इयत्ता १२ वी - प्रकरण ५ - भारत: सामाजिक व धार्मिक सुधारणा

                                 प्रकरण पाचवे     

भारत: सामाजिक व धार्मिक सुधारणा

  

  • इंग्रजी  शिक्षण घेऊन त्या शिक्षणपद्धतीच्या आधारावर येथे उदयाला आलेल्या नवशिक्षित पिढीने सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे काम केले.

  • सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचे अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण असल्याची जाणीव पहिल्या पिढीतील  समाजसुधारकाना होती.

  • यामुळे माझ्या यांच्यापासून सुरू झालेल्या सामाजिक व धार्मिक सुधारणाचा आढावा घेणे  आवश्यक आहे.

  •  सामाजिक व धार्मिक सुधारणा आवश्यकता -

 प्रश्न-  १९ व्या  भारतात समाजसुधारकांनी जनजागृती करण्यास  सुरुवात केली.    (सकारण स्पष्ट करा.)   ३ गुण.

  • ब्रिटिशांच्या राजवटीत राजकीय गुलामगिरी व आर्थिक पिळवणूक सुरू झाली.

  • पण याच बरोबर इंग्रजी भाषा आणि इंग्रजी शिक्षण  हे भारतीयांच्या आधुनिकीकरणास  पोषक ठरले.

  • इंग्रजी शिक्षणामुळे येथील समाजसुधारकांची जगाकडे बघण्याची दृष्टी बदलली.

  • भारतीय समाजातील अंधश्रद्धा, रूढी-परंपरा, जातीभेद, उच्च -निच्च्तेच्या भ्रामक कल्पना, चौकस आणि चिकित्सक वृत्तीचा अभाव यामुळे भारतीय समाज मागे पडला होता.

  • स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि मानवता यावर आधारित नवीन समाजाची निर्मिती करण्याची आवश्यकता समाजसुधारकांना वाटू लागली. 

  • सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अभावी  राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण असते, याची जाणीव नवशिक्षिताना झाली.

  • यामुळे समाज सुधारकांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली. 

  • सुधारणा पर्व -

  • राजा राममोहन रॉय यांचे कार्य -    (टिप लिहा.)

प्रश्न -  राजाराम मोहन राय यांनी भारतात आधुनिकतेची पायाभरणी केली.      (तुमचे मत नोंदवा.)    ३ गुण. 

प्रश्न-  राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या सुधारणांचा  आग्रह धरला होता. (सविस्तर उत्तर लिहा.)   ५ गुण.

  • राजा राममोहन रॉय यांनी भारतात आधुनिकतेची पायाभरणी केली.

  • भारतातील आद्य समाजसुधारक राजा राममोहन राय यांचा जन्म  बंगालमध्ये झाला. 

  • अनेक भाषांचे ज्ञान राजा राममोहन राय यांना होते.  

  • त्यांनी अरेबिक भाषा आणि साहित्याचा अभ्यास केला. 

  • संस्कृत भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवले होते.  

  • याशिवाय सर्व धर्मांचा अभ्यास केला. 

  • भारतीय समाज मागे पडलेला होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता यावर आधारित नवसमाज निर्मिती.

  •  सतीप्रथा -

  • सती प्रथेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता, कारण त्यांच्या वहिनीला सती जावे लागले होते. 

  • वेद,उपनिषदांचा अभ्यास करून उपनिषदांचे बंगाली भाषेत रूपांतर केले.

  • धर्मग्रंथांमध्ये सती जाणे हे धर्मकर्तव्य असल्याचा उल्लेख नाही, हे त्यांनीच सर्वप्रथम सिद्ध केले.

  • १८२९ मध्ये हे सती प्रथा कायद्याने बंद केली.

  • कर्मठांनी  कर्मकांडाचे आणि मूर्ती पूजेचे स्तोम  माजवून मानवतावादी हिंदू धर्म विकृत केलेला आहे. 

  • त्यामुळे लोक धर्मांतर करू लागलेले होते. 

  • त्यामुळे समाजातील दोष, समस्या यांचे निराकरण राजा राममोहन राॅॅय यांना करायचं होते.

  • समाजातील चालीरीती, रूढी, प्रथा-परंपराना त्यांनी विरोध केला होता.

  • समाजप्रबोधन घडवून आणण्यासाठी ‘संवाद कौमुदी’ आणि  ‘मीरात-उल- अखबार’  ही वृत्तपत्र सुरू केली. 

  • ‘प्रेसिडेन्सी कॉलेज’ची स्थापना केली. 

  • भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेवर लेखन केले. तसेच सुधारणा चळवळी ही सुरू केल्या.

  • ब्राम्हो समाज-

  • ब्राम्हो समाजाची स्थापना केल्यानंतर ईश्वर एकच आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही.

  • त्यानंतर मोगल सम्राटाचा  राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. 

  • भारतातून इंग्लंडला  जाणारे ते पहिले भारतीय होते. 

  • त्यांना नवविचारांचा  जनक असे  म्हटले  जाते. 

  • तर त्यांनी सर्वप्रथम ‘ब्रह्मपत्रिका’ नावाचे वृत्तपत्र देखील सुरू केले होते.

  • जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे आणि तो निर्गुण, निराकार, निरंकारी आहे, असं ते मानत होते.

  • इंग्रजी शिक्षण देणारे एक विद्यालय त्यांनी सुरू केले होते. ‘वेदांत कॉलेज’ काढले.

  • हिंदूंच्या अध्यापन आणि  पाश्चात्त्यांची भौतिकविद्या या दोहोंचा समन्वय साधण्याचा प्रयत्न रॉय यांनी केला.

  • आत्मीय सभेच्या माध्यमातून सर्वधर्मामधील समान अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला.

  •  १८२८ पासून ब्राम्हो समाज या नावाने ओळखले जाऊ लागले.समाज स्थापन करण्यामागचा त्यांचा उद्देश होता. तो उद्देश सर्वधर्मियांना एकत्रित करून समाजातील रूढी-परंपरा दूर करणे.

  •  या माध्यमातून त्यांनी सतीप्रथा, बालविवाह, जातिव्यवस्था तसेच इतर सामाजिक रूढी-परंपरा बंद केलेल्या आहे.

  • परंपरांना विरोध करताना नवीन विचार, स्वातंत्र्य यांचा स्वीकार केला आणि समाज सुधारणेचा आग्रह धरला.

  •  राजा राममोहन राय यांच्या नंतर देवेंद्रनाथ ठाकूर यांनी कार्य पुढे नेत सांभाळलेली दिसते.

  • कालांतराने दोघांमध्ये मतभेद झाले. त्यामुळे केशवचंद्र सेन यांनी भारत वर्ष ब्राह्मण समाज स्थापन केली.

  •  राजा राममोहन राय यांचे अन्य कार्य-

  •  दक्षिण अमेरिका खंडातील स्पॅनिश वसाहतीक साम्राज्याविरुद्ध चाललेल्या स्वातंत्र्य चळवळींना देखील पाठिंबा दिलेला आहे.

  •  पक्षाची बाजू मांडण्यासाठी १८३१  मध्ये ते इंग्लंडला गेले होते. 

  • सम्राटाचे राजदूत म्हणून भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते. 

  • राजा मोहनरॉय  यांना नव्या विचारांचा जनक म्हटले गेले.

  •  भारतीय संस्कृतीची ओळख युरोपियनांना करून दिली. 

  • त्यांनी आपल्या लेखनातून आधुनिक विचारसरणीचा पाया घातला. 

  • वृत्तपत्र नियंत्रक कायद्याविरुद्ध आवाज उठवला.

  •  राजा राममोहन रॉय यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन मानवधर्म सभा, परम्हांस सभा आणि ज्ञानप्रसार सभा सुरू झाल्या.

    • धार्मिक सुधारणा चळवळी -

    •  प्रार्थना समाज:         (टीप लिहा)   २ गुण.

    • दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी स्थापन केलेल्या परमहंस  सभेतूनच  पुढे डॉ. आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉ. रा.गो.भांडारकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजाने अनेक जनहिताचे काम केले. 

    • प्रार्थना समाजाची कामे

    1. प्रार्थना समाजाने मूर्तिपूजेला विरोध करून एकेश्वरवादाचा पुरस्कार केला. 

    2. कर्मकांडाला विरोध करून प्रार्थनेवर भर दिला. 

    3. पारमार्थिक जीवनापेक्षा ऐहिक जीवनाला प्राधान्य देणारी कामे प्रार्थना समाजाने केली.

    4. अनाथालय, श्री शिक्षण संस्था आणि कामगारांसाठी रात्र शाळांची स्थापना केली.

    5. जातीभेदाला विरोध केला. स्त्री पुरुष समानतेची चळवळ सुरू केली.

    •  सत्यशोधक समाज-        (टिपा लिहा)    २ गुण.

    •  महात्मा फुले-         (टिपा लिहा)       २ गुण. 

    1. महात्मा ज्योतिराव फुले यांनी १८७३  मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

    2. अन्य धर्माच्या परंपरेवर बौद्धिक आक्रमण करणारा विचार यामागे होता. 

    3. बहुजन समाजाला मिळणाऱ्या प्रवृत्तींवर महात्मा फुले यांनी प्रहार केला. 

    4. शेतकरी, कारागीर, कामगार आणि अठरापगड जातीचे भले साधण्याचा मार्ग महात्मा फुले यांनी दाखवला. 

    • सत्यशोधक समाजाने पुढील विचारसरणीचा पुरस्कार केला--

    1.   एकेश्वरवाद व मूर्तीपूजेला विरोध. 

    2. वेद व पुराणांचे प्रामाण्य नाकारले. 

    3. विवेचक बुद्धिप्रामाण्यला प्राधान्य दिले. 

    4. पुरोहितांच्या वर्चस्वाला आणि मध्यस्थीला विरोध केला. 

    5. मूर्तिपूजेला विरोध केला चमत्कारांवर विश्वास आणि तीर्थयात्रेला विरोध.

    6. परलोक कल्पनेला विरोध.

    7.  महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याला सुरुवात केली. 

    8. स्त्री स्वातंत्र्याचा मार्ग  स्त्रियांच्या शिक्षणातून जातो, याची जाणीव या दोघांनी समाजाला करून दिली.

    9. त्यांचे हे  स्त्री शिक्षणाचे कार्य पुढे पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे यांनी चालविले.

    •  गोपाळ बाबा वलंगकर-

    • Q महात्मा फुले यांचे समतेचे कार्य गोपाळबाबा वलंगकर यांनी पुढे चालवले. 

    • कारण भारतातील समाजरचना विषमतेवर आधारित होती. 

    • गोपाळबाबा वलंगकर  यांनी विराट विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेवर  कोरडे ओढले.

    • शिवराम जानबा कांबळे-

    •  शिवराम जानबा कांबळे यांनी  मुरळी, जोगतीन देवदासी यांच्या प्रश्‍नांकडे समाजाचे लक्ष वेधले.

    •  आर्य समाज-       (टीप लिहा)      २ गुण.

    • १८७५  मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. 

    • आर्य समाजाचे कार्य- 

    1.  आर्य समाजाने वेदांना पवित्र ग्रंथ मानले. 

    2. जातीभेद अमान्य केला. 

    3. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार  केला. 

    4. विधवा पुनर्विवाह, मिश्र विवाह यांचाही आर्य समाजाने  पुरस्कार केला.

    •  रामकृष्ण मिशन-         (टीप लिहा)   २ गुण.

    •  प्रश्न - रामकृष्ण मिशनने केलेले कार्य लिहा. 

    • स्वामी विवेकानंदांनी इसवी सन  १८९७ मध्ये रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली.

    • लोकसेवेला प्राधान्य देऊन रामकृष्ण मिशनने केलेले कार्य  पुढील प्रमाणे- 

    1. दुष्काळग्रस्तांना मदत केली. 

    2. आजारी लोकांना औषधोपचाराची सुविधा दिली.

    3. समाजातील दीनदुबळ्यांची सेवा केली. 

    4. स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार करून स्त्री-शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या. 

    5. स्त्री-शिक्षणाचा आग्रह धरला. 

    6. अध्यात्मिक उन्नतीला महत्व देऊन समाजाला आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला.

    7. ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका’ हा संदेश स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनद्वारे तरुणांना दिला. 

    8. अशारितीने आत्मिक उन्नती, स्त्री शिक्षण, दीनदुबळ्यांचा उद्धार  अशा विविध प्रकारच्या कामातून रामकृष्ण मिशनने समाज उपयोगी कामे केली केली.

    9.  समाजसुधारकांचे कार्य:

    10. सर सय्यद अहमद खान- 

    प्रश्न-सर सय्यद अहमद खान यांनी केलेले कार्य लिहा.     ५  गुण.

    • १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात सामाजिक प्रबोधनाला सुरुवात झाली होती.समाजसुधारक सामाजिक सुधारणांचे कार्य करत होते. अशाच पद्धतीने मुस्लीम समाजात सर सय्यद अहमद खान यांनी सामाजिक सुधारणेचे कार्य हाती घेतले त्यांच्या कार्याचा आढावा पुढील प्रमाणे-

    • सर सय्यद अहमद खान यांचा जन्म १८१७ मध्ये  दिल्ली येथे झाला. 

    •  त्यांचे उर्दू, पर्शियन, अरेबिक आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. 

    • इ.स. १८५७  च्या उठावात इंग्रजांशी एकनिष्ठ होते. 

    • ‘आईन -ए- अकबरी’ या ग्रंथाचे संपादन केले.हा  ग्रंथ अबुल फजल याने सम्राट अकबराच्या प्रशासन पद्धतीवर  लिहिलेला आहे.

    • १८६४ मध्ये त्यांनी मुस्लिमांसाठी ‘सायंटिफिक सोसायटी’ स्थापन केली. 

    • या सोसायटीचे सदस्य इतिहास, विज्ञान आणि राजकीय अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास करत. 

    • मुस्लिम बांधवांमध्ये शिक्षणाचा प्रसार केला.

    • त्यासाठी गाजीपुर येथे इंग्रजी शाळेची स्थापना केली.

    • १८६९ ते  इंग्लंडला गेले. इंग्लंडहून परत आल्यावर त्यांनी १८७५ मध्ये ‘मुहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज’ ची स्थापना केली.

    • ‘अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटी’ अलिगड चळवळीचे केंद्र बनले. 

    • सर सय्यद अहमद खान यांनी उर्दूमध्ये लेखन केले. 

    • त्यांनी ‘मोहम्मदन सोशल रिफॉर्मर’ हे नियतकालिक सुरु केले. 

    • आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला.

    •  ताराबाई शिंदे -

     प्रश्न- पुरुष सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या ताराबाई शिंदे भारतातील पहिल्या विचारवंत  होत्या.         (तुमचे मत नोंदवा)

    •  ताराबाई शिंदे यांचा जन्म १८३९  मध्ये झाला.

    • त्यांनी स्त्री-पुरुषांच्या परिस्थितीची तुलना करणारा निबंध लिहिला. 

    • महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी होत्या.

    • १८८२  साली प्रसिद्ध झालेल्या ‘स्त्री- पुरुष तुलना’ या पुस्तकाच्या लेखिका होत्या.

    • ताराबाई या बुलढाणा येथील रहिवासी होत्या.

    • त्यांचे वडील बापूजी हरी शिंदे हे एक जमीनदार होते. सत्यशोधक समाजाचे सभासद होते.

    •  ताराबाईंचा भाऊ रामचंद्र हे जोतिबांच्या कंपनीत भागीदार होते. त्यामुळे ताराबाईंच्या घरात सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे वातावरण होते. 

    • अशातच शिक्षणाने त्यांचे व्यक्तिमत्व देखिल विकसित झालेले होते. 

    • ताराबाई मराठी,संस्कृत, इंग्रजी या भाषा शिकल्या होत्या. शिक्षणामुळे त्यांना वाचनाची गोडी लागली होती.

    • ताराबाईंनी  ‘स्त्री-पुरुष तुलना’ या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला.

    •  स्त्री असून देखील त्या घोडा चालवायला शिकल्या. ताराबाई शेतीच्या कामात लक्ष घालत आणि कोर्टाचीही कामे करत. 

    • ताराबाई स्वभावाने तापट होत्या. ताराबाईंना लग्न करण्याची इच्छा नव्हती.

    • पण १९ व्या शतकात मराठा समाजातील शेतकरी कुटुंबातील स्त्रीला लग्न न करता जीवन जगणे शक्य नव्हते.

    •  इतकेच नाही तर विवाहसुद्धा वडील माणसांच्या सांगण्यानुसार करावा लागे.

    • ताराबाईंचे लग्न एका सर्वसामान्य माणसाबरोबर झाले. परंतु त्यांचा संसार सुखाचा झाला नाही. मुलं होऊनही त्या संसारात रमल्या नाही. 

    • विधवा विवाह, स्त्री शिक्षण, सती प्रथा बंदी या सुधारणांच्या पुढे जाऊन ताराबाईंनी थेट स्त्री-पुरुष समानतेची मागणी केली. 

    • त्या काळाचा विचार करता हे अत्यंत धाडसाचे होते. आपल्या पुस्तकामध्ये  विधवा विवाहाला उच्चवर्णीयांनी केलेली मनाई, स्त्रीचे हाल, शिक्षण नसल्याने तिची होणारी कुचंबना या गोष्टी  ताराबाई भोवतालच्या परिस्थितीत बघत होत्या.

    • रूढी-परंपरा,संस्कृतीने स्त्रियांना कुटुंबात दिलेले गौण स्थान, सर्व बंधने स्त्रीवर घालण्याची पद्धत, पुरुषांना गरजेपेक्षा जास्त दिलेले महत्त्व या गोष्टी ताराबाईंना पटत नव्हत्या. 

    • त्या काळात घडलेल्या महत्त्वाच्या घटनेने त्यांना प्रेरणा मिळाली. 

    • ही घटना म्हणजे एका तरुण विधवेवर खटला भरला होता. तिला शिक्षा झाली होती. या खटल्याविषयी ताराबाईंनी वर्तमानपत्रातून वाचले. 

    • एका स्त्रीची केशवपनासारख्या दुष्ट रूढी तसेच पुरुषांना अनेक लग्न करण्याची असलेली मुभा ,परवानगी या सर्व प्रश्नांवर टीका केलेली दिसते. 

    • पुरुष सत्तेला थेट आव्हान देणार्‍या त्या भारतातील पहिल्या महिला विचारवंत होत.

    • महाराष्ट्रातील स्त्री समाजसुधारक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात  त्यांनी योगदान दिले. 

    • महात्मा फुले यांनी ताराबाईंच्या विचारांचे समर्थन करून ताराबाई शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले. 

    • ताराबाईंनी स्त्रियांच्या शोषणाविरोधात दिलेला लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेला चालना देणारा होता.ताराबाईच्या दृष्टीने धर्म स्त्रियांचे दमन करणारा आहे.  स्त्रियांचे अधिकार नाकारणारा आहे. धर्म पुरुषांनी निर्माण केलेला आहे.  

    • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे -     (टिप लिहा)

    • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म इसवी सन १९७३  मध्ये कर्नाटकातील ‘जमखिंडी’ या गावी झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण  जमखिंडी येथेच झाले.

    • त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला आले आणि तेथे त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली. पदवी संपादन केल्यानंतर ते मुंबईला आले.

    •  पुढे प्रार्थना समाजाच्या सहाय्यामुळे त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली.

    •  इंग्लंडहून मायदेशी परतत असताना त्यांनी एमस्टर डॅम येथे भरलेल्या उदार धर्मपरिषदेत त्यांनी भाग घेतला आणि त्या ठिकाणी हिंदुस्थानातील ‘उदार धर्म’ या विषयावरील प्रबंध वाचला.

    •  महर्षी शिंदे यांनी इंग्लंडहून परत आल्यानंतर सर्व प्रकारचे मानमरातब व उच्च अधिक अधिकाराच्या जागा नाकारून प्रार्थना समाजाच्या कार्याला वाहून घेतले. 

    • आपला समाज रूढी-परंपरांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि धर्माची अंधश्रद्धा, भोळ्या  समजुती व कर्मकांड यापासून सुटका करण्यासाठी प्रार्थना व ब्राम्हो समाज यांच्या तत्वांचा लोकांमध्ये प्रसार होण्याची गरज आहे, असे त्यांचे मत होते. 

    • त्याकरिता त्यांनी देशभर दौरे काढले आणि देशातील अनेक शहरात एकेश्वरी धर्मपरिषदा घेतल्या.

    • अस्पृश्योद्धाराचे  कार्य-

    •  महर्षी शिंदे यांनी अस्पृश्य जातीच्या उत्तरासाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे.

    •  अस्पृश्य बांधवांना भोगाव्या लागणाऱ्या यातना पाहून त्यांच्या अंतःकरण पिळवटून निघाले.

    • आपल्या या दुर्दैवी बांधवांच्या उद्धारासाठी कार्य करण्याचा त्यांनी निश्चय केला.

    •  त्याचे मूर्त स्वरूप  म्हणजेच इसवी सन १९०६   मध्ये स्थापन केलेले ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ ही संस्था होय.

    • या मिशनच्या माध्यमातून मुंबईत परळ, देवनार या भागात तसेच पुणे येथे मराठी शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या उद्योग शाळा सुरू केल्या.  

    • तसेच पुण्यातील पर्वतीचा मंदिर प्रवेश सत्याग्रह घडवून आणला.

    •  ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’च्या वतीने महर्षी शिंदे यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. 

    • त्यामध्ये  अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा सुरु करणे, त्यांचे शिवण कामाचे वर्ग चालवणे,  त्यांच्या प्रबोधनासाठी व्याख्याने कीर्तने आयोजित करणे, लोकांची सुश्रुषा करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होता.

    • त्याच्या शाखा अनेक गावात  उघडल्या.या कार्यात  त्यांची बहीण जनाक्का शिंदे यांनीही भाग घेतला होता. 

    • महर्षी शिंदे यांनी देशभर दौरे  आखून समाजजागृती घडवून आणली. समाजातील अनिष्ट चालीरीती,  रूढी नष्ट व्हाव्यात,  लोक व्यसनापासून दूर रहावेत, स्त्री शिक्षणाचा  प्रसार व्हावा याकरिता  ही त्यांनी प्रयत्न केले.

    •  ‘आधुनिक काळातील महान कलीपुरुष’  असा द्वारकापीठाचे शंकराचार्य यांनी त्यांचा निषेध केला होता. 

    • एका अर्थाने ही त्यांच्या पुरोगामित्वाचीच पावती होय. 

    • शेतकरी परिषदांचे आयोजन--

    •  इंग्रजी राज्यात शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत हलाखीची बनली होती. 

    • शेतकऱ्यांच्या या स्थितीत सुधारणा व्हावी म्हणून महर्षी शिंदे यांनी शेतकऱ्यांना संघटित करून त्यांच्यात जागृती घडवून आणण्याचे प्रयत्न केले. 

    • त्याकरिता त्यांनी अनेक ठिकाणी शेतकरी परिषदा आयोजित केल्या. 

    • संयुक्त मतदारसंघ योजना यासंदर्भात त्यांनी जनजागर जागरण केले. 

    • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपले संपूर्ण जीवनच समाजसेवेसाठी वाहिले होते.

    • कोणत्याही फळाची अपेक्षा न बाळगता आपल्या अंगीकृत कार्य त्यांनी अखेरपर्यंत निग्रहाने चालविले. 

    • म्हणूनच भाई माधवराव बागल  त्यांना ‘उपेक्षित राहिलेले निष्काम कर्मयोगी’  असे म्हणतात.

    •  डॉ.  बाबासाहेब आंबेडकर :

    •  दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

    •   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती लिहा.      ५ गुण.

    •  मुद्दे -   अ. दलितोद्धाराचे  कार्य -       ब. वृत्तपत्रीय कार्य.        क. संस्थात्मक कार्य. 

    •  दलितोद्धाराचे  कार्य -

    •  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांवर समाजउभारणी करण्याचे ठरवले.

    • अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला विद्याभ्यासात सतत रममान होणारा विद्वान, प्रख्यात कायदेपंडित, भारतीय घटनेचे शिल्पकार त्वचा वेगवेगळ्या नात्यांनी ते भारतीय जनतेला परिचित आहेत.

    •  जातीसंस्थेला विरोध आणि समतेला प्राधान्य देणारा लढा त्यांनी उभारला.

    •  बाबासाहेब १९०७  मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९१२ मध्ये ते बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

    •  त्यानंतर १९१३  मध्ये उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. त्याकरिता त्यांना बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी आर्थिक सहाय्य केले. 

    • १९१५  मध्ये त्यांनी  एम.ए. ची पदवी संपादन केली.

    •  काही काळ त्यांनी बडोदा संस्थानांमध्ये नोकरी केली. ते सार्वजनिक कार्यात भाग घेऊ लागले. 

    • १९२४ मध्ये त्यांनी ‘बहिष्कृत हितकारणी सभा’ या संस्थेची स्थापना केली.

    • या सभेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी समाजाला ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ असा संदेश दिला.

    • यातूनच पुढे महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. सार्वजनिक पाणवठे सर्वांना खुले असले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. 

    • मनुस्मृती’ हिंदू धर्मग्रंथाने जन्माधिष्ठित वर्णव्यवस्थेचे समर्थन करून पर्यायाने सामाजिक विषमतेला व त्यावर आधारित जातिव्यवस्थेला आधार प्राप्त करून दिला होता. 

    • तेव्हा समाज सामाजिक विषमता आणि उच्च-नीच भेदभाव यांचे समर्थन करणाऱ्या या ग्रंथाचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी त्यांनी २५ डिसेंबर १९२७  रोजी मनुस्मृतीचे जाहीररीत्या दहन केले.

    •  नंतरच्या काळात नाशिकच्या काळाराम मंदिरात सर्वांना मुक्त प्रवेश मिळावा, यासाठी त्यांनी १९३०  मध्ये सत्याग्रह सुरू केला. 

    • या सत्याग्रहाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले होते. 

    • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक’, बहिष्कृत भारत’, जनता’, आणि समता’, ही वृत्तपत्रे सुरू केली.

    • वृत्तपत्रे आणि बाबासाहेब यांचे अतूट नाते होते. त्या माध्यमातून त्यांना समाजात जनजागृती घडवून आणायची होती.

    • वर्तमानपत्राकडे चळवळीचे एक हत्यार म्हणून त्यांनी पाहिले. म्हणून डॉ. आंबेडकर यांनी वृत्तपत्रे सुरू केली होती.

    •  कष्टकरी वर्गाला उज्वल भवितव्य  लाभावे म्हणून त्यांनी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’  स्थापन केला.

    • त्यानंतर ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ हा पक्ष स्थापन करून समतेवर आधारित समाजरचना निर्माण करण्यावर भर दिला.

    •  डॉ. बाबासाहेबांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी निर्माण केलेले भारतीय संविधान होय.

    • रामस्वामी नायकर -

    • तामिळनाडूतील ‘एरोड’ या शहरात १८७९ मध्ये रामस्वामी नायकर यांचा जन्म झाला. 

    • 1920 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून आपल्या कार्याला सुरुवात केली.

    •  प्रभावी वक्ते, लेखक आणि गांधीवादी विचारसरणीच्या रामस्वामी नायकर यांना त्यांच्या समाजोपयोगी कार्यामुळे लोक  ‘पेरियार’ म्हणजेच महान आत्मा म्हणून ओळखू लागले होते.

    •  रामस्वामी नायकर हे विज्ञान, बोध आणि तर्क विषयाचे क्रांतिकारी विचारक होते. 

    • त्यांनी समाजातील अस्पृश्य पीडित व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा आणि समान अधिकार मिळविण्याचा मार्ग दाखवला. 

    • पेरियार एकमेव असे क्रांतिकारक होते की, त्यांनी दक्षिण भारतातील राजकारणामधून ब्राह्मणवादाला सुरुंग लावला आणि समाजव्यवस्था बळकट केली. 

    • तामिळनाडू राज्यात आज देखील  रामस्वामी  नायकर यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. 

    • गांधी विचारसरणीचा स्वीकार करू आणि स्वदेशीचा प्रसार आणि सर्व जातींना मंदिर प्रवेश यासाठी ते सुरुवातीला कार्यरत होते. 

    • पेरियार हे दक्षिणेतील महात्मा ज्योतिबा फुले होते.

    •  वायकोम सत्याग्रह -

    • वायकोम सत्याग्रहामध्ये त्यांनी भाग घेतला होता. तामिळनाडूमध्ये त्यांनी  स्वाभिमान आंदोलन सुरू केले.

    • केरळ आणि उर्वरित भारतातील प्रचलित  जातिव्यवस्थेनुसार, जीवनसाथीच्या हिंदूंना मंदिरात प्रवेश नाकारला गेला. 

    • केरळमध्ये त्यांना मंदिरांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर चालण्याची परवानगी नाकारण्यात आली.

    • जाती-धर्माची पर्वा न करता प्रत्येक हिंदूंसाठी सार्वजनिक रस्ते वापरण्याचा अधिकारही त्यांनी घेतला.

    •  त्यानंतर केरळ राज्यातील त्रावणकोरमधील छोटेसे शहर  वैकोममध्ये मंदिर परिसरात व त्याच्या आसपास अस्पृश्यतेचे कठोर कायदे होते.

    •  त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना मंदिरात प्रवेश मिळावा, या उद्देशाने यापूर्वीच एक चळवळ सुरू झाली होती. 

    • ज्यामध्ये पेरियार आणि त्यांची पत्नी दोघेही सहभागी झाले होते.

    •  वर्णव्यवस्था, बालविवाह यांच्या विरोधात देखील त्यांनी लढा उभारला. त्यांनी स्त्रियांचे हक्क, संततीनियमन या विषयांवर क्रांतीकारक भूमिका घेतली. 

    • कमलादेवी चट्टोपाध्याय :

    •  कमलादेवी या एक सुप्रसिद्ध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. 

    • त्यांचा जन्म मंगलोर येथे झाला. त्या बाल विधवा होत्या.कमलादेवी चट्टोपाध्याय काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. 

    • 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांना भाग घ्यायला परवानगी द्यावी, यासाठी त्यांनी महात्मा गांधीजींचे मन वळवले होते. 

    • कमलादेवी यांनी स्त्रियांच्या हक्कांच्या संदर्भात जन्मभर काम केले. कमलादेवी यांनी स्वतः हरीन्‍द्द्रनाथ चटोपाध्याय यांच्या बरोबर पुनर्विवाह केला. 

    • त्यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये बेडफर्ड कॉलेज आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे झाले. त्याच सुमारास महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील असहकारितेच्या चळवळीत भाग घेण्यासाठी त्या भारतात परत आल्या. 

    • त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक वेळा धडाडीने भाग घेतला आणि तुरुंगवासही भोगला. 

    • मिठाच्या सत्याग्रहातही त्यांनी भाग घेतला होता.  युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

    •  शेतीविषयक प्रश्नांसंबंधी त्यांना विशेष आस्था होती. काँग्रेस पक्षाच्या सदस्य होत्या.

    • कामगार, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलने केली. शेतात काम करणाऱ्या स्त्री मजुरांना न्याय्य वागणूक मिळावी, यासाठी त्या  आग्रही होत्या.

    •  ‘ऑल इंडिया विमेंस कॉन्फरन्स’  ही स्त्रियांची संघटना त्यांच्या प्रयत्नातून साकार झाली.

    • कारखान्यामध्ये स्त्रियांसाठी कामाचे चांगले वातावरण असावे, असाही आग्रह त्यांनी धरला होता.

    •  स्त्रियांना बाळंतपणाची पगारी रजा मिळावी, यासाठी देखील त्यांनी पाठपुरावा केला होता.

    • १९४२ च्या चले जाव’ चळवळीत इंग्रजांनी त्यांना वर्षभर तुरुंगात ठेवले होते.

    •  भारतीय नाट्यकलेत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग केले होते. 

    • भारतीय रंगभूमीवर काम करणाऱ्या त्या पहिल्या सुशिक्षित व प्रतिष्ठित महिला होत्या.

    • भारतीय कलाकुसरीच्या वस्तू कौशल्याच्या अवनत स्थितीतील कलांना उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी बरीच परिश्रम घेतले.

    • त्यांचा ‘हंडीकॅप ऑफ इंडिया’ हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. सार्वजनिक जीवनात अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली.

    •  तसेच इतरही क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.अनेक पुरस्कार आणि मान कमलादेवी चटोपाध्याय यांना लाभलेले आहे. 

    •  काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या, मिठाच्या सत्याग्रहात सहभाग, स्त्रियांच्या हक्कांसाठी कार्य,  १९४२  चले जाव चळवळीत सहभाग व तुरुंगवास, कामगार- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलने करणाऱ्या  तसेच  स्त्रि मजुरांना न्याय वागणूक मिळावी आणि स्त्रियांना कारखान्यात काम करण्यासाठी योग्य वातावरण मिळावे, इतकेच नाही तर स्त्रियांना बाळंतपणाची पगारी रजा मिळावी, म्हणून प्रयत्नशील असणाऱ्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा मृत्यू २९ ऑक्टोबर १९८८  रोजी मुंबई येथे झाला.

    •  संस्थानिकांचे योगदान -

    •  महाराजा सयाजीराव  गायकवाड -

    •    सयाजीराव यांचा जन्म इसवीसन  १८६३  मध्ये झाला.  त्यांचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील कवळाने हे होय आहे.

    •  बडोदा संस्थानचे राजे खंडेराव गायकवाड यांचा १८७०  मध्ये मृत्यू झाला. 

    • त्यांना औरस पुत्र नसल्यामुळे त्यांच्या पत्नीने जमनावहिनी १८७५  मध्ये गवळण याचे काशीराव गायकवाड यांचा मुलगा गोपाळराव यास दत्तक घेतले आणि त्याचे नाव सयाजीराव असे ठेवले. 

    • अशाप्रकारे सयाजीराव बडोदा संस्थानचे राजे बनले. सयाजीरावांनी आपल्या सत्तेचा वापर नेहमी प्रजेच्या हितासाठी केला. 

    • आपल्या कारकिर्दीत त्यांनी बडोदा संस्थानात अनेक सुधारणा घडवून आणल्या.

    •  एक प्रजाहितदक्ष राजा असा लौकिक त्यांनी संपादन केला होता.

    •  शैक्षणिक कार्य  

    • बडोदा संस्थानांमध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी पुरोगामी धोरण आखले होते.

    • सयाजीरावांनी बहुजन समाज व मागासलेले वर्ग यांच्यामध्ये शिक्षणप्रसार घडवून आणण्यास प्राधान्य दिले.

    •  त्यासाठी त्यांनी आपल्या बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. 

    • प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान बडोदा संस्थानाने मिळवला. 

    • सयाजीरावांनी आपल्यास अस्पृश्यांसाठी ही शाळा सुरू केल्या होत्या. 

    • तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अनेक वसतीगृहे उघडली होती. शालेय मुलामुलींना शारीरिक शिक्षण सक्तीचे केले. 

    •  स्त्री शिक्षणात प्रोत्साहन आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायाम शाळा त्यांनी सुरू केली.

    • ज्ञानप्रसार घडवून आणण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात गावोगावी वाचनालये उघडली. त्याच्या जोडीला फिरती वाचनालयही सुरू केली. 

    • अनेक गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या. त्याचा लाभ महर्षी शिंदे डॉक्टर आंबेडकर या सारख्या मान्यवर व्यक्तींना देखील  झाला.

    • सामाजिक सुधारणा -

    •  सयाजीराव गायकवाडांनी सामाजिक प्रश्नकडेही लक्ष दिले होते. समाजसुधारणेची कट्टर पुरस्कर्ते होते. 

    • घटस्फोटाचा कायदा करून तो अमलात आणणारे बडोदा हे भारतातील पहिले राज्य होते. अस्पृश्यता निवारण विधवा विवाह, मिश्र विवाह या संबंधीचे कायदे हे त्यांनी आपल्या संस्थांमध्ये केले होते. 

    • पडदा पद्धत बंदी, बालविवाह बंदी  यासारख्या सुधारणा केल्या. 

    • शेतकऱ्यांच्या हितासाठी  अनेक गोष्ट केल्या होत्या. 

    • याखेरीज अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली होती.

    • आपल्या संस्थानात सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानामध्ये केलेल्या या सुधारणा पाहता ते एक कर्तृत्ववान ,प्रजाहित दक्ष व पुरोगामी विचारांचे  राजे होते, असे म्हणावे लागेल. 

    •  पंडित मदन मोहन मालवीय त्यांनी हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दात सयाजीरावांचा गौरव केला आहे.

    • राजर्षी शाहू महाराज -

    •   राजश्री शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे अधिपती होते. 

    • त्यांचा जन्म कागलच्या घाटगे घराण्यात इसवी सन 1874 मध्ये झाला. 

    • कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी यांचा अहमदनगर येथे इंग्रजांच्या कैदेत असताना मृत्यू झाला. 

    • त्यांना औरस पुत्र नसल्याने त्यांच्या पत्नी आनंदीबाई साहेब यांनी कागलचा घाटगे घराण्यातील जयसिंगराव घाटगे यांचा थोरला मुलगा यशवंतराव यास 884 मध्ये दत्तक घेतले. 

    • दत्तक विधानानंतर यशवंतरावांचे नाव शाहू असे ठेवण्यात  आले.

    • 1894  मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर राज्याची अधिकार सूत्रे आपल्या हाती घेतली.

    •  शाहू महाराज यांची कारकीर्द अनेक बाबतीत उल्लेखनीय ठरले. 

    • आपल्या सत्तेचा वापर त्यांनी लोककल्याणासाठी केला. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर संस्थानामध्ये अनेक सुधारणा घडून आल्या. 

    • त्यांनी पुरोगामी विचारांचा पाठपुरावा करून समाजसुधारणेच्या कार्याला चालना दिली.

    • राजश्री शाहू महाराज यांचे सर्वात महत्वपूर्ण कामगिरी म्हणजे महात्मा फुले यांच्यानंतर निष्प्राण होत चाललेल्या ब्राह्मणेतर चळवळीला त्यांनी संजीवनी देऊन तिच्यात नवचैतन्य निर्माण केले. 

    • महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीचे ते मार्गदर्शक, नेते व   स्फूर्तीदाते बनले. सामाजिक विषमता दूर करून बहुजन समाजाला न्याय मिळवून  दिला. 

    • शाहू महाराज हे सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील महात्मा फुले यांचे खरीखुरी वारसदार होते.

    • शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षणाचा जाहिरनामा काढला.

    • त्यांच्या प्रेरणेने 1911 मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना झाली.

    • तसेच त्यांच्या आश्रयाने कोल्हापूरमध्ये 1918 आली आहे समाजाची शाखा सुरू  झाली.

    •  शैक्षणिक कार्य

    •  बहुजन समाजात शिक्षण प्रसार घडवून आणण्याच्या दृष्टीने शाहू महाराजांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. 

    • त्यांनी आपल्या राज्यात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला.

    • रोटीबंदी-बेटीबंदी आणि व्यवसायबंदीवर टीका केली. 

    • आंतरजातीय विवाह कायदा केला, तसेच विधवा पुनर्विवाहाचा कायदा, बहुजन समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये ५०  टक्के जागा  राखीव ठेवण्यास संबंधीचा कायदा यासारखे पुरोगामी स्वरूपाची कायदे केले. 

    • व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आली.कोल्हापूरमध्ये निरनिराळ्या जातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. 

    • तसेच बहुजन समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिष्यवृत्ती देण्याचे धोरण  आखले. 

    •  सामाजिक विषमता व अन्यायाविरुद्ध त्यांनी सतत संघर्ष केला.  

    • आपल्या राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी श्रावणी आणि गोष्टी केल्या. 

    • शाहू महाराजांच्या राज्यकारभार विषयक सुधारणांची व्यक्ती त्यांच्या छोट्याशा संस्थांना पुरतीच मर्यादित होती. 

    • परंतु या सुधारणा इतक्या मूलगामी स्वरूप एका सामाजिक क्रांतीने जन्म घेतला आणि ही क्रांती पावली तर संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून राहिली. 

    • महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीचा वारसा खर्‍याअर्थाने शाहू महाराजांनी पुढे  चालवला.

    •  या सगळ्या समाजसुधारकांनी भविष्यातला देश आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला होता. 

    • स्वातंत्र्य चळवळीसाठी लढणारा डोळस समाज निर्माण करायचा असेल तर विचारशील नागरिक तयार करणे आवश्यक असते, या दृष्टिकोनातूनच  भारतातील, महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी पोषक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातून केलेला दिसतो. 

    • त्यामुळे नंतरच्या काळात भारतीयांनी युरोपियन वसाहतवादाविरुद्ध यशस्वी लढा देऊन भारताला पारतंत्र्यातून मुक्त केल. 



टिप्पण्या