प्रकरण-७
भारत आणि इराण (पर्शिया)
प्रस्तावना -
इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून उत्तर भारतात नवनवी राज्ये,गणराज्य, टोळीराज्य, जनपदे अस्तित्वात येऊ लागली आणि त्यात संघर्ष सुरू झाला.
या संघर्षातून इसवीसन पूर्व सहाव्या शतकामध्ये मगध साम्राज्याच्या रूपाने सत्तेचे एकत्रीकरण सुरू झाले.
याच काळात पर्शियातून अनेक टोळ्या खैबर खिंडीतून उत्तरापथात येऊ लागल्या.
भारतातील आर्य टोळ्यांचा आणि पर्शियन टोळ्यांचा संबंध स्पष्ट करणारा पुरावा म्हणजे बोंगांझकोईचा शिलालेख होय,
अखमोनीय साम्राज्य -
इसवी सन पूर्व ७ व्या शतकापासून भारत-बॅबिलोनिया दरम्यान पर्शियन आखातातून व्यापार सुरू होतो.
इसवी सन सहाव्या शतकापासून पर्शियन इराणी टोळ्या अधिक आक्रमक बनू लागतात. तेथे अखमोनिया साम्राज्य आकाराला येते.पर्शिया एक प्रबळ सत्ता बनते.
भारतीय उपखंड आणि इराण यांच्यातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध हडप्पा काळापासून प्रस्थापित झालेले होते, याचे पुरावे येथील प्राचीन स्थळांच्या उत्खननात मिळालेले आहेत.
हडप्पा संस्कृती समकालीन असलेले एलामचे साम्राज्य हे इराणच्या नैऋत्य भागात होते. सांस्कृतिकदृष्ट्या मेसोपोटेमियाला अधिक जवळचे होते.
एलाम साम्राज्याच्या राजधानीचे नाव ‘सुसा’ असे होते. त्यावरून त्या प्रदेशाला ‘सुसियाना’ असे म्हटले जायचे.
कालांतराने इराणमध्ये विविध राजघराण्यांची सत्ता उदयाला आली, तरीदेखील त्यांची राजधानी ‘सुसा’येथे राहिली.
‘सुसा’ येथील पुरातत्त्व संशोधनाच्या आधारे इराण आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंधावर खात्रीशीर पुरावा मिळालेला आहे.
सायरस आणि डॅरीअसच्या स्वाऱ्या :
इराणच्या साम्राज्याची प्रस्थापना अखमोनीय घराण्यातील दुसरा सायरस याने केली. तो ‘पार्स’ या जमातीतील होता.
त्यांनी पर्शियन साम्राज्याचा विस्तार केला. याच काळात भारतात पहिले पर्शियन आक्रमण झाले.
पारस जमातीचे वास्तव्य अफगाणिस्तानला लागून असलेल्या इराणच्या वायव्येकडील डोंगराळ प्रदेशामध्ये होते.
त्यामुळे या प्रदेशालाही ‘पार्स’ असेच नाव होते. ग्रीक लोक या शहराला ‘पर्सिपोलीस’ असे म्हणत.
या ‘पार्स’ प्रांतात उदयाला आलेले, म्हणून अखमोनिय साम्राज्याचा उल्लेख ‘पर्शियन साम्राज्य’ असा केला जातो.
राजधानी ‘सुसा’ -
प्रश्न- पहिला दार्युश याच्याविषयी माहिती लिहा.
सम्राट दुसरा सायरस याने ‘पासारगाद’ येथे राजधानी बांधण्यास सुरुवात केली होती.परंतु त्याच्या मृत्यूमुळे ती पूर्णत्वाला गेली नाही.
दुसरा सायरसनंतर त्याचा मुलगा कॅम्बिसेस हा सत्तेवर आला. त्याने राजधानी ‘सुसा’ येथे हलवली आणि त्यानंतर त्याने इजिप्त जिंकून घेतले होते.
दुसरा कॅम्बिसेसनंतर गादीवर आलेला पहिला दार्युश (डॅरीअस) पर्शियातल्या अखमोनिय साम्राज्याचा सम्राट बनला. तो अतिशय महत्त्वाकांक्षी होता. त्याने साम्राज्यविस्ताराची धोरण अंगीकारले.
इसवी सन पूर्व ५२२ ते ४८८ या कालखंडात त्यांने राज्य केले. त्याच्या काळात पर्शियन टोळ्यांनी पुन्हा भारतावर आक्रमण केले.
हिरोडोटससारखा समकालीन इतिहासकार याविषयी माहिती देतो. पहिला दार्युश याने सुसाच्या तटबंदीचे मजबुतीकरण केले.
सुसा येथे त्याने मोठा राजवाडा आणि अपादान (म्हणजे अनेक खांबी सभागृह) बांधले.
त्याने ‘पर्सीपोलीस’ हे नवे शहर वसवले आणि तेथे स्वतःच्या निवासासाठी एक नवा राजवाडा आणि अपादान बांधले.
‘सुसा’ ते भूमध्य समुद्रापर्यंत जाणारा ‘रॉयल रोड’ विकसित केला. हा मार्ग २५०० किमी. लांबीचा होता.
पराक्रमी असणाऱ्या पहिल्यादा आयोनियन बंडाचा बीमोड केला.
सिंध आणि पंजाब जिंकून साम्राज्याचा विस्तार केला. त्याने सुसा, पारसागात, ‘पर्सीपोलीस’ आणि बेहीस्तून येथे शिलालेख उभारले, त्यांना आता जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे.
त्याने ‘दारीक’ ही सोन्याची तर ‘सीग्लास’ ही चांदीची नाणी पाडली. अथेन्स व आयोनियन ग्रीक यांच्याशी झालेल्या मॅरेथॉनच्या लढाईत मात्र पहिला दार्यूष्यच्या सैन्याला पराभव पत्करावा लागला..
डॅरीअसनंतर क्षर्षीस, दुसरा डॅरीअस, तिसरा डॅरीअस यासारखे राजे राज्यावर आले. पहिल्या डॅरीअसच्या मृत्यूनंतर पर्शियन राज्याला उतरती कळा लागली.
इराण-अशिया व्यापार -
इराण भौगोलिकदृष्ट्या पूर्व आणि पश्चिम आशियाला जोडणारा प्रदेश आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम आशियामध्ये चालणाऱ्या व्यापारात आणि पर्यायाने सांस्कृतिक देवाणघेवाणीत इराणचे स्थान महत्त्वाचे होते.
इराणचे ‘एरियाना’ असे आणखी प्राचीन नाव आहे. इतिहासपूर्व काळापासून आशिया आणि पर्शियन आखात व पुढे मेसोपोटेमिया आणि इजिप्तपर्यंत हा व्यापार चालू होता.
पर्शियन साम्राज्याच्या काळात ग्रीस आणि रोमपर्यंत विस्तारला.
प्राचीन काळापासून व्यापारी तांडे वापरत असलेल्या मार्गावर सम्राट आणि सुरक्षिततेची व्यवस्था निर्माण केली. त्यांनी काही मार्गांची पुनर्बांधणी केली.
रॉयल रोड- ( टीप लिहा) 2 गुण.
पर्शियन साम्राज्याचे राजे दुसरा सायरस व पहिला दार्युश यांनी राजधानी सूसा येथून भूमध्य समुद्रांपर्यंत जाणारा व्यापारी रस्ता विकसित केला, हा मार्ग ‘रॉयल रोड’या नावाने ओळखला जातो.
हा मार्ग २५०० किमी लांबीचा होता. रॉयल रोडच्या काही शाखा भारतीय उपखंड आणि इजिप्त यांना जोडत असत.
मॅसिडोनियाचा राजा सिकंदर याने भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशावर स्वारी करण्यासाठी ‘रॉयल रोड’ या मार्गाचाच उपयोग केला.
पर्शियन (अखमोनिय) साम्राज्य आणि ग्रीस यांच्यातील लढाया-
प्रश्न- पर्शियन (अखमोनिय) साम्राज्य आणि ग्रीस यांच्यातील लढायांची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा.
अ. आयोनीन ग्रीकांचा लढा व स्थलांतर
ब. मॅरेथॉनची लढाई.
क. ग्रीक संघ व अखमोनिय सत्ता यातील तह.
ड. संघर्षाचे परिणाम.
पर्शियन साम्राज्यातील अखमोनीय सम्राट व ग्रीक नगरराज्य यांच्यात दीर्घकाळ लढाया झाल्या.
त्यामध्ये हिरोडोटस इतिहासकाराचे लेखन महत्वाचे आहे. इतिहास लेखनाचा जनक हिरोडोटस यांना मानले जाते.
अ. आयोनीन ग्रीकांचा लढा व स्थलांतर -
इसवी सन पूर्व ६ व्या शतकात दुसरा सायरस ‘लिडिया’ हे राज्य जिंकून घेतले. परिणामी लिडियाच्या सत्तेखाली असणारी आयोनीयातील ग्रीक नगरराज्य अखमोनिय साम्राज्यात विलीन झाली.
आयोनीयातील ग्रीकमधून तुर्कस्तानच्या अनाटोलीयात (म्हणजेच तुर्कस्तानच्या अशियातील भूभागात) स्थलांतर करून आले. या प्रदेशाला ‘आशिया मायनर’ असेही म्हणतात.
ब. मॅरेथॉनची लढाई-
आयोनीयातील सर्व ग्रीक नगरराज्यांनी पहिला दार्युश याच्याविरुद्ध उठाव केला.
पाच वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर दार्युशने या बंडाचा बिमोड केला. अथेन्स आणि एरिट्रीया या नगर राज्यांनी आयोनीन ग्रीकांना मदत केल्यामुळे पहिला दार्युशने अथेन्सवर आक्रमण केले.
अथेन्स जवळच्या मॅरेथॉनच्या मैदानावर ही लढाई होऊन त्यात पहिल्या दार्युशचा पराभव झाला.या लढाईला मॅरेथॉनची लढाई असे म्हणतात.
क. ग्रीक संघ व अखमोनिय सत्ता यातील तह -
पहिल्या दार्युशचा वारस झेरेक्सेस याने ग्रीसवर स्वारी केली; परंतु त्याला अपयश आले. नंतरच्या काळातही दोन सत्तांत संघर्ष चालू राहिला.
अखेरीस अथेंस व अन्य नगरराज्यांच्या ग्रीक संघाने अखमोनिय सत्तेविरुद्ध लढा पुकारला.
ड. संघर्षाचे परिणाम -
दीर्घ संघर्षामुळे अखोमोनीय साम्राज्य दुर्बल झाले.ग्रीक संघ व पर्शियन साम्राज्य या दोन्हीच्या राजकीय व आर्थिक क्षेत्रांवर दूरगामी परिणाम झाले.
या संघर्षाचा एक मोठा परिणाम म्हणजे सम्राट सिकंदर याने पर्शियावर स्वारी केली.
प्रश्न- सम्राट सिकंदरने पर्शियावर स्वारी केली. (सकारण स्पष्ट करा)
अखमोनिय सम्राट आणि ग्रीक नगरराज्यांचा संघ यांच्यात दीर्घकाळ संघर्ष चालू होता. या संघर्षामुळे अखमोनिय सत्ता दुर्बल होत गेली.
ग्रीक संघ आणि पर्शियन साम्राज्य दोन्हींच्या राजकीय आणि आर्थिक क्षेत्रांवरही या संघर्षाचे दूरगामी परिणाम झाले.
या दुर्बलतेचा फायदा घेऊन मॅसिडोनियाचा सम्राट तिसरा अलेक्झांडर म्हणजेच सिकंदर याने रशियावर स्वारी केली.
प्रश्न- अलेक्झांडरने तिसऱ्या दार्युशला पत्रातून कोणत्या बाबींची जाणीव करून दिली?
‘एरियन’या ग्रीक इतिहासकाराने लिहिलेल्या ‘अनाबेसिस ऑफ अलेक्झांडर’ या ग्रंथात तीसरा दार्युश आणि अलेक्झांडरया दोघांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांचा उल्लेख केला आहे.
आपली आई, पत्नी आणि मुले यांना मुक्त करावे यासाठी पर्शियन सम्राट तिसरा दार्युश याने लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना अलेक्झांडरने दार्युशला पुढील बाबींची जाणीव करून दिली--
१. पर्शियन सम्राटांनी पूर्वी ग्रीकांवर अनेक आक्रमणे करून त्यांना खूप दुःख दिले.
२. अशा आक्रमक पर्शियन यांना शिक्षा करण्यासाठी आपण समुद्र पार करून आलो आहोत.
३. तिसऱ्या दार्युशने आपल्याविरुद्ध ग्रीकांना भडकावण्याचा प्रयत्न केला.
४. तिसरा दार्युश हा पराभूत राजा असून, आपल्याबरोबर समान दर्जाच्या नात्याने वागण्याचा प्रयत्न करू नये, असेही अलेक्झांडरने सुचवले आहे.
५. यावरून दुखावली गेलेली ग्रीकांची अस्मिता आणि पर्शियन सत्तेला आपण सहज नमवू शकतो, हा आत्मविश्वास अलेक्झांडरच्या मोहिमेला प्रेरणा देणाऱ्या ठरल्या, असे म्हणता येते.
हिरोडोटस-
प्रश्न- हिरोडोटस यांनी कोणत्या उद्देशाने ग्रंथलेखन केले?
हिरोडोटस याने हिस्टरिया (द हिस्टरीज) हा ग्रंथ लिहिला.
इसवी सन पूर्व ५०० ते ४४९ या काळात ग्रीक नगरराज्य आणि अखमोनिया साम्राज्य यांच्यात झालेल्या युद्धांमागील कारणमीमांसा शोधणे, शोधलेली माहिती ग्रंथरूपात सादर करणे.
काळाच्या ओघात मानवी कामगिरी विस्मृतीच्या पडद्याआड जाऊ नये.
ग्रीकांच्या आणि बर्बर म्हणजेच वर्षं लोकांच्या महान आणि आश्चर्य वाटाव्यात अशा कृतींच्या गौरवाला विस्मृतीमुळे कमीपणा येऊ नये.
प्रश्न- हिरोडोटसने अखमोनीय सैन्यातील भारतीय सैनिकांच्या केलेल्या वर्णनातून कोणती माहिती मिळते?
इतिहास लेखनाचा जनक हिरोडोटस यांना मानले जाते.
हिरोडोटस याने ग्रीक नगरराज्य व अखमोनिया साम्राज्य यांच्यात इसवी सनापूर्वी ५०० ते ४४९ या काळात झालेल्या व्यक्तींची कारण मिमांसा आपल्या ग्रंथात केलेली आहे.
या लेखनात त्याने अखमोनिय सैन्यातील भारतीय सैनिकांचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे--
सम्राट झेरेक्सेस यांनी केलेल्या आक्रमणावेळी त्याच्या सैन्यात गांधार, सिंध व पंजाब येथील सैनिक होते.
गांधारमधील सैनिकांच्याजवळ वेताचे धनुष्यबाण आणि आखूड दांड्याचे भाले होते. त्यांच्या बाणांची टोके लोखंडी होती. सुती कापडाचा पोषाखात असलेले भारतीय सैन्य धनुष्यबान चालवण्यात अत्यंत निपुण होते.
ग्रीसमधून माघार घेताना झेरेक्सेसच्या सेनापतीने भारतीय सैनिकांची एक तुकडी ग्रीसमध्ये ठेवली होती.
प्रश्न- हिरोडोटसला इतिहास लेखनाचा जनक मानले जातात. ( तुमचे मत नोंदवा)
इतिहास लेखनाचा जनक ‘हिरोडोटस’ यांना मानले जाते.
त्याने विवेक नगर राज्य व अखमोनिय साम्राज्य यांच्यात झालेल्या युद्धाची कारणमीमांसा ‘हिस्टोरीया’या ग्रंथात केली आहे.
एखाद्या विशिष्ट घटनेची संपूर्ण माहिती घेऊन तिची कालक्रमानुसार मांडणी करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता.
हे करताना हिरोडोटसने देव, मनुष्याचे नशीब या साध्या काल्पनिक गोष्टींचा वापर केला नाही.
घटनांची कालक्रमानुसार मांडणी करणे, हे इतिहास लेखनाचे पायाभूत तत्व हिरोडोटसच्या मांडणीने पुढे सुरू झाले.
या पायाभूत सूत्राने इतिहास लेखनाला एका स्वतंत्र ज्ञान शाखेचे स्वरूप प्राप्त झाले. म्हणून हिरोडोटसला इतिहास लेखनाचा जनक मानले जाते.
पर्शियन ( अखमोनिय) साम्राज्य आणि भारत :
ज्या काळात भारतातील महाजनपदांमधील सत्ता स्पर्धेतून सरतेशेवटी मगध साम्राज्याचा उदय झाला.
त्याच काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशातील छोटी-छोटी स्वतंत्र राज्य जिंकून घेत अखमोनिय सम्राटांनी यांच्या साम्राज्याची सीमा पंजाब पर्यंत विस्तारली.
सम्राटांचे अभिलेख आणिक इतिहासकारांच्या नोंदीच्या आधारे अखोमिया सम्राट दुसरा याने काबूलच्या (गांधार) खोऱ्यातला प्रदेश जिंकून घेतला.
त्यामध्ये हा प्रदेश साम्राज्यात समाविष्ट होता. सिंध आणि पंजाब जिंकून घेतला. वितस्ता (झेलम) अखमोनिय साम्राज्याची पुर्वेकडील सीमा बनली.
इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव-
प्रश्न-पर्शियन सत्तेचे भारतावरील राजकीय व सांस्कृतिक परिणाम स्पष्ट करा. (सविस्तर उत्तर लिहा) ५ गुण.
पर्शियन सत्तेचे भारतीय उपखंडावर किमान दोन शतके वर्चस्व होते. या दोनशे वर्षांच्या काळात या सत्तेचे भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रांवर झालेले परिणाम-
राजकीय परिणाम-
साम्राज्याच्या प्रशासनासाठी जिंकलेल्या प्रत्येक प्रांतावर सत्रपांची म्हणजे राज्यपालांची नेमणूक करण्याची पद्धत.
ही पद्धत पुढे सिकंदर, शक व कुशाण यांनीही स्वीकारली.
भारत आणि इराण यांच्यातील राजनैतिक संबंध प्रस्थापित होवून दोन्ही देशात व्यापारी दळणवळण सुरू झाले.
सांस्कृतिक परिणाम-
पर्शियन साम्राज्याच्या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात ‘अरेमाइक’ वापरात आली.
या लिपीतूनच पुढे खारोष्टी ही प्राचीन भारतीय लिपी विकसित झाली.
राज्यातल्या असलेले कोरीव लेख मोक्याच्या जागी प्रदर्शित करण्याची अखमोनिय सम्राटांची पद्धती सम्राट अशोकासारख्या राजाने स्वीकारली.
अखमोनीय सम्राटांची नाणी पाडण्याची पद्धत भारतातील सत्रप व अन्य राजांनी स्वीकारून स्वतःची नाणी पाडली.
पर्शियन स्थापत्य व शिल्पकलेचा प्रभाव भारतीय स्थापत्य व शिल्पकलेवर पडला. पर्शियन भाषेचा प्रभाव पडून भारतीय भाषांमध्ये अनेक पर्शियन शब्द आले.
पर्शियन नाणी - ( टिपा लिहा) २ गुण.
अखमोनिय साम्राज्यापूर्वी पर्शियात वस्तुविनिमय पद्धतीने व्यवहार होत असत.
त्यात चांदीच्या लडीचाही वापर होत असे.
‘लिडिया’ या ग्रीक नगरराज्यात वापरात असलेल्या ‘स्टेटर’ या नाण्याच्या धर्तीवर दुसरा सायरस याने नाणी पाडायला सुरुवात केली.
पहिला दार्युश याने ‘दारिक’ सोन्याची व ‘सिग्लोस’ ही चांदीची नाणी पाडली. या नाण्यांवर त्याने धनुष्यबाण उधारी प्रतिमा अंकित केलेली होती.
‘सिग्लोस’ चे अनेकवचन ‘सिग्लोइ’असे होते.एका दारीकची किंमत बारा सिग्लोइ इतकी असे.
अखमोनिया साम्राज्यातील ग्रीक सत्रपीनी आपली स्वतःची नाणीही पाडली. या नाण्यांवर एका बाजूला राजाची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला आहत तंत्राचा उपयोग करून एखादे चिन्ह ठेवलेले असे.
प्रश्न- भारतीय दगडी कोरीव कामाचा उगम पर्शियन व ग्रीक शिल्पशैलीमध्ये दाखवता येतो. (सकारण स्पष्ट करा) 3 गुण.
अखमोनीय साम्राज्याच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात पर्शियामध्ये भव्य इमारती बांधण्यासाठी सम्राट सायरसने ग्रीक वसाहतींमधून स्थापत्यकार व शिल्पकार आणले होते.
सिकंदराने पर्शियन साम्राज्य नष्ट केल्याने या कारागिरांचा राजाश्रय संपला.
त्यामुळे त्यांना स्थलांतर करावे लागले. स्थलांतर केलेले हे कारागीर भारतात आले, त्यांना सम्राट अशोकाने राजाश्रय दिला.
सम्राट अशोकाने गोठ्या केलेल्या दगडी स्तंभामध्ये या कारागिरांच्या शैलीचा प्रभाव पडलेला जाणवतो.
म्हणून भारतातील दगडी कोरीव कामाचा उगम पर्शियन व भीक शिल्प शैली मध्ये दाखवता येतो.
तक्षशिला -
प्रश्न- तक्षशिला नगरीची प्राचीन माहिती लिहा.
प्राचीन तक्षशिला नगरासंबंधीची माहिती बौद्ध साहित्य आणि ग्रीक इतिहासकार यांच्या लेखनातून मिळते.
प्रागैतिहासिक काळात सूक्ष्मास्त्रांचा वापर करणाऱ्या लोकांचा वावर तक्षशीलेत असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
इसवी सनापूर्वी ३५०० च्या सुमारास या भागात नवाश्मयुगीन गाव वसाहत असल्याचे ‘सराइ खोला’ येथील उत्खननात सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे सिद्ध होते.
इस्लामाबादजवळील ग्रँड रोडवर तक्षशिला नगराची १८ पुरातत्त्वीय स्थळे सापडली आहे.
‘गांधार’ या महाजनपदाची तक्षशिला ही राजधानी होती. ‘लोकांनी गजबजलेले समृद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासनव्यवस्था असलेले नगर’ असे वर्णन सिकंदरासोबत आलेल्या इतिहासकारांनी केलेले आहे.
तक्षशिलेतील शिक्षणपद्धती- टीप लिहा.
तक्षशिला हे विद्येचे व शिक्षणाचे केंद्र बनले होते.तक्षशिला अनौपचारिक विश्वविद्यालय बनले होते.
आचार्यांनी शिष्यांना काय शिकवावे व कसे शिकवावे, यावर राजसत्तेचे नियंत्रण नव्हते.अभ्यासक्रम ठरविण्याबाबत आचार्यांना स्वातंत्र्य होते.
विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत बुद्धिमत्तेनेनुसार त्याच्या शिक्षणाचा कालावधी ठरत असे. विद्यार्थी परिपक्व झाला की नाही, हे आचार्य ठरवत असत.
औपचारिक परीक्षा घेण्याची पद्धती नव्हती. किंबहुना परीक्षा ही खऱ्या ज्ञानाची कसोटी मानली जात नव्हती.
ंतक्षशिला येथे शिकवल्या जाणाऱ्या विषयांमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद सामवेद वेदांगे, प्राचीन परंपरा आणि नीतिशास्त्र तत्वज्ञान, गणित, संगीत, वैद्यक, पुराण, इतिहास, अस्त्रविद्या, काव्य यासारख्या अनेक विषयांचा समावेश होता.
प्रश्न- प्राचीन काळी तक्षशिला हे विद्येचे व शिक्षणाचे केंद्र होते. (तुमचे मत नोंदवा)
प्राचीन काळातील तक्षशिलेत अनेक विद्वान राहत होते.
या विद्वानांची कीर्ती ऐकून भारतीय उपखंडातील विविध प्रदेशातून अनेक विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येत असत.
त्याकाळात तक्षशिला अनौपचारिक विश्वविद्यालयाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सम्राट अशोकाच्या काळात तक्षशिला हे बौद्ध परंपरेचा शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनले होते.
त्यामुळे तक्षशिला हे प्राचीन काळी विद्येचे आणि शिक्षणाचे केंद्र बनले होते.
परंतु इसवीसनाच्या पाचव्या शतकात खुणांच्या आक्रमणामुळे तक्षशिला नगराचे विद्या वैभव हळूहळू नष्ट होत गेले.
चंद्रगुप्त मौर्य वयाने लहान असताना आचार्य चाणक्यांनी त्याला शिक्षणासाठी तक्षशिला येथे नेले, असे समजले जाते.
चाणक्य स्वतः तक्षशिलेचे रहिवासी होते. सम्राटपदी आल्यानंतर चंद्रगुप्त मौर्याने तक्षशिला येथे प्रादेशिक राजधानी स्थापन केली.
सम्राट अशोकाच्या काळात तपशील आहे बौद्ध परंपरेच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनले.
ग्रीक, शक, कुशाण यांच्या आक्रमणाच्या काळातही तक्षशिला येथील शिक्षणपद्धतीवर फारसा प्रतिकूल परिणाम झाला नाही.
परंतु इसवीसनाच्या पाचव्या शतकात हुणांच्या आक्रमणामुळे तक्षशिला नगराचे विद्यावैभव हळूहळू नष्ट होत गेले.
सिकंदराची स्वारी--
प्रश्न- सिकंदराच्या स्वारीचे वर्णन करा. (सविस्तर उत्तर लिहा)q
सिकंदराच्या स्वारी संबंधीची माहिती प्रामुख्याने एरियन, कर्टीस, डीओडोरस, प्लूटार्क आणि जस्टिन या ग्रीक इतिहासकार यांच्या लेखनातून मिळते.
इसवी सन पूर्व ३३४ मध्ये सिकंदर मॅसिडोनियाचा राजा झाला.
त्यानंतर इसवी सनापूर्वी ३३१ मध्ये अखोमिया सम्राट तिसरा दार्युश याचा त्याने पराभव केला.
त्यानंतर त्यावेळी त्याने इराणच्या ‘शिस्तान’ प्रांतापर्यंत मजल मारली आणि तेथून काबूलकडे मोर्चा वळवला.
काबूलच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतल्यानंतर तो हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याच्या प्रदेशात आला.
उत्तरापथावर वसलेल्या ‘नाइकिया’ येथे तक्षशीलेच्या राजा ‘आंभी’ याने त्याचे स्वागत करून त्याच्याशी हात मिळवणी केली.
शिसिकोटटस (शशीगुप्त) नावाचा राजा सिकंदराला स्वतःहून शरण आला.
काही राजांनी सिकंदराशी लढा दिला, परंतु ते पराभूत झाले.
यापैकी राजा पुरू (पोरस) आणि सिकंदर यांच्यात झेलम नदीच्या तीरावर निकराची लढाई झाली.
या लढाईत पुरू (पोरस) पराभूत झाला असला तरी त्याच्या पराक्रमाने सिकंदर आणि त्याचे सैन्य प्रभावित झाले.
पोरसच्या सैन्यातील हत्तींचा वापर ग्रीकांसाठी नवीन होता.
ग्रीक इतिहासकारांनी पुरुच्या युद्धकौशल्याचे आणि धीरोदात्ततेचे कौतुक केले आहे.
सिकंदराने काबुल, सिंध आणि पंजाब ही राज्य जिंकून घेतले.
निसा नावाच्या एका ग्रीक वसाहतीने सुरुवातीस सिकंदराला विरोध केला, मात्र नंतर त्यांनी त्याचे स्वागत केले.
चिनाब, रावी नदीच्या दिशेने पुढे जात तो बियास नदीपर्यंत पोहोचला.
अमोखनीय याच्या साम्राज्यातील सिंध, पंजाब, अफगाणिस्तान या प्रदेशातील कमकुवत राहते सिकंदरापुढे टिकाव धरू शकले नाहीत.
प्रश्न- ग्रीक इतिहासकारांनी पुरू राजाचे एकमुखाने कौतुक केले आहे. (सकारण स्पष्ट करा).
झेलम नदीच्या तीरावर सिकंदर आणि पुरु यांच्यात अत्यंत निकराची लढाई झाली.
पूरुच्या सैन्यातील हत्तींचा वापर हा ग्रीकांसाठी नवीन अनुभव होता. हत्तींची फळी फोडणे हे ग्रीक सैन्याला मोठे आव्हान ठरले.
पुरू राजाचा पराक्रम, युद्धकौशल्य आणि धीरोदात्तपणा पाहून स्वतः सिकंदरही प्रभावित झाला.
काबुल, सिंध,पंजाब प्रांतातील अन्य राजे सिकंदराला स्वतःहून शरण जात असताना, पोरसने मात्र धीरोदात्तपणे सिकंदराला तोंड दिले.
त्यामुळेच पोरसचा (पूरुचा) पराभव होऊनही इतिहासकारांनी त्याचे एकमुखाने कौतुक केले.
प्रश्न- सिकंदराच्या स्वारीचे भारताच्या राजकीय पटावर फारसे दूरगामी परिणाम झालेले नाहीत. ( सकारण स्पष्ट करा)
सिकंदराने भारताच्या वायव्येकडील भागावर आक्रमण करून अनेक प्रदेश जिंकले.
सिकंदराच्या मृत्यूनंतर थोड्याच काळात मगध सम्राट चंद्रगुप्त मौर्य याने वायव्येकडील प्रदेशावर आक्रमण करून तो प्रदेश जिंकला.
बिहार ते अफगाणिस्तान असा मोठा प्रदेश त्याच्या एकछत्री अंमलाखाली आला.
त्यामुळे सिकंदराच्या स्वारीचे भारताच्या राजकीय पटावर फारसे दूरगामी परिणाम झालेले नाहीत.
त्यामुळे सिकंदराच्या स्वारीचे भारताच्या राजकीय पटावर फारसे दूरगामी परिणाम झालेले नाहीत.
प्रश्न- भारतातून माघारी परतताना सिकंदराने जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था कशी लावली?
दीर्घकाळ चाललेल्या लढायांमुळे त्याच्या सैनिकांनी पुढे जाण्यास नकार दिल्याने सिकंदराला माघारी परतावे लागले.
सिकंदराने परतण्यापूर्वी जिंकलेल्या प्रदेशाची जबाबदारी वेगवेगळ्या राजांवर व ग्रीक सत्रपांवर सोपवली.
जेपंजाबमधील प्रदेश पूरुकडे सोपवला. सिंधमधील प्रदेशाचे अधिपत्य तक्षशीलेच्या राजा आंभी यांच्याकडे सोपवले.
वारणावतीचा राजा अभिसार याच्यावर काश्मीरची जबाबदारी दिली.
सिकंदराने परत जाण्यापूर्वी पुरुकडे पंजाबमधील प्रदेशांचे आणि आंभीकडे सिंधमधील प्रदेशांचे अधिपत्य सोपवले.
परतत असतांना इसवी सनापूर्वी ३२५ मध्ये तो बॅबिलोन येथे मरण पावला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा