इयत्ता १२ वी, प्रकरण -७

     प्रकरण - ७     भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण 


  • निर्वसाहतीकरण : संकल्पना स्पष्ट करा / टिपा लिहा.     २ गुण.

 प्रश्न - भारत स्वतंत्र झाला तरी भारताचा स्वातंत्र्यलढा संपलेला नव्हता.   (सकारण स्पष्ट करा)    ३ गुण

  • वसाहतवाल्यांचे वसाहतीवरील वर्चस्व संपुष्टात येणे आणि त्यांनी स्थानिक लोकांच्या हाती सत्ता सुपूर्द करणे, यालाच  'निर्वसाहतीकरण' असे म्हणतात.

  • वसाहतवादाला विरोध, स्वातंत्र्यलढा आणि वसाहतींना मिळालेले स्वातंत्र्य हे निर्वसाहतीकरणाचे तीन टप्पे आहेत.(निर्वसाहतीकरणाच्या तीन टप्यात वसाहतीकरण या टप्याचा समावेश होत नाही.  १ गुण.)

  • २० वे  शतक निर्वसाहतीकरणाचे म्हणून ओळखले जाते.वसाहतीकरणाची  प्रक्रिया जगभरात घडून आली. 

  • भारताला याच मार्गाने १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. मात्र त्यावेळी भारतामध्ये अनेक छोटी-छोटी संस्थाने अस्तित्वात होती.

  • भारतातील ही संस्थाने आणि फ्रेंच, पोर्तुगीज वसाहती यांनी प्रजेला स्वातंत्र्य दिले नव्हते. त्यांचे भारतात विलीनीकरण होणे बाकी होते. 

  • भारतात सामील होणे किंवा न होणे हे वसाहतींवर अवलंबून होते.

  • तरी भारताचा स्वातंत्र्य लढा संपलेला नव्हता.त्यामुळे देशाचे एकत्रीकरण होणे शक्य झाले.

  • निर्वसाहतीकरण ते एकीकरण----

  • सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान---

  • संस्थानाच्या विलीनीकरणात सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान.  (टिपा लिहा)  २ गुण.

  • असहकार आंदोलनाच्या प्रभावामुळे संस्थानांमध्ये राजकीय जागृतीला सुरुवात झाली.

  • संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला.

  • काही संस्थांने वगळता बहुसंख्य संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली. 

  • कारण सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल, असा सामीलनामा तयार केला

  • सामीलनामा कराराला पतियाळा या संस्थानाने सकारात्मक प्रतिसाद दिला.

  • जुनागढ, हैदराबाद व काश्मीर या संस्थांनांचा अपवाद वगळता इतर संस्थांनांकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. 

  • सरदार वल्लभभाई पटेल यांनी कणखर भूमिका घेऊन जुनागढ, हैदराबाद आणि काश्मीर या तीन संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सोडवला.

  • (प्रश्न- भारतामध्ये वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली.) 

  • जुनागढ--

प्रश्न - जुनागढ संस्थान भारतात विलिन झाले.   (सकारण स्पष्ट करा).     ३ गुण.

  • जुनागढ संस्थान भारतात विलीन झाले नव्हते. जुनागढ हे गुजरातमधील सौराष्ट्र भागातील एक संस्थान होते.

  • तेथील प्रजा भारताच्या बाजूने तर, जुनागढचा नवाब पाकिस्तानच्या बाजूने होता. 

  • जनतेने नबाबाच्या या निर्णयाला विरोध केला. यामुळे नबाब पाकिस्तानात पळून गेला. 

  • अखेर फेब्रुवारी १९४८ मध्ये जुनागढ संस्थान भारतात विलीन झाले.

  • हैदराबाद मुक्तिसंग्राम----

प्रश्न  -  हैदराबाद संस्थानाच्या मुक्तिसंग्राम याची माहिती लिहा. 

मुद्दे -   अ. संस्थानाची (परिषदांची) स्थापना          ब. रामानंद तीर्थ यांचे योगदान               क. रजाकार संघटनेचा अत्याचार     ५  गुण. 

अ.संस्थांची (परिषदांची) स्थापना--

(प्रश्न - हैदराबाद संस्थानात आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र परिषदांची स्थापना झाली.                    (तुमचे मत नोंदवा.)      ३   गुण.)

  •  हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते.

  •  त्यामध्ये तेलगू, कन्नड, मराठी भाषिक प्रदेश होते.

  •  हैदराबादच्या सत्ताधीश निजामाने प्रजेच्या नागरी व राजकीय हक्क यांचा संकोच केला होता.

  • आपले हक्क मिळवण्यासाठी संस्थानातील जनतेने तेलंगण भागात ‘आंध्र परिषद’,  मराठवाडा भागात ‘महाराष्ट्र परिषदकर्नाटक भागात ‘कर्नाटक परिषद’ या संस्था स्थापन केल्या.

ब. स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान - 

  • हैदराबाद संस्थानाच्या मुक्ती लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी समर्थपणे केले.

  •  त्यांना  संस्थानातील तीनही विभागातील निष्ठावान कार्यकर्त्यांनी  मोलाची साथ दिली.

  •  स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या हैदराबाद स्टेट काँग्रेसने संस्थानातील विलीनीकरणाच्या लढ्याला चालना दिली आणि लढा तीव्र केला.

  •  हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे, असा ठराव संमत केला.

  • निजामाने मात्र हा ठराव अमान्य केला.

  • स्वामी रामानंद तीर्थ यांना तुरुंगवास घडला.

क.  रझाकार संघटनेचा अत्याचार व हैदराबाद संस्थानाचे भारतात विलीनीकरण -

 प्रश्न - हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.     (सकारण स्पष्ट करा)     ३  गुण. 

  • हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे, असा ठराव केला.

  • मात्र निजामाने स्वतःचे वर्चस्व गमावण्याच्या भीतीने ठरावाला विरोध केला.

  •  त्याचा कल पाकिस्तानकडे होता. प्रजा भारताच्या बाजूने, तर निजाम प्रजेच्या विरोधात अशी परिस्थिती निर्माण झाली.

  •  प्रजेला धडा शिकवण्यासाठी निजामाचा हस्तक कासीम रझवी याने निजामाच्या पाठिंब्याने ‘रझाकार’ नावाची संघटना स्थापन केली.

  •  कासिम रझवी व त्याची रझाकार संघटना यांनी लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्या प्रजेवर अत्याचार केले.

  •  निजाम आपल्या भूमिकेवर अडून राहिला. सामोपचाराचे धोरण फेटाळून चर्चेचे दरवाजे बंद केले.

  •  अखेरीस भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई (ऑपरेशन पोलो) सुरू केली.

  •  शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम शरण आला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.

  • हैदराबाद मुक्ती संग्रामातील मराठवाड्याचे योगदान -

  • या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, दिगंबरराव बिंदू, आ.कृ.वाघमारे, अनंतराव भालेराव, फुलचंद गांधी, माणिकचंद पहाडे, देवीसिंग चव्हाण, आशाताई वाघमारे, दगडाबाई शेळके इत्यादींनी सक्रिय सहभाग घेतला होता.

  •  तसेच या लढ्यात वेदप्रकाश शामलाल, गोविंद पानसरे, श्रीधर वर्तक, बहिर्जी शिंदे, जनार्दन मामा इत्यादींनी हौतात्म्य पत्करले. 

  • हैदराबादच्या मुक्तीलढ्यात मराठवाड्यातील जनतेचा सिंहाचा वाटा होता.

  •  १७  सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती संग्रामाचा दिवस मराठवाड्यात ‘मराठवाडा मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो.

  • काश्मीरची समस्या----

प्रश्न - जम्मू-काश्मीर संस्थानाच्या विलीनीकरणाची माहिती लिहा.

 मुद्दे - अ. पाकिस्तानच्या आक्रमणाची पार्श्वभूमी       ब. सामीलनामा करार     क. विलीनीकरण              व विलीनीकरणानंतरच्या घडामोडी.     ( सविस्तर उत्तर लिहा)             ५ गुण.            किंवा 

प्रश्न - काश्मीरच्या वादास आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले.         (तुमचे मत नोंदवा)     ३ गुण.

 अ.  पाकिस्तानच्या आक्रमणाची पार्श्वभूमी-

  •  भारत स्वतंत्र होताना काश्मीरचा संस्थानिक राजा हरिश्चंद्र याने  भारत व पाकिस्तान यापैकी कोणत्याही देशात सामील न होता, काश्मीर स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला.

  •  मात्र पाकिस्तानला  काश्मीर हवे असल्याने त्याने हरीसिंगावर दबाव आणला.

  •  २२ ऑक्टोबर १९४७  रोजी पाकीस्तानी सशस्त्र टोळ्यांनी काश्मीरवर आक्रमण केले.

ब.  सामीलनामा करार -

  • दोन्ही देशांपासून आपले स्वतंत्र अस्तित्व राखू इच्छिणाऱ्या राजा हरिसिंग त्याला पाकिस्तानचे आक्रमण परतवून लावणे अशक्य होते.

  •  त्यामुळे काश्मीरच्या संरक्षणासाठी हरिसिंगाने भारताकडे लष्करी सहकार्य मागितले.

  • २७  ऑक्टोबर १९४७  रोजी काश्मीर भारतात विलीन झाले.

  •  हरिसिंग याने सामील होण्याच्या करारावर सही केली.

क.  विलीनीकरण व विलीनीकरणानंतरच्या घडामोडी -

 प्रश्न - काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रात गेल्यानंतर काश्मीरमध्ये कोणत्या घटना घडल्या.           (सविस्तर उत्तर लिहा)            ५ गुण.

  •  काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर भारतीय लष्कर काश्मीरच्या रक्षणासाठी गेले.

  •  भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांनी बळकावलेला काश्मीरचा बराचसा भाग मुक्त केला.

  •  काही भाग मात्र पाकिस्तानच्या ताब्यात राहिला. जानेवारी  १९४८ मध्ये भारताने काश्मिरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेला.

  •  दोन देशांमधील काश्‍मीरच्या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले.

  •  पाकव्याप्त काश्मीरमधून पाकिस्तानी सैन्य काढून घेणे, संयुक्त राष्ट्रसंघाला आजपर्यंत शक्य झालेले नाही.

  •  परंतु प्रौढ मताधिकाराच्या आधारे तत्कालीन ‘नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या’ सरकारने घटना सभेसाठी मतदान घेतले. 

  • घटना सभेने भारतात विलीन होण्यावर शिक्कामोर्तब केले.जम्मू-काश्मीरची घटना अमलात आली.

  •  तेव्हापासून जम्मू-कश्मीर हा भारतीय संघराज्याचा अविभाज्य भाग आहे.

  •  भारतीय राज्यघटनेच्या कलम ३७० अन्वये काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा प्रदान करण्यात आला.

  •  ऑगस्ट २०१९ मध्ये भारतीय संसदेने  ३७०  वे कलम रद्द करून काश्मिरचा विशेष दर्जा नष्ट केला आणि जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला.

  • दादरा नगर- हवेली----

  • दादरा व नगर-हवेली या पोर्तुगीज वसाहतींच्या  विलिनीकरणाची माहिती लिहा.      (सविस्तर उत्तर लिहा)      ५ गुण.

  • आझाद गोमंतक पक्षाचे आंदोलन गुजरातच्या समुद्रकिनार्‍यापासून काही अंतरावर असलेल्या आणि दमनगंगा नदीच्या उत्तर किनार्‍यावर वसलेल्या दादरा व नगर-हवेली या प्रदेशांवर पोर्तुगिजांची सत्ता होती.

  •  १५  ऑगस्ट १९४७ रोजी  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पोर्तुगीजांनी या भागाला स्वातंत्र्य देणे अपेक्षित होते, परंतु पोर्तुगीजांनी जनतेला स्वातंत्र्य दिले नाही. 

  • त्यामुळे स्थानिक जनता पोर्तुगिजांच्याविरुद्ध सक्रिय झाली. हे स्वातंत्र्य न मिळाल्यामुळे जनतेने आपला लढा तीव्र केला.

  •  ‘युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स’ आणि ‘आझाद गोमंतक दल’ यांनी परस्पर सहकार्य करून हा भाग पोर्तुगिजांच्या ताब्यातून  मुक्त करण्याची मोहीम आखली.

  •  १९५४  मध्ये फ्रान्सिस मस्कारन्हीस, विमल सरदेसाई या आझाद गोमंतक या कार्यकर्त्यांनी प्रखर आंदोलन करून नगर हवेलीचा प्रदेश ताब्यात घेतला.

  •  युनायटेड फँट ऑफ संघटनेने दादरा भागावर नियंत्रण मिळवले.

  • पोर्तुगीजांची शरणागती---

  • आझाद गोमंतक परिषदेच्या राष्ट्रवादी शक्तीसेनेने नरोली,पिंपरी, सिल्वासाचा भाग ताब्यात घेतला.

  •  स्थानिक पोलिस ठाणे आणि प्रशासकीय कार्यालयांवर हल्ले चढवले.

  •  जनतेचा प्रक्षोभ लक्षात घेत पोर्तुगीज सैन्याने माघार घेतली.

  •  पोर्तुगीज कॅप्टन फॉल्गो त्याने शरणागती पत्करली.

  •  केंद्र सरकारने के.जी. बदलाणी  या अधिकाऱ्याला त्या भागात प्रशासन सुरळीत करण्यासाठी पाठवले.

  •  भारत सरकारने केलेल्या करारानुसार दादरा व नगर-हवेलीचा भाग कायदेशीररित्या २ ऑगस्ट १९५४  रोजी भारताकडे हस्तांतरित करण्यात आला.

  •  यानंतर १९६१  मध्ये या भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.

  •  या लढ्यात विश्वनाथ लोंढे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर, निळूभाऊ लिमये, वसंत झांजते इत्यादींनी भाग घेतला.

गोवा--- 

संकल्पना चित्र पूर्ण करा.

 प्रश्न - गोवा मुक्तीसंग्रामातील पुढील नेत्यांच्या योगदानाविषयी माहिती लिहा.

 मुद्दे-  अ.  डॉ. टी. बी. कुन्हा.    ब. डॉ. राम मनोहर लोहिया.  क. गोवा विमोचन सहायक समिती ड. मोहन रानडे.   इ. गोवा मुक्ती.    (सविस्तर उत्तर लिहा)      ५ गुण.  

  • टी. बी.कुन्हा व गोवा काँग्रेस कमिटी -

  •  गोव्यातील पोर्तुगीज सत्ता झुगारून देण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात प्रयत्न सुरू झाले होते.

  • १९२८  मध्ये मुंबईत गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना झाली. डॉ.टी. बी. कुन्हा. गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख होते.

  •  १९२९  मध्ये गोवा काँग्रेस भारतीय राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत असलेली एक शाखा झाली.

  •  टी. बी. कुन्हा यांनी १९३९ मध्ये ‘छोडो गोवा’ अशी पत्रिका संपूर्ण गोव्यात लावण्यात आली.

  •  संयुक्त आघाडीचे अध्यक्ष फ्रान्सिस मस्कारन्हीस यांनी भारतीय राष्ट्रध्वज फडकावला.

  •  वडगाव येथे सत्याग्रहात भाग घेतलेल्या डॉ. कुन्हा, पुरुषोत्तम काकोडकर आणि अन्य कार्यकर्त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली.

  •  पोर्तुगालमधील तुरुंगात ८  वर्ष शिक्षा भोगलेले डॉ. कुन्हा भारतात आले .

  •  टी.बी.कुन्हा यांनी मुंबईत ‘आजाद गोवा’ व ‘स्वतंत्र गोवा’ ही वृत्तपत्र सुरू केली.

  • डॉ. राम मनोहर लोहिया - 

  •  इ.स. १९४६ मध्ये डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली गोवा मुक्तीसाठी सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले.

  •  लोहिया यांना पोर्तुगीज सरकारने गोव्यातून हद्दपार केले. 

  • गोवा विमोचन सहायक समिती -

  • १९५४  मध्ये पुणे येथे ‘गोवा विमोचन सहायक समिती’ची स्थापना झाली.

  •  केशवराव जेथे ना.ग.गोरे, जयंतराव टिळक हे समितीचे नेते होते.

  •  नानासाहेब गोरे व सेनापती बापट या समितीच्या नेत्यांनी गोव्यात सत्याग्रह केला.

  •  पणजीच्या किल्ल्यावर भारताचा तिरंगा ध्वज फडकावला.

  •  आचार्य अत्रे यांनी मराठा दैनिकातून लढ्याला प्रेरणा दिली.

  •  मोहन रानडे पोर्तुगीज सत्तेविरुद्ध लढणाऱ्या मोहन रानडे यांचे योगदान मोलाचे आहे.

  •  आझाद गोमंतक दलाच्या सहकार्याने मोहन रानडे यांनी सशस्त्र लढा दिला.

  •  पोलीस स्टेशनवर केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले पोर्तुगीजांनी त्यांना पोर्तुगालच्या तुरुंगात १९४२ पर्यंत ठेवले.

  •  गोवामुक्ती  -

  •  प्रश्न - इ.स. १९६१  पर्यंत गोव्यातील पोर्तुगीज राजवट अबाधित राहिली.      ३  गुण

  •  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पोर्तुगीजांनी भारतातील वसाहतींना स्वातंत्र्य देणे अपेक्षित होते.

  •  मात्र पोर्तुगीजांनी गोवा सोडण्यास नकार दिला. गोवा मुक्तीसाठी गोव्यातील जनतेने काही संघटना स्थापन केल्या.

  • अनेकांनी सत्याग्रह, आंदोलने केली. पोर्तुगीज सरकारने आंदोलकांना आणि आंदोलकांच्या नेत्यांना तुरुंगात टाकले.

  •  जनतेवर अत्याचार केल्यामुळे गोवा मुक्तीलढा तीव्र झाला. 

  • पंडित नेहरू यांनी लोकभावनेची दखल घेऊन लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

  •  ‘ऑपरेशन विजय’ या सांकेतिक नावाने भारतीय सैन्य गोव्यात उतरले.

  • स्थानिक जनतेनेही सैन्याला मदत केली. पोर्तुगिजांनी पेरलेल्या भूसुरुंगाबद्दल त्यांनी पुण्याला माहिती दिली.

  • ४८  तासांच्या आत पोर्तुगीज शरण आले. १९  डिसेंबर १९६१  रोजी गोवा भारतीय संघराज्यात सामील झाले.

  •  गोव्याचे ४५०  वर्षांचे पारतंत्र्य संपुष्टात आले.

  • नकाशा वाचन -

 प्रश्न- भारताच्या वायव्य दिशेकडील राष्ट्र कोणते?

  •  पाकिस्तान. 

प्रश्न- भारतातील पोर्तुगीजांचे सत्ता केंद्र कोणते?

  •  गोवा.

 प्रश्न- पूर्वकिनारपट्टीवरील फ्रेंचांचे सत्ता केंद्र कोणते?

  •  पुद्दुचेरी, कारिकल, यानम, चंद्रनगर.

प्रश्न - भारताच्या दक्षिणेला कोणते राष्ट्र आहे?

  • श्रीलंका.

प्रश्न -फ्रेंचांची पश्चिम किनारपट्टीवरील वसाहत कोठे होती? 

  • माहे

  • पुद्दुचेरी (पांडेचेरी) ---

प्रश्न - पुद्दुचेरी विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला.     (सकारण स्पष्ट करा)   ३  गुण.

  • पुद्दुचेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी पुद्दुचेरी भाग फ्रेंच यांच्या ताब्यात होता.

  •  ब्रिटिश राज्यकर्त्यांनी घालून दिल्यास पोर्तुगीज आणि फ्रेंच स्वतःहून निघून जातील, असे भारतीयांना वाटत होते.

  •  पुद्दुचेरी, कारिकल, माहे आणि यानम एकमेकांशी निगडीत नसणारे प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये चंद्रनगरचा प्रदेश फ्रेंचांच्या ताब्यात होता.

  • फ्रान्स  सरकार आपल्या ताब्यातील प्रदेश सोडायला तयार नव्हते.

  •  पुद्दुचेरी येथील कामगार नेते व्ही.सुबैय्या यांच्या नेतृत्वाखाली लोक संघटित झाले.

  •  त्याची दखल घेऊन भारत सरकारने फ्रेंच सरकारकडे पुद्दुचेरी हे भारताला परत करण्याची आग्रही मागणी केली.

  •  जून १९४८  मध्ये दोन्ही सरकारमध्ये करार होऊन तिच्या विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला.

  •  वाटाघाटी, आंदोलन आणि प्रत्यक्ष कारवाई या मार्गाने पुद्दुचेरीचा  प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली.

  •  पुढे १३ ऑक्टोबर १९५६  रोजी फ्रान्स आणि भारत या उभय सरकारांमध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया निश्चित झाली.

  •  विधिमंडळ आणि नगरपालिकांमध्ये विलीनीकरणाच्या बाजूने मतदान झाले.

  • १ नोव्हेंबर नोव्हेंबर १९५४ रोजी भारताला या वसाहतींचा ताबा मिळाला‌. 

  • १९६२  मध्ये या कराराला फ्रान्सच्या संसदेने मान्यता दिली.

  • भारताच्या एकीकरणाची  प्रक्रियाही पूर्ण झाली.






टिप्पण्या