# गुप्त काळाला भारतातील सुवर्णकाळ असे का म्हणतात?

मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर खूपच अराजकता माजली होती. लहान-मोठ्या राज्यांचा सुळसुळाट झालेला होता. त्यामुळे भारतातील अंतर्गत शांतता व सुव्यवस्था पार बिघडून गेली होती.
अशा बेबंदशाहीतून व विपन्नावस्थेतून भारतीयांना वर काढण्याचे काम व संपूर्ण भारतात एकछत्री अंमल प्रस्थापित करून शांतता सुव्यवस्था निर्माण करण्याचे काम गुप्त राज्यकर्त्यांनी केले.
संपूर्ण भारताची अध्यात्मिक व आदिभौतिक प्रगती घडवून, वैदिक धर्माचे पुनरूज्जीवन घडवून आणले. भारतीय व्यापार विश्वव्यापी करून भारताची आर्थिक प्रगती घडवून आणली. भारतीय कला, साहित्य, व विज्ञान यांना उत्तेजन देऊन भारताची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय अशी सर्वांगीण प्रगती घडवून आणली, खरच गुप्तांनी भारतात 'सुवर्णयुग' निर्माण केले. गुप्तांची कालखंड 'वैभवशाली कालखंड' म्हणून ओळखला जातो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा