सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरूष का म्हटले जाते ?
इंग्रजांनी भारतातील संस्थाने खालसा करताना त्यांच्याशी वेगळे करार करावे लागले होते.स्वातंत्र्याच्या १९४७ च्या कायद्याने ही संस्थानेदेखील स्वतंत्र होणार होती. त्यामुळे भारताचे अनेक छोटे-मोठे तुकडे होण्याचा धोका निर्माण झाला होता, पण वल्लभभाई पटेल यांचा मुत्सद्दीपणा व कणखरपणा, माऊंटबॅटन व नेहरूंचे आवाहन यांना यश येऊन जुनागढ, हैद्राबाद व काश्मीर हे वगळता बाकीच्यांचे शांततामय मार्गाने विलीनीकरण झाले.
जुनागढ व हैद्राबाद यांनादेखील भारताचे लोहपुरूष वल्लभभाई पटेल यांनी कोणतीही दयामाया न दाखवता पोलिसांप्रमाणे थर्ड डिग्रीच्या वापरासारख्या उपायांनी वठणीवर आणले व त्यांचे विलिनीकरण केले. काश्मीरच्या बाबतीत विलीनीकरण झाले ,परंतु त्यातून काही प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. वल्लभभाई पटेल यांच्या या कणखर धोरणामुळेच त्यांना भारताचे पोलादी पुरुष(लोहपुरूष)असे म्हटले आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते.१९३४ व १९३७ निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेसच पक्षाचे संघटनाही केले होते. 'भारत छोडो' आंदोलनातही ते आघाडीवर होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधानही होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा