इयत्ता ११ वी, प्रकरण ११ वे.

                              ११.   दक्षिण भारतातील राजसत्ता

  • प्रस्तावना --

  • प्राचीन काळात दक्षिण भारतात चोळ, पांड्य  व चेर ही महत्त्वाची राजघराणी होती. 

  • चोळ घराण्याच्या अधिपत्याखाली तंजावर आणि तिरुच्चिराप्पल्ली हे तामिळ प्रदेशातील राज्य होते.

  • तर पांड्य  घराण्याच्या अधिपत्याखाली पुदुकोट्टईपासून कन्याकुमारीपर्यंतचा प्रदेश होता. 

  • चेर घराण्याच्या अधिपत्याखाली केरळ होते.

  •  राज्यव्यवस्था आणि व्यापार यांची माहिती आपण या पाठांमध्ये करून घेणार आहोत.

प्रश्न-   चोळ राजवंशाची माहिती लिहा.

  • इ.स.च्या पहिल्या शतकात तामिळ प्रदेशातील तंजावर व तिरुचिरापल्ली या भागात चोळ राजवंश उदयाला आला.

  • चोळांंच्या अधिपत्त्याखालील प्रदेश ‘चोळमंडळ’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

  • चोळांचा पहिला राजा करीकाल याने चेर व  पांड्य राजांचा पराभव करून तमिळ अधिसत्ता निर्माण केली.

प्रश्न -   पांड्य  राजवंशाची माहिती लिहा.

  • दक्षिण भारतात पुदुकोट्टैपासून कन्याकुमारीपर्यंत पांड्य घराण्याची सत्ता होती.

  • राजकीय वर्चस्वासाठी पांड्य राजे चोळ राजांशी सतत संघर्ष करीत असत. 

  • चोर राजा करीकाल याने  पांड्यांचा पराभव करून तमीळ अधिसत्ता निर्माण  केली.

प्रश्न - चेर राज्याची माहिती लिहा.

  • दक्षिण भारतातील केरळ प्रदेशात चेरांचे राज्य निर्माण झाले. 

  • त्या राज्याचा उल्लेख ‘केंडलपुतो’ म्हणजे ‘केरळपुत्र’ असा करण्यात येतो.

  •  राजकीय वर्चस्वासाठी त्यांनी चोळ, पांड्य राजांशी सतत संघर्ष केला. 

  • चोळ राजा करीकालने चेरांचा पराभव करून तमिळ अधिसत्ता निर्माण  केली.

  • त्रिपक्षीय संघर्ष

  • दक्षिण भारतातील चोळ, पांड्य, चेर राजसत्ता राजकीय वर्चस्वासाठी कायम एकमेकांशी संघर्ष करीत राहिल्या. त्यांच्यातील संघर्ष ‘त्रिपक्षीय संघर्ष’ म्हणून प्रसिद्ध आहे.

  • यानंतर कृष्णा, तुंगभद्रा या नद्यांच्या उत्तरेला देखील काही राज्यांचा उदय झाला.

                यात प्रामुख्याने सातवाहनांची सत्ता होती.

  • वाकाटक घराणे

  • वाकाटक घराण्याची स्वतंत्र राजसत्ता प्रस्थापित झाली कारण सातवाहन सत्ता झाली होती.

  • सातवाहन सत्ता इसवी सनाच्या तिसर्‍या शतकापासून  क्षीण  होण्यास सुरुवात झाली होती.

  •  त्याचा फायदा घेऊन स्वतंत्र राजसत्ता प्रस्थापित करणाऱ्यांमध्ये वाकाटक घराणे महत्त्वाचे होते. 

  • वाकाटक घराण्याची स्थापना विंध्यशक्तीने केली. विंध्यशक्तीनंतर प्रवरसेन हा राजा गादीवर आला.

  •  त्याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार उत्तरेला माळवा आणि गुजरातपासून दक्षिणेला कोल्हापूर, कर्नूल (आंध्र प्रदेश) पर्यंत केला होता.

  •  कोल्हापूरचे त्या काळातील नाव ‘कुंतल’ असे होते. 

  • प्रवरसेनाने चार अश्‍वमेध यज्ञ केले आणि सम्राट ही पदवी धारण केली.

  •  वाकाटक घराण्यातील प्रसिद्ध राजा प्रवरसेन हा होता.

  • वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन यांनी ‘सेतुबंध’ ह्या महाराष्ट्री प्राकृत भाषेतील रचना केली.

  •  वाकाटक काळातच कालिदासाने मेघदूत हे काव्य विदर्भातील ‘रामटेक’ या ठिकाणी रचले.

  • प्रश्न-  वाकाटक साम्राज्याच्या विभाजन झाले.      (सकारण स्पष्ट करा.)        किंवा

  • प्रश्न - वाकाटक राज्याच्या विभाजनाची माहिती लिहा.

  • राजा पहिला प्रवरसेन  याच्या मृत्यूनंतर त्याच्या साम्राज्याची विभागणी गौतमीपुत्र व सर्वसेन  या त्याच्या पुत्रांमध्ये झाली.

  •  राजा प्रवरसेन याच्या साम्राज्याचा विस्तार मोठा असल्याने त्याच्या विभाजनाची गरज होती.

  •  राजा प्रवरसेन याचे गौतमीपुत्र व दुसरा प्रवरसेन हे पुत्र कर्तबगार व समजूतदार होते.

  •  आपापसात संघर्ष करण्याऐवजी वाकाटक साम्राज्याचे विभाजन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

  •  त्यानुसार नागपूर पलीकडचा प्रदेश गौतमीपुत्रकडे तर दक्षिणेकडचा प्रदेश सर्वसेनेकडे देण्याचे ठरले. 

  • सर्वसेनाने ‘हरिविजय’ हे काव्य रचले. 

  • वाकाटक राज्याचे विभाजन होऊन दोन प्रमुख शाखा निर्माण झाल्या. 

  • त्यातील एका शाखेची राजधानी ‘नंदिवर्धन’ (नगरधन रामटेक जिल्हा नागपूर) येथे, तर दुसर्‍या शाखेची राजधानी ‘वत्सगुल्म’ म्हणजे सध्याचे वाशिम येथे होती.

  • प्रश्न - वाकाटकांचे योगदान स्पष्ट करा.

  •  वाकाटक राजे विद्या, साहित्य व कला यांचे भोक्ते आणि आश्रयदाते होते. 

  • हिंदू (वैदिक) धर्म आणि संस्कृती यांचे त्यांनी रक्षण केले.

  •  त्यांचा धार्मिक दृष्टिकोन सहिष्णू असल्याने सर्वच धर्मांचा विकास वाकाटक काळात झाला. 

  • त्यांनी जबाबदारपणे राज्यकारभार केला. 

  • उत्तम प्रशासन व सामर्थ्यवान लष्कर उभारले.

  • साम्राज्याचा विस्तार केला आणि राज्यात सुसत्ता प्रस्थापित केली.त्यांचे साम्राज्य आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत होते.

  • वाकाटकांच्या काळात शिल्पकला व चित्रकला यांनी उत्कर्षबिंदू गाठला होता. 

  • अजिंठा येथील  १, २, १६, १७  आणि  १९  क्रमांकांच्या लेण्यांची याकाळात निर्मिती झाली. 

  • त्यांचा कालखंड महाराष्ट्रातील वैभवाचा कालखंड होता.

  • चालुक्य घराणे -

  • राजा जयसिंग याने सहाव्या शतकाच्या सुरुवातीला बदामीचे चालुक्य घराण्याची स्थापना केली. चालुक्य canघराण्याचा मूळ पुरुष संस्थापक जयसिंग होता.

  •  जयसिंगाने सहाव्या शतकाच्या सुरुवातीला वातापि  (बदामी) येथे आपली राजधानी स्थापन केली.

  •  जयसिंगाचा नातू पुलकेशी हा चालूक्यांचा पहिला मोठा राजा होता. बदामीचा किल्ला त्याने बांधला.

  •  पहिल्या पुलकेशीने  अश्वमेध यज्ञ करून महाराज’ ही पदवी धारण केली होती. 

  •  राजा पहिला पुलकेशी याने ‘सत्याश्रय ’ हे बिरूद धारण केले. तसेच ‘पृथ्वीवल्लभ हेही  बिरुद धारण केले होते.

  •  पहिला पुलकेशीनंतर त्याचा मुलगा कीर्तीवर्मा राज्यावर आला. 

  • कीर्तीवर्माच्या कारकिर्दीत वनवासीचे  (कारवार)  कदंब व अपरान्ताचे  (उत्तर कोकण)  मौर्य यांना जिंकून आपले राज्य वाढवले.

  •  कीर्तीवर्मा हा कलेचा भोक्ता होता. बदामी येथील सुंदर लेणी त्याच्या आदेशाने निर्माण केली.

  •  दुसरा पुलकेशी हा चालूक्यांचा सर्वात महान राज्यकर्ता होता.

  • दुसरा पुलकेशीने दक्षिण दिग्विजय करून ‘परमेश्वरहे बिरूद  धारण केले.

  •  रवीकिर्ती नावाच्या कवीने रचलेल्या प्रशस्तीमध्ये त्याच्या पराक्रमाचे वर्णन आलेले आहे.

  •  कदंब, मौर्य, नल, कलचुरी, राष्ट्रकूट, लाट, मालव व गुर्जर अशा अनेक राजांना पराभूत करून त्याने विदर्भ, महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा विस्तीर्ण प्रदेशांवर चालुक्यांची सत्ता प्रस्थापित केली.

  •  राजा हर्षवर्धन याचा पराभव दुसरा पुलकेशी या चालूक्य राजाने केला. 

  • दुसरा पुलकेशीचा पुत्र विक्रमादित्य याने पल्लवांचा पराभव केला.

  •  चालुक्य आणि पल्लव यांचा संघर्ष पुढे बराच काळ चालला.

  •  चालूक्यांचा शेवटचा राजा कीर्तीवर्मा यांचा पराभव दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने केला.

  • प्रश्न - दक्षिण भारतात चालुक्यांची प्रबळ सत्ता निर्माण झाली.

  • पहिल्या पुलकेशीने चालुक्यांच्या राज्याचा विस्तार केला.

  •  अश्वमेध यज्ञ करून त्याने ‘महाराजही पदवी धारण केली.

  •  कीर्तीवर्माने कदम्ब  व उत्तर कोकण जिंकले.

  •  दुसरा पुलकेशीने दक्षिण भागात दिग्विजय करून चालुक्यांची सत्ता अधिक बलवान केली.

  •  त्याने कदंब, मौर्य, नल, कल्चुरी, राष्ट्रकूट, लाट, मालव व गुर्जर अशा अनेक राजांना पराभूत करून विदर्भ, महाराष्ट्र व कर्नाटकात विस्तीर्ण साम्राज्य प्रस्थापित केले.

  •  अशाप्रकारे दक्षिण भारतात चालुक्यांची प्रबळ सत्ता निर्माण झाली.

  • प्रश्न-  चालुक्यांचे योगदान लिहा.

  • बदामी आणि कल्याणीचे चालुक्य हे विद्या, साहित्य आणि कला यांचे उपासक होते.

  •  अनेक विद्वान त्यांच्या दरबारात होते.

  •  चालुक्यांच्या काळात संस्कृत व कन्नड भाषांमध्ये विपुल साहित्य निर्माण झाले.

  •  या काळातील बदामी, हम्पी,ऐहोळ, पट्टदकल, श्रवणबेळगोळ येथील द्राविड शैलीतील मंदिरे त्यांच्या स्थापत्याची आणि वैभवाची प्रचीती देतात.

  •  चालुक्य हे वैष्णव पंथीय होते. त्यांनी धर्मसहिष्णुतेचे धोरण स्वीकारलेले होते.

  • पल्लव घराणे -

  • प्रश्न - पल्लव घराण्याच्या सुरुवातीच्या काळाची माहिती लिहा.

  • च्या सहाव्या शतकात आरंभीच्या पल्लवांची सत्ता पूर्व किनाऱ्यावर उदयास आली. 

  • साधारणपणे सहाव्या शतकापासून नवव्या शतकापर्यंत पल्लव राजे दक्षिण भारतातील एक प्रबळ शक्ती म्हणून ओळखले जात.

  •  पल्लवांच्या मूळ स्थानाविषयी इतिहास तज्ञांमध्ये एकमत नाहीत. 

  • पल्लवांचे काही प्राचीन ताम्रपट सापडले आहेत. 

  • त्यानुसार सिंहवर्मा व शिवस्कंधवर्मा यांनी पल्लव घराण्याची  सत्ता स्थापन केली. 

  • कांची पल्लवांची राजधानी होती.

  •  सिंहविष्णूच्या कारकिर्दीपासून पल्लव घराण्याची संगतवार माहिती मिळते.

  • प्रश्न - पल्लव घराण्यातील सिंहविष्णू आणि महेंद्रवर्मा यांची कामगिरी लिहा.

  • सिंहविष्णू यांनी चोलांचे प्रदेश जिंकून कृष्णेपासून कावेरीपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला.

  •  सिंहविष्णूनंतर त्याचा मुलगा महेंद्रवर्मा गादीवर बसला. 

  • महेंद्रवर्मा याने मत्तविलास हे प्रहसन संस्कृत भाषेत लिहिले.

  •  तसेच संगीत विषयक ग्रंथ लिहिला. त्याने संगीत, नृत्य, शिल्पकला, चित्रकला इत्यादींना राजाश्रय दिला.

  •  एकसंध दगडातून मंदिरे खोदून काढण्याची पद्धत त्याने सुरू केली आणि अनेक मंदिरे बांधली. 

  •  अपराजित हा शेवटचा पल्लव राजा होता. चोळ राजा आदित्य याने त्याचा पराभव करून पल्लवांचे राज्य नष्ट केले.

  • राष्ट्रकूट घराणे -

  • राष्ट्रकुट घराण्याचा संस्थापक ‘दंतीदुर्ग’ होता.

  •  दंतिदुर्गनंतर त्याचा चुलता कृष्ण पहिला हा गादीवर आला.

  •  त्याने चालुक्यांची सत्ता समुळ नष्ट केली.

  •  कृष्ण पहिला या राष्ट्रकूट राजाने वेरुळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले. 

  • राष्ट्रकूट राजांनी उत्तर भारतात आपला प्रभाव निर्माण केला.

  • अमोघवर्ष हा राष्ट्रकूट घराण्यातील कर्तबगार राजा होता. 

  • अमोघवर्षाने रत्नमालिका व कविराजमार्ग या ग्रंथांची रचना केली.

  •  तसेच सोलापूरजवळ मान्यखेट (मालखेड) हे नवे नगर वसवले.

  •  परमार आणि कल्याणीचे चालुक्य यांनी केलेल्या आक्रमणामुळे राष्ट्रकूट करण्याचा ऱ्हास  झाला.

  • शिलाहार घराणे -

  • प्रश्न-  शिलाहार घराण्याविषयी माहिती लिहा. 

  •  मुद्दे-      अ. संस्थापक               ब. दक्षिण कोकणचे शिलाहार              क. उत्तर कोकणचे शिलाहार    ड.  कोल्हापूरचे शिलाहार.

  • शिलाहार  घराण्याच्या तीन शाखा निर्माण झाल्या  होत्या.

  • संस्थापक --

  • तीनही शाखांचे राजे आद्यपुरुष म्हणून विद्याधर जिमूतवाहन याचा उल्लेख करताना दिसतात.

  • ते स्वतः ला ‘तगरपुराधिश्वर’ असे म्हणवून घेतात. म्हणजेच या घराण्याचा मूळ पुरूष वाहन हा उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर / तेर या गावातून आला असावा.

  • दक्षिण कोकणचे शिलाहार -

  • दक्षिण कोकणात ‘सणफुल्ल’ या शिलाहार राजाने सत्ता स्थापन केली.

  • त्याचा मुलगा ‘धम्मियार’ याने बालिपट्टण हे गाव वसवले.तेथे एक किल्ला बांधला.

  • पुढे आदित्यवर्मा या राजाने आपले राज्य ठाण्यापासून गोव्यापर्यंत वाढवले.

  • या घराण्याचा शेवटचा राजा रट्टराज हा होता.

  • या घराण्याचा इतिहास खारेपाटणच्या ताम्रपटावरुन समजतो.

  • उत्तर कोकणचे शिलाहार -

  • उत्तर कोकणात ‘कपर्दी’  या राजाने शाखा स्थापन केली. प्रारंभी तो राष्ट्रकूटांचा मांडलिक होता.

  •  उत्तर कोकणच्या शिलाहार राजांनी स्थानक  (ठाणे) येथे आपली राजधानी स्थापन केली.

  •  पुल्लशक्ती, झंझ,  पहिला व दुसरा  वज्जड, छित्तराज, पहिला अपरार्क, मल्लीकर्जून आणि सोमेश्वर हे या घराण्यातील कर्तबगार राजे होते. 

  • त्यांच्यातील अंतर्गत भांडणाचा फायदा घेऊन कोल्हापूरचे शिलाहार आणि कदंब यांनी उत्तर कोकणचा काही भाग जिंकला. छित्तराजाचा भाऊ मुम्मुणि याने  अंबरनाथ येथे आम्रेश्वर महादेवाचे भव्य मंदिर बांधले.

  • कोल्हापूरचे शिलाहार -

  • जतिग हा कोल्हापूरचे शिलाहार घराण्याचा संस्थापक होता.

  •  कोल्हापूरच्या शिलाहारांची सत्ता सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि बेळगावावर होते.

  •  न्यायवर्मा, चंद्र, दुसरा जतीग, अमारसिंह, दुसरा गुहल, पहिला व दुसरा भोज बल्लाळ गंडारादित्य,विक्रमादित्य इत्यादी या घराण्याचे नामवंत राज्यकर्ते होऊन गेले. 

  •  राजा भोज दुसरा हा कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील महत्त्वाचा राजा होता.

  • त्याने  कोल्हापूर, वळीवडे व पन्हाळा या राजधान्या त्याने वसवल्या.

  •  खिद्रापूर येथील कोपेश्वर महादेवाच्या भव्य मंदिराची निर्मिती या घराण्याच्या राज्यकर्त्याने केली.

  • गोंड घराणे -

प्रश्न गोंड राज्याची माहिती लिहा.

  • यादवांच्या काळात चांदा म्हणजेच चंद्रपूर येथे गोंड घराण्याची स्थापना झाली.

  •  कोल भिल हा या घराण्याचा संस्थापक होता. 

  •  गोंड जमातीला एकत्र करून नाग घराण्याविरुद्ध उठाव केला आणि आपली सत्ता स्थापन केली. 

  • शिरपूर येथे राजधानी स्थापन केली. 

  •  खांडक्या  बल्लाळसिंग याने बल्लारपूर येथे किल्ला बांधला आणि राजधानीचे बल्लारपूर येथे स्थलांतर केले.

  •  निळकंठ शाहच्या  काळात नागपूरचा रघूजी भोसले याने गौडांचा पराभव करून त्यांचे राज्य मराठा साम्राज्यामध्ये विलीन केले.

  • गोंड घराण्यात एकूण ६२  राजे होऊन गेले. या राजांनी महाराष्ट्रातील देवगड, नागपूर, चंद्रपूर येथे अनेक शतके राज्य केले.

  •  गोंड घराण्यातील राणी दुर्गावतीने मोगलांविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा आहे.

प्रश्न - राणी दुर्गावतीची माहिती लिहा.

  • चंदेल राजपूत घराण्यातील दुर्गावती ही गोंडवनची राणी होती. 

  • तिने उत्तम प्रकारे राज्यकारभार केला.

  •  तिने दीर्घकाळ मोगलांविरुद्ध लढा दिला.

  •  पतीच्या मृत्यूनंतर सम्राट अकबराला शरण न जाता दीर्घकाळ त्याच्याशी लढा दिला. 

  • तिने प्राणार्पण केले परंतु शरणागती पत्करली नाही.

  • यादव घराणे-

मध्ययुगीन महाराष्ट्रातील महत्त्वाचे घराणे म्हणजे यादव घराणे होय.

प्रश्न - महाराष्ट्राच्या इतिहासात यादव कालखंडाला विशेष महत्त्व आहे.   (सकारण स्पष्ट करा.)

  • यादव कालखंडाला विशेष महत्व आहे कारण यादव कालखंडामध्ये-------

  1. सांकृतिक प्रगती झाली.

  2.  यादवांच्या काळात महानुभाव वारकरी पंथ उदयाला आले.

  3.  याकाळात खानदेशात पाटण, कर्नाटकात सोलोटगी आणि मराठवाड्यात पैठण येथे विविध विद्या व शास्त्रांच्या अध्ययनाची केंद्रे होते होती.

  4.  या काळात धर्मशास्त्र व पूर्व मीमांसा न्याय आणि वेदांत यासारख्या अनेक विषयांवर संस्कृत ग्रंथांची रचना झाली. 

  5. याज्ञवल्क्यस्मृतीवरील अपरार्क केलेली टीका, ‘चतुर्वर्ग चिंतामणी’  हे  संस्कृत ग्रंथ, ‘शारंगदेव’ यांचा संगीतशास्त्रावरील ‘संगीत रत्नाकर’ हा ग्रंथ इत्यादी.

  6. याकाळात म्हाईभट्टाने ‘लीळाचरित्र’, मुकुंदराजाचे ‘विवेकसिंधु’, ज्ञानदेवाने ‘भावार्थदीपिका’  हे मराठी ग्रंथ लिहिले.

  7.  त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या नामदेव, जनाई, चोखोबा यासारख्या संतकवींनी अभंग रचना केली.

  8.  या काळात अनेक हेमाडपंती मंदिरे बांधली गेली. उदाहरणार्थ सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर अंजनेरी येथील मंदिर संकुल या काळात बांधल्या गेलेल्या मंदिरांची उत्तम उदाहरणे आहेत.

  9. अंकाई आणि टंकाई अशा किल्ल्यांचे हे बांधकाम झाले.

  • राज्यव्यवस्था, व्यापार, समाजजीवन -

  • दक्षिण भारतातील राज्यव्यवस्था -

  • दक्षिण भारतातील राज्यव्यवस्थेत ‘महादंडनायक’, ‘राष्ट्रिक’, ‘देशाधिकृत’, ‘अमात्य’, ‘आयुक्त’, यासारखे अधिकारी होते.

  •  चोळ प्रशासनात अधिकाऱ्यांच्या मंडळाला 'उदानकुट्हटम' असे म्हटले जायचे.

  • राज्य अनेक मंडळात-प्रांतात विभागले जात असे.

  •  मंडलमचे अधिकारी राजघराण्यातील सदस्य असत.

  •  राज्याचे प्रशासन अत्यंत कार्यक्षम होते. ग्रामसंस्था स्वायत्त होते. 

  • 'ग्रामसभा' गावाचा कारभार पहात असे.

  • ग्रामसभेच्या प्रमुखास 'ग्रामभोजक' (ग्रामकूट) म्हणून ओळखले जात असे.

  • त्याची निवड गावकरी करत असत. काही वेळा ही नेमणूक राजाही करीत असे.

  • दक्षिण भारतातील नाणी -

  • मौर्य साम्राज्याच्या काळात मौर्यांची नाणी चलनात होती. 

  • मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर पांड्य  राजांनी स्वतःची आहत नाणी पाडली. त्यावर सूर्य, घोडा, स्तूप, वृक्ष, मासा यासारख्या आकृत्या कोरलेल्या असत.

  •  चेरांच्या नाण्याच्या एका बाजूला धनुष्य-बाणाची, तर दुसऱ्या बाजूला हत्तीची आकृती कोरलेली असे.

  •  तसेच त्यांचे राजचिन्ह व्याघ्रही पाहायला मिळते. 

  • त्यांची नाणी सोन्याची, चांदीची व तांब्याची असत. 

  • ‘राजराजा’ या राजाच्या नाण्यावर राजराजाची प्रतिमा व व्याघ्र आकृती कोरलेली असे. त्यावरचा मजकूर देवनागरी लिपीत कोरलेला असे.

  • Aqqaaaaaaa त्यावर भारतीय राजांची  आकृती उमटवून ती परत चलनात आणली जात असे.

  •  दक्षिण भारतातील व्यापार उद्योग -

  • दक्षिण भारतातील विशेष कौशल्यांवर आधारित अनेक व्यवसाय होते.

  • मलयगिरीच्या जंगलातून हस्तिदंत मिळवले  जाई. त्याच्यावर कोरीव काम केले जाई.

  • चोलमंडलम उत्तम दर्जाच्या वस्त्रांसाठी प्रसिद्ध होते.

  • सुती कापड व रेशीम वस्त्रांची निर्मिती या प्रदेशात होत असे.

  •  चेरांच्या राज्यात अत्यंत तलम कापड विणले जाई.

  •  हस्तिदंताच्या कोरीव वस्तू, सुती कापड, रेशमी कापड यांची रोमला निर्यात केली जात असे.

  •  शेतीची समृद्धता व वाढते उद्योग यामुळे पैठण, नगर, तेर (तगर), नासिक इत्यादी नगरे उदयास आली.

  •  ग्रामीण भागातील उत्पादनांची शहरी भागात विक्री करावयाची बाजारपेठ नगराच्या मध्यभागी असे.

  •  व्यापारीश्रेणी, व्यापार व समाजजीवनात महत्त्वाची भूमिका बजावत.

  • साहित्य , कला, स्थापत्य

प्रश्न - दक्षिण भारतातील राज्यकर्त्यांच्या साहित्य, कला व स्थापत्य यातील योगदानाचा आढावा घ्या.

  • साहित्यातील योगदान --
  • दक्षिणेकडील राज्यांमध्ये काव्य आणि व्याकरणाच्या ग्रंथांची निर्मिती करण्याची परंपरा प्राचीन काळापासून होती.
  •  तामिळ संस्कृतीत संघम साहित्याचा कालखंड हा सर्वात प्राचीन साहित्याचा कालखंड मानला जातो.
  •  एकूण तीन संघमचे आयोजन करण्यात आले असावे.
  •  हा काळ संस्कृत वाङ्‍‍मयाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा होता.
  •  कालिदासाने मेघदूत हे काव्य विदर्भातील 'रामटेक' या ठिकाणी रचले.
  •  वाकाटक राज्यकर्त्यांनी प्राकृत भाषेतील साहित्य निर्मितीला प्रोत्साहन दिले.
  •  दुसरा प्रवरसेन याने 'सेतुबंध' तर सर्वसेनाने  'हरिविजय' हे काव्य लिहिले रचले.
  • कला व स्थापत्य -
  • दक्षिण भारतात मंदिर स्थापत्याची द्राविड शैली विकसित झाली.
  •  कांची येथील कैलासनाथ आणि वैकुंठपेरूमल मंदिर, तंजावर येथील बृहदेश्वर मंदिर द्राविड  स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट नमुने आहेत.
  •  चालुक्यांनी एहोळ, बदामी आणि पट्टदकल इत्यादी ठिकाणी मंदिरे बांधली.
  •  राष्ट्रकुटांच्या काळात कैलास मंदिराची निर्मिती झाली.
  •  चोळांच्या काळात धातूशिल्प ही कला विकसित झाली. 
  • नटराजाची कांस्यमुर्ती सर्वात प्रसिद्ध आहे.
  •  वाकाटकांच्या काळात शिल्पकला व चित्रकला यांनी  उत्कर्षबिंदू गाठला.
  •  अजिंठा येथील १,२,१६,१७ आणि १९  क्रमांकांच्या लेण्यांची या काळात निर्मिती झाली.
  • या लेण्यांच्या शिल्पकारांना शरीररचनेचे आणि निसर्गातील बारकावे यांचे उत्तम ज्ञान होते असे दिसते.
  • भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासाचा थोडक्‍यात आढावा आपण आत्तापर्यंत घेतला.
  • . बाहेरील देशांशी प्राचीन काळापासून सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झालेले होते.
  •  आज सांस्कृतिक संबंधांचा इतिहास आपण पुढील दोन पाठांमध्ये समजून घेणार आहोत.                                                                              ------------------  धन्यवाद----------

टिप्पण्या