उगम इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर झाला.
श्रीविजय हे आशियातील सर्वात प्रबळ राज्य होते.
मलायू आणि त्याच्या शेजारची दुर्बल राज्य जिंकून श्रीविजय राज्याने साम्राज्यविस्तार केला.
११ व्या शतकातील चोळांच्या आक्रमणाला तोंड देताना श्रीविजय राज्य दुर्बल झाले.
‘इस्कंदर शाह’ याने मलायातील पहिल्या सुलतानशाही राज्याची स्थापना केली.
मजपहित -
१३ व्या शतकामध्ये पूर्व जावामध्ये मजपहित राज्य उदयाला आले.
भारतीय संस्कृतीचा प्रभाव असणारे हे शेवटचे राज्य होते.
विजय हा या राज्याचा संस्थापक होता.
याने कुबलाई खानाला जावामधून हाकलून दिले.
इंडोनेशियातील जावा, बाली मजपहितचे अस्तित्व हळूहळू संपुष्टात आले.
शैलेंद्र राज्य -
जावामधील शैलेंद्र राज्याचे राज्यकर्ते भारतातून आले असावेत, असे प्रतिपादन काही भारतीय इतिहासकार करतात.
इसवी सनाच्या ८ व्या आणि ९ व्या शतकात शैलेंद्र सत्तेच्या भरभराटीचा काळ होता.
बौद्ध धर्माचे अनुयायी असलेल्या शैलेंद्र राजांनी अनेक बौद्ध मंदिरे आणि स्तूप बांधले.
मध्य जावातील बोरोबुदुरचा स्तूप स्थापत्य, शिल्पकला व बौद्ध तत्वज्ञानाची अभिव्यक्ती या सर्वच दृष्टीने अद्वितीय आहे.
शैलेंद्र काळात मध्य जावामध्ये डिएंगच्या पठारावर बांधलेला हिंदू मंदिरांचा समूह ‘डिएंग मंदिरे’ ओळखला जातो.
मतराम -
मतराम नावाची एक समकालीन जावाच्या पूर्व भागात होती.
संजय नावाचा राजा या राज्याचा संस्थापक होता.
मतराम राजवटीत महाभारत व हरिवंश या ग्रंथांचे जावानीज भाषेत भाषांतर करण्यात आले.
काकवीन नावाची जावानीज काव्यरचना ‘शार्दूलविक्रीडित’ सारख्या संस्कृत वृत्तामध्ये बांधलेल्या आहेत.
राजा दक्ष आणि प्रांबनान येथे हिंदू मंदिरे बांधली.
त्यातील प्रमुख मंदिर ‘चंडी प्रांबनान किंवा चंडी लारा / रारा जोन्ग्रांग’ या नावाने ओळखले जाते.
हे शिवाचे मंदिर असून त्यात दुर्गा देवीची सुंदर प्रतिमा आहे.
वायांग छायानाट्य -
वायांग हा इंडोनेशियातील छायानाट्याचा खेळ आहे.
हा खेळ विशिष्ट पद्धतीने बनवण्यात आलेल्या कातडी किंवा लाकडी पुतळ्या वापरून केला जातो.
त्यात रामायण व महाभारतातील कथा सादर केल्या जातात.
कलावंतांकडून रंगमंचावर सादर केल्या जाणाऱ्या नृत्यनाट्यालाही वायांग असे म्हणतात.
प्रांबनान मंदिर -
इंडोनेशियात हिंदू विशेषतः शैव संप्रदायाची मंदिरे ही बांधली गेली.
त्यामध्ये प्रांबनान येथील मंदिर समूह खूप महत्त्वाचा मानला जातो.
या समूहातील मंदिरांना जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा देण्यात आलेला आहे.
त्यातील प्रमुख मंदिर ‘चंडी प्रांबनान चंडी लारा/राज जोंग्रांग’ नावाने ओळखले जाते.
मतरामचा राजा दक्ष याने बांधले.
हे मंदिर शिवाचे असून त्यामध्ये दुर्गादेवीची एक सुंदर मूर्ती आहे.
तिला स्थानिक लोक ‘लारा जोंग्रांग’ असे म्हणतात.
बौद्ध तत्त्वज्ञानानुसार विश्वाच्या अस्तित्वाच्या तीन पातळ्या असतात.
कामधातू (इच्छारुपी बंध)
रूपधातु (आकाररूपी आणि कामरूपी बंध)
अरूपधातू (बंधमुक्तता)
बोरोबुदुरच्या स्तूपाची रचना या तीन पातळ्यांच्या संकल्पनेवर आधारलेली आहे.
पहिल्या दोन पातळ्यांवर क्रमाने लहान होत जाणारे चौथरे आहेत.
प्रत्येक चौथऱ्याभोवती शिल्पाकृती असून कोनाड्यांमध्ये बुद्धमूर्ती आहे.
अंतिम पातळीवर तीन वर्तुळाकृती चौथरे आणि त्यांच्या कडेने चाळीदार स्तूप आहेत. त्या स्तूपांच्या आत बुद्धमूर्ती आहेत.
सर्वात शेवटच्या वर्तुळाकृती चौथऱ्यावर भरीव स्तूप आहे.
अत्यंत भव्य असा हा स्तूप इसवीसन ८०० च्या सुमारास बांधला गेला.
अशा रीतीने आपण भारताबाहेरील देशांमध्ये त्या त्या देशातील संस्कृतीच्या घडणीत भारतीय संस्कृतीने महत्त्वाची भूमिका बजावली, याचा इतिहास पाहिला.
बौद्ध धर्माचा प्रसार आणि व्यापार यांच्यामुळे भारतीय संस्कृतीच्या भारताबाहेरच्या प्रसाराला सुरुवात झाली.
त्या इतिहासाने इसवी सनाच्या सुरुवातीपासून मध्ययुगापर्यंतचा कालखंड व्यापलेला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा