कथा कॅलेंडरची : भाग २
ख्रिस्त धर्म -
१. ख्रिस्तीशक (इसवी सन)- प्रभू येशूचा जन्मदिनापासून ख्रिस्ती वर्ष प्रारंभ झाले.
इसवीसन वा इंग्रजी शक या नावाने ओळखले जाते.
त्यांचे वर्ष १ जानेवारीपासून प्रारंभ होते. कंसात महिन्याचे दिवस दिलेले आहेत.
१. जानेवारी (३१) - एक मस्तक समोर व दुसरे मागे वळून पाहणाऱ्या जॅन्यूस या देवाच्या नावावरून या महिन्याला जानेवारी म्हणतात.
२. फेब्रुवारी (२८) - रोमन लोकांच्या सण-उत्सवात वाजविले जाणारे फेब्रुआ हे वाद्य वा शुद्धीकरणाची देवता फेब्रुअस या देवतेच्या नावावरून या महिन्याला फेब्रुवारी असे म्हणतात.
असलेल्या इसवीसनाला ४ ने भागल्यावर जर भाग पूर्ण गेला, तर त्या वर्षी लीप वर्ष समजून फेब्रुवारी महिन्याचे २९ दिवस धरले जातात व ज्या वर्षाला ४ ने भाग जात नाही, त्या वर्षी फेब्रुवारी हा २८ दिवसांचा धरला जातो.
अर्थात दर ४ वर्षातून एकदा या महिन्याचे २९ दिवस येतात, त्याला लीपवर्ष असे म्हणतात.
सौरवर्षाची लांबी सूक्ष्ममानाने ३६५ दिवस, ५ तास, ४८ मिनिटे, ४५/३७ सेकंद एवढी आहे. ढोबळमानाने ३६५ दिवस धरतात.
त्यामुळे प्रत्येक वर्षाचा आरंभ ५ तास ४८ मिनिटे,४५/३७ सेकंद एवढ्या वेळाने मागे पडतो.
हा मागे पडणारा वेळ भरून काढण्यासाठी दर ४ वर्षांनी १ दिवस अधिक धरला जातो.
अर्थात त्यामुळे वर्षारंभ ४५ मिनिटे पुढे जातो व तो भरून काढण्यासाठी दर १०० वर्षांनी फेब्रुवारीची २९ तारीख धरत नाही.
३. मार्च (३१) - रोमन लोकांनी त्यांची प्रमुख देवता मार्स (मंगळ) या युद्ध व कृषीदेवतेचे नाव या महिन्याला दिले.
इंग्लंडमध्ये इसवी सन १७५२ पर्यंत हा वर्षारंभ महिना प्रसिद्ध होता.
जुलियस सीझरचे नवे कॅलेंडर सुरू करण्यापूर्वी मार्च हा महिना वर्षारंभाचा महिना म्हणून मानला जात असे.
येशू ख्रिस्ताची आई मेरी हिला मार्चमध्ये गर्भधारणा झाल्याने या महिन्याला विशेष महत्त्व आहे.
परंतु ८ व्या पोप ग्रेगरीने ग्रेगॅरियन हे कॅलेंडर सुरू केले.
इ.स. १५८२ च्या सुमारास कॅथालिक देशात जानेवारीला नववर्षाचा पहिला महिना मानण्यात आले व मार्च तिसऱ्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले.
४. एप्रिल (३०) - रोमन प्रेमदेवता ॲफ्रोडायटी (उमलणे) या शब्दावरून या महिन्याला एप्रिल हे नाव देण्यात आले.
पूर्वी या महिन्याला निरोनियस व ईस्टर अशी नावे होती.
५. मे (३१) - इटालियन देवता माय मॅजेस्टा किंवा मेय, मिअ - रोमन देवता हिच्या नावावरून वा ग्रीक पुराणातील हर्मिजयाची आई माय हिच्यावरून या महिन्याला मे हे नाव देण्यात आले आहे.
हा महिना कॅथालिक चर्चने कु. मेरीस अर्पण केला आहे.
६. जून (३०) - आकाशावर स्वामित्व असलेल्या ज्युपिटरची पत्नी जूनो (रोमच्या कॅपिटल ऑनलाइन टेकडीवर हे मंदिर आहे.) हिच्या नावावरून जूनला जून हे नाव प्राप्त झाले.
तर काहींच्या मते, जून शब्द लॅटिनमधील जंगर (जोडणे) शब्दावरून आला आहे.
रोमन्स व सॅबिन्स यांचा तह जून महिन्यात झाला,तर लॅटिनमधील ज्युनियर्स या शब्दावरून जून हा शब्द तयार झाला.
पूर्वी या महिन्याचे २६ दिवस होते. पण नंतर रोम्युलसने त्यात ४ दिवस घालून हा ३० दिवसांचा महिना केला.
हा महिना तीस दिवसांचा करण्यात ज्युलियस सिझरचा मोठा वाटा आहे.
७. जुलै (३१) - ख्रिस्ती पंचांगानुसार हा ७ वा महिना ३१ दिवसांचा असून, रोमन काळात १० महिन्यांचे वर्ष असताना, याचा क्रमांक ५;वा होता व तेव्हा त्याला क्विंटिलिस असे म्हणत. ज्यूलियस सीझरचा खून झाल्यावर त्याच्या स्मृत्यर्थ या महिन्याचे नाव ज्युलियस असे ठेवण्यात आले. याच महिन्यात ज्यूलियसचा जन्म झाला. अग्लोसॅक्शन लोक या महिन्याला हेगमंथ, हायमंथ (वैरिणीचा महिना) वा मिडमंथ महिना असे म्हणतात मध्ययुगात ज्युलियस हे नाव बदलून जुलै ठेवण्यात आले व आज ते प्रचलित आहे.
८. ऑगस्ट (३१) - जुलियस सीझरची बहीण ती जुलिया हि़च्या मुलीचा मुलगा ऑक्टोवियस हा ज्युलियस सीझर चाखून झाल्यावर त्याचा वारसदार म्हणून रोमचा राजा झाला तसा त्याच्या पुढच्या महिन्याला माझे नाव द्या, अशी ऑगस्टसने इच्छा व्यक्त केली. तेव्हापासून त्याच्या नावाने या महिन्याला ऑगस्ट असे नाव देण्यात आले.
९. सप्टेंबर (३०) - लॅटिन मधील सप्टेम ( सेव्हन) या नावावरून या महिन्याचे नाव ठेवण्यात आले.
१०. ऑक्टोबर (३१) - पूर्वी या महिन्याला जर्मेनिक, ॲंटोनिनस, हर्क्युलस इत्यादी नावे होती. पण लॅटिन भाषेत आक्टो - ८ म्हणून या महिन्याला ऑक्टोबर असे नाव देण्यात आले.
११. नोव्हेंबर (३०) - लॅटिनमधील नोव्हम या शब्दावरून या महिन्याला नोव्हेंबर असे म्हणतात.
१२. डिसेंबर (३१) - रोमन पंचांगात पूर्वी हा महिना १० वा होता. लॅटिन भाषेत १० (डेसम,डोसम) या अंकावरून या महिन्याचे नाव डिसेंबर ठेवण्यात आले.
ग्रेगोरियन कॅलेंडर - आज आपण जे जानेवारी ते डिसेंबर महिने पाहतो, त्यात शेवटचा बदल इ.स.१५८२ मध्ये झाला.
ग्रेगोरियन कॅलेंडर हे १३ वा पोप ग्रेगोरी यांच्या आदेशानुसार ४ ऑक्टोबर १५८२ रोजी अस्तित्वात आले.
जुलियस कॅलेंडर ख्रिस्तोफर जर्मन खगोलशास्त्रज्ञांनी सुधारित पद्धतीने तयार केले.
इस्लाम धर्म-
१. हिजरी सन-मासांची गणना पूर्णत: चांद्रमासावर अवलंबून आहे. यांचा दिवस संध्याकाळपासून सुरु होतो, तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत असतो. कारण इस्लाम धर्म संस्थापक प्रेषित महम्मद पैगंबर इसवीसन १५ जुलै ६२२ ला मक्केहून मदिनेला रात्री गेले. तेव्हापासून ही गणना सुरू झाली. त्यांचा नूतनमहिना चंद्र दर्शनाचे दुसऱ्या दिवसापासून सुरू होतो. त्यांच्या महिन्यांची नावे - १.मोहरम २. सफ्फर ३.रबिलावल ४. रबिलाखर ५.जमादिलावल ६.जमादिलारवर ७.रज्जब ८. साबान ९. रमजान १०.सव्वाल ११.जिल्काद १२. जिल्हेज. यामध्ये अधिक महिना वगैरे धरत नसल्याने सौरवर्षाशी मेळ बसत नाही व सुमारे ३३ महिन्यांनी यांचे नूतन वर्ष एक महिन्याने सौरवर्षापुढे जाते.
२. फसली सन - फसली सण म्हणजे प्रेरणा. ७ जून १६२६ साली अकबराने मृगनक्षत्रापासून या सणाचा प्रारंभ केला.
३. अरबी सन -इ.स.७ जून ५९९ या सणाचा प्रारंभ हिंदूंच्या चंद्र व सूर्य यांच्या गतीला मेळ बसवून केला आहे.
४. इलाही - हा सन अकबराने २९ व्या राज्यवर्षी चालू केला.
५. जव्हार- ही कालगणना जव्हारच्या संस्थानिकांनी दिलेल्या संनदात व त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात चालू होती. जव्हार घराण्यातील नेमीशाह यास शके १२६५ ज्येष्ठ शु,||१२|| दिवशी शाह हा किताब मिळाला. त्याच्या स्मरणार्थ हा काल ठरविण्यात आला.
६. जुलूस -काही मुसलमान राजांनी आपल्या काही लहानसहान कार्यक्रमाच्या निमित्ताने कालगणना सुरु केली.
७. तुर्की -हिजरी कालगणना वसुलीच्या दृष्टीने गैरसोयीची होऊ लागल्याने २२ मार्चचा प्रारंभ होणारा हा तुर्की शक प्रचलित झाला. तुर्की वर्षचक्र इस्लाम राष्ट्रांनी स्वीकारून त्यातील १२ महिन्यास जनावरांची नावे दिली.
८. मब्लुदी - ही कालगणना टिपू सुलतानाने चालू केली. मब्लुदी म्हणजे जन्मासंबंधी कालगणना. हिंदू कालगणना व टिपू यांची कालगणना यांच्यात जरासा फरक आहे.
पारशी धर्म -
सध्या यांच्या प्रत्येक महिन्याचे ३० दिवस धरतात. त्यामुळे त्यांचे वर्ष ३६० दिवसांचे होते. सौरवर्षाशी मेळ घालण्यासाठी शेवटचे पाच दिवस ते गाथा या नावाने पाळतात.
तरीसुद्धा त्यांचा सौरवर्षाशी वेळ बसत नाही. कारण ३६५ दिवसांचे वर्ष असे म्हणत असलो तरी, प्रत्यक्षात अंदाजे ३६५.२५ दिवसांचे वर्ष होते. म्हणून वरचा फरक जाणवतो. यांच्यामध्ये इराणमध्ये अधिकमास पाळणारे लोक आहेत. ते १२० वर्षांनी एक अधिकमास पाळतात, त्याला कबीस असे म्हणतात.
अधिकमास मानणाऱ्या पंथाला ‘कदमी’ असे म्हणतात.तर अधिकमास न पाळणाऱ्या पंथाला ‘शहानशाही’ असे म्हणतात.
बौद्ध धर्म-
इसवीसन पूर्व ५४३ ला गौतम बुद्धांच्या निर्वाण दिनापासून वैशाखी पौर्णिमेला या शकांचा प्रारंभ झाला.
जैनधर्म - त्यांची नावे वसंत कुसुम संभव नि दान विरोधी अभिनंद शिवप्रतिष्ठान विजया प्रति वर्धन श्रेयान शिव शिशिर जवान इत्यादी सर्व धर्मातील लोक आठवड्यातील एक दिवस विश्रांतीसाठी वापरतात.
रविवार - ख्रिस्ती व हिंदू, सोमवार - ग्रीक, मंगळवार - इराणी, बुधवार - असिरीयन, गुरुवार - इजिप्शियन, शुक्रवार - तुर्की व मुस्लिम, शनिवार - ज्यू. असे आहे विश्वाचे कालमापन.
कालगणनेसाठी आपल्याकडे आपल्या पूर्वजांनी तिथी, वार, नक्षत्र, योग, करण या पाच अंगानी कालगणनेचे ज्ञान देणारे पंचांग निर्माण केले.
कालगणनेसाठी भारतीयांनी अनेक पद्धतींचा स्वीकार केला.
आपण ज्याला वर्ष म्हणतो, त्याला शक असेही म्हणण्याची पद्धत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा